written by Khatabook | June 6, 2022

महाराष्ट्रात आंब्याचा बिजनेस सुरू करायचा?

×

Table of Content


आंबा सगळ्यांच्याच आवडीचं फळ. नुसतं फळच नाही तर फळांचा राजा म्हणून हापूस आंब्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. आंब्याच्या सीझनमध्ये आंबा न खाणारा विरळाच असेल. पण, त्याचा सीझन यायला काही अवधी लागतोच. शक्यतो कडक उन्हाळ्यातच आंबा बाजारात दिसायला लागतो. एकदा बाजारात आला की जूनपर्यंत मुक्काम ठोकून, मग सरळ पुढच्याच उन्हाळ्यात बाजारात अवतरतो. सगळेच जण आंब्याच्या सीझनचा मनमुराद आनंद घेतात. ज्याला जसा परवडंल तसा, आंबा विकत घेतला जातो. आता परवडण्याचा विषय निघलाच, तर तिथे बिजनेस आला. आंब्याचा बिजनेस हा सीझननुसार असला तरी यातून बऱ्यापैकी नफा मिळवल्या जावू शकतो. फक्त काही महिनेच मेहनत करावी लागणार आहे. चला तर मग महाराष्ट्रात आंब्याचा बिजनेस सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टींविषयी या लेखात सविस्तर जाणून घेवूया.

आंब्याचा बिजनेस का सुरू करायचा?

आंब्याचा रस जरी सगळीकडेच वर्षभर चाखायला मिळत असला तरी आंब्याला चोखून खाण्याची मज्जाच वेगळी आहे. हा जरी भावनात्मक विचार असला तरी, हेच खरं आहे. कारण, आंब्याच्या सीझनमध्ये नंबर लावूनही एखाद्या वेळेस हवा तो आंबा बाजारातून मिळवणं अशक्य होतं. अशावेळी एखाद्या व्यक्तीला आंब्याविषयी काहीच माहिती नसल्यास, कोणताही आंबा त्याच्या माथी हापूस म्हणून मारला जातो. त्यामुळे ग्राहकांना हापूस आंबा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे तुम्ही जर आंबा बिजनेसमध्ये उतरायचे ठरवल्यास, हापूस आंबा विकून तुम्ही ग्राहकांनाही खूश करू शकता आणि चांगला नफाही मिळवू शकता. कारण, हापूस आंब्याची मागणी सर्व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही अल्पावधीत यातून भरघोस कमाई करू शकता. हापूस व्यतिरिक्त ही बरेच आंबे आहेत. ज्याची ग्राहकांकडून सीझनमध्ये मागणी होते. यामुळे तुम्ही जर आंब्याचा बिजनेस सुरू करायचा विचार करत असल्यास, व्होलसेल विक्रेता म्हणून किंवा रिटेल विक्रेता म्हणूनही करू शकता. तसेच, बाराही महिने आंब्याच्या विविध पदार्थाची मागणी असते. त्यातील काही ठराविक पदार्थ निवडून तुम्ही त्याचा ही बिजनेस सुरू करू शकता. 

हेही वाचा : टिकल्यांचा बिजनेस कसा सुरू करायचा?

आंब्याविषयी थोडक्यात

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे 4000 वर्षापासून आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख मे.टन उत्पादन दरवर्षी मिळते. तसेच, महाराष्ट्रातून आंब्याची दरवर्षी सर्वाधिक निर्यात केली जाते. जवळपास 17 जातींच्या आब्यांचा यात समावेश आहे. निसर्गाने चांगली सोबत केल्यास उत्पादनाचा आकडा वाढतो. आंबा उष्ण - दमट हवामानातच चांगला बहरतो. त्यामुळे हे हवामानच आंब्याला अधिक मानवते. इतर हवामानातही आंब्याची वाढ होते. मात्र कडाक्याची थंडी, कोरडे हवामान त्याला मानवत नाही. बराच काळ थंडी व कोरडे हवामान राहिले तर फळधारणेची शक्यता राहत नाही. आंब्याला कितीही उन्हाचा तडाखा बसला तरी तो वाढतो. मोहोर येण्याचा आणि फळांचा काळ डिसेंबर ते जूनपर्यंत असतो. फळ त्यानुसार मागे-पुढे येवू शकतात. त्यामुळे आंब्याचा बिजनेस सुरू करण्याआधी आंब्याच्या जातीविषयी जाणून घेणे गरजेचं आहे. त्यांचा कालावधी आणि इतरही बऱ्याच गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत.

आंब्याच्या जाती कोणत्या आहेत?

आंब्याच्या बऱ्याच जाती बाजारात पाहायला मिळतात. पण, त्यापैकी जास्त मागणी असलेले आंब्याविषयी जाणून घेवूयात.

  1. हापूस : रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस जगभऱ प्रसिद्ध आहेत. उत्तम स्वाद आणि मधुर चव असल्याने हा आंबा सर्वांत खास आहे. फळ पिकल्यानंतर आकर्षक तांबूस पिवळा रंग येतो. फळ घट्ट असून शेंदरी रंगाचे रेषाविरहीत असते. फळ पिकल्यानंतर 10 ते 12 दिवस टिकून राहते. त्यामुळे निर्यातीसाठी परदेशात ही पाठवता येते. पूर्वी लाकडी खोके, ट्रँकामधून जाणारा हापूस आता अगदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये बाजरात दिसून येतो. आंब्याचे भाव दरवर्षी कमी जास्त होत असतात. अंदाजे 700 रुपये डझनपासून ते 2500 रुपये डझनपर्यंत हापूस आंब्याचे भाव बाजारात पाहायला मिळतात. ग्राहक त्यांना परवडेल त्या भावात हापूस आंबा घेवून त्याचा मनमुराद आनंद लुटतात. पण, यंदा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाल्याचे चित्र आहे.
  1. जुन्नर हापूस : रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूसचा सीझन संपल्यानंतर जुन्नर हापूस बाजारात येतो. जूनचा पहिला आठवडा ते तिसरा आठवड्यपर्यंत हा बाजारात पाहायला मिळतो. अल्पावधीतच या आंब्याने ओळख निर्माण केली असून याचा स्वाद हापूससारखाच असून याचा दर 150 ते 200 रुपये डझन आहे. यामुळे ग्राहकांची पसंती या आंब्याला मोठ्या प्रमाणात आहे.
  1. केसर : ही जात मूळची गुजरातमधील मात्र, महाराष्ट्रात सर्वत्र या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. ठाण्यात ही याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच, सोलापूरमधील केसर आंब्याने सातासमुद्रापार मजल मारली आहे. हापूसपेक्षा 3 ते 4 पटीने जास्त उत्पादन देणारी जात असल्याने या जातीचे लागवड देशभर केल्या जात आहे. फळांचा स्वाद उत्तम आणि चवीला गोड असतात. फळ पिकल्यानंतर 5 ते 6 दिवस टिकते. त्यामुळे तातडीने फळांना बाजारात घेवून जाणे, आवश्यक असते. केसर आंब्याचा भाव ही यंदा 150 ते 200 रू किलो बाजारात पाहायला मिळत आहे.
  1. पायरी : हापूस आंब्यापेक्षा जास्त उत्पादन देणारी जात आहे. फळे मध्यम आकाराची, आकर्षक लाल रंगाची असतात. फळे रसाळ असून गोड असतात. मात्र पिकल्यानंतर ती जास्त काळ टिकत नाहीत. सध्या बाजारात पायरीचा दर 150 ते 400 रुपयापर्यंत आहे. 
  1. तोतापूरी : हा आंबा कर्नाटकातील प्रमुख जात असून हिला 'बंगलोरा' या नावानेही ओळखले जाते. फळे दोन्ही टोकास निमुळती बाकदार असतात. रंग हिरवट, पिवळसर आणि त्यावर चमकदार तांबुस पट्टे पाहायला मिळतात. फळ साधारण प्रतीचे असले तरी टिकाऊ असते. भरपूर आणि नियमित उत्पादन मिळत असल्याने फळे भारतातील कोण्याही बाजारपेठेत पाठवता येतात त्यामुळे व्यापारी दृष्ट्या तोतापूरी फायद्याचा आहे. तसेच, त्याचा दर ही सामान्यांच्या खिशाला परवडणाराच असतो. यंदा 40 ते 50 रुपये किलो दर आहे. 
  1. दशेरी : उत्तर भारतात लागवडीखाली असलेली जात वैशिष्ट्यपुर्ण व अत्यंत गोड चवीमुळे प्रसिद्ध आहे. उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्रात फळे लवकर तयार होतात. फळ मध्यम आकाराचे, लांबट, शेंदरी, पिवळ्या रंगाचे असून स्वाद व चव उत्तम असते. दशेरीचा दर यंदा 150 ते 250 रुपये किलो आहे.

संकरित जाती :

  1. रत्ना : कोकण कृषी विद्यापीठाने नीलम (नर) आणि हापूस (मादी) यांच्या संकरातून तयार केलेली जात असून फळे दरवर्षी येतात. या जातीची फळे हापूसपेक्षा मोठी असून घट्ट आणि रेषाविरहीत असतात. फळांचा स्वाद आणि चव साधारण हापूस सारखीच आहे. फळे पिकल्यानंतर 8 दिवस टिकतात.
  1. सिंधू : कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना (मादी) आणि हापूस (नर) यांच्या संकरातून तयार केलेली जात आहे. या जातीच्या फळांचा रंग आणि स्वाद आकर्षक असून दरवर्षी फळे मिळतात. फळे रेषाविरहीत असतात. या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे फळांमधील कोय ही अतिशय पातळ असते आणि फळे नियमित येत असून फळातील गर गोड असतो.

आंब्याचे मार्केट

तुम्ही मुंबई किंवा पुणे भागात राहत असून किरकोळ किंवा मोठे व्यापारी असल्यास, तुम्हाला आंबा तेथील मार्केटमधून सहज उपलब्ध होवू शकतो. तुम्ही पुण्यात असल्यास ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ (एपीएमसी)च्या माध्यमातून गुलटेकडी येथील पुणे मार्केट यार्डमधून व्होलसेल दराने आंबे विकत घेवू शकता. येथे रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि इतर ही राज्यांमधून आंबे विक्रीसाठी आणले जातात. 

मुंबईत विकला जाणारा आंबा प्रामुख्याने ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ (एपीएमसी)च्या माध्यमातून येतो. एपीएमसीच्या वाशी येथील फळ मार्केटमध्ये देवगड, रत्नागिरी, अलिबाग, वेंगुर्ला, श्रीवर्धन आणि जुन्नर येथून तसेच, अन्यही राज्यांतूनही आंबा येतो. हापूससोबतच केशर, बदामी, दशेहरी, पायरी आदी आंब्याचे विविध प्रकार एपीएमसीमध्ये प्रत्येक वर्षी जानेवारी ते जून महिन्यामध्ये विक्रीसाठी आणले जातात.

हे महाराष्ट्रातील दोन मोठी शहरे असली तरी अन्य शहरात ही आंब्याचे मार्केट असून, त्या शहरात असलेल्या ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ (एपीएमसी) च्या अंतर्गत येणाऱ्या मार्केटमधून ही तुम्ही आंबे घेवू शकता. तसेच, एखाद्या गावात राहत असल्यास, तिथे आमराई घेवूनही तुम्ही जवळच्या शहरात किंवा गावोगाव फिरूनही आंब्याचा बिजनेस करू शकता. पण, सगळ्या गोष्टी स्वत:च करण्यात थोडी जोखीमही पत्करावी लागू शकते. त्यामुळे तुम्हाला आमराईचा अनुभव असल्यास, ती घ्यायला काहीच हरकत नाही. अनुभव नसल्यास, तुम्ही व्होलसेल आंबे घेवूनही ते स्टाॅल लावून विकू शकता.   

रिटेल विक्रेता म्हणून सुरू करा

आंब्याचं सीझन ठरलेलं असल्यामुळे, तुम्हाला मार्चपासून ते जूनपर्यंत कसा बिजनेस करता येईल त्याचं प्लॅनिंग करावे लागेल. तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहत असल्यास, तुम्हाला आंबा सहज उपलब्ध होवू शकतो. पण, तुम्ही या बिजनेसमध्ये नवीन असल्यास, तुम्हाला आंबे साठवणे आणि वाहतूक या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं आहे. तुम्ही व्होलसेलर जवळून आंबा आणत असल्यास, त्याची पॅकिंग कशी आहे आणि त्यांचा कालावधी किती असेल. याची विचारणा करणे ही आवश्यक आहे. कारण, खरा बिजनेस येथूनच सुरू होतो. तुम्ही जास्त आंबे आणले आणि ते विकल्या गेले नाहीतर तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे आंब्याची सर्व माहिती काढून घ्या. तसेच, सुरूवातीला रिटेल विक्रेता म्हणून सुरू करा आणि तुम्ही ज्या परिसरात राहता. तेथील अंदाज घेवूनच. आंबे विकत घ्या. यामुळे तुमचा फायदा होवू शकतो. प्रत्येक वर्षाचा अनुभव घेवून तुम्ही आंबा निर्यात करण्याच्या बिजनेसमध्येही उतरू शकता.

आंबा विकत कसा घ्यायचा?

मार्केटची साधी पद्धत आहे. सर्व आंबे एकत्र मार्केटमध्ये आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांकडून आंब्याची बोली लावली जाते. बोली लावताना जो विक्रेता सर्वाधिक बोली लावेल त्याला माल दिला जातो. त्याने एकदा माल विकत घेतल्यावर, तो तेथील स्थानिक विक्रेत्यांना विकतो. नाहीतर स्वत:च आंबे विक्रीसाठी बाजारात आणतो. त्यामुळे बाजारात काही ओळखीचे व्होलसेलर विक्रेत असल्यास, तुम्हाला आंबे सहज मिळतील, तेही योग्य भावात. आंब्याचा बिजनेस करायचा ठरवल्यास, मार्केटची ओळख असणं खूप आवश्यक आहे. 

आंब्याचा बिजनेस सुरू करायचा खर्च 

तुम्ही जर हापूस आंब्याचा बिजनेस करायचे ठरवल्यास आणि  तुमचा सेटअप मोठा असल्यास तुम्हाला लाखोंच्या घरात खर्च येवू शकतो. हा आंबा तुम्हाला त्याच्या आकारानुसार आणि पेट्यांमध्ये मिळतो. एक पेटी चार डझन, पाच डझन आणि सहा डझनची असते. ज्याला जशी परवडेल तशी घेण्यात येते. त्यामुळे तुम्ही रिटेल विक्रेता म्हणून स्टाॅल लावायचे ठरवल्यास अंदाजे 50000 रुपये खर्च येवू शकतो. हा खर्च खिशाला परवडण्यासारखा असल्यामुळे तुम्ही योग्य प्लॅन करून हा बिजनेस सुरू करू शकता. 

तुम्ही सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेवून आंबे ऑनलाईन ही विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाईट बनवून घ्यायला लागेल. त्यानंतर सोशल मीडियावर खाते उघडून तिथे तुमच्या बिजनेसची जाहिरात करावी लागेल. यासाठी तुमच्या बजेटात थोडी वाढ होईल. पण, तुमचा आंबा हातोहात खपून जाईल. त्यामुळे तुम्ही या प्लॅटफाॅर्मचा ही बिजनेससाठी योग्य वापर करून घेवू शकता आणि अल्पावधीतच तुमची ओळख निर्माण करू शकता.

हेही वाचा : भारतातील 'या' खास चाॅकलेट ब्रॅंडविषयी माहिती आहे?

निष्कर्ष

आंब्याचा बिजनेस जरी सीझननुसार असला तरी, कमी वेळात तुम्ही चांगली कमाई करू शकता. हे तुमच्या लक्षात आलेच असेल. फक्त तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुम्ही ज्या परिसरात राहता, तेथील मार्केटची पूर्ण माहिती आणि बिजनेस जिथे सुरू करायचे ठरवले आहे. तो भाग ओळखीचा असणं गरजेचं आहे. तुम्हाला आंब्याचा बिजनेस सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या लेखाद्वारे समजल्या असतील अशी आशा आहे. 

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: आंब्याचा बिजनेस ऑनलाईन करता येतो का?

उत्तर:

होय, तुम्हाला आंब्याचा बिजनेस ऑनलाईन करता येईल. यासाठी फक्त तुम्हाला एखादी वेबसाईट बनवून घ्यायला लागेल. त्यानंतर सोशल मीडियावर खाते उघडून तिथे तुमच्या बिजनेसची जाहिरात करावी लागेल.

प्रश्न: हापूस आंब्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाला आहे का?

उत्तर:

होय, केंद्र सरकारने हापूस आंब्याला अल्फान्सो या नावाने भौगोलिक निर्देशांक (जीआय) दिला आहे.

प्रश्न: पुण्यात व्होलसेलमध्ये आंबे कुठे मिळतात?

उत्तर:

तुम्ही गुलटेकडी येथील पुणे मार्केट यार्डमधून व्होलसेल दराने आंबे विकत घेवू शकता.

प्रश्न: हापूस आंब्याचा बिजनेस सुरू करायचा खर्च किती आहे?

उत्तर:

तुम्ही रिटेल विक्रेता म्हणून स्टाॅल लायवायचे ठरवल्यास, अंदाजे 50000 पर्यंत खर्च येवू शकतो.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.