written by Khatabook | May 28, 2022

ई-वॉलेट्स किंवा UPI अ‍ॅप्स वापरतेवेळी ऑनलाईन पेमेंट फ्राॅड कसा टाळायचा?

×

Table of Content


भारतात ऑनलाईन पेमेंट फ्राॅड अधिक सामान्य होत आहे कारण, डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरकर्ते UPI अ‍ॅप्स आणि ई-वॉलेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NCPI) ने विश्‍लेषित केलेल्या डेटानुसार फेब्रुवारी 2022 मध्ये UPI व्यवहारांच्या एकूण संख्येने 4.53 अब्जचा टप्पा ओलांडला आहे. देशात व्यवहार करण्यासाठी अधिक लोक ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप्स आणि ई-वॉलेट वापरत आहेत आणि आता ग्रामीण भागातील लोकही ई-UPI स्कॅमने प्रभावीत आहेत. 

गुन्हेगार सोशल इंजिनिअरिंगच्या डावपेचांचा वापर करण्यात अधिक तरबेज झाले आहे. तसेच, वापरकर्त्यांना त्यांच्या UPI वॉलेटवर पेमेंट विनंत्या पाठवून त्यांना सहज फसवत आहे. बहुतेक व्यावसायिक बँका, लोन देणारे भागीदार आणि UPI अ‍ॅप डेव्हलपमेंट कम्युनिटी वापरकर्त्यांना या स्कॅमविषयी नेहमीच चेतावणी देतात आणि वापरकर्त्यांना शिक्षित करण्यासाठी सायबर जागरूकता मोहिमा चालवतात. सरतेशेवटी, ते या स्कॅममधून सामान्यांना वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी नेहमीच तयार असतात. तरीही, काहीवेळा नवीन वापरकर्ते चुकतात आणि स्कॅमरना पेमेंट करतात.

तुम्हाला माहिती आहे का? भारतात दर महिन्याला 80,000 पेक्षा जास्त UPI फ्राॅड रिपोर्टची नोंद केली जाते.

काय आहे ई-UPI अ‍ॅप फ्रॉड?

कोविड-19 महामारीने अनेक व्यवसायांना डिजिटल मार्गाकडे वळण्यास प्रवृत्त केले आहे, याचा अर्थ अधिकाधिक ग्राहक ऑनलाईन व्यवहार करत आहेत. मोबाईल फोनद्वारे कॅशलेस पेमेंट करण्याचा सर्वांत जलद आणि सोपा मार्ग म्हणजे UPI अ‍ॅप्स होय. ई-UPI अ‍ॅप्स बँक खात्यांशी जोडले जातात आणि काही सेकंदात रिअल टाईम व्यवहार सुलभ होतात. आणि ई-UPI फ्राॅड या अ‍ॅप्सशी संबंधित कोणतेही स्कॅम असू शकतात. हे अ‍ॅप्स वापरण्याबाबत चांगली बातमी अशी आहे की ते बिल्ट-इन सुरक्षा आणि सुरक्षा फिचर्ससह डिझाईन केलेले आहेत. तथापि, कोणतेही तंत्रज्ञान परिपूर्ण नाही आणि शेवटी, अनोळखी लोकांना संवेदनशील डेटा शेअर न करणे ही या अ‍ॅप वापरकर्त्यांची एकमेव जबाबदारी आहे. 

हेही वाचा : Google Pay फ्रॉड काय आहे? त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी टिप्स

भारतात ऑनलाईन पेमेंट फ्राॅड कसा टाळायचा?

भारतातील डिजिटल पेमेंट फ्राॅड रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ऑनलाईन ट्रेंडमध्ये असणाऱ्या नवीनतम स्कॅमविषयी जागरूक राहणे. UPI अ‍ॅप्सद्वारे ऑनलाईन पेमेंट फ्राॅड अधिक अत्याधुनिक होत आहे, ज्यामुळे त्यांना शोधणे कठीण होत आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात, पेमेंट विनंत्या सामान्य वाटू शकतात आणि स्कॅमर्स अधिकृत संस्था आणि व्यक्तींना खूप चांगले ओळखतात. त्यामुळे नवीन  वापरकर्ते त्यांच्या जाळ्यात सहज ओढले जातात. खाली काही सामान्य मार्ग आहेत ज्यामध्ये स्कॅमर्स संवेदनशील माहिती मिळवतात, तसेच तुम्ही त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या स्टेप्स घ्यायला पाहिजे, याची माहिती दिली आहे:

फिशिंग स्कॅम

फिशिंग स्कॅम म्हणजे स्कॅमर्स बनावट वेबसाईट तयार करतात, त्या पूर्णपणे अधिकृतसारख्याच दिसतात. स्कॅमर टेक्स्ट किंवा SMS द्वारे या साईटवर पेमेंट लिंक पाठवतात आणि क्लिक केल्यानंतर लोक त्यांच्या जाळ्यात येतात. या पेमेंट लिंक्स त्यांच्या UPI अ‍ॅपला विनंत्या पाठवतात आणि जेव्हा ते मंजूर करतात तेव्हा त्यांच्या ई-वॉलेटमधून पैसे डेबिट करतात.

स्कॅम ज्यामध्ये UPI पिन किंवा OTP शेअर करणे समाविष्ट आहे

अनेक फ्राॅड करणारे ग्राहकांना कॉल करतात आणि अ‍ॅप सपोर्ट मिळवण्यासाठी त्यांच्या फोनवर पाठवलेला UPI OTP शेअर करण्यास सांगतात. काही प्रकरणांमध्ये, स्कॅमर बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगतो आणि ग्राहकाला त्यांच्या व्यवहार हिस्ट्रीचा रिव्ह्युव्ह करण्याची विनंती करू शकतो. प्रक्रियेदरम्यान, ते UPI पिन रिसेट करण्यास सांगू शकतात आणि त्यांचा सध्याचा पिन कशासाठी सेट केला आहे ते विचारू शकतात आणि अशा प्रकारे वापरकर्त्यांना फसवू शकतात. लक्षात ठेवा की, स्कॅमर खूप हुशार असतात आणि त्यांच्याकडे वापरकर्त्यांना फोनवर संवेदनशील माहिती देण्यास प्रवृत्त करण्याचे कौशल्य असते. बँका किंवा UPI अ‍ॅप सपोर्ट स्टाफ ग्राहकांना असे तपशील विचारण्यासाठी कधीही फोन कॉल करत नाहीत. भारतातील ई-वॉलेट चालवणाऱ्या कंपन्यांच्या वतीने कॉल करत असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचे फोन कॉल्स दुर्लक्षित करणे किंवा टाळणे ही सर्वोत्तम पद्धत आहे.

QR कोड स्कॅनिंग

फ्राॅड करणारे ग्राहकांना QR कोड पाठवतात आणि चेकआउट करताना त्यांना स्कॅन करण्यास सांगतात. जेव्हा एखादा वापरकर्ता UPI अ‍ॅप स्कॅन करण्यासाठी वापरतो तेव्हा तो आपोआप व्यवहार सुरू करतो. तथापि, UPI अ‍ॅप्स सामान्यपणे व्यापाऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी QR कोड तयार करण्याची आणि पाठवण्याची परवानगी देत ​​नाहीत. जर तुम्हाला अशी विनंती आली तर त्याकडे दुर्लक्ष करा.

दिशाभूल करणारी UPI नावे

अनेक स्कॅमर्स त्यांचे UPI आयडी खरेखुरे दिसण्यासाठी त्यांच्या हँडलच्या शेवटी 'UPI' किंवा 'BHIM' शब्द वापरतात. @disputesNCPI किंवा @paymentsBHIM_service ने समाप्त होणारे पत्ते वापरकर्त्यांना योग्य असल्याचे वाटतात. यामुळे स्कॅमर बनावट UPI आयडी तयार करतात आणि वापरकर्त्यांकडून पैसे घेवून त्यांना संवेदनशील माहिती उघड करायला लावतात.

सोशल मीडिया UPI फ्राॅड

UPI वॉलेटमध्ये प्रचलित असलेला आणखी एक स्कॅम म्हणजे सोशल मीडिया UPI स्कॅम. वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर TeamViewer सारखे स्क्रीन-शेअरिंग अ‍ॅप्स इन्स्टाॅल करण्यास सांगितले जाते आणि व्हेरिफायसाठी त्यांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वेबकॅमसमोर धरून ठेवण्यास सांगितले जाते. त्यानंतर, स्कॅमर त्यांना व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांचा UPI OTP शेअर करण्यास सांगतो, जो त्यांना SMS द्वारे प्राप्त होतो. एकदा वापरकर्त्यांनी तपशील शेअर केल्यानंतर, त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात.

SMS स्कॅम

तुमच्‍या फोनवर तुम्हाला एक मेसेज मिळू शकतो, त्यामध्ये तुम्हाला UPI लॉग इन क्रेडेंशियल अपडेट करण्‍यासाठी किंवा अ‍ॅप अपडेट करण्‍यासाठी सांगितले जाते, त्‍यामध्‍ये एक लिंकही असते. SMS टेक्स्टमध्ये मॅलिशिअस लिंकवर क्लिक केल्याने तुमचा फोन मेलवेअर किंवा डाउनलोड झालेल्या व्हायरसमुळे प्रभावीत होवू शकतो. जेव्हा तुम्ही लिंक वापरून तपशील देता तेव्हा स्कॅमर्सना तुमच्या खात्यात अनधिकृत प्रवेश मिळतो आणि तुम्ही लॉक आउट होण्याचा धोका होवू शकतो. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अशा टेक्स्टकडे दुर्लक्ष करणे आणि ते न उघडणे हाच उत्तम उपाय आहे. तुमचे UPI अ‍ॅप नेहमी अपडेट करा आणि डेव्हलपर पॅच रिलीज होण्याची प्रतीक्षा करा. अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि जेव्हा शंका असेल तेव्हा लेटेस्ट न्यूज पाहा.

हेही वाचा : कॅशबॅक स्कॅमचे ट्रेंड काय आहेत? त्यांच्यापासून सुरक्षित कसे राहायचे?

काय करावे आणि काय करू नये

  1. तुमचा क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, UPI OTP, PIN इत्यादी सारखे वैयक्तिक तपशील कोणासोबतही शेअर करू नका.
  2. तुम्हाला ई-मेलवर पाठवलेल्या संशयास्पद UPI पेमेंट लिंक उघडू नका. जर विषय ओळ किंवा प्रेषक अशी एखादी व्यक्ती असेल ज्याला तुम्ही ओळखत नाही, तर त्याच्याशी संवाद साधू नका. अ‍ॅप डेव्हलपर आणि बँकांकडून थेट येणाऱ्या अधिकृत ई-मेललाच प्रतिसाद द्या.
  3. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जेव्हा कोणी तुम्हाला पैसे पाठवू इच्छित असल्यास, तुम्हाला तुमचा UPI पिन कधीही शेअर करावा लागत नाही आणि तुमच्या UPI आयडीवर डिजिटल पेमेंट मिळवण्यासाठी पिनची आवश्यकता नसते.
  4. तुमच्या UPI साठी सोशल मीडिया वेबसाईट्स आणि इंटरनेटवरील सूचीबद्ध कस्टमर सपोर्ट नंबर वापरू नका. नेहमी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आमच्याशी संपर्क साधा पेज पाहा.
  5. व्हेरिफाय नसलेले कॉल किंवा लोकेशनवरून येणाऱ्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका. जर कोणी बँक प्रतिनिधी असल्याचा दावा करत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष करा. जर तुम्हाला एखाद्या स्कॅमर्सने संपर्क साधला तर, त्यांचा फोन नंबर कागदावर नोंदवा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा.
  6. तुमच्यासोबत फ्राॅड झाला असल्यास, तुमचे UPI व्यवहार आयडी, तपशील, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर गोळा करा आणि तक्रार करण्यासाठी तुमच्या जवळच्या सायबर गुन्हे विभागाला भेट द्या. पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करा आणि व्यवहार पूर्ववत करण्यासाठी त्वरित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. स्कॅमरने फोनद्वारे तुमच्याशी संपर्क साधला असल्यास तुमचे फोन कॉल रेकॉर्ड करा जेणेकरून तुमच्याकडे स्कॅमचा पुरावा असेल.
  7. तुमच्‍या व्‍यवहार हिस्ट्रीचा स्‍क्रीनशॉट ठेवा जेणेकरुन तुमच्यासोबत फ्राॅड झाल्यास, बँकेकडे तो पुरावा म्हणून पाठवू शकता. तुमचा संपर्क आणि UPI माहिती सोशल मीडिया किंवा वेबसाईटवर कधीही पोस्ट करू नका कारण फ्राॅड करणारे तुमच्या पोस्ट पाहू शकतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.
  8. तुम्हाला तुमच्या फोनवर UPI अ‍ॅपवरून स्पॅम चेतावणी मिळाल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नका. काय सुरू आहे याविषयी वाचा आणि जागरूक राहा कारण, अ‍ॅप डेव्हलपर्स नोटिफिकिशेनद्वारे अलर्ट पाठवून वापरकर्त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न करत असतात.

निष्कर्ष

आता तुम्हाला UPI अ‍ॅप्स कसे वापरले जातात आणि स्कॅमर्स  पैसे चोरण्यासाठी कोणते मार्ग वापरतात याविषयी माहिती झाली आहे, तुम्ही त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करू शकता. अनोळखी लोकांशी संवाद साधताना नेहमी सावधगिरी बाळगा आणि जोपर्यंत तुम्ही त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, तोपर्यंत तुमचे आर्थिक तपशील ऑनलाईन देऊ नका. शंका असल्यास, अ‍ॅपवर होत असलेल्या नवीनतम सायबर क्राईम ट्रेंडसाठी अ‍ॅप डेव्हलपरच्या वेबसाईटला भेट द्या.

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

कृपया या प्रकरणाचा रिपोर्ट एकतर तुमचे कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडे करा किंवा जवळच्या सायबर क्राइमला संपर्क करा. या प्रकरणाचा रिपोर्ट करण्यासाठी cybercell@khatabook.com वर ई-मेल पाठवा.

महत्वाचे: SMS किंवा अन्य चॅनेलद्वारे प्राप्त होणारे OTP, पिन किंवा अन्य कोड कोणासोबतही शेअर करू नका. तसेच, तुमचा खाते क्रमांक किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील सार्वजनिक प्लॅटफाॅर्मवर कधीही शेअर करू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: मी चांगले UPI अ‍ॅप कसे डाउनलोड करू?

उत्तर:

तुम्ही कधीही अनधिकृत वेबसाईट किंवा इंटरनेटवरून UPI ​अ‍ॅप्स डाउनलोड करू नका कारण, स्कॅमर त्यांचे स्वतःचे अ‍ॅप्स तयार करू शकतात आणि माहिती चोरण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. नेहमी Google Play Store किंवा iOS स्टोअरला भेट द्या आणि व्हेरिफाय केलेल्या स्त्रोतांकडून अ‍ॅप्स डाउनलोड करा. UPI अ‍ॅप्स देखील सामान्यतः वापरकर्त्यांना अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या पेमेंट विनंत्यांबद्दल सूचित करतात, त्यामुळे तुम्ही त्यांना प्रतिसाद आणि उत्तर देत नसल्याची खात्री करा.

प्रश्न: स्कॅमर्सचा फोन आल्यास काय करायला पाहिजे?

उत्तर:

अनेक अ‍ॅप्समध्ये फ्राॅड करणाऱ्यांची किंवा अनधिकृत UPI मनी ट्रान्सफर विनंत्यांची तक्रार करण्यासाठी बिल्ट-इन-सपोर्ट असते. तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. पुढील स्टेप म्हणजे त्यांचा फोन कॉल रेकॉर्ड करणे आणि सर्व आवश्यक तपशिलांसह बँक आणि कायदेशीर अधिकाऱ्यांना संभाषणाचा रिपोर्ट देणे. संभाषणादरम्यान तुमचे नाव, रोजगार तपशील, UPI पिन, बँक खाते क्रमांक इत्यादीसारखी संवेदनशील माहिती देणे टाळा.

प्रश्न: भारतातील टॉप ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप्ससाठी UPI टोल-फ्री हेल्पलाइन नंबर कोणते आहेत?

उत्तर:

BHIM चा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक 18001201740 आहे. PayTM ची 24X7 हेल्पलाईन आहे जी 0120-4456-456 वर डायल केली जाऊ शकते. PhonePe ची ग्राहक सपोर्ट टीम 080-68727374 वर उपलब्ध आहे आणि GooglePay च्या कस्टमर सपोर्टला 1-800-419-0157 वर संपर्क साधला जाऊ शकतो. BharatPe साठी कस्टमर सपोर्ट फोन नंबर 088825 55444 आहे.

प्रश्न: भारतात दर महिन्याला किती UPI फ्राॅड होतात?

उत्तर:

UPI द्वारे ऑनलाईन पेमेंट फ्राॅडचे 80,000 पेक्षा जास्त रिपोर्ट प्रत्येक महिन्याला नोंदवले जातात.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.