written by khatabook | August 21, 2020

BHIM UPI किती सुरक्षित आहे? | संपूर्ण मार्गदर्शक

×

Table of Content

BHIM UPI वर संपूर्ण मार्गदर्शिका

BHIM उर्फ भारत इंटरफेस फॉर मनी हा एक व्हर्च्युअल पेमेंट ॲप आहे, जो 30 डिसेंबर 2016 रोजी भारतात लॉन्च झाला आहे. BHIM ॲप तुम्हाला UPI वापरून जलद आणि सोपे आर्थिक व्यवहार करायची परवानगी देतो. UPI हा एक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आहे जो तुम्हाला एका मोबाईल अ‍ॅपवर सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्यास आणि एकाधिक बँक खात्यांचा वापर करण्यास अनुमती देतो. BHIM ॲप तुम्हाला फक्त मोबाईल नंबर किंवा व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस (व्हीपीए) सह थेट एका बँकेतून दुसर्‍या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतो. चला BHIM UPI ने ऑफर केलेले फिचर्स पाहूया.

पैसे पाठवा

BHIM अ‍ॅप एका बँकेतून दुसऱ्या बँकेत तातडीने पैसे ट्रान्सफर करण्याची अनुमती देते. पैसे पाठवण्याच्या पर्यायासह व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस (व्हीपीए), खाते क्रमांक & IFSC किंवा QR कोडद्वारे कोणालाही पैसे पाठवले जावू शकतात.

रिक्वेस्ट मनी

तुम्ही एखाद्याला पैशाची विनंती करू इच्छिता? BHIM UPI तुमच्यासाठी हे सोपे करते. व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस (व्हीपीए) दाखल करून पैसे कलेक्ट करण्यासाठी BHIM अ‍ॅप रिक्वेस्ट मनी हा पर्याय निवडा.

स्कॅन &पे

व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस (व्हीपीए) विसरलात? काळजी करू नका, स्कॅन करून पेमेंट करा. स्कॅनद्वारे क्यूआर कोड स्कॅन करा & amp; पेमेंट सुरू करण्यासाठी देय पर्याय निवडा. तुमचा स्वत:चा व्यवसाय असल्यास तुम्ही विक्रीवर पेमेंट मिळवण्यासाठी एक अद्वितीय QR कोड तयार करू शकता.

ट्रान्सजेक्शन

BHIM UPI मधील व्यवहार तुम्हाला तुमचा व्यवहार इतिहास आणि इतर प्रलंबित विनंत्या असल्यास त्या तपासण्याची परवानगी देतात. येथून तुम्ही या विनंत्यांना मंजूर किंवा नाकारू शकता. व्यवहारावरील रिपोर्ट इश्यूवर क्लिक करून तुम्ही तक्रार देखील करू शकता.

प्रोफाईल

प्रोफाईल ही एक जागा आहे जिथे तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित माहिती मिळेल जसे की तुमचा स्थिर क्यूआर कोड, पेमेंट पत्ते इ. त्याव्यतिरिक्त तुम्ही WhatsApp, ई-मेल इत्यादींद्वारे मेसेंजर ॲपद्वारे क्यूआर कोड देखील शेअर करू शकता.

बॅंक खाते

BHIM UPI मधील बँक खाते पर्याय तुमची लिंक केलेली बँक खाती आणि त्यांची UPI PIN स्थिती दर्शवतो. तुम्ही येथे तुमचा UPI PIN सेट किंवा बदलू शकता आणि मेनूमध्ये प्रदान केलेले खाते बदलावर क्लिक करून लिंक केलेले बँक खाती देखील बदलू शकता. तुम्ही बँक बॅलन्स तपासू इच्छित असल्यास संबंधित बँक खात्याच्या विनंती बॅलन्सवर क्लिक करा.

BHIM UPI पेमेंट ॲपचे SWOT विश्लेषण

जेव्हा आम्ही ॲप म्हणून BHIMचे विश्लेषण करतो तेव्हा आम्ही या आभासी पेमेंट पद्धतीचे फायदे, तोटे आणि संधी ओळखू शकतो

सामर्थ्य BHIM वापरण्यास सोपी आहे आणि NPCI द्वारा सपोर्टेड आहे (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही एक सरकारी संस्था आहे.
दोष अ‍ॅप कार्यक्षमतेबद्दल जागरूकता नसणे समस्यांचे निराकरण करण्यासाठी ॲप आणि सपोर्ट सिस्टमचा अभाव, त्यामुळे बरेच ग्राहक असमाधानी आहेत.
संधी डिजिटल पेमेंट सिस्टमच्या वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे अनेक संस्था ऑनलाईन बँकींग आणि मनी ट्रान्सफर सेवा देशभरात ऑफर करत आहेत. इंटरनेट सेवांच्या प्रसारासह भारतातील बिगर मेट्रो (टियर II आणि III) मधील शहरे आणि खेड्यांमध्ये विस्तारित केले गेले आहे.
थ्रेट डिजिटल व्यवहारांची सुरक्षा ही या ॲपची सर्वांत मोठी चिंता करण्याची बाब आहे. हे ॲपच्या वापरात अडथळा आणू शकते.

तुम्ही इंटरनेटशिवाय BHIM वापरू शकता?

होय, तुम्ही हे करू शकता! तुम्ही स्मार्टफोन वापरकर्ता नसल्यास किंवा फक्त इंटरनेट कनेक्टिव्हिटीची कमतरता असल्यास, तुम्ही BHIM UPI ॲप वापरून डिजिटल व्यवहार करू शकता. कशा पद्धतीने कार्य करते ते येथे आहे:

  1. तुमच्या मोबाईलमध्ये *99# डायल करा
  2. तुमच्या पसंतीची भाषा निवडा.
  3. तुम्हाला करायचा असलेल्या व्यवहाराचा प्रकार निवडा.
  4. तुमच्या बँकेचे नाव किंवा तुमच्या बँकेच्या IFSC कोडचे पहिले चार-अंक दाखल करा आणि नंतर “प्रत्युत्तर द्या”वर क्लिक कर.
  5. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाते लिंक असल्यास, इच्छित खाते निवडा ज्यामधून तुम्हाला व्यवहार करायचा आहे.
  6. याव्यतिरिक्त, तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक त्यानंतर स्पेस आणि नंतर कार्डची समाप्ती तारीख दाखल करा.
  7. तुमचा सहा-अंकी UPI PIN क्रमांक दाखल करा.

बस. आता तुमच्या व्यवहारावर प्रक्रिया केली जाईल!

BHIM UPI ॲप वापरण्याचे फायदे काय आहेत?

BHIP UPI अ‍ॅप वापरण्याचे बरेच फायदे आहेत.

  • तुम्ही भारतातील सर्व बँकांमधून डिजिटल पेमेंट करू शकता.
  • BHIM अ‍ॅप वापरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
  • प्रक्रिया सोपी, वेगवान आणि सुरक्षित आहे.
  • नॉन-वर्किंग दिवसाची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही वर्षामध्ये 365 दिवस व्यवहार करू शकता.
  • BHIM ॲप इंटरनेट कनेक्शनशिवाय कार्य करते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास अगदी साध्या फोनसह, तुम्ही UPI वर व्यवहार करू शकता.
  • UPI द्वारे पेमेंट ट्रान्सफर करण्याची मर्यादा 20,000 प्रति व्यवहार आहे.
  • तुम्ही कोणत्याही बँक अ‍ॅपवर BHIM UPI वापरू शकता.
  • सर्वोत्तम शेवटी आहे! म्हणजे BHIM अ‍ॅपद्वारे व्यवहार करून तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो.

BHIM अ‍ॅपबद्दल काही लोकप्रिय प्रश्न विचारले आहेत - आम्ही त्यांना तुमच्यासाठी उत्तर दिले आहे!

BHIM अ‍ॅप किती सुरक्षित आहे?

हा सर्वांत विचारला जाणारा एक प्रश्न आहे. होय, BHIM अ‍ॅप वापरून डिजिटल व्यवहार करणे सुरक्षित आहे. भारतात पेमेंट्स हाताळण्यासाठी सरकारी संस्था NPCI विकसित आणि देखभाल करत असल्याने, हा अ‍ॅप सर्वांत सुरक्षित पेमेंट गेटवे फ्लांट्स करतो. 90 सेकंदाच्या निष्क्रियतेनंतर, तुम्हाला लॉक केले जाईल आणि अ‍ॅपमधून बाहेर केले जाईल.

मी BHIM UPI मार्फत जीएसटी पेमेंट करू शकतो का?

होय! 29 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनुसार, जर तुम्हाला BHIM UPIमार्फत जीएसटी पेमेंट करायच्या असतील तर डिजिटल पेमेंटसाठी बिलाच्या जीएसटी भागावर कॅशबॅकच्या रूपात प्रोत्साहन दिले जाईल. शिवाय, तुम्हाला जीएसटी भागावर २०% कॅशबॅक मिळेल जो तुमच्या खात्यावर क्रेडिट होईल, ज्याला फक्त प्रत्येक व्यवहारासाठी 100 रुपये दिले जातील.

काही छुपे खर्च आहत का?

कार्ड पेमेंट वापरण्यासाठी जादा शुल्क आकारणारे दुकान-मालक तुम्हा सर्वांना माहित नाही काय? BHIM UPI बरोबर पैसे भरल्यास तुमचे अनावश्यक अतिरिक्त पैसे वाचतात कारण UPI वापरणारे व्यवहार पूर्णपणे मोफत असतात आणि BHIM अ‍ॅप त्याच्या सेवा वापरण्यासाठी एक पैसा सुद्धा घेत नाही. BHIM UPI योग्य रणनीती आणि एक परिपूर्ण लाँच आहे. हे अ‍ॅप demonitization वेळी सार्वजनिक केले गेले होते, त्यामुळे एका रात्रीतून हिट बनले. आज या डिजिटल युगात भारत सरकारने BHIM UPIचे आभार मानून रोजचे व्यवहार रोखहित, सोपे आणि सुरक्षित केले आहेत. तुम्हाला थोडक्यात अजून माहिती जोडायची इच्छा आहे काय? आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा!

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.