written by Khatabook | July 4, 2022

बिजनेस विकासाविषयी सर्व काही जाणून घ्या

×

Table of Content


व्यवसाय विकास हा प्रत्येक व्यवसाय स्थिरस्थावर करण्यासाठीच्या प्रयत्नांचा महत्वाचा घटक आहे. व्यवसाय विकास व्यावसायिक कंपनीच्या कामगिरीचे मूल्यांकन करतात. तसेच, सुधारणा करण्यास कुठे वाव आहे का याविषयी ते पाहतात. या व्यवसायात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, त्यांच्याजवळ विशिष्ट कौशल्य असणे आवश्यक आहे.  

या लेखात, आम्ही तुम्हाला व्यवसाय विकास म्हणजे काय, कंपनीच्या यशात त्याचे महत्त्व किती असते याबद्दल माहिती देऊ. तसेच, व्यवसाय विकास तज्ज्ञ म्हणून कार्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, यावरही चर्चा करू.

तुम्हाला माहिती आहे का?

आरबीआयने 2020 मध्ये केलेल्या 1,246 स्टार्टअप्सच्या सर्वेमध्ये असे आढळले आहे की फक्त 3% कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे.

व्यवसाय विकास (बिजनेस डेव्हलपमेंट) म्हणजे काय?

कनेक्शन्स, बाजारपेठा आणि ग्राहकांच्या वाढीद्वारे मूल्य निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन तंत्राच्या विकासाला व्यवसाय विकास म्हटले जाते. एक व्यवसाय विकास तज्ज्ञ, ज्याला बऱ्याचदा व्यवसाय डेव्हलपर म्हणूनही ओळखले जाते. तो विशेषज्ञ व्यवसायांना त्यांचे उपक्रम आणि महसूल वाढवण्यात मदत करतो. फर्मसाठी ते एकतर पारंपारिक, पूर्ण-वेळ कर्मचारी म्हणून काम करतात किंवा स्वतंत्र सल्लागार म्हणून फक्त करारावर काम करतात. व्यवसाय डेव्हलपरचे दैनंदिन उपक्रम आणि त्यांचे धोरण या क्षेत्राच्या आधारावर बदलू शकतात, परंतु त्यांचे उद्दीष्ट समान राहते. 

व्यवसाय विकासाची भूमिका

काही व्यवसाय उत्स्फूर्तपणे वाढतात आणि थोड्याच काळात स्वत:ची जागा तयार करतात. काॅर्पोरेशन त्यांच्या विस्ताराचे काळजीपूर्वक नियोजन आणि धोरण न आखताच बिजनेसमध्ये उतरल्यास, त्यांना संसाधनासाठी आणि बजेटसाठी जोखिम घ्यावी लागू शकते. परिणामी, जर एखाद्या फर्मला व्यवसाय वाढवायचा आणि भरभराट करायची असेल, तर व्यवसायाच्या वाढीची शक्यता हे सर्वांत मोठे उत्तर असू शकते. एक स्मार्ट व्यवसाय डेव्हलपर  इतर व्यवसायांशी दीर्घकालीन युती तयार करू शकतो आणि वाढवू शकतो, परिणामी अधिक लीड्स आणि चांगले करार होऊ शकतात. तसेच, कंपनी रोख रक्कम, मालमत्ता किंवा कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ न करता विस्तार करण्यास सक्षम होऊ शकते. 

हेही वाचा : लग्नासाठी खास गिफ्ट पर्याय कोणते आहेत?

व्यवसाय विकासाचे पैलू

व्यवसायाच्या विकासासाठी अनेक घटक आहेत. व्यवसाय विकास अधिकारी व्यवसायाच्या मोठ्या साखळीसह सहकार्य करतात, ज्यामध्ये विक्री प्रतिनिधी, मार्केटिंग अधिकारी, मॅनेजमेंट  विक्रेत्यांचा सहभाग असतो. इतर विभागांबरोबर काम करण्याव्यतिरिक्त, व्यवसाय डेव्हलपरनी युती आणि संयुक्त उपक्रम, खर्च कमी करण्याचे उपाय, वाटाघाटी आणि संवाद यासारखे फर्मचे घटक हाताळले पाहिजेत. विक्रीसारख्या विविध विभागांचे विभाग आणि गुणधर्म यांना एकत्र आणण्यासाठी व्यवसाय डेव्हलपर एकात्मिक धोरणात्मक उद्दिष्टांचा वापर करतात. 

विक्री

व्यवसाय विकास अधिकारी विक्री कर्मचाऱ्यांसाठी वास्तववादी विक्री लक्ष्य निश्चित करतात आणि ते कसे साध्य करावे याविषयी सल्ला देतात. सुधारणेच्या संधी शोधण्यासाठी ते बाजाराचे किंवा विविध क्षेत्रांमधील कंपनीच्या विक्रीच्या कामगिरीचे परीक्षण ही करतात.

व्यवसाय विकास विरूद्ध विक्री

लीड्स किंवा शक्यतांना नवीन ग्राहकांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रथेलाच विक्री म्हणून ओळखले जाते. व्यवसाय विकास हा आता एक विस्तृत शब्द आहे ज्यामध्ये विक्रीव्यतिरिक्त अनेक कामांचा समावेश आहे. तथापी, काही क्रॉसओव्हर आहेत तरी ही बहुतेक पारंपारिक BD नोकऱ्या फक्त नवीन ग्राहक अधिग्रहणाशी मर्यादितरित्या संबंधित आहेत. 

विक्री आणि व्यवसाय विकासात हा नेहमीच होणारा गोंधळ आहे. हे क्वचितच अनपेक्षित आहे कारण विक्रीमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांनी व्यवसाय डेव्हलपरचे लेबल स्वीकारले आहे. हे बहुधा केले जाते कारण संस्थेला असे वाटते की BD वर्गीकरण विक्रीशी जोडलेले काही नकारात्मक बाबी दूर करते. 

या गोंधळलेल्या गोष्टीचा परिणाम म्हणून, अनेक व्यावसायिक सेवा व्यवसाय विक्रीला "व्यवसाय विकास" म्हणतात आणि प्रत्येक वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या वर्णनात त्याचा समावेश करतात. ते व्यवसायाच्या  BD जबाबदाऱ्यांमध्ये काही विक्री कर्तव्ये देखील समाविष्ट करू शकतात, जसे की लीड निर्मिती आणि लीड पालन.

मार्केटिंग

कंपनीच्या उत्पादनांचा / सेवांचा प्रचार करणाऱ्या जाहिराती आणि मोहिमांद्वारे मार्केटिंग टीम महसूल वाढ वाढवण्यासाठी प्रयत्न करते. व्यवसाय विकास तज्ज्ञ एक विशिष्ट स्थान, लोकसंख्याशास्त्रीय किंवा वापरकर्ता गटाची माहिती काढण्यासाठी मार्केटिंगचा वापर करून बाजार संशोधन करू शकतात. तसेच मार्केटिंग खर्च कसा करावा याविषयी ते व्यवस्थापनाला सल्ला देऊ शकतात.

व्यवसाय विकास विरूद्ध मार्केटिंग

पारंपारिकपणे, व्यवसाय विकास ही मार्केटिंगची शाखा होती जी नवीन जाहिरात किंवा वितरण संपर्क आणि प्लॅटफॉर्म मिळवण्यावर केंद्रित होती. हे काम अजूनही अनेक संस्थांमध्ये कायम असले, तरी "व्यवसाय विकास" हा शब्द आता असंख्य मार्केटिंग आणि विक्री कार्यांचा पर्याय बनला आहे. 

भागीदारी

व्यवसाय बऱ्याचदा त्यांचे काम वाढवण्यासाठी आणि नवीन बाजारात पाय रोवण्यासाठी भागीदारीचा वापर करतात. व्यवसाय डेव्हलपर स्पर्धात्मक लँडस्केपचे अधिक चांगले विश्लेषण करण्यासाठी आणि युती आणि इतर धोरणात्मक भागीदारीबद्दल निर्णय घेण्यासाठी वित्त आणि कायदेशीर विभागांची मदत घेतात.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट

व्यवसाय विकास व्यावसायिकांकडे प्रोजेक्टची कालमर्यादा, लाॅजिस्टिक, वेळापत्रक, खर्च आणि इतर अंदाज यांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी असते. ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमला प्रारंभिक मार्गदर्शन आणि ब्रीफिंग देण्यासाठी शीर्ष व्यवस्थापनाशी सहकार्य करू शकतात, जे नंतर प्रोजेक्टच्या विकासाची सूत्रे हाती घेतील आणि त्यावर लक्ष ठेवतील. 

विक्रेता मॅनेजमेंट

विक्रेते हे व्यावसायिक सहकारी किंवा कर्मचारी आहेत जे त्यांच्या वस्तू किंवा सेवांशी संबंधित किरकोळ अनुभवावर देखरेख ठेवतात. व्यवसाय विकास व्यावसायिक विक्रेत्यांना ओळखण्यात तसेच व्हेंडिंग सेवांच्या किंमती आणि कायदेशीर परिणामांचा अंदाज लावण्यासाठी संस्थेला मदत करतात.

वाटाघाटी, नेटवर्किंग आणि लॉबिंग

व्यवसाय विकासातील व्यवस्थापकांनी आक्रमकपणे डील करणे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपन्यांच्या हितासाठी वाटाघाटी करणे आवश्यक आहे. जरी लॉबिंग हे जगाच्या अनेक क्षेत्रांमध्ये कायदेशीररित्या अस्पष्ट क्षेत्र असले तरी, बहुतेक प्रकरणांमध्ये, विशेषत: जेव्हा कॉर्पोरेशनला नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करायचा असतो तेव्हा कंपनीच्या विकासासाठी हे महत्वाचे आहे. व्यवसाय डेव्हलपर्स सरकारी अधिकारी, प्राधिकरण, नियामक आणि सप्लायरसह जुडून राहण्यासाठी पावूल उचलू शकतात. 

खर्च कमी करणे

नफा फक्त विक्री आणि ऑपरेशन्सचा आकार वाढवूनच नव्हे तर खर्चात कपात करण्याच्या उपायांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करूनही वाढवता येऊ शकतो. व्यवसाय डेव्हलपर या क्षेत्रातील व्यावसायिक आहेत, ज्यामुळे कॉर्पोरेट भागधारकांना खर्च कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम केले जाते आणि परिणामी, महसूल वाढतो. 

व्यवसाय विकासासाठी आवश्यक कौशल्ये

व्यवसाय विकासात काम करायचे असेल तर त्या पदासाठी असलेल्या वर्णनात तुम्ही काही गुण शोधले पाहिजेत. या क्षमता विकसित करण्यासाठी वैयक्तिक लक्ष्य आत्मसात करणे तुम्हाला दावेदार म्हणून उभे राहण्यास मदत करू शकते. तुमच्या सीव्हीवर तसेच व्यवसाय विकास मुलाखतीच्या प्रक्रियेदरम्यान हायलाईट करण्यासाठी काही क्षमता येथे आहेत: 

विक्री कौशल्य

जरी व्यवसाय विकास आणि विक्रींचे कार्य वेगवेगळे असले, तरी काही सामान्य उपक्रम आणि जबाबदाऱ्या सारख्याच असतात. परिणामी, मूलभूत विक्री क्षमता तुम्हाला या व्यवसायात यशस्वी होण्यास मदत करू शकतात. व्यवसाय विकास व्यावसायिकांनी लक्ष्यित ग्राहकांना प्रभावीपणे ओळखले पाहिजे आणि वाढीस चालना देण्यासाठी त्यांची बाजारपेठ समजून घेतली पाहिजे. त्यांना संभाव्य भागीदारांशी सहकार्य करणे आणि इतर तज्ज्ञ आणि व्यवसायांसह संभाव्य भागीदारी तयार करणे देखील आवश्यक आहे. 

संवाद कौशल्य

एक व्यवसाय डेव्हलपर म्हणून, तुम्ही रोज विविध प्रकारच्या तज्ज्ञांशी जुडणे आवश्यक आहे. या पदासाठी प्रभावी होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आणि मौखिक संवाद क्षमतेत सुधारणा केली पाहिजे. संवाद प्रत्येक प्रसंगी स्पष्ट आणि व्यावसायिक असले पाहिजे. एखाद्या विशिष्ट परिस्थितीसाठी संवादाची कोणती पद्धत विशेषत: योग्य आहे हे निवडणे देखील महत्वाचे आहे. 

व्यवसाय विकासाचा एक घटक म्हणून तयार झालेल्या व्यावसायिक संबंधांना नियमितपणे चालना देणे आवश्यक आहे; म्हणूनच, सक्षम संवादकाची या क्षेत्रात भरभराट होऊ शकते. तुम्हाला वाटाघाटींशी देखील परिचित असले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूच्या लोकांना संवाद योग्यरित्या समजत असून तुमचा विचार आणि दृष्टिकोन व्यक्त करण्यास तुम्ही सक्षम असल्याची खात्री तुम्हाला असायला पाहिजे.

मार्केटिंग कौशल्य

व्यवसाय विकास विभाग विक्री टीमऐवजी अनेक बिजनेसमध्ये मार्केटिंग टीमसह जवळून कार्य करतो. व्यवसाय डेव्हलपरजवळ काही विक्री क्षमता असणे आवश्यक आहे, परंतु त्यांनी त्यांच्या कामात मूलभूत मार्केटिंग आयडिया देखील समजून घेतल्या पाहिजेत आणि अंमलात आणल्या पाहिजेत. मार्केटिंग आणि व्यवसाय विकास तज्ज्ञांचे अंतिम उद्दीष्ट व्यवसायाचा विस्तार करणे हे आहे, परंतु ते साध्य करण्याचे मार्ग वेगळे असू शकतात. 

व्यवसाय डेव्हलपर मार्केटिंग-संबंधित विविध कर्तव्यांसाठी जबाबदार असतात. यात भागीदारी शोधणे, मोहीम व्यवस्थापन, ब्रँडिंग उपक्रमांना मदत करणे, नवीन ग्राहक बेस तयार करणे आणि नवीन ग्राहकांमध्ये ब्रँड ओळख आणि निष्ठा यशस्वीरित्या वाढवणे याचा समावेश आहे. 

बिजनेस इंटेलिजेंस

इनसाईट प्राप्त करणे आणि कोणत्याही बाजारपेठेचे सखोल आकलन असणे यासाठी व्यवसाय कौशल्य आवश्यक आहे. कंपनीच्या उपक्रमांशी संबंधित बिजनेस त्यांच्या उत्पादनांच्या लाईन, प्रतिस्पर्धी आणि स्थूल आर्थिक परिस्थितीचे विस्तृत विश्लेषण आणि संशोधनाद्वारे विकसित केले जाऊ शकते. 

डेटा संकलन आणि विश्लेषण देखील व्यवसाय बुद्धिमत्तेचे पैलू आहेत. संभाव्य बाजारपेठेचे परिमाण, त्यावर परिणाम करणारे कोणतेही बदल आणि विशिष्ट बाजार गटांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळालेले उपक्रम हे कंपनी डेव्हलपरला मदत करणारे डेटाचे काही संच आहेत. व्यक्ती ही प्रतिभा संशोधन करून, डेटा कलेक्ट करून आणि लक्ष्यित बाजारपेठांविषयी अधिक जाणून घेऊन विकसित करण्यास सुरवात करू शकतो. 

विश्लेषणात्मक कौशल्ये

व्यवसाय विकास व्यावसायिक धोरणे आणि योजना स्थापित करण्यासाठी अर्थपूर्ण इनसाईट मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करतात. मोठ्या प्रमाणात असंरचित डेटामधून महत्त्वपूर्ण संकेत आणि गंभीर माहिती काढण्यासाठी त्यांच्याकडे तपशीलांवर बारकाईने लक्ष असणे आवश्यक आहे. 

याचबरोबर, इतरांना प्रभावीपणे समजेल अशा प्रकारे संवाद साधण्यासाठी त्यांना या इनसाईट गोळा करण्यास आणि त्यांचे आयोजन करण्यास सक्षम असले पाहिजे. कॉर्पोरेट यशाचे प्रभावीपणे स्पष्टीकरण देण्याची क्षमता आणि कंपनीच्या विस्तारासाठी आपण काय करीत आहात याचे विश्लेषण करण्यासाठी संस्थात्मक क्षमता असणे या कारकीर्दीच्या मार्गात भरभराट होण्याची क्षमता बऱ्यापैकी सुधारेल. 

प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्य

व्यवसाय विकास हे गुंतगुंतीचे क्षेत्र आहे, यात एकाच वेळी अनेक उपक्रम आणि प्रक्रिया सुरू असतात. उत्कृष्ट प्रोजेक्ट मॅनेजर होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गुण व्यवसाय विकास व्यवसायात हस्तांतरित करण्यायोग्य आहेत. या क्षमतांमध्ये नेतृत्व, संघ बांधणी, जोखिम देखरेख आणि मॅनेजमेंट आणि वैयक्तिक संघटना यांचा समावेश आहे. 

एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना, कर्मचाऱ्यांचे मॅनेजमेंट करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे कारण तुम्ही प्रत्येक कर्तव्य एकट्याने पार पाडू शकणार नाही. टीमच्या कार्याला प्रोत्साहन देणे, मतभेदांवर मात करणे आणि कामगिरीचे मूल्यमापन करणे हे सर्व टीम मॅनेजमेंटचे पैलू आहेत. व्यवसाय डेव्हलपर म्हणून याच क्षमता तुमच्या परिणामकारकतेला लागू होतात. 

हेही वाचा : टिकल्यांचा बिजनेस कसा सुरू करायचा?

निष्कर्ष

काही व्यवसायांसाठी व्यवसायवृद्धी दीर्घकालीन यश मिळवण्याची पद्धत असते. मित्रपक्ष आणि भागीदारांशी संबंध प्रस्थापित करणे आणि टिकवून ठेवणे फायदेशीर ठरू शकते, जसे की इतर मार्गांनी विकासाची संभाव्यता ओळखू शकते. व्यवसाय विकास कंपनीची दीर्घकालीन स्थिरता आणि ती कामगिरी साध्य करण्याच्या सर्वोत्तम साधनांशी निगडित असतो. व्यवसाय भागीदारांशी कनेक्शन तयार करू शकतात जे त्यांना व्यवसायाच्या वाढीच्या शक्यता शोधायला आणि निर्माण करायला वाढीव कालावधीसाठी रेफरलद्वारे मदत करतील

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: व्यवसाय विकासाची गुरुकिल्ली काय आहे?

उत्तर:

व्यवसाय विकासाचे अंतिम ध्येय म्हणजे ग्रोथ होय.

प्रश्न: कंपन्यांनी वापरलेले व्यवसाय विकासाचे धोरण काय आहे?

उत्तर:

व्यवसाय विकास प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे मुख्य धोरण म्हणजे तोटा कमी करताना संस्थेत येणाऱ्या पैशाची रक्कम वाढवण्यात मदत करण्यासाठी धोरण तयार करणे.

प्रश्न: व्यवसाय विकास हे मार्केटिंग किंवा विक्री पोस्ट आहे का?

उत्तर:

मार्केटिंग संवाद आणि ग्राहकांच्या लक्ष्यीकरणावर लक्ष केंद्रित करते, तर विक्री प्रतिनिधी पात्र लीड्सच्या शक्यतांवर काम करतात आणि त्या लीड्सला बंद करतात जे मार्केटिंग आणि विक्री टीम या दोघांनी मिळवलेले आहेत. व्यवसाय विकास हा व्यावसायिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारीवर लक्ष केंद्रित करतो.

प्रश्न: व्यवसाय विकास प्रक्रिया काय आहे?

उत्तर:

व्यवसाय विकास प्रक्रियेमध्ये 4 मुख्य स्टेज समाविष्ट आहेत, मग तो एक लहान व्यवसाय असो किंवा बहुराष्ट्रीय काॅर्पोरेशन. ह्या स्टेजपुढीलप्रमाणे आहेत :

  • स्टार्टअप स्टेज
  • ग्रोथ स्टेज
  • परिपक्वता स्टेज
  • नूतनीकरण किंवा नकार स्टेज

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.