written by Khatabook | April 7, 2022

भारतात कोल्ड ड्रिंक व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शिका

×

Table of Content


व्यवसाय करायचं ठरवल्यास, पूर्ण मेहनतीने त्यात झोकून दिल्यास यश मिळवणं सोपं होत. बरोबर? पूर्वी पेय म्हटलं की, उन्हाळाच आठवायचा. कारण, याच सीझनमध्ये पेयांना मोठ्या प्रमाणात मागणी असायची. आता त्यांची मागणी वाढली असून याचे रुपांतर मोठ्या मार्केटमध्ये होताना दिसत आहे. या व्यवसायाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने, हा व्यवसाय जास्त फायदेशीर आहे. तथापि, पेय कंपनी सुरू करण्याचा मार्ग गुंतागुंतीचा आणि निर्बंधांनी भरलेला आहे हे सुद्धा नाकारता येत नाही. पण, एकदा का या व्यवसायात उतरल्यास, यश मिळवायला उशीर लागणार नाही.

गोल्डस्टीन मार्केट इंटेलिजन्सच्या मते, 2017 ते 2030 या कालावधीत भारतातील पॅकेज्ड नॉन-अल्कोहोलिक पेय बाजारात 16.2% सीएजीआरने वाढ होण्याची अपेक्षा आहे. शिवाय, जसजसे अधिकाधिक लोक कोल्ड ड्रिंक्सकडे वळतील, तसतसे अंदाजे कालावधीच्या अखेरीस बाजारपेठ 150 बिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 

भारतात नॉन-अल्कोहोलिक जसे की, स्क्वॅश, फळांचा रस, कोल्ड ड्रिंक्स, सोडा, मिनरल वाॅटर आणि सिरप यासारख्या पेय क्षेत्रात अलिकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. कोल्ड ड्रिंक्स हे एक प्रकारचे नॉन-अल्कोहोलिक पेय आहे जे साधारणपणे कार्बोनेटेड नसतात आणि त्यात नैसर्गिक किंवा कृत्रिम स्वीटनर, खाद्य सिड, नैसर्गिक किंवा कृत्रिम फ्लेवर आणि कधी-कधी ज्यूस असतो. फळे, काजू, बेरी, मुळे, औषधी वनस्पती आणि वनस्पतींच्या इतर स्त्रोतांपासून नैसर्गिक फ्लेवर तयार केले जातात; भारतातील लोकप्रिय सॉफ्ट ड्रिंक्समध्ये बिस्लेरी, माझा, स्प्राइट आणि फ्रुटी यांचा समावेश आहे.

भारताची लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे, तशी अर्थव्यवस्थाही वाढत आहे आणि परिणामी खाद्यपदार्थ-पेयांचीही गरज भासू लागली आहे. भारतातील पेय उद्योगात वाढ होण्याची मोठी क्षमता आहे, अशा प्रकारे या व्यवसायात सामील होणे हा एक फलदायी उपक्रम असेल. भारतात सॉफ्ट ड्रिंक्स व्यवसाय सुरू करण्याच्या नियमांबद्दल, तसेच तुमच्या क्षेत्रातील व्होलसेलर कोल्ड ड्रिंक डिस्ट्रीब्युटरशी कसा सहयोग करावा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

तुम्हाला माहिती आहे का?

1.3 अब्ज लोकसंख्येसह भारत जगातील सर्वांत मोठ्या ग्राहक बाजारपेठांपैकी एक आहे आणि 25 वर्षांखालील निम्म्याहून अधिक लोकसंख्येसह ते सर्वांत तरुण देशांपैकी एक आहे. त्यामुळे, तुमच्या जवळील कोल्ड ड्रिंक एजन्सी चालवणे हा एक फायदेशीर उपक्रम ठरू शकतो.

कोल्ड ड्रिंक उत्पादनासाठी व्यवसाय योजना

या व्यवसायाचा सर्वांत महत्वाचा घटक म्हणजे एक फूलप्रूफ व्यवसाय धोरण तयार करणे होय. हे करण्यासाठी, तुम्हाला पहिले मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे. बाजाराची गरज ओळखून नंतर तुम्ही बनवू इच्छित असलेल्या विशिष्ट उत्पादनावर निर्णय घ्या.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च लागू शकतो याचा अंदाज बांधा. निश्चित आणि परिवर्तनीय अशा दोन्ही खर्चांची गणना करणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पादन क्षेत्रातील कोल्ड ड्रिंक विक्रेत्यांशी धोरणात्मक सहयोग तयार करा आणि उत्पादनासाठी मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन योजना विकसित करा.

कोल्ड ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

उत्पादन क्षमतेनुसार, एक जोडी मशीन्स असलेल्या कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक स्वयंचलित कारखान्याची किंमत ₹ 20 लाख ते ₹ 50 लाख इतकी असू शकते. तसेच, सेमी-ऑटोमॅटिक मशीनसह हा खर्च अंदाजे 10-15 लाख रुपयांपर्यंत खाली येवू शकतो.

तुम्हाला जमीन, इन्व्हेंटरी, कायदेशीर शुल्क, श्रम आणि तीन महिन्यांसाठी भांडवलात पैसे गुंतवावे लागतील. भारतात कोल्ड ड्रिंक निर्मितीचा कारखाना सुरू करण्यासाठी एकूण 30 लाख ते 1 कोटी इतकी गुंतवणूक आवश्यक असेल.

हेही वाचा : 1 लाखाच्या आत सुरू होणाऱ्या सर्वोत्तम बिजनेस कल्पना

कोल्ड ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय आवश्यक आहे?

कोल्ड ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंगसाठी या गोष्टी आवश्यक आहेत:

  • कच्चा माल

तुम्ही प्रदान करता त्या कोल्ड ड्रिंकच्या प्रकारानुसार, तुम्हाला पेय तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या कच्च्या घटकांची आवश्यकता असेल. पेय उत्पादन प्रक्रियेत पाण्याच्या बाटल्या महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे तुमच्या कारखान्यात शुद्ध पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा लागतो. शेवटी, एक व्यवस्थित इन्व्हेंटरी आणि सहज सप्लाय साखळी हे सुनिश्चित करते की उत्पादन निर्धारित आणि वेळेवर पूर्ण केले जाते.

कोल्ड ड्रिंक्स उत्पादन सुविधेसाठी साखर, संरक्षक, कार्बोनेटेड पाणी आणि कृत्रिम फ्लेवर यासारख्या कच्च्या घटकांची आवश्यकता असू शकते. म्हणून, ताज्या फळांचा सततचा होणारा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी फळांच्या बागा सुविधेजवळ असणे आवश्यक आहे.

  • पायाभूत सुविधा

पेय उत्पादन सुविधा स्थापित करताना योग्य साईट निवडणे महत्वाचे आहे. पर्यावरणाला काही धोका होवू नये यासाठी बहुतेक कारखाने शहरांच्या बाहेरील बाजूस स्थापित केले जातात. तथापि, कोल्ड ड्रिंक्स फॅक्टरीसारख्या इतर प्रकरणांमध्ये, हाय-स्पीड तंत्रज्ञानासह अत्याधुनिक आधुनिक उत्पादन सुविधा विकसित करण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

  • यंत्रसामग्री

योग्य पायाभूत सुविधांची स्थापना झाल्यानंतर पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य साधने आणि यंत्रे होय. मात्र, काही व्यवसाय मालक खर्च कमी करण्यासाठी साध्या, कमी खर्चाच्या मशीनरीला प्राधान्य देतात, विशेषत: उत्पादन उद्योगात उत्पादन प्रचालनाची उभारणी करताना मात्र यंत्रसामग्रीच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये.

प्रत्येक वेळी, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की उच्च-गुणवत्तेची यंत्रे आणि अत्याधुनिक साधने आणि उपकरणे कारखान्यांमध्ये वापरली जात आहेत, जसे की मिक्सर, रेफ्रिजरेटर, कॉम्प्रेसर, ब्लेंडिंग सिस्टम, कार्बो कूलर्स आणि  अजूनही बरंच काही.

  • प्रक्रिया

प्रत्येक पेय प्रक्रिया अद्वितीय आहे आणि हा तो दृष्टीकोन आहे जो पेय यशस्वी आहे की अपयशी आहे हे ठरवतो. पेय उत्पादनामध्ये ठेवण्यापूर्वी त्याच्या फाॅर्म्यूल्याच्या सुरक्षिततेची पुष्टी करणे देखील महत्वाचे आहे.

  • मार्केटिंग आणि ब्रँडिंग

पेय कंपनीच्या यशासाठी योग्य मार्केटिंग आणि ब्रँडिंग युक्तीचा वापर महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आकर्षक लोगो वापरला पाहिजे जो लोकांना ब्रँडच्या संकल्पनेशी जोरदारपणे कनेक्ट करू शकेल. शिवाय, ब्रँडला महत्त्व देण्यासाठी योग्य जाहिरात कंपन्या आणि ब्रँड म्बेसेडरची निवड करणे महत्वाचे आहे. पॅकेजिंग हा आणखी एक घटक आहे ज्याचा लोक ब्रँड निवडताना विचार करतात.

  • विक्री

पेय क्षेत्रात एक मजबूत विक्री धोरण आवश्यक आहे. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, तुमच्या व्यवसायाचे स्वरूप आणि त्यात समाविष्ट असलेल्या पेयांच्या प्रकारांच्या आधारे तुम्ही योग्य व्होलसेलर विक्रेते, थेट विक्री किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सपर्यंत मार्केटिंग केले पाहिजे. आणखी एक आवश्यक घटक ज्याचे सखोल मूल्यांकन करणे आवश्यक आहे ते म्हणजे किंमत. कारण पेय क्षेत्राचे मार्केटिंग आणि ओव्हरहेड खर्च जास्त आहे, उत्पादन आणि विक्रीच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात मार्जिन असणे महत्वाचे आहे.

कोल्ड ड्रिंक डिस्ट्रिब्युटरशिपचे काय?

कोल्ड ड्रिंक्स किराणा मालाची दुकाने, रेस्टॉरंट्स, चित्रपटगृहे आणि समर्पित कोल्ड ड्रिंक्सची दुकाने यासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ग्राहकांना त्यांना हवा असलेला ब्रँड आणि फ्लेवर ऑफर करणे ही यशस्वी कोल्ड ड्रिंक रिटेल व्यवसायाची गुरुकिल्ली आहे.

जुन्या कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्ससह, बरेच व्यापारी एनर्जी ड्रिंक्स, सुधारित पाणी किंवा आईस्ड-टीविषयी जाणून घेतात. ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी, तुम्हाला कोल्ड ड्रिंक स्टोअरच्या रुपात, सॉफ्ट ड्रिंक पर्यायांची विस्तृत निवड करणे आवश्यक आहे..

कोल्ड ड्रिंक डिस्ट्रिब्युटरशिप सुरू करण्यासाठी काय करावे?

कोल्ड ड्रिंक मार्केटमधील किरकोळ विक्रेत्यांनी ब्रँड मेमरी, फ्लेवर, मूल्य चेतना आणि त्यांच्या ग्राहकांवर परिणाम करणारे इतर घटक समजून घेणे आवश्यक आहे. कोल्ड ड्रिंक किरकोळ विक्रेता होण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला प्रथम तुमच्या व्यवसायासाठी दस्तऐवजीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय कसा व्यवस्थापित करू इच्छिता यावर अवलंबून, तुम्ही एक खाजगी मर्यादित कंपनी, कॉर्पोरेशन, भागीदारी किंवा एकमेव मालकी म्हणून नोंदणी करू शकता. फ्रँचायजर कंपनी तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपाविषयी चौकशी करेल आणि तुम्हाला तुमच्या फर्मचे नाव आणि स्वरूप यासारखी माहिती पुरवावी लागेल.

भारतात कोल्ड ड्रिंक एजन्सी सुरू करणे

  • जाणून घ्या ब्रँडविषयी अधिक

सर्व टाॅप कोल्ड ड्रिंक कंपन्यांच्या वेबसाईट्स कंपनीचा इतिहास, नीतिमत्ता, मार्केटिंग तंत्र, सध्याच्या बातम्या आणि योजना याविषयी माहिती प्रदान करतात. किरकोळ विक्रेता बनण्यासाठी, तुमच्या व्यवसायासाठी काय चांगले आहे हे निवडण्यापूर्वी तुम्हाला प्रथम त्यांनी विकलेल्या बऱ्याच वस्तूंशी परिचित होणे आवश्यक आहे. वेबसाईटवर, तुम्हाला तुमचा किरकोळ व्यवसाय वाढवण्यासाठी आणि कंपनीसह सहयोग करण्याचे फायदे याविषयी उपयुक्त लेख देखील मिळू शकतात.

  • उत्पादनाच्या ऑफरिंगकडे लक्ष द्या

उत्पादनाची यादी तपासण्यासाठी, कंपनीची वेबसाईट पाहा. कॉफी, दुग्धजन्य पदार्थ, ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स आणि इतर वैविध्यपूर्ण उत्पादनांसाठी प्रमुख कोल्ड ड्रिंक कंपन्या उपलब्ध आहेत. तुम्ही भरू शकता अशा सूचीतील कोणतीही तफावत पाहण्यासाठी अन्य स्टोअरला भेट द्या.

  • तुमचे टार्गेट प्रेक्षक ओळखा

तुम्हाला तुमच्या कोल्ड ड्रिंक्सकडे आकर्षित होणारी अचूक लोकसंख्या ओळखता आली पाहिजे. मग, त्या ग्राहकांना टार्गेट करण्यासाठी, त्यांच्या खरेदीच्या सवयींचे विश्लेषण करणे आणि योग्य मार्केटिंग दृष्टीकोन डिझाईन करा. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना टार्गेट करण्यासाठी बाजार सर्वेक्षण साधनांची श्रेणी वापरू शकता.

  • कोल्ड ड्रिंक ब्रँडच्या वेबसाईटवर फ्रँचायजीसाठी अर्ज करा

विशिष्ट कोल्ड ड्रिंक ब्रँड निवडल्यानंतर तुम्ही फ्रँचायजी बनण्यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही आता इंटरनेटवर डीलरशिपसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला फक्त कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन व्यवसाय चौकशी फॉर्म भरायचा आहे.

पर्यायाच्या स्वरूपात 'डीलरशीप प्लिकेशन'साठी टॅब असल्यास, त्यावर क्लिक करून ज्या वस्तूच्या डीलरशिपसाठी अर्ज करायचा आहे, ती वस्तू निवडू शकता, तर 'सबमिट' बटण दाबण्यापूर्वी वेबसाईटच्या स्टेप्स फॉलो करा. हे नजीकच्या काळात एक नवीन व्यवसाय विनंती फॉर्म तयार करेल.

  • ऑन-बोर्डिंग

ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्यानंतर लवकरच तुम्हाला कोल्ड ड्रिंक फर्मच्या विक्री सल्लागाराचा कॉल येईल. हा प्रतिनिधी तुम्हाला जवळच्या बॉटलिंग फॅक्टरीची माहिती देईल, तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि कंपनीची धोरणे स्पष्ट करेल. तुम्ही चांगली जोडी आहात की नाही हे निर्धारित करण्यात हे तुम्हा दोघांनाही मदत करेल.

  • मार्केटिंग धोरण

सॉफ्ट ड्रिंक कंपन्या ब्रँड म्बेसेडर म्हणून काम करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर प्रमोशनल क्टिव्हिटीज करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करतात. ज्यूससारख्या कार्बोनेटेड आणि नॉन-कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स विकणाऱ्या दुकानदारांसाठी ही महत्त्वपूर्ण बाब असेल आणि लोकप्रिय उत्पादनांमधून बरेच पैसे कमवता येतील. जेव्हा कोल्ड ड्रिंक्सचा विचार केला जातो, तेव्हा ही ब्रँड मेमरी आहे जी विक्रीस चालना देते. 

  • विक्री धोरण

कोणत्याही मोठ्या ब्रँडशी संबंध ठेवल्यास, तुम्हाला फायदा होईल कारण ते जाहिरातींवर बरेच पैसे खर्च करतात. कोल्ड ड्रिंक्स खाद्यपदार्थासह एकत्र करणे ही एक चांगली कल्पना आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने स्टेकची ऑर्डर दिली तर त्याला फ्री सॉफ्ट ड्रिंक मिळेल किंवा त्याने पिझ्झा ऑर्डर केला तर त्याला सवलतीत सॉफ्ट ड्रिंक मिळेल. तुमच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, तुम्हाला योग्य व्हिज्युअल आणि उत्पादन शैली निवडणे आवश्यक आहे आणि तुमच्या स्टोअरमध्ये तो संदेश व्यक्त करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : भारतात हार्डवेअर शाॅप कसे उघडायचे? या पायऱ्यांद्वारे जाणून घ्या

निष्कर्ष

पेय उद्योगात गुंतणे उत्पादक आणि डिस्ट्रिब्युटर दोघांसाठीही फायदेशीर आहे. कोल्ड ड्रिंक्सच्या व्यवसायाचा वर्कफ्लो या ब्लॉगमध्ये वर्णन करण्यात आला आहे. सॉफ्ट ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यात किंवा कोल्ड ड्रिंक्स डिस्ट्रिब्युटर बनण्यात स्वारस्य असलेल्या कोणात्याही व्यक्तीला हा ब्लाॅग वाचल्यास योग्य ती माहिती मिळू शकेल अशी आम्हाला आशा आहे. 

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: कोल्ड ड्रिंक्स उद्योगात नफ्याचे मार्जिन किती आहे?

उत्तर:

कोल्ड ड्रिंक्सवर नफ्याचे  मार्जिन 10% ते 20% पर्यंत असते.

प्रश्न: भारतातील सॉफ्ट ड्रिंक उद्योग फायदेशीर आहे का?

उत्तर:

सर्वांत लोकप्रिय सॉफ्ट ड्रिंक ग्लासेस ₹ 15 ते ₹ 20 पर्यंत आहेत, ज्यात 50 ते 60% नफा मार्जिन आहे. जर तुमची कोल्ड ड्रिंक एजन्सी रोज 300 ग्लास ₹15 प्रमाणे विक्री करू शकत असल्यास, तुम्ही दरमहा ₹ 4,500 ते ₹ 5,000 च्या दरम्यान कमवू शकता, जो सुमारे ₹ 1,20,000 नफा आहे.

 

प्रश्न: भारतात पेय फर्मची नोंदणी कशी करता येईल?

उत्तर:

तुम्हाला एफएसएसएआयकडे तुमच्या कोल्ड ड्रिंक कंपनीची नोंदणी करणे आणि बार बेव्हरेजेससाठी खाद्यपदार्थ सुरक्षा परवाना मिळवणे आवश्यक आहे.

खालील परवाने देखील आवश्यक आहेत:

  • ट्रेडमार्कची नोंदणी (पर्यायी)
  • जीएसटी क्रमांक

प्रश्न: स्फूर्तिदायक पेय तयार करण्यासाठी किती खर्च येतो?

उत्तर:

पेप्सी, थम्स अप, स्प्राइट, लिम्का आणि कोकाकोला सारख्या कोल्ड ड्रिंक्सची किंमत प्रति लिटर 1.50 ते 2.00 च्या दरम्यान आहे. परिणामी, 250 मिलीलीटर सॉफ्ट ड्रिंक पेयाची किंमत 0.50 असेल.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.