written by khatabook | August 27, 2020

डेबिट, क्रेडिट नोट आणि त्यांचे स्वरूप काय आहे?

×

Table of Content


डेबिट आणि क्रेडिट नोटला समजून घ्या

तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता तेव्हा तुमच्या मित्रांसह आणि समुदायासह शेअर करणे एक चांगली बाब आहे. तुम्ही सुरुवातीच्या बर्‍याच अडचणींवर मात करून सेवा किंवा उत्पादन तुमच्या ग्राहकांपर्यंत वितरित करता, तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल. पण, ते इथेच थांबत नाही! एकदा एखादे उत्पादन किंवा सेवा वितरित झाल्यावर तुम्हाला तुमच्या ग्राहकाला बिल द्यावे लागेल. पहिल्यांदा काही वेळा किंवा काही ग्राहकांसाठी बिलिंग प्रक्रिया सुलभ होऊ शकते. तथापि, एकदा तुम्ही व्यवसायात आलात आणि ते वाढायला लागल्यावर तुमच्याकडे योग्य हिशोब प्रणाली असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला योग्य सिस्टम व्यवस्थापित करण्यासाठी आणि तुमच्या व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी सुरूवातीपासूनच सराव केला पाहिजे. डेबिट नोट आणि क्रेडिट नोट यासाठी सर्वोत्तम पद्धत आहे. आता तुम्हाला नक्कीच असे वाटले असेल की इनव्हाॅईस प्रक्रिया करणे ही एकमेव पायरी आहे. हे समजून घ्या की, इनव्हाॅईस हे ग्राहकांशी देवाणघेवाण करण्यासाठीचे कागदपत्र आहे ज्यात तुम्ही तुमच्या उत्पादन किंवा सेवेच्या शुल्काचा उल्लेख करता. तुम्ही विक्री केलेले उत्पादन किंवा तुम्ही ऑफर केलेली सेवा ग्राहकाच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल किंवा जर उत्पादनात किंवा सेवेमध्ये काही दोष असेल तर काय करावे? या प्रकरणात तुमच्याकडे कागदपत्रांचे आणखी काही संच असणे आवश्यक आहे. त्यांना अनुक्रमे डेबिट नोट आणि क्रेडिट नोट असे म्हणतात. ते काय आहेत, त्यांचे स्वरूप आणि ते कसे वापरावे ते जाणून घेवूया.

डेबिट नोट काय आहे?

ग्राहक किंवा खरेदीदार हे सदोष वस्तू विकल्या गेल्यानंतर विक्रेता, सेवा प्रदाता किंवा पुरवठादाराला नोट जारी करून पैसे परत करण्यास किंवा समायोजित करण्याची विनंती करतात. सर्वसाधारणपणे डेबिट म्हणजे एक खाते एंट्री आहे जी कंपनीच्या संपत्ती किंवा दायित्वासंबधी बॅलन्स शिटमध्ये वाढ किंवा घटीच्या परिणामाविषयी सूचित करते. डेबिट नोट (जीएसटी अनुपालन) सादर करण्याची आदर्श वेळ

  • कर इनव्हाॅईस तयार केले जाते आणि जारी केले जाते आणि करपात्र रक्कम वास्तविक करापेक्षा कमी असते.
  • भरलेल्या कराच्या तुलनेत कर इनव्हाॅईस पाठवले जाते आणि कर कमी आकारला जातो.

क्रेडिट नोट काय आहे?

दुसरीकडे, उत्पादन किंवा सेवा वितरित करण्यात अयशस्वी झाल्यास विक्रेत्याकडून खरेदीदारास क्रेडिट नोट दिली जाते. पुरवठादार काही प्रमाणात किंवा संपूर्ण इनव्हाॅईस परत करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येतो. इनव्हाॅईसला हटवणे शक्य नाही आणि अशा प्रकारे पेमेंट समायोजित करण्यासाठी क्रेडिट नोट जारी करणे आवश्यक आहे.

अर्थ आणि उदाहरणे:

डेबिट नोट आणि क्रेडिट नोट जारी करण्याच्या दोन उपयोगाच्या प्रकरणांवर नजर टाकूया:

परिस्थिती: ग्राहकाकडून विक्रेत्याला दिलेली रक्कम घटून जाते↓ ग्राहकाकडून विक्रेत्याला दिलेली रक्कम वाढून जाते↑
कारण: खराब गुणवत्तेचा माल किंवा उल्लेख केल्यापेक्षा कमी प्रमाणात प्राप्त केली जाते, इत्यादी. अतिरिक्त वस्तू वितरीत केल्या गेल्या आहेत किंवा कमी रकमेवर यापूर्वी शुल्क आकारले गेले आहे, इत्यादी.
परिणाम: वस्तूंचे (किंमत) मूल्य घटते ↓ इनव्हाॅईसचे मूल्य (बिल) वाढते ↑
पुढची पायरी? ग्राहक डेबिट नोट जारी करतात विक्रेता डेबिट नोट जारी करतात
उपाय: ↓ दायित्व सेटल करण्यासाठी ग्राहकाला कमी पैसे द्यावे लागतील ग्राहक उत्तरदायित्व सोडवण्यास अधिक रक्कम द्यावी लागेल ↑
शेवटची पायरी? विक्रेते ग्राहकांच्या डेबिट नोटच्या प्रतिसादात क्रेडिट नोट जारी करतात ग्राहक विक्रेत्याच्या डेबिट नोटला प्रतिसाद म्हणून क्रेडिट नोट जारी करतात.

क्रेडिट नोट का जारी करावी? (जीएसटी अनुपालन)

  • जेव्हा क्लायंट काही भाग किंवा संपूर्ण वस्तू परत करतो किंवा ऑफर
  • केलेल्या सेवेस उशीर झाला किंवा ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता नाही झाल्यास
  • क्लायंट केवळ आंशिक उत्पादन स्वीकारतो आणि उर्वरित नाकारतो परंतु संपूर्ण उत्पादनासाठी इनव्हाॅईस बनवले जाते
  • विक्रेत्याने वास्तविक करापेक्षा अधिक कर दर समाविष्ट केल्यास
  • विक्रेत्याने तयार केलेले इनव्हाॅईस खरेदीदारास ऑफर केलेल्या वास्तविक वस्तूंपेक्षा अधिक असल्यास

डेबिट विरूद्ध क्रेडिट नोट

डेबिट नोट क्रेडिट नोट
ग्राहक तयार करतो आणि विक्रेत्याला पाठवतो विक्रेता खरेदीदारास एक नोट पाठवतो
ही एक नोट आहे जी या पुरवठादाराच्या खात्यातून केलेली डेबिट नोंदवते ही नोट ग्राहकांच्या खात्यात क्रेडिट केली असल्याची खात्री करेल
खरेदी रिटर्न बुक अपडेट केले आहे विक्री रिटर्न बुक अपडेट केले आहे
खाते प्राप्त करण्यायोग्य (एआर) कमी केले आहे खाती देय (एपी) कमी केली जातात
ही ग्राहकाची क्रेडिट आहे आणि निळ्या शाईने लिहिल्या जाते हे विक्रेत्याचे डेबिट आहे आणि लाल शाईत नोट केले आहे
क्रेडिट नोटसाठी डेबिट नोटची देवाणघेवाण केली जाते डेबिट नोटसाठी क्रेडिट नोटची देवाणघेवाण केली जाते
पेमेंट आधीपासून दिले असल्यास जारी केले जाते जेव्हा एखादे इनव्हाॅईस आधीच दिले जाते तेव्हा जारी केले जाते

डेबिट आणि क्रेडिट नोट स्वरूप

दोन्ही स्वरूप MS Excel, MS Word, किंवा PDF मध्ये बनवता येतात. तथापि, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह, तुम्ही हे तुमच्या स्मार्टफोनमध्येही बनवू शकता. तुमच्याकडे जे काही आहे ते स्वरूप समान आहे, ज्यात खालील तपशिल असणे आवश्यक आहे. डेबिट नोट आणि क्रेडिट नोट्स दरम्यान फक्त किरकोळ थोडा फरक आवश्यक आहे. जीएसटी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे क्रेडिट किंवा डेबिट नोट करताना.

  • शीर्षक - उल्लेख डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट
  • प्रत्येक आर्थिक वर्षासाठी अनुक्रमांक तयार करा आणि खाली दिलेल्या सल्ल्यानुसार पाठवलेल्या प्रत्येक नोटसाठी एक अद्वितीय प्रदान करा.
    • ते 16 वर्णांपेक्षा अधिक नसावे
    • यात डॅश, स्लॅश, हायफन इत्यादी विशिष्ट वर्णांसह अल्फान्यूमेरिक वर्ण असू द्या.
  • नोट जारी केल्याच्या तारखेचा उल्लेख करा
  • संदर्भासाठी इनव्हाॅईस क्रमांक आणि इनव्हाॅईसची तारीख जोडा
  • पाठवणार्‍याचे नाव, संपर्क तपशिल आणि जीएसटीआयएन (वस्तू व सेवा कर ओळख क्रमांक) समाविष्ट करा.
  • प्राप्तकर्त्याचे संपर्क तपशिल आणि जीएसटीआयएन (वस्तू व सेवा कर ओळख क्रमांक) जोडा.
  • त्याचप्रमाणे, प्राप्तकर्त्याचा वितरण पत्ता, नाव आणि संपर्क क्रमांक जोडा
  • बिल किंवा कर इनव्हाॅईसशी संबंधित तारीख आणि अनुक्रमांक जोडणे आवश्यक आहे
  • त्यानंतर, सेवेचे मूल्य किंवा ऑफर केलेल्या उत्पादनास (करपात्र रक्कम) कर डेबिट केलेल्या तपशिलांसह जोडा
  • ते पुरवठादाराच्या/खरेदीदाराच्या डिजिटल स्वाक्षर्‍याने समाप्त करा

टीप: पूरक इनव्हाॅईस डेबिट नोट आणि क्रेडिट नोटला संदर्भित केलेले दुसरे नाव आहे .

डेबिट किंवा क्रेडिट नोट तयार करताना लक्षात ठेवावयाचे मुद्दे:

  • क्रेडिट नोटमध्ये समाविष्ट केलेली सर्व रक्कम नकारात्मक असायला पाहिजे त्याचप्रमाणे डेबिट नोटमध्ये सर्व रक्कम सकारात्मक असायला पाहिजे.
  • डेबिट किंवा क्रेडिट नोट वार्षिक कर परतावा देण्याच्या देय तारखेपासून 6 वर्षांसाठी सांभाळून ठेवा.
  • डेबिट किंवा क्रेडिट नोट सादर करणे महत्वाचे आहे. जीएसटी कायद्यानुसार आणि नोंदणीकृत पक्षाने हे कागदपत्र जारी करणे आवश्यक आहे.
  • वार्षिक रिटर्न भरण्याच्या तारखेपासून किंवा प्रत्येक आर्थिक वर्षाच्या 30 सप्टेंबररोजी क्रेडिट नोट द्या . तथापि, डेबिट नोट जारी करण्यास वेळ प्रतिबंध नाही. कारण कर वसूलीसाठी डेबिट नोट सरकारसाठी फायदेशीर आहे. दुसरीकडे, क्रेडिट नोट करांचे दायित्व कमी करते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही क्रेडिट नोट जारी करता तेव्हा वेळेसोबत असणं लक्षात ठेवा.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.