written by Khatabook | April 30, 2022

टिकल्यांचा बिजनेस कसा सुरू करायचा?

×

Table of Content


काही वर्षाआधी सौभाग्याचे लेणे म्हणून कुंकवाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. आता ही केला जातो. पण, सध्याच्या या आधुनिक युगात कुंकवाची जागा टिकलीने घेतली आहे. यामुळे टिकली आता फक्त सौभाग्याचे लेणे म्हणूनच ओळखली जात नाही. तर सर्वच महिला आणि मुलीसुद्धा नवीन ट्रेंडनुसार विविध प्रकारच्या टिकल्या फॅशन म्हणून लावताना दिसत आहेत. यामुळे भारतातील स्त्री वर्गाची संख्या पाहिल्यास, टिकली बिजनेसला सर्वाधिक वाव आहे. तसेच, टिकलीचा बिजनेस सुरू करायला लागणारा खर्च ही खिशाला परवडणारा आहे. चला तर मग टिकली बिजनेस सुरू करायला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. याची सर्व माहिती घेवूया.

टिकली बिजनेसचे महत्व

टिकली ही फक्त सौंदर्य खुलवण्यापुरतीच मर्यादित नसून भारतीय स्त्रीचे सौभाग्याचे लेणे आहे. विशेष म्हणजे महिलांच्या 16 श्रृंगारमध्ये कुंकवाचा समावेश होतो. ज्याची जागा ही टिकलीने घेतली आहे. त्यामुळे टिकली ही स्त्रीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक स्त्री कपाळावर टिकली लावतेच. स्त्रिया टिकल्यांचा वापर कपड्यांच्या कलर कॉम्बिनेशननुसार करतात. म्हणून सर्वंच महिलांजवळ त्यांचे टिकल्यांच्या डिझाईनचे सुंदर कलेक्शन असतेच. तसेही ज्या वस्तू स्त्रिया वापरतात, त्या वस्तूंची मार्केटमधील मागणी कधीच कमी होत नाही. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आधी टिकली फक्त परंपरा म्हणून वापरली जायची. पण, आता तसे राहिलेले नाही, आजच्या आधुनिक युगात टिकली ही फॅशन म्हणून लावली जाते. म्हणून टिकल्या तयार करण्याच्या बिजनेसचे महत्व वाढले आहे. कारण, प्रत्येक सण,लग्न-समारंभ आणि वाढदिवस सेलिब्रेशेन्समध्ये महिला कपड्यांवर शोभतील अशा टिकल्या  लावतात. त्यामुळे टिकल्यांच्या मार्केटचा विस्तार वाढला असून टिकलीने स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे. तसेच, छोट्या उद्योजकांना बिजनेस करण्यासाठी नवीन वाट उघडली आहे. म्हणून, हा बिजनेस सुरू केल्यास कमी बजेटमधून चांगली कमाई करता येईल. तसेच, या बिजनेसचे मार्केट मोठे असल्याने व्यापारी वर्ग शोधायला ही जड जाणार नाही.

हेही वाचा : भारतातील 'या' खास चाॅकलेट ब्रॅंडविषयी माहिती आहे?

टिकलीचा बिजनेस सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी

टिकली बनवण्याच्या बिजनेसमध्ये उतरताय म्हटल्यावर, खाली दिलेल्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

टिकल्या तयार करण्यासाठी कच्चा माल

हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे घटक लागणार आहे. यात प्रामुख्याने वेल्वेटचा समावेश आहे. तसेच, रंगीबिरंगी खडे, मणी, गोंद या वस्तू वेल्वेटवर सजावट करण्यासाठी लागणार आहेत. एकदा टिकली तयार झाल्यावर, तिची पॅकेजींग कशी करायची हेही तुम्हाला ठरवायचे आहे. चला तर मग टिकली तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल गरजेचा आहे ते पाहूया.

 • वेल्वेटचा कापड किंवा स्टिकर
 • रंगीबिरंगी खडे
 • मणी
 • गोंद
 • पॅकेजिंग साहित्य

टिकली तयार करण्यासाठी मशीन्स

टिकली तयार करण्यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मशीन. या मशीन्स असल्यास तुमचे काम खूप सोपे होईल. सध्या टिकल्यांची मागणी वाढल्यामुळे या मशीन्स तुम्हाला शहरातून सहज उपलब्ध होतील. कोणत्या मशीन्स आवश्यक आहेत ते जाणून घेवूया. 

 • अडहेसिव्ह कोटिंग मशीन
 • ड्रायिंग मशीन
 • टिकली मोल्ड्स
 • टिकली पंचींग मशीन
 • टिकली प्रिंटिंग मशीन
 • पॅकेजिंग मशीन

वर ज्या मशीन्स आहेत, त्यांची मार्केटमध्ये कमी-अधिक किंमत असू शकते. त्यामुळे तुमचा बजेट कमी असल्यास, तुम्ही हातानेही टिकल्या बनवू शकता. फक्त यातील टिकली कटिंग आणि प्रिंटिंग मशीन असल्यातरी तुमचे काम होवू शकते. जसाजसा तुमचा बिजनेस वाढेल त्यानुसार तुम्ही मशीन्स खरेदी करू शकता. सहसा तुम्हाला टिकली बनवण्यासाठी ज्या मशीन्स गरजेच्या आहेत तेच निवडा.

टिकली बनवण्याची प्रक्रिया

 • टिकली कटिंग

चांगल्या गुणवत्तेच्या वेल्वेट कापडाला पंचिंग मशीनमध्ये ठेवून पाहिजे तेवढ्या प्रमाणात कटिंग मशीनच्या मदतीने कट केले जाते.

 • टिकली पंचिंग

पंचिंग मशीनचा वापर करून पंचिंग केले जाते, म्हणजे वेल्वेट कापडाच्या विविध आकारात प्लेन टिकल्या तयार केल्या जातात.

 • टिकलीवर प्रिंट

आजकाल फॅंन्सी टिकलीचा वापर सर्वाधिक होते. त्यात स्टोन आणि विविध डिझाईनचा वापर केला जातो. अशा प्रकारचे डिझाईन तयार करण्यासाठी प्रिंटिंग मशीनचा वापर करून टिकलीवर प्रिंट केले जाते.

 • गोंदाचा वापर

गोंदाचा वापर टिकलीला चिकटवण्यासाठी केला जातो आणि ते टिकलीच्या दुसऱ्या बाजूला लावण्यात येते. त्यानंतर ते सर्व टिकल्या सुकवण्यासाठी ड्रायिंग मशीनसमोर ठेवण्यात येतात.

 • टिकल्यांचे पॅकेजिंग

एकदा टिकल्या तयार झाल्यानंतर ग्राहकाच्या मागणीनुसार त्या पॅक करण्यात येतात. 

टिकलीचे विविध प्रकार

सध्या चेहऱ्याच्या ठेवणीनुसार स्त्रियांचा कल टिकली घेण्याकडे वाढला आहे. तरी ही काही खास टिकल्यांचे प्रकार आहे ज्यांची मागणी आजही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. चला तर मग त्यांच्याविषयी जाणून घेवूया..

खाली काही महत्वाचे टिकलीचे प्रकार दिले आहेत.

 • खड्याची टिकली

पांढऱ्या खड्याच्या टिकल्याची फॅशन जुनी झाली असली तरी आजही कोणत्याही समारंभात किंवा पार्टीमध्ये पारंपरिक ड्रेसवर या टिकल्या लावलेल्या अनेक मुली दिसतात. यात आता वेगवेगळे कलर उपलब्ध असून प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग स्टोन लावणेही अनेक जणींना आवडते. म्हणजेच पांढऱ्या खड्यांच्या टिकल्या अजूनही फॅशनमध्येच आहेत.

 • फॅन्सी टिकली

अनेक छोट्या कंपन्या या उत्पादनात उतरल्याचे दिसत आहेत. फॅन्सी टिकल्यांमध्ये सगळ्या रंगांबरोबर मणी, मोती, खडे, कुंदन हे प्रकार आहेत. यामध्ये सिंगल खडा, डबल खडे, गोल खडा लावलेला असतो. टिकल्यांच्या प्रकारांप्रमाणेच टिकल्यांचे अनेक आकारही आहेत. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर किंवा साडीवर फॅन्सी टिकली खुलून दिसते.

 • विविध रंगांच्या टिकल्या

या टिकल्यांची फॅशन काॅलेज तरूणींमध्ये सर्वांत जास्त आहे. जसा ड्रेस तशी टिकली हे समीकरण या टिकल्यांचा पाया आहे. म्हणजे आजकाल जवळपास सर्वच रंगात टिकल्या उपलब्ध आहेत. मात्र, तरीही तरुणी टिकल्यांमध्ये निळा, जांभळा, हिरव्या रंगांच्या टिकल्या पसंत करतात. प्लेन साडीवर टिकली लावण्याची फॅशन आहे. तरुणी विविध रंगाच्या आणि आकाराच्या टिकल्या लावताना आढळतात.

 • वेल्वेट टिकली

काळानुरूप टिकल्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक पडू लागला आहे. विविध रंगांच्या, विविध आकारांच्या, विविध पद्धतींच्या वेल्वेटच्या टिकल्या सध्या मार्केटमध्ये येऊ  लागल्या आहेत. पण, लाल रंगाच्या वेल्वेट टिकल्याचे मार्केट अजूनही वाढतेच आहे. 

 • लग्न समारंभासाठी खास टिकली

नववधूसाठीच्या खास प्रकारच्या फॅन्सी टिकल्या बाजारांमध्ये विविध डिझाईन आणि आकारात उपलब्ध आहेत. नववधूप्रमाणेच नवरदेवासाठी अक्षता, खडे यांनी तयार केलेला टिळ्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच, मळवट टिकलीचा ट्रेंडही मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे आणि तेही पाहिजे त्या आकारांमध्ये.

बिजनेससाठी जागा व मॅन पावर

टिकली तयार करण्याचा बिजनेस घरबसल्या करता येण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला जागेचे भाडे वाचवायचे असल्यास, तुम्ही हा पर्याय निवडू शकता. जर तुमचा सेट अप मोठा असल्यास, तुम्हाला घराची जागा अपूरी पडू शकते. यासाठी तुम्हाला कमीतकमी 1000 चौरस फूट जागा आवश्यक असेल. याचबरोबर तुम्हाला वीज कनेक्शनचं ही पाहावे लागेल. 

बिजनेस सुरू करायचा बजेट कमी असल्यास, तुम्ही किमान 500-600 चौरस फूट क्षेत्रात बिजनेसचा आरंभ करू शकता. लोकेशन निवडताना पर्यावरणाची हानी किंवा इतराना काही त्रास होणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक आहे.  

याच बरोबर अजूनही एक महत्वाची गोष्ट बाकी राहिली. ती म्हणजे कामगार तेच नसतील तर कंपनी चालेल तरी कशी. तुमच्या कंपनीच्या बजेटनुसार तुम्ही कामगारांची निवड करू शकता. मोठा बजेट असल्यास, 7-8 कामगारांची गरज लागू शकते. त्यातही त्यांना निवडताना काही अनुभवी कामगाराची निवड करणे आवश्यक आहे.  

टिकली बनवण्याच्या बिजनेससाठी परवाना

बिजनेस सुरू करण्यासाठी काही महत्वाचे परवाने आवश्यक आहेत. खाली त्याची थोडक्यात माहिती दिली आहे. 

 • तुमचा बिजनेस छोटा असो की मोठा सर्वांतआधी तुम्हाला प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप फर्ममध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, तुम्ही जर वैयक्तिकरित्या काम करत असल्यास, ते प्रोप्रायटरशिप म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. 
 • भागीदारी ऑपरेशन्ससाठी, तुम्हाला LLP – किंवा खाजगी म्हणून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC) सह लिमिटेड कंपनी नोंदणीची निवड करावी लागेल.
 • GST नोंदणी: GST नियमानंतर अनिवार्य जीएसटी नंबरसाठी अर्ज करावा लागेल.
 • ट्रेड परवाना: तुमच्या बिजनेससाठी ट्रेड परवाना स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळवला जावू शकतो.
 • प्रदूषण प्रमाणपत्र: तुमची फर्म सुरू केल्यानंतर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून संबंधित विभागाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • ट्रेडमार्क: कंपनीच्या ब्रँडचे संरक्षण करण्यासाठी, ट्रेडमार्कसाठी नोंदणीही करून ठेवू शकता.

तुम्ही SSI युनिटसाठी नोंदणी केल्याची खात्री करा आणि नंतर तुमच्या बिजनेसच्या नावाने खाते उघडा. तसेच, विक्रीकरासाठी नोंदणी करा.

टिकल्यांचे मार्केट कोणते आहे?

सध्या किराणा शाॅप असो की स्टेशनरी असो, अशा ठिकाणी टिकल्यांचे तोरण दिसून येतात. त्याचबरोबर अजूनही बऱ्याच ठिकाणी टिकल्यांची विक्री होताना दिसत आहे. त्यांची गुणवत्ता चांगली असल्यास, तुम्हाला जास्त फिरण्याची गरज भासणार नाही. चला तर मग त्याविषयी सविस्तर जाणून घेवूया. 

 • रिटेल मार्केट

हा अतिशय चांगला पर्याय आहे जिथे तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमची उत्पादने सादर करू शकता. या रिटेल मार्केटच्या विक्रेत्यांसह नेटवर्क तयार झाल्यास, तुमच्या अडचणी कमी होतील. तसेच, त्यांच्याशी थेट संबंध आल्याने नफा मिळायला ही मदत होईल. शहराच्या जवळपास तुमची कंपनी असल्यास, तुम्हाला बरेच विक्रेते मिळू शकतात.

 • व्होलसेलर

बिजनेसच्या सुरूवातीला तुमच्या जवळ मॅन पावर कमी असल्यास, तुम्ही शहरातील व्होलसेलरसह नेटवर्क तयार करू शकता. त्यांचे नेटवर्क मोठे असल्याने तुमच्या मालाची मागणी तुम्हाला वाढलेली पाहायला मिळेल.

 • ऑनलाईन बिजनेस

आजकाल ऑनलाईनचे युग असल्याने तुम्ही तुमच्या वेबसाईटवरही तुमचा बिजनेस ऑनलाईन करू शकता. तसेच, इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरही तुमच्या टिकल्यांचे ऑर्डर्स घेवू शकता. काही प्रसिद्ध वेबसाईट आणि अप्लिकेशनचाही तुम्ही बिजनेससाठी वापर करू शकता. पण, त्यांच्या काही अटी व शर्ती असतात. ते पाहणेही गरजेचे आहे. बिजनेस ऑनलाईन आणल्यास, बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. तसेच, इतर खर्चही आटोक्यात राहतील.

याचबरोबर काॅस्मेटिक शाॅप, माॅल्स आणि सुपरमार्केटकडे ही तुम्ही पर्याय म्हणून पाहू शकता. 

गुंतवणूकीचा खर्च

टिकल्याचा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 1 लाख ते 3 लाखापर्यंत खर्च येवू शकतो. ज्या गोष्टीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्याची माहिती खाली दिली आहे. 

 • परवाना काढण्यासाठी खर्च करावा लागेल
 • कामगारांची सॅलरी द्यावी लागेल
 • मशीन्स घ्याव्या लागतील
 • कच्चा माल खरेदी करावा लागेल
 • अन्य ही काही छोटे-मोठे खर्च होवू शकतात. 

हेही वाचा : हिंदुस्तान पेट्रोलियमची फ्रेंचायजी कशी मिळवायची?

निष्कर्ष

तुम्हाला कमी बजेटमध्ये बिजनेस सुरू करायचा असल्यास, टिकलीचा बिजनेस सुरू करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. या आधुनिक युगात छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच महिला टिकल्यांचा वापर आवडीने करतात. तुम्हाला यासाठी फक्त मार्केटची मागणी पाहावी लागेल. तुम्हाला हा बिजनेस सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मांडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हाला बिजनेस सुरू करण्यासाठी ही माहिती कामी येईल. 

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: टिकल्या तयार करण्यासाठी आवश्यक मशीन्स कोणत्या आहेत?

उत्तर:

टिकल्या तयार करण्यासाठी मशीन्सची यादी खाली दिली आहे.

 • अडहेसिव्ह कोटिंग मशीन
 • ड्रायिंग मशीन
 • टिकली मोल्ड्स
 • टिकली पंचींग मशीन
 • टिकली प्रिंटिंग मशीन
 • पॅकेजिंग मशीन

प्रश्न: टिकल्या तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल पाहिजे?

उत्तर:

टिकली तयार करण्यासाठी खालील कच्चा माल आवश्यक आहे.

 • वेल्वेटचा कापड किंवा स्टिकर
 • रंगीबिरंगी खडे
 • मणी
 • गोंद

प्रश्न: टिकलीचा बिजनेस सुरू करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे?

उत्तर:

बिजनेसचा बजेट मोठा असल्यास, 1000 चौरस फूट जागा लागू शकते. बजेट कमी असल्यास, तुम्ही 500 ते 600 चौरस फूटमध्ये तुमचा बिजनेस सुरू करू शकता.

प्रश्न: टिकली बनवण्याच्या बिजनेससाठी परवाना लागतो का?

उत्तर:

होय, टिकली बनवण्याच्या बिजनेससाठी तुम्हाला तुमच्या कंपनीची नोदणी करावी लागते. तसेच जीएसटी नंबर, ट्रेड परवाना आणि प्रदूषण प्रमाणपत्र ही गरजेचे आहे.

प्रश्न: टिकल्याचा बिजनेस सुरू करण्यासाठी किती खर्च लागतो?

उत्तर:

टिकल्याचा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत खर्च येवू शकतो. 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.