written by khatabook | August 23, 2020

यशस्वी किराणा स्टोअर उघडण्यासाठी संपूर्ण माहिती

×

Table of Content

सध्या तुमचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार होण्याची भारतात चांगली संधी आहे. यासाठी तुम्हाला प्रतिष्ठित संस्थांकडून चांगले शिक्षण मिळवण्याची आवश्यकता नाही किंवा स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे असण्याचीही गरज नाही. तुमच्याजवळ फक्त आकांक्षा, कठोर परिश्रम करण्याची वृत्ती आणि थोडे पैसे आवश्यक आहेत. यासह, तुम्ही कोणत्याही वेळेत प्रतिष्ठा आणि पैसा मिळवू शकता. आश्चर्यचकित झालात? तुम्ही या सोप्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केल्यास तुम्ही किराणा दुकान सुरू करण्यास तयार असाल. तुमच्या उद्योजकीय प्रवासातील ही पहिली पायरी आहे.

किराणा स्टोअर काय आहे?

किराणा स्टोअर हा स्थानिक डिपार्टमेंट स्टोअर व्यवसाय आहे जो घरामध्ये आवश्यक असणारी सर्व किराणा साहित्य पुरवतो. तुम्ही निधी उपलब्धतेच्या आधारावर, एखादा स्टोअर सेट करण्याची योजना आखू शकता. खालील विभागांकडून माहिती घेवून स्टोअर कुठे सुरू करावे आणि कोणत्या मार्गांचे अनुसरण करावे, त्यांत रोजच्या गरजेचे कोणते किराणा साहित्य ठेवावे याविषयी जाणून घ्या.

किराणा स्टोअर कसे उघडावे? – पायऱ्यांद्वारे सूचना

पायरी 1: बिजनेसची फ्रेमवर्क बनवा

सर्वांत महत्वाची गोष्ट पहिले. तुम्ही प्रारंभ करण्यापूर्वी पुढील तपशिलांसह विभागीय स्टोअर योजना करा. लोकांना आणि बाजाराला समजून घ्या जे यशस्वी बिजनेसची गुरुकिल्ली आहे.

  • तुमच्या ग्राहकांची आवश्यकता जाणून घ्या
  • त्यांची विकत घेण्याची क्षमता ओळखा
  • त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल जागरूक राहा
  • स्पर्धक आणि त्यांचे विजयी धोरण तपासा

Step 2: चांगले स्थान निवडा

आता एखाद्या विशिष्ट क्षेत्रात लोकांच्या आवश्यकतांबद्दल तुम्हाला चांगली आयडिया मिळाली असल्यास, दुकानासाठी स्थान निवडायला सुरूवात करा. तुमच्या किराणा स्टोअरसाठी स्थान निवडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आजूबाजूला मोठा समुदाय असणे गरजेचे आहे. तसेच, जेथे लोकांना खरी गरज आहे. अशा ठिकाणी शहराच्या बाहेर थोड्या मोकळ्या जागेत, जेथे लोक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दूरच्या ठिकाणी प्रवास करतात. तुम्ही निवडलेले हे स्थान लोकांना सहजपणे उपलब्ध आहे हे सुनिश्चित करा. सभोवतालच्या प्रतिस्पर्ध्यांवर आणि त्यांनी ग्राहकांकडून मिळवलेल्या सदिच्छावर लक्ष ठेवा.

पायरी 3: तुमच्या निधीची योजना बनवा

एकदा तुम्ही किराणा स्टोअरचे स्थान निश्चित केल्यावर त्या ठिकाणी राहणाऱ्या किंमतीचे मोजमाप करणे आवश्यक आहे. त्यासह, तुम्ही आता दुकान भाड्याने देण्यासाठी आवश्यक निधीसाठी योजना आखली पाहिजे. तसेच, तुम्ही डिझाईन आणि पायाभूत सुविधांच्या किंमती, युटिलिटी बिले आणि सूची खरेदींवर विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही फ्रँचायझी बनण्याच्या दुसऱ्या पर्यायावर देखील विचार करू शकता. या प्रकरणात, तुम्हाला तयार वस्तू मिळेल आणि तुम्हाला फक्त फ्रेंचायझरला रॉयल्टी देण्याची आवश्यकता असेल. या मॉडेलचे बरेच फायदे आणि तोटे आहेत, म्हणून संशोधन करण्यास तयार राहा.

पायरी 4: स्टाॅकलिस्ट तयार करा

आपण गृहित धरू की तुमचे स्टोअर सेट अप केले आहे आणि सर्व पायाभूत सुविधा तयार आहेत. आता, तुम्हाला विक्री करण्यासाठी वस्तूंचा साठा करणे आवश्यक आहे. जर तुम्ही बर्‍याच वस्तू खरेदी केल्या आणि ग्राहक येत नसल्यास वाया जाणाऱ्या वस्तूंविषयी आणि कंपनीच्या नफ्याविषयी चिंता वाटणं साहजिक आहे. दुसरीकडे, जर तुम्ही फक्त अत्यल्प साठा ठेवला असेल आणि ग्राहकांचा ओघ वाढला असेल तर लोकांना त्यांना हवे ते मिळणार नाही, तर कदाचित ते पुन्हा तुमच्या स्टोअरला भेट देण्यास प्राधान्य देणार नाहीत. म्हणूनच, या गोष्टींमध्ये विजय मिळवण्यासाठी तुम्हाला संतुलन राखणे गरजेचे आहे. एक चांगली यादी व्यवस्थापन प्रणाली वापरा जे तुम्हाला या समस्येचे निराकरण करायला नक्कीच मदत करेल

तुमच्या किराणा स्टोअरचा नफा वाढवण्यासाठी टाॅप 5 टीप्स

किराणा स्टोअरची सुरूवातीची पायरी तुम्ही पार केली आहे. परंतु, अजून ही ग्राहकांमध्ये तुमची उपस्थिती निर्माण करण्यासाठी बराच लांब पल्ला गाठायचा बाकी आहे. मात्र, काळजी करू नका, येथे तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करण्यासाठी सोप्या टीप्स दिल्या आहेत.

  1. पाहा आणि अनुभवा- दिसणाऱ्या भावनारूपी गोष्टी मेंदूवर अधिराज्य गाजवतात त्यामुळे शाॅपला साजेसा गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजेत. एकाच दृष्टीक्षेपात गोष्टी ग्राहकांच्या नजरेस पडतील अशा जागी त्या नीटनेटक्या ठेवलेल्या असल्या पाहिजे.
  2. कामाची वेळ - तुमच्या परिसरातील रहिवाशांच्या आधारे तुम्ही दुकान चालवावे. जर तरूण कुटुंबे तुमच्या भागात राहत असल्यास आणि बहुतेक लोक दिवसा कामावर जात असतील तर तुम्हाला संध्याकाळी उशिरापर्यंत आणि रविवारी दुकान उघडे ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्रास न होता खरेदी करता येईल.
  3. सवलत आणि ऑफर - ग्राहकांना आमिष दाखवून सवलत आणि भेट कूपन प्रदान करा आणि त्यांना कायमस्वरूपी तुमचे ग्राहक बनवा. ग्राहकांना नि: शुल्क गोष्टी दिल्या जात असल्याची खात्री करा आणि तुमच्या व्यवसायाला बदनाम करणारे अप्रिय किंवा मूर्खपणाचे सौदे न देण्याचा प्रयत्न करा.
  4. तंत्रज्ञानसोबत राहा- स्मार्ट सिस्टम स्मार्टपणे जगावर राज्य करीत आहे आणि तुम्ही देखील अपग्रेड राहणे महत्वाचे आहे. भारत QR कोडसाठी अर्ज करा जी ग्राहकांसाठी एक सोपी आणि जलद पेमेंट करायची पद्धत आहे. सर्वसाधारण लोकांचे गट तयार करून सूट तपशिल शेअर करण्यासाठी ग्राहकांचे मोबाईल नंबर कलेक्ट करा.
  5. वैयक्तिक आयटमचा स्पर्श- तुम्ही स्टोअरमध्ये किती वस्तू ठेवत आहात हे महत्वाचे नाही, परंतु वैयक्तिक गोष्टींचा स्पर्श नेहमी शीर्षस्थानी असायला पाहिजे. तुमच्या ग्राहकांना व्यक्तिशः जाणून घ्या आणि त्यांना काय आवडते हे समजून घेवून त्यांच्या किराणाच्या गरजा भागवा. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल आणि ते तुमचे निष्ठावंत ग्राहक होतील.

महत्वपूर्ण सूचना

किराणा बिजनेस सुरू करणे खूप कठीण गोष्ट नाही. तुम्ही तुमचा बिजनेस थोड्या कालावधितच वाढवू शकता. तुम्हाला योग्य रचनेसह बिजनेस सुरू करण्याची आवश्यकता आहे. तसेच, काही दिवस काम समजून घेतल्यास बिजनेस योग्य मार्गावर आणण्यास मदत होईल. सगळ्यात चांगला सल्ला म्हणजे तुमच्या स्पर्धकांच्या व्यवसायाला समजणं आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारे ओळखणं आहे. हा साधा मंत्र तुमच्या किराणा व्यवसायाला उच्च शिखरावर घेवून जाईल.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.