written by Khatabook | September 10, 2022

ब्रँडिंग म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

×

Table of Content


ब्रँडिंग प्रक्रियेमध्ये विविध तंत्रांचा समावेश केला जातो, यामधील प्रत्येकाला प्रश्नात उत्पादनाविषयी सुसंगतता निर्माण करण्यासाठी तयार केले जाते. गेल्या काही वर्षापासून, ब्रँडिंग संकल्पनेमध्ये अंमलबजावणीच्या दृष्टीने अभूतपूर्व बदल झालेला पाहायला मिळतं आहे. पार्श्वभूमी बॅनर आणि ब्रँडिंग स्टँडीपासून ते लघुपट आणि व्यावसायिक जाहिरात, ऑनलाईन काॅन्टेस्ट, मजेदार उपक्रम, मोफत गोष्टी आणि अजूनही बऱ्याच घडामोडी ब्रॅंडिंगमध्ये होत आहेत. आज, तुमच्याकडे संगीताच्या इव्हेंटमध्ये फूटवेअरचे समर्थन करणारे सेलिब्रिटी आहेत, गायक त्यांच्या गाण्यांमध्ये ब्रँडच्या नावांचा वापर करतात आणि मुलाखतीच्या वेळी प्राॅडक्ट किंवा सेवेचा उल्लेख करतात. ब्रँडिंगचा अर्थ अगदी स्पष्ट शब्दात संदेश देतो आणि टार्गेट प्रेक्षकांना काय हवंय, याविषयी पूर्वकल्पना देतो. मार्केटिंगमध्ये ब्रँडिंग उत्पादन जागरूकता वाढवण्यात मदत करते. तसेच, ते व्यवसाय आणि संस्थेची मूल्ये स्पष्ट करून प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण करते. ब्रँडिंगला सीमा नाहीत, तुम्ही त्याचा कसा वापर करता त्यावर त्याची विशेषता अवलंबून आहे. ब्रँडिंग हा सर्व-शक्तिशाली उपक्रम आहे जो लोगो डिझाईन करण्यापासून सुरू होतो.

तुम्हाला माहीत आहे का?

Airbnb च्या एका प्रमोशनल व्हीडिओला 3.5 मिलियन व्ह्यूज मिळाले कारण त्यांची पंचलाईन, "जादुई अनुभव जे यजमान पाहुण्यांसाठी आणतात." ही होती.

मार्केटिंगमध्ये ब्रँडिंग म्हणजे काय?

ग्लोबलायझेशनमुळे बाजारपेठात लाखो उत्पादन ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहेत. बरेच एकमेकांसारखे असतात, तर इतरांचे काही वेगळे पैलू असतात. काही उत्पादने त्यांच्या समकालीनांसारखी असली तरी काही फरक पडत नाही. कारण, काही ब्रँड्सना अधिक चांगले आणि अधिक विश्वासार्ह म्हणून मान्यता मिळालेली असते. लोक त्यांच्याशी लगेच कनेक्ट होतात. ब्रँडचा त्यामागचा उद्देश कधीच बदलत नाही आणि म्हणूनच समर्पित ग्राहक प्रत्येक दिवसांगणीक वाढतच राहतात.

मॉल्स, कमर्शियल आउटलेट्स आणि सिनेमा हॉलमध्ये किंवा कुठेही गेला तरी लोक त्या विशिष्ट ब्रँडसाठी विचारत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. ते ही जादू कशी करतात हा मोठा प्रश्न आहे?  येथेच ब्रँडिंग खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ही जादू व्हॅल्यू मेसेजिंगमध्ये आहे, जी ब्रँडच्या ओळखीचा पाया घालते.

त्यांचे टार्गेट प्रेक्षक ब्रँडचे नाव न वाचताही प्रत्येक मार्केटिंग उपक्रमाला त्वरित ब्रँडशी जोडतात.

Nike चे 'राईट-टिक' चिन्ह आणि त्यांची टॅगलाईन 'जस्ट डू इट' हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे तीन शब्द ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पुरेसे आहेत.

हेही वाचा : बिजनेस विकासाविषयी सर्व काही जाणून घ्या

Airtel ने दूरसंचार क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर प्रवेश केला होता, परंतु आज ते सर्वांत टाॅपच्या कंपन्यांपैकी एक आहे. यांचा लोगो पारंपारिक वर्णमालेतील 'A' ची ऊर्जा आणि गतिशीलता व्यक्त करतो. त्याच्या मार्केटिंग संप्रेषणात त्याच्या विविध टॅगलाईनने ग्राहकांना आकर्षित केले आहे. त्यांच्या काही क्लासिक टॅगलाईन खाली दिल्या आहेत:

  • Airtel टेली-सर्व्हिसेसमध्ये 'एक्सप्रेस युवर सेल्फ, 'भारताचे पहिले 4जी नेटवर्क', सामील आहे.
  • Airtel बँकिंगमध्ये हे समाविष्ट आहे, 'बँकिंग आता तुमच्या बोटांवर, भारताची पहिली पेमेंट्स बँक.'

टॅगलाईन्स वाचल्या तर त्या आपल्याशी बोलत आहेत असं वाटत. ते स्पष्ट आहेत आणि ब्रँड संदेशाचा बडेजाव न करता सेवेविषयी निश्चित विधान करतात. जेव्हा ते म्हणतात, 'बँकिंग तुमच्या बोटांवर, याचा अर्थ असा होतो की तुम्ही पेमेंट्स सुरू करू शकता आणि बहुतेक Airtel ग्राहक हे सोयीस्कर फिचर वापरतात. 

लोक ब्रँडच्या बांधिलकीशी संबंधित आहेत. एकदा का विश्वास घट्ट झाला की, ग्राहकाला दुसऱ्या ब्रँडकडे काहीही आकर्षित करू शकत नाही. जेव्हा असे घडते, तेव्हा उत्पादन किंवा सेवेमध्ये किंचित भाववाढीवर वादविवाद होत नाहीत कारण, ग्राहकांचा ब्रँडवर पूर्ण विश्वास असतो. इतर टेलिकॉम ऑपरेटर्स कमी दर आणि चांगले पॅकेजेस देत असले  तरी, Airtel त्याच्या निर्दोष नेटवर्क आणि ब्रँडिंगमुळे राज्य करत आहे. ब्रँडच्या अनुभवामुळे किंमतीत किंचित वाढ झाल्याने त्यांचे ग्राहक कमी झाले नाहीत. असंख्य मूल्यवर्धित सेवांबरोबरच Airtel च्या थीमवर आधारित जिंगल्समुळे भारतातील मित्र-मैत्रिणींविषयी आणि परदेशी ठिकाणांविषयी ग्राहकांमध्ये उत्साह संचारतो.

यामुळे Airtel चे ग्राहक नसलेल्यांमध्ये ही कुतूहल निर्माण होते आणि ते सुंदर दुनीयेच्या शोधात ऑफलाईन स्टोअरला भेट देतात. 

चुकून खराब झालेला ग्राहकाचा स्मार्टफोन दुरुस्त करण्याचे Airtel ने दिलेले आश्वासन हे त्याचे अतिशय प्रभावी उदाहरण आहे. Airtel डिव्हाईसच्या मोफत पिक-अपची खात्री देते, त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये फोन दुरुस्त करते आणि ग्राहकांनाही ते वितरीत करते. मार्केटिंगद्वारे जाहिरात केलेल्या या ब्रँडिंग सेवा ग्राहकांच्या ब्रँडवरील विश्वासाची पुष्टी करतात कारण ते वाढतच आहे. अशा प्रकारे, एक संस्था म्हणून, तुम्ही तुमच्या मार्केटिंग उपक्रमांद्वारे तुमची मुख्य दृष्टी स्पष्ट करता. ग्राहकांना तुमच्या ब्रँडशी जुडण्याचे विविध फायदे आणि त्यांना सातत्याने काय मिळते हे समजते.

मार्केटिंगमधील ब्रँडिंग म्हणजे 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करणे आणि पॉवर-पॅक्ड मार्केटिंगद्वारे ते चॅनेल करणे होय. काहीतरी अद्वितीय, वेगळे, आश्वासक आणि विश्वासार्ह काय आहे हे समजण्या एवढे ग्राहक हुशार असतात. सर्व एअरलाईन्स आपल्याला आरामदायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणाची खात्री देतात. तथापि, एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी उद्धट किंवा उद्धटपणा केल्याची अनेक उदाहरणे आहेत. एक घटना ब्रँडच्या ओळखीला आणि मूल्यांना कायमची हानी पोहोचवू शकते. मार्केटिंगमधील ब्रँडिंग ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक शक्तिशाली चॅनेल म्हणून काम करते. ब्रॅंडिंग योग्य प्रेक्षकांना योग्य संदेश, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट उत्पादने आणि सेवांच्या वचनांसह ब्रँडच्या मूल्याचा प्रचार करण्यासाठी योग्य धोरण म्हणून काम करते.

ब्रँडिंग महत्त्वाचे का आहे?

ब्रँडिंग फक्त ऑफलाईन ब्रँडिंग आणि जाहिरातींद्वारे ऑनलाईन संदेशांपुरते मर्यादित नाही. तुमच्या मार्केटिंगचा प्रत्येक पैलू तुमचे ब्रँडिंग प्रतिबिंबित करतो. आपले इन-स्टोअर आणि टेलीमार्केटर्स आपल्या ग्राहकांशी कसे बोलतात, त्यांच्या तक्रारी समजून घेणे आणि समस्यांचे निराकरण करण्याची त्यांची वचनबद्धता ब्रँडच्या संस्कृतीचे वर्णन करते. प्रभावी ब्रँडिंग आपल्याला स्वत:ची जागा तयार करण्यात मदत करते. तुमचे स्पर्धक कदाचित सारखी उत्पादने विकत असतील, पण तुम्ही तुमच्या क्लायंटला सातत्यपूर्ण सेवेचे वचन देऊन शक्तिशाली ब्रँड मेसेजिंगचा सराव करता, तेव्हा तुम्ही वेगळी ओळख निर्माण करता.

जेव्हा तुमच्या मार्केटिंगमध्ये तुमच्या ब्रँडचा उद्देश प्रामाणिक, पारदर्शक आणि सकारात्मक म्हणून ओळखला जातो, तेव्हा तुमच्याकडे बाजारातील एक मौल्यवान गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. जर तुम्ही या बाबतीत तुमची ब्रँड प्रतिष्ठा प्रस्थापित करू शकलात, तर तुम्ही नवीन लॉन्चच्या पुढे असाल. ब्रँडिंग हे गोष्ट सांगण्यासारखे आहे. याच कारणामुळे टाटा समूह हा सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहे.

ब्रँड त्याच्या गुणवत्तेचे वचन कधीही विसरत नाही. यामुळे भावनिक बंध प्रस्थापित करण्यात मदत झाली जी वर्षानुवर्षे मजबूत होत गेली. ते विविध उद्योगांमधील ब्रँड आणि त्यांची विविधता, दृष्टी, रोजगाराच्या संधी, ग्राहकांचे समाधान आणि सामाजिक जबाबदारी याविषयी बोलते.

टाटा समूहाचा लोगो डिझाईन हे प्रेरणेचे प्रतीक आहे. याचा अर्थ 'ज्ञानाचे वृक्ष' असा आहे आणि विविध उपकंपन्यांनी ते वचन पूर्ण केले आहे, हे खरे आहे. ऑटोमोबाईल्स, एअरलाईन्स, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी, लक्झरी वेअर, इलेक्ट्रिसिटी, ई-कॉमर्स आणि ऑप्टिकल्समध्ये तुम्हाला टाटाची उपस्थिती मिळू शकते. ब्रँडची वाढ विश्वासाच्या आधारावर आधारित आहे, जी त्यांनी त्यांच्या मार्केटिंगद्वारे अत्यंत सन्माननीय पद्धतीने मांडली आहे.

ई-कॉमर्समध्ये ब्रँडिंग का महत्त्वाची आहे?

डिजिटायझेशनमुळे ग्राहक भारावून गेले आहेत आणि वेब वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या विविध उत्पादनांनी भरले आहे. ई-कॉमर्समध्ये ब्रँडिंगचे महत्त्व म्हणजे जगभरातील विविध ग्राहकांना टार्गेट करून तुमची ब्रँड इक्विटी भक्कमपणे तयार करणे होय. याचाच अर्थ असा आहे की भिन्न ब्रँड व्हॅल्यू तयार करून स्पर्धकांचा पराभव करण्यासाठी आणि  त्यांना मागे टाकण्यासाठी स्वत:ला तयार करणे होय. प्लॅटफॉर्मवर तुमची ब्रँड इक्विटी वाढवण्या आणि ब्रँड निष्ठा तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायांवर उभे राहणे आवश्यक आहे.

तुमचा संदेश सुरुवातीला तुमच्या ऑनलाइन मार्केटिंगमध्ये अतिशय स्पष्ट आणि सुसंगत असायला पाहिजे. हे ग्राहकांना आणि संभाव्य भागीदारांना तुमच्या व्यवसायाच्या उद्देशाचे आणि दृष्टीचे स्पष्ट संकेत देते. तुमचे ब्रँडिंग आशावादी असले पाहिजे आणि प्रत्येकाला तुमची मूळ मूल्ये समजायला मदत झाली पाहिजे.

एकदा का हा समज प्रस्थापित झाला की, मग तुमच्या ग्राहकांची निष्ठा दीर्घकाळ टिकेल. ई-कॉमर्समध्ये, ग्राहकांनी इतरांपेक्षा तुमची उत्पादने का निवडावीत हे तुम्हाला सहजरित्या परंतु ठामपणे सांगता यायला पाहिजे. तुम्हाला अत्यंत नम्र ग्राहक संवाद, वितरण आणि विक्रीनंतरची सेवा सुनिश्चित करावी लागेल. तुमचे लक्ष्यित प्रेक्षक ओळखण्याचे योग्य संशोधन तुम्हाला तुमच्या ब्रँडची वेगाने जाहिरात करण्यास सक्षम करेल आणि यामुळे त्यांना त्यांचा ब्रँड आणि त्याची आश्वासने ओळखण्यास मदत होईल.

एकदा का त्यांना तुमचा ब्रँडचा मेसेज समजला की बांधिलकी निर्माण होते आणि तुम्हाला असे अनेक निष्ठावंत ग्राहक सापडतात, जे मौखिक प्रचार करायला तुमची मदत करतील. तुमचा ब्रँडिंग संदेश ई-कॉमर्स प्रेक्षकांना तुमचा ब्रँड काय सूचित करतो, त्याची मूलभूत मूल्ये आणि त्याच्या समकालीनांमध्ये ते कशामुळे खास आहे, हे समजायला सोप्पं बनवते.

हेही वाचा : टिकल्यांचा बिजनेस कसा सुरू करायचा?

निष्कर्ष

हा लेख मार्केटिंग आणि ई-कॉमर्समध्ये ब्रँडिंगची भूमिका स्पष्ट करतो. ब्रँडिंगचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे संदेशाची सुसंगतता होय. एखाद्या ब्रँडसाठी वेगळा संदेश देणे तुम्हाला परवडणारे नाही कारण यामुळे ग्राहकांमध्ये संशय निर्माण होवू शकतो. एक सुसंगत आणि अस्सल ब्रँड संदेश तुमच्या दृष्टीच्या गंभीरतेवर जोर देतो. ब्रँडिंग तुमच्या बिजनेसला बरेच फायदे मिळवून देते. ब्रँडिंग एखाद्या विशिष्ट प्रदेशाशी जुळवून घेता येण्याजोगे असले पाहिजे. तुम्हाला लोकांच्या अपेक्षा समजून घ्याव्या लागतील आणि त्यानुसार तुमच्या ब्रँड मार्केटिंगद्वारे त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम व्हावे लागेल. 

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: ब्रँडिंग म्हणजे काय?

उत्तर:

ब्रँडिंग हे प्रत्येक बिजनेसचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. तुमच्या संस्थेचे ब्रँडिंग ब्रँड लोगो, डिझाईन आणि रंगांनी सुरू होते आणि संस्थेच्या मूल्यांसह संपते. हे ग्राहकांसाठी तुमची दृष्टी व्यक्त करते. ब्रँडिंगमध्ये ब्रँड लोगो आणि टॅगलाईन प्रभावीपणे प्रदर्शित करणे समाविष्ट आहे जेणेकरून ग्राहकांना तुमची उत्पादने आणि सेवा समजण्यास मदत होईल.

प्रश्न: ब्रँडिंगची व्याख्या कशी समजून घेतली जावू शकते?

उत्तर:

व्यवसाय लहान असो वा मोठा, प्रत्येकाची ब्रँड ओळख निश्चित करून त्याला चांगल्या प्रकारे समजून घेतल्या जावू शकते. ब्रँडिंगमध्ये तुमच्या व्यवसायाची दृष्टी आणि ग्राहकांची सेवा करण्याची योजना कशी आहे हे स्थापित करणे समाविष्ट आहे. ब्रँडिंग हे संप्रेषणाचे एक शक्तिशाली चॅनेल आहे ज्यामध्ये कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी सातत्याने काही तरी नवीन करत असते.

प्रश्न: व्यवसायाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि त्याच्या मूलभूत मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करणारे विविध ब्रँडिंग प्रकार कोणते आहेत?

उत्तर:

ब्रँडिंगचे चार मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे:

वैयक्तिक - विविध प्रकारच्या उत्पादनांसह व्यवसायात, प्रत्येक उत्पादनास एक अद्वितीय ब्रँड नाव दिले जाते.

दृष्टिकोन - यात भावनांनी भरलेला दृष्टिकोन प्रस्थापित करणे समाविष्ट आहे. बऱ्याचदा, बिजनेस हाउसेस त्यांच्या ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी सेलिब्रिटींच्या सेवांचा वापर करतात.

ब्रँड एक्स्टेंशन - मूळ कंपनी एकच आहे, पण उत्पादने वैविध्यपूर्ण आहेत. टाटा समूहाचे आदर्श उदाहरण आहे. त्यांचे काही ब्रँड विस्तार खालीलप्रमाणे आहेत: टायटन टाइमपीसमध्ये डील करते, वेस्टसाइड हे त्याचे कपड्यांचे ब्रँड एक्स्टेंशन आहे, फार्मसी उत्पादनांमध्ये 1mg आणि तनिष्क ज्वेलरीमध्ये सामील आहे.

खासगी-लेबल ब्रँडिंग - या प्रकारच्या ब्रँडिंगमध्ये एखादा व्यवसाय खाजगी लेबलचा म्हणजेच त्यांच्या ब्रँडअंतर्गत विकल्या गेलेल्या दुसऱ्या प्रस्थापित व्यवसायाने तयार केलेल्या लेबलचा आधार घेतो.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.