written by Khatabook | May 2, 2022

लग्नासाठी खास गिफ्ट पर्याय कोणते आहेत?

×

Table of Content


भारतातील लग्न-समारंभ सणासारखेच साजरे केले जातात. सर्वजण उत्साह आणि आनंदाने कामाला लागतात. किती तरी फुलांनी आणि लायटिंगने लग्नाचा हाॅल सजवलेला असतो. अशी परिस्थिती जवळपास सर्वच लग्नात असते. कारण, सगळ्यांना माहिती आहे. लग्न एकदाच होते, त्यामुळे लग्नात सगळ्याच बारीक गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. या शुभ दिनी सर्वजण नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद द्यायला येतात. मग कसला विचार करताय या जोडप्याला काहीतरी खास गिफ्ट देण्याची हीच वेळ आहे!

यंदाचा लग्नसराईचा मोसम वेगळा असेल. जास्त लोकांच्या संपर्कात जाणे टाळावे लागेल आणि उपस्थिती ही प्रमाणातच असेल. तसे पाहायला गेलो तर लग्नसमारंभांचा विकास झाला असला, तरी गिफ्ट देण्या-घेण्याचा भारतीयांचा मूळ स्वभाव तसाच आहे. मात्र, पाहुण्यांचा कल आता या जोडप्याला काहीतरी अनोखे गिफ्ट देण्याकडे जास्त आहे. एखाद्या साध्या गोष्टीपासून ते महागड्या गोष्टीपर्यंत गिफ्ट देण्यासाठी तुम्ही या लेखाचा वापर करून, तुमच्या आवडत्या जोडीला खास गिफ्ट देऊ शकता. 

चला तर मग काही सर्वांत स्टाईलिश आणि वैयक्तिकृत गिफ्ट आयडियाज जाणून घेवूया, ज्यात होम डेकोरपासून ते ट्रॅव्हल अ‍ॅक्सेसरिजचा समावेश आहे.

तुम्हाला माहिती आहे का? दुबईचे प्रिन्स शेख मोहम्मद यांना त्यांच्या वडिलांनी विक्रमी 22 मिलीयन डॉलर्समध्ये बांधलेले स्टेडियम हे लग्नाच्या आतापर्यंतच्या सर्वांत महागड्या गिफ्टपैकी एक मानले जाते. 

लग्नासाठी सर्वांत चांगल्या गिफ्ट आयडियाज

ज्वेलरी

भारतात ज्वेलरीशिवाय कोणतेही लग्न कधीच पूर्ण होत नाही. ज्वेलरी सर्वांत आदर्श गिफ्ट मानले जाते.  महागड्यापासून कमीतकमी किंमतीपर्यंत (तुमच्या गिफ्टिंग बजेटनुसार) - कस्टमाईज्ड पीस ऑफ ज्वेलरी हे लग्नासाठी भारतातील सर्वोत्तम गिफ्ट मानले जाते.

हेही वाचा : टिकल्यांचा बिजनेस कसा सुरू करायचा?

रोमँटिक ट्रीप

कोणत्याही नवविवाहित जोडप्यासाठी रोमॅंटिक ट्रिप अद्भुत गिफ्ट आहे! ऐतिहासिक हॉटेल किंवा वुडलँड रिट्रीटमध्ये आरामदायी सुट्टी या जोडप्यावर तुमचे असलेले प्रेम प्रदर्शित करते. हे एखाद्या शांत ठिकाणावरील बीच रिसॉर्टही असू शकते जेथे, ते एकत्र चांगला वेळ घालवू शकतात. याचाच अर्थ असा आहे की जोडप्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ देणे होय.

एअर प्युरिफायर

'लव्ह इज इन द एअर', असं ते म्हणतात. पण, एवढं प्रदूषण होत असताना प्रेमासाठी जागा कुठे आहे? व्यावहारिक दृष्ट्या पाहिले तर, एअर प्युरिफायर हे आवश्यक साधन आहे, विशेषत: शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी. ताजी हवा जोडप्याला आनंद देऊ शकते. कॉर्डलेस एअर प्युरिफायर ही एक चांगली गिफ्ट आयडिया आहे कारण ती घराच्या कोणत्याही भागात वापरली जाऊ शकते. रोमँटिक आणि आरामदायी वातावरण तयार करण्यासाठी अ‍ॅरोमॅटिक ऑईलचा वापर देखील केला जाऊ शकतो.

सबस्क्रिप्शनचे गिफ्ट द्या

जर तुम्ही त्या जोडप्याला पूर्वीपासून ओळखत असल्यास, तुम्हाला कदाचित त्यांच्या कंटेंटच्या सवयींबद्दल माहिती असेल. मग ती मासिके असोत किंवा ऑन-डिमांड स्ट्रीमिंग असोत. लोकप्रिय मासिक, अ‍ॅमेझॉन प्राईम किंवा नेटफ्लिक्सचे वर्षभराचे सबस्क्रिप्शन गिफ्ट देल्यास, जोडप्यांना चांगला वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळेल.

नवीन घरासाठी खास गिफ्ट

नव्या आयुष्याची उज्ज्वल सुरुवात करण्यासाठी अनेक नवीन जोडपी नवीन घर खरेदी करतात. पती-पत्नी म्हणून नवीन घरात जाणाऱ्या जोडप्यांसाठी एक आश्चर्यकारकपणे तयार केलेला वैयक्तिकृत कटिंग बोर्ड ही लग्नाच्या सर्वांत सुंदर आणि व्यावहारिक गिफ्टपैकी एक आहे! सुंदर बांबू बोर्ड लग्नासाठी आणि गृह-प्रवेशासाठी गिफ्ट म्हणून दुहेरी भूमिका करते. जसे की, संपूर्ण रात्रीचे जेवण तयार करण्यासाठी, स्नॅक्स सर्व्ह करण्यासाठी आणि अगदी चारक्युटेरी बोर्ड म्हणून सर्व्ह करण्यासाठी वापरला जाऊ शकतो! वापरात नसताना, भरीव बोर्ड प्रदर्शनी भागात ठेवल्यास छान दिसतो. विशेष म्हणजे त्याला बघितल्यावर जोडप्यांना त्यांच्या लग्नाच्या दिवसाची आठवण न झाल्यास नवलच.

शॅडो बॉक्समध्ये त्यांच्या सर्वांत सुखद आठवणी

त्यांचे लग्न त्यांच्या आयुष्यातील अशा क्षणांंपैकी एक असेल, जेव्हा प्रत्येकवेळी त्यांना असे वाटेल की आपण त्या क्षणांना आयुष्यभर जपून ठेवायला पाहिजे. शॅडो बॉक्स गिफ्ट सेटसह ते पुन्हा ती वेळ जगू शकतात! हा शॅडो बॉक्स सेट एक अनोखे लग्नाचे गिफ्ट असेल ज्यामुळे त्यांना त्यांचा मोठा दिवस दाखवण्याची संधी मिळेल. त्यांच्या पुष्पगुच्छासाठी, रिसेप्शनमधील फुले किंवा समारंभातील फोटोंसाठी शॅडो बॉक्स सेट एक सर्वांत क्रिएटिव्ह लग्नाचे गिफ्ट असेल. ज्यामुळे, त्यांना त्यांच्या आयुष्यातील मोठा दिवस दाखवता येईल!

सुंदर वाइन चिलर

आनंदी जोडप्याला वाईन चिलर गिफ्ट द्या! हा उत्कृष्ट वाइन कूलर लग्नाच्या सर्वांत असामान्य गिफ्टपैकी एक आहे. कारण, तो साधारण वाइन चिलर नसून स्वयंपाकघर किंवा डायनिंग रूम डेकोर करण्यासाठी ही कामी येतो. तसेच, विवाहित जोडपे म्हणून किंवा त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या पेयासाठी त्यांनी ठेवलेली, वाइनची बाटली पूर्णपणे थंड असल्याच्या हमीसाठी त्यांना चिलर वापरण्याचा आनंद मिळेल.

गॅजेट्स

फायर स्टिक, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही किंवा टॅब्लेट यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स व्यावहारिक गिफ्ट होवू शकतात आणि लग्नाच्या गिफ्टच्या खास आयडियाज बनू शकतात.

बाथरोब

बाथरोब्स जे मॅचिंग आणि मुलायम असतात हे एक छान गिफ्ट आहे. याचा वापर कपल आंघोळ करताना आणि विश्रांती घेताना करू शकतात. चांगला बाथरोब तुर्की काॅटनचा बनलेला असतो आणि आतून खूप मुलायम असतो. रविवारची सकाळ निवांतपणे घालवण्याचा हा योग्य मार्ग!

परफ्यूम/ सुगंधित मेणबत्त्या

परफ्यूमला केवळ सुगंध मानले जात नाही तर एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देणारा सुगंध म्हणून मानले जाते. जोडप्याच्या परफ्यूमच्या आवडीनिवडींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सुगंधाला प्रेमाचे प्रतीक बनवा आणि जोडप्याला काही उत्कृष्ट परफ्यूम सेट गिफ्ट द्या. त्यांना सुगंधित मेणबत्त्या गिफ्ट द्या ज्या शांत प्रभाव देतात आणि संपूर्ण वातावरण नव्याने फुलवण्यासाठी उपयोगात आणल्या जावू शकतात. त्यांचा हलका सुगंध थकलेल्या जोडीला ताजेतवाने करेल आणि सर्वोत्तम लग्नाचे गिफ्ट बनेल!

कॅश

या जोडप्याला काय आवडेल हे तुम्हाला माहित नसल्यास आणि ते सोपे करायचे असल्यास तुम्ही गिफ्ट म्हणून कॅश देऊ शकता. याव्यतिरिक्त, कॅश गिफ्ट दिल्यास जोडप्याला भविष्यातील खर्चासाठी त्यांची बचत करणे शक्य होईल.

बॅग्ज

तुम्ही तुमच्या आवडत्या नवविवाहित जोडप्याला एक अत्याधुनिक स्ट्रॅप बॅग देऊ शकता जेणेकरून, ते त्यांच्या हनिमून किंवा विकेंडच्या प्रवासासाठी त्याचा वापर करू शकतील. वैयक्तिक टच देण्यासाठी हे हाताने रंगवलेल्या शिलालेखांनी किंवा फॉइलसह वैयक्तिकृत केले जाऊ शकते.

बोर्ड गेम

बोर्ड गेम खेळून जोडपी एकमेकांना समजून घेवू शकतात. ते तीन प्रकारे फायदेशीर आहे:

 • स्पर्धात्मक उपक्रम  खेळण्यामुळे अ‍ॅड्रेनालाईनची पातळी वाढते आणि नवविवाहित जोडप्यांमधील बंध मजबूत होतात.
 • जोडीदार दुसऱ्याची संज्ञानात्मक प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, परिणामी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो.
 • हा एक मजेदार छंद आहे जो तुम्हाला कुटुंबासमवेत अधिक वेळ घालण्याची अनुमती देतो.

कस्टम ड्रिंकिंग ग्लासेस 

तुमच्या वधू आणि वरासाठी कस्टम ड्रिकिंग ग्लासपेक्षा अधिक मूळ लग्नाच्या गिफ्ट आयडियाज सापडणार नाहीत, जर त्यांना ड्रिंक्स करणे आवडत असल्यास! ते विशेषत: त्यांच्या लग्नाच्या दिवशी संध्याकाळी आणि कामानंतर कस्टम-निर्मित ग्लास पसंत करतील! जर तुम्ही त्यांना मॅचिंग सेट दिल्यास, त्यांना बिअरचा सिक्स-पॅक आणि वाइनची बाटली देत असल्याची खात्री करा. जेणेकरून, जेव्हा ते त्यांचे गिफ्ट उघडतील तेव्हा लगेच ते नवीन ग्लासचा वापर करू शकतील.

प्री-पेड वेडिंग कार्ड्स

प्री-पेड वेडिंग कार्ड्सने आज सर्वांत लोकप्रिय गिफ्ट पर्यायांपैकी एक म्हणून वधूला ओव्हरस्टफ्ड लिफाफे देण्याच्या मागील प्रथेची जागा घेतली आहे. प्रत्येक जोडप्याला त्यांच्या लग्नानंतर नवीन सुरुवात करताना आर्थिक मदतीची गरज असते आणि घराला सुशोभित करण्यासाठी ते कोणत्याही उपयुक्त वस्तू खरेदी करू शकतात. हा पर्याय बहुतांश बँकांमध्ये उपलब्ध असून, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरूनही तुम्ही पैसे भरू शकता. गिफ्ट देण्याची ही एक सोपी परंतु प्रभावी पद्धत आहे जे गिफ्ट घेणाऱ्याला आनंदित करेल कारण, त्यांना जे आवडेल त्या वस्तू ते खरेदी करू शकतात.

हेही वाचा : भारतातील 'या' खास चाॅकलेट ब्रॅंडविषयी माहिती आहे?

निष्कर्ष

कोणतेही जोडपे जे लग्नाचे रजिस्टर तयार करतात ते त्यांच्या भविष्यातील आवश्यकतांबद्दल अत्यंत सजग असू शकतात. तथापि, साध्या चेकच्या तुलनेत गिफ्ट थोडे हटके असावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. जर तुम्हाला खास गिफ्ट द्यायचे असल्यास, गिफ्टला खास बनवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही लग्नाचे गिफ्ट देता, तेव्हा तुम्ही आनंदी जोडप्याने लग्न करून उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्याच्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करत असता. तर लग्नाच्या या खास गिफ्ट आयडियाजसह, तुमचे गिफ्ट तुम्हाला अभिनंदन करेल! 

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: लग्न करणाऱ्या जोडप्यासाठी लग्नाच्या काही सर्वोत्तम गिफ्ट आयडिया काय आहेत?

उत्तर:

एका जोडप्यासाठी सर्वोत्कृष्ट लग्नाच्या गिफ्ट आयडियामध्ये स्वयंपाकघरातील उपकरणे आणि घरगुती डेकोर वस्तूचा समावेश होतो. विविध गिफ्टच्या शाॅपमधून खरेदी करताना, तुम्ही वस्तू जोडप्याच्या सांगण्यानुसार कस्टमाईजही करू शकता.

प्रश्न: ज्यांच्याजवळ सर्व आहे त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे लग्नाचे गिफ्ट द्यावे?

उत्तर:

ज्या जोडप्यांकडे सर्व आहे, त्यांच्यासाठीही या वस्तू पूर्णपणे अनपेक्षित असतील. ज्यांच्याकडे सर्व आहे अशा जोडप्यासाठी काही सर्वोत्कृष्ट लग्नाच्या गिफ्ट आयडियाज येथे आहेत.

 • कस्टम प्रिंट किंवा मोनोग्राम असलेल्या वस्तू
 • ब्लँकेट्स आणि पिकनिक बास्केट
 • नावासह वाइन बॉक्स
 • कॉफीसाठी परकोलेटर
 • कॅरी ऑल लगेज 
 • ऑल-इन-वन ट्रे
 • प्लांटिंग टब्स/ फुलदाणी
 • सर्वोच्च प्रतीच्या सुगंधी मेणबत्त्या
 • विणलेले ब्लँकेट
 • अ‍ॅमेझॉन गिफ्ट कार्ड
 • सेफोरा गिफ्ट कार्ड
 • फरसह मॅट्स किंवा रग्स
 • बागकामासाठी किट
 • लग्नासाठी व्हिस्की गिफ्ट सेट
 • प्रवासासाठी आवश्यक गोष्टी
 • स्पा किट (ऑल-इन-वन) (ब्यूटी गिफ्ट बास्केट)
 • बोर्डासाठी गेम
 • ब्लूटूथ स्पीकर
 • वायफायसह राउटर

प्रश्न: कमी खर्चात लग्नाच्या गिफ्टच्या काही चांगल्या आयडिया काय आहेत?

उत्तर:

लग्नासाठी हे आहेत टॉप 5 बजेट गिफ्ट्स:

 • फ्रेम
 • डिनर सेट
 • कॅश
 • वैयक्तिकृत मग सेट्स
 • बेडिंगसाठी वस्तू

प्रश्न: लग्नाचे गिफ्ट म्हणून कॅश देणे असभ्यपणाचे मानले जाते का?

उत्तर:

नाही, कॅश ही एक अत्यंत व्यावहारिक आणि योग्य लग्नाचे गिफ्ट मानले जाते. सर्व प्रकारच्या जोडप्यांसाठी, हा नक्कीच सर्वांत सुरक्षित आणि सर्वांत मौल्यवान गिफ्ट पर्याय आहे.

प्रश्न: भारतीय जोडप्यासाठी लग्नाचे आदर्श गिफ्ट काय आहे?

उत्तर:

भारतीय लग्नासाठी ज्वेलरी हे आदर्श गिफ्ट आहे. वधू-वरांना त्यांच्या नव्या जीवनात सौभाग्याचे प्रतीक म्हणून चेन, कानातले किंवा बांगड्या अशी ज्वेलरी देणे शुभ मानले जाते.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.