written by Khatabook | January 3, 2022

1 लाखाच्या आत सुरू होणाऱ्या सर्वोत्तम बिजनेस कल्पना

×

Table of Content


बिजनेस म्हटलं की सर्वांसमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे गुंतवणूक. तीही साधी-सुधी नाही तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते, असंच बहुतेकाना वाटतं. पण तसं पाहता हे खरं नाही. तुम्ही कमीतकमी गुंतवणुकीत बिजनेस सुरू करू शकता. तुम्ही जर बिजनेस करायचं ठरवलंच तर 1 लाखांपेक्षा कमी भांडवलासह विविध प्रकारचे छोटे बिजनेस सुरू करण्याच्या अनेक संधी आहेत. यासाठी फक्त तुम्हाला बिजनेस निवडण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच या लेखात 1 लाखात कोणता बिजनेस सुरू करता येईल, त्याविषयी माहिती देण्यात आली आहे

1 लाखात कोणता बिजनेस सुरू करता येईल?

सध्या सर्वच ऑनलाईन बिजनेस तेजीत सुरू आहेत. जागतिक महामारीमुळे ऑनलाईन बिजनेसची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यापैकी काही बिजनेस 1 लाखात सुरू करता येईल असे आहेत:

ऑनलाईन शिक्षण

ई-लर्निंग उद्योग हा सर्वांत फायदेशीर बिजनेस क्षेत्रांपैकी एक आहे. अलीकडील सर्वेक्षणांनुसार, येणाऱ्या काळात ई-लर्निंग क्षेत्राच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, जर तुम्ही शिक्षण किंवा ई-लर्निंग उद्योगांमध्ये काम शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या ठिकाणी ई-ट्यूटर बिजनेस सुरू करू शकता. हा सर्वांत किफायतशीर 1 लाख गुंतवणूक करून सुरू करता येणाऱ्या बिजनेसपैकी एक आहे.

हा बिजनेस सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? ई-ट्यूटरिंग सेवेसाठी शिक्षणाची क्षमता असलेला मजबूत सेट आवश्यक आहे. तसेच, अनुभवी शिक्षकांचा मोठा समूह किंवा भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या शिक्षकांची आवश्यकता असेल. ई-ट्यूटर सेवा कंपनीचा प्रारंभ करण्यासाठी, तुम्हाला अंदाजे 11,000 रुपयांची आवश्यकता असेल. वेबसाईट विकसित करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी तुम्हाला सुमारे 5000-6000 रुपये लागतील. साहित्य आणि इंटरनेट कनेक्शनसह संसाधनांसाठी, सुमारे 5000 रुपये लागतील.

ज्यूस काउंटर 

भारतात काही महिन्यांमध्ये हवामान बऱ्यापैकी गरम आणि अधिक उन्ह असणारं असतं. उन्हापासून सामना करण्यासाठी आणि तहान शमवण्यासाठी, बरंच लोक ताजे फळ पेय आणि मॉकटेलला प्राधान्य देतात. यामुळे ज्यूस बार कंपनी सुरू करण्याची कल्पना ही यशस्वी होवू शकते आणि यासाठी गुंतवणूक ही जास्त करायची गरज नाही.

शहरात ज्यूस बार उघडण्यासाठी, तुम्हाला चांगली जागा भाड्याने घ्यावी लागेल. तसेच, ताजी फळे व इतर संबंधित उपकरणं घेण्यासाठी तुम्हाला अंदाजे 25,000 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये ज्युसर, ब्लेंडर, गाळण्या, ताजी फळे, फ्लेवर्ड सिरप, डिस्पोजेबल कटलरी व जागेचा समावेश आहे.

ड्रॉप-शिपिंग सेवा

ड्रॉप-शिपिंग सेवा महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी मोठी मागणी आहे. लोकांना आणि बिजनेसला विविध व्यावसायिक हेतूंसाठी एक विश्वसनीय आणि जलद ड्रॉप-शिपिंग सेवा हवी आहे; अशा प्रकारे, ड्रॉप-शिपिंग किंवा कुरिअर सेवांची मागणी आणि व्याप्ती विस्तृत आहे.

हा बिजनेस सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? शहरातील ड्रॉप-शिपिंग सेवेसह प्रारंभ करण्यासाठी, तुम्हाला अंदाजे 35,000 रुपये भरावे लागतील. तुम्ही स्टोअरेज आणि पॅकिंग सुविधा भाड्याने घेऊ शकता, पॅकिंग आणि कलेक्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी काही लोकांना कामावर घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काही मालमत्ता खरेदी करणे आवश्यक आहे जसे की एक ऑनलाईन वेबसाईट विकसीत करणे किंवा खरेदी करणे. जिथे लोक तुम्हाला रकमेसह ऑर्डर आणि पॅकिंग साहित्य देऊ शकतील. तसेच पॅकेजिंग मटेरियल, गोंद, पॅकेजेसवर पत्ते छापण्यासाठी प्रिंटर आणि इतर संबंधित मालमत्ता घेण्यासाठी अंदाजे 1 लाखापर्यंत खर्च येवू शकतो.

क्लाउड किचन

फूड सेक्टरच्या शक्यता आणि वाढती मागणी नाकारता येणार नाही. कारण, रेस्टॉरंट किंवा फूड बार चालवण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल कमी करण्यासाठी क्लाउड किचन लोकप्रिय होत आहे. क्लाउड किचन म्हणजे फूड डिलीव्हर करणे होय. यासाठी तुम्हाला बसण्याच्या जागेवर आणि वातावरणावर भरपूर पैसा खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरातून स्वच्छ आणि उत्कृष्ट जेवण डिलीव्हर करू शकता. हे सध्या सर्वांत लोकप्रिय कंपनी संकल्पनांपैकी एक आहे.

हा बिजनेस सुरू करण्यासाठी, तुम्हाला स्वच्छ, स्वयंपाकासाठी हवेशीर जागा तसेच सक्षम कुकची आवश्यकता असेल. प्रारंभिक बजेट अंदाजे 50,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे.

फ्लिपिंग वेबसाईट्स

छोट्या बिजनेसपासून ते मोठ्या कॉर्पोरेशनपर्यंत, प्रत्येक फर्म आपल्या ऑपरेशन्सला विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी मदतीच्या शोधात आहे. सेवा म्हणून वेबसाईट फ्लिप करणे आजकाल अत्यंत लोकप्रिय आहे आणि बाजारातील नवीन बिजनेस संकल्पनांपैकी एक आहे. त्यामुळे, जर तुम्ही कालबाह्य वेबसाईट्सना अधिक अद्वितीय आणि आकर्षक आवृत्त्यांमध्ये सुधारित करण्याचा किंवा वापरकर्ता-अनुकूल स्मार्टफोन ॲप्स विकसित करण्याचा अनुभव असलेले तंत्रज्ञ असल्यास, तुम्ही वेबसाईट फ्लिपिंग बिजनेस सुरू करू शकता. ही 1 लाखाखालील उत्कृष्ट बिजनेस कल्पनांपैकी एक आहे. तुम्ही तुमची वेबसाईट किंवा ॲप डिझाईन किंवा डेव्हलपमेंट अनुभव तसेच तुम्ही प्रदान करता त्या सेवांच्या प्रकारांवर आधारित तुमचे समर्थन शुल्क सेट करू शकता.

हा बिजनेस सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? वेबसाईट फ्लिपिंग सेवांसह प्रारंभ करण्यासाठी, तुम्ही नवीनतम आणि योग्य प्रोग्रामिंग भाषांसह वेबसाईट्स आणि ॲप तयार करण्यात किंवा पुन्हा डिझाईन करण्यात कुशल आणि प्रवीण असणे आवश्यक आहे. हा बिजनेस सुरू करण्यासाठी, उच्च-कार्यक्षमता असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप संगणक, तसेच प्रीमियम सॉफ्टवेअर किंवा इंटरफेस यासारख्या काही मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 55,000 रुपये लागतील.

बुटीक सेवा

1 लाखांपासून सुरू होण्याऱ्या बिजनेससाठी, बुटीक सेवा ही सर्वांत जास्त मागणी असलेली आणि आकर्षक कंपनी संकल्पना आहे. आजकाल लोक उत्पादित कपड्यांपेक्षा कस्टम-मेड आणि एक प्रकारचे डिझायनर कपडे मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. त्यामुळे, तुम्ही जर फॅशन डिझाईनचे पदवीधर असाल किंवा सुंदर वस्त्रे डिझाईन करण्यात आणि तयार करण्यात तुम्हाला आनंद वाटतं असल्यास, तुम्ही तुमच्या छंदाचे रूपांतर आकर्षक बिजनेसमध्ये करू शकता. जर तुम्हाला कमी प्रारंभिक खर्चासह एक छोटा बिजनेस स्थापित करायचा असल्यास, बुटीक सेवांवर तुमची बिजनेस धोरण केंद्रित करा. हा बिजनेस सुरू करण्याची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे भाडे आणि मालमत्तेचा उच्च खर्च टाळून तुम्ही तो तुमच्या स्वतःच्या घरातून आरामात करू शकता.

अंदाजे 25,000 रुपयाच्या खर्चासह, तुम्ही स्टिचिंग आणि डिझायनिंगशी संबंधित काही मालमत्ता खरेदी करून घरबसल्या बुटीक सेवा सुरू करू शकता, जसे की कार्यक्षम शिलाई मशीन, धागे, लेस, बॉर्डर, बटणे, कापड आणि अजूनही बरंच काही.

लेखन सहाय्य

निःसंशयपणे, कंटेंट सर्वोच्च आहे. त्यामुळे, जर तुम्हाला ब्लॉग आणि लेख लिहिण्यात आनंद वाटत असल्यास किंवा लेखन-संबंधित सेवा जसे की ब्लॉग लेखन, वेबसाईट कंटेंट आणि एसईओ राईट-अपमध्ये तुमचा तगडा अनुभव असल्यास, तुम्ही लेखन सेवा बिजनेस सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. तुमचा लेखन अनुभव आणि ऑफर केलेल्या सेवांच्या आधारावर तुम्ही तुमच्या सहाय्यासाठी दर कार्ड निवडू शकता.

हा 1 लाख गुंतवणुकीचा बिजनेस सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? लेखन सेवांना विविध प्रकारच्या क्षमतांची, तपशिलाच्या विस्तारासाठी भेदक नजर, संपादनाचे कायदे आणि नियम समजून घेणे आवश्यक असते. लेखन सेवा कंपनीसह प्रारंभ करण्यासाठी, लेखन आणि संपादन उपकरणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 20,000 रुपयाची आवश्यकता असेल.

हेही वाचा : विविध क्रेडिटर्स काय आहेत: अर्थ आणि उदाहरणे

बेकिंग सेवा

तुम्ही बेकिंगमध्ये कुशल आहात आणि घरातून छोटा बिजनेस सुरू करायच्या कल्पना शोधत आहात? मग तुम्ही स्वादिष्ट केक, कुकीज, मफिन्स आणि हॉट-पाइपिंग ब्राउनीज विकणारी बेकरी उघडण्यासाठी धोरण आखले पाहिजे.

तुमच्या घरातून बेकरी सेवा ऑफर करणे सुरू करण्यासाठी, तुम्हाला काही बेकिंगशी संबंधित मालमत्तेवर अंदाजे 12,000 ची गुंतवणूक करावी लागेल. ओव्हन-टोस्टर-ग्रिल (OTG), बेकिंग मटेरियल, बेकिंग मोल्ड, वजनाचे यंत्र, केक टेबल आणि बेकिंग क्सेसरीज ज्यात स्क्रॅपर्स, बटर शीट, नोझल्स, स्पॅटुला आणि ब्लेंडर यांचा समावेश आहे.

कॅफेची स्थापना

आजकाल कॅफे अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. लोकांना त्यांचा वेळ घालवायला, मिटिंग करायला आणि कॅफेमध्ये हँग आउट करायला आवडते. तुम्ही चहा किंवा कॉफीचा आनंद घेत असाल आणि ते तयार करण्यात कुशल असाल, तर तुमचा कॅफे सुरू करून तुमची स्वप्ने साकार करा. तुम्ही किमान बजेटमध्ये ते उत्तम प्रकारे सेट करू शकता. ही 1 लाखाच्या आतील बिजनेस कल्पनांपैकी एक आहे जिथे तुम्ही कॉफी, चहा आणि काही चवदार स्नॅक्स समाविष्ट करू शकता. सुरूवातीला खर्च कमी करण्यासाठी तुम्ही स्वयं-सेवा वापरात आणू शकता.

फूड ट्रक किंवा व्हॅन सेट करणे

तुम्ही रेस्टॉरंट उघडता तेव्हा तुम्हाला खूप खर्च करावा लागतो. दुसरीकडे, फूड ट्रक कंपनी सुरू करणे हा भारतीय उपखंडातील सर्वांत सोपा आणि किफायतशीर बिजनेस आहे. हा बिजनेस सुरुवातीच्या गुंतवणुकीसह 1 लाखांच्या आत सुरू केला जाऊ शकतो. परमिट आणि लायसन्ससाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. इतर खर्चामध्ये कर्मचारी, ट्रकचे शुल्क, कच्चा माल इत्यादींचा समावेश होतो.

टिफिन किंवा घरी बनवलेले खाद्यपदार्थ पुरवणे

कॉर्पोरेट संस्कृतीच्या वाढीमुळे, लोक स्वादिष्ट घरगुती जेवण शोधत आहेत. लोकांना घरी बनवलेले टिफिन खाद्यपदार्थ पुरवणे हा तुमचा छोटा बिजनेस सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. यासाठी स्वयंपाकाची सुविधा, डिलीव्हरी करणारे कर्मचारी, टिफिन आणि डिस्पोजेबल इत्यादींची गरज असेल.

इव्हेंट मॅनेजमेंट

इव्हेंट मॅनेजमेंट बिजनेस हा 1 लाखांपासून सुरू करता येणाऱ्या बिजनेसपैकी एक उत्तम पर्याय आहे. वाढदिवसाच्या पार्ट्या, लग्न, औपचारिक कार्यक्रम, वैयक्तिक, विश्रांती किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांपासून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा यात समावेश होतो. तुम्ही विशिष्ट स्थान निवडू शकता किंवा एकाधिक सेवांसाठी पर्याय देऊ शकता. तुम्ही इव्हेंट हाताळणी शुल्क आकारू शकता ज्यात सजावट, छायाचित्रकार, खानपान आणि संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय यांचा समावेश असेल. ही सेवा प्रदान करण्यासाठी जनसंपर्क कौशल्ये हा एक महत्त्वाचा फायदा आहे.

इलेक्ट्रॉनिक दुरुस्तीचे दुकान

लॅपटॉप, स्मार्टफोन इत्यादी तंत्रज्ञानाच्या गॅझेट्सच्या अतिवापराच्या या युगात, सर्व कार्यालयीन उपकरणे आणि घरगुती उपकरणे वेळोवेळी दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगची खरी गरज आहे. गरजेनुसार स्पेअर पार्ट्सची विक्री केल्यास नफ्याचे प्रमाण खूपच चांगले आहे. उपकरणांच्या सर्व्हिसिंगसाठी ग्राहकांकडून वार्षिक देखभाल करार (AMC) देखील घेतला जाऊ शकतो. ही गुंतवणूक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दुरुस्ती, प्लिकेशन सॉफ्टवेअर, काही तंत्रज्ञांसाठी सॉफ्टवेअरची अंमलबजावणी इत्यादींमध्ये मदत करेल. त्यामुळे हा बिजनेस सुरू करण्यासाठी 70,000-80,000 रुपये लागतील.

आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञ म्हणून काम करणे

लठ्ठपणाचे वाढते प्रमाण आणि निरोगी जीवन जगण्याच्या इच्छेमुळे आहार आणि पोषण-आधारित सल्ल्याला जास्त मागणी वाढली आहे. ग्राहक या सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्राप्त करू शकतात. 1 लाख गुंतवणुकीचा बिजनेस स्थापित केल्यानंतर, व्यक्तींना मासिक शुल्काच्या आधारावर आणि त्यांच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार निरोगी आहार प्रदान केला जाऊ शकतो. तुमच्या ग्राहकांशी सल्लामसलत करण्यासाठी, तुम्हाला फक्त एक कार्यालय आणि वजनाचे यंत्र गरजेचं आहे.

क्राफ्ट क्लासेस

मुलांसाठी आणि अगदी लहान मुलांसाठी क्राफ्ट क्लासेस सुरू केले जाऊ शकतात जेणेकरून त्यांना त्यांचे कौशल्य सेट वाढवण्यात मदत होवू शकते. या पर्यायामध्ये, सुरुवातीला काही जाहिरात खर्चासह छोटी जागा आवश्यक आहे. हे वर्ग तासानुसारही घेतले जावू शकतात. हे वर्ग सुरू करण्यासाठी सुमारे 25,000 रुपये आवश्यक आहेत.

एचआर सेवा

कोणी मानवी संसाधन सेवादेखील (एचआर) पुरवू शकतो. त्यासाठी, तुम्हाला वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यासोबत टाय अप करणे आवश्यक आहे आणि योग्य स्तरावरील कौशल्य संचासह योग्य लोकांना नियुक्त करून त्यांच्या रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवते तेव्हा कमिशन आकारले जाऊ शकते. बिजनेससाठी कार्यालयाची जागा आणि काही कर्मचाऱ्यांना समन्वयित करण्यासाठी 1 लाख गुंतवणुकीची आवश्यकता आहे. हा एचआर बिजनेस उभारण्यासाठी काही जाहिराती कराव्या लागू शकतात.

विमा एजंट

आजकाल SBI, LIC इत्यादी नामांकित कंपन्यांचे इन्शुरन्स एजंट बनणे सोपे आहे. यासाठी तुम्हाला काही निकष पूर्ण करावे लागतील आणि परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील. एकदा पूर्ण केल्यावर, तुम्हाला विमा मिळवण्यासाठी केवळ चांगली रक्कम दिली जात नाही तर भविष्यातील प्रीमियम पेमेंटवर भरपूर ॲड-ऑन लाभांसह कमिशनही मिळते. आर्थिक नियोजनात विमा आवश्यक असल्याने 1 लाखाखालील सदाबहार छोट्या बिजनेस कल्पनांपैकी ही एक आहे.

भाषांतर सेवा

भिन्न देश, संस्कृती आणि पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये अधिक परस्पर संवादासह अनुवादांची गरज खूप वाढली आहे. प्रादेशिक आणि स्थानिक भाषा जाणणारे बरेच लोक आता प्रथमच इंटरनेट वापरत आहेत. अशा प्रकारे भाषांतर सेवा प्रदान करणे ही एक उदयोन्मुख बिजनेस संधी बनत आहे. फक्त तुमच्या भाषेत अस्खलित असणे आवश्यक आहे, जे तुम्हाला चांगले पैसे मिळवण्यात आणि तुमचा स्वतःचा बिजनेस सुरू करण्यात मदत करू शकते. हे तुम्हाला तुमचा बिजनेस विविध भौगोलिक सीमा ओलांडून वाढवण्याची अनुमती देईल.

वैद्यकीय पर्यटन

आजारांच्या वाढीमुळे आणि चांगल्या आणि अधिक स्वस्त आरोग्य सेवांच्या मागणीमुळे, वैद्यकीय पर्यटन अधिक लोकप्रिय होत आहे. कमी गुंतवणुकीसह आणि उत्कृष्ट परताव्यासह वाढणारी बिजनेस संधी म्हणजे पुरेशी माहिती मिळवणे आणि एखाद्या शहराबाहेर वैद्यकीय मदत घेणार्‍या रुग्णाच्या सर्व वैद्यकीय मागण्यांसाठी सानुकूल सेवा प्रदान करणे होय.

हेही वाचा : भारतात हार्डवेअर शाॅप कसे उघडायचे? या पायऱ्यांद्वारे जाणून घ्या

निष्कर्ष

वरीलपैकी कोणताही छोटा बिजनेस 1 लाखाच्या आत सुरू करून स्वतःचे बॉस बना. आम्‍हाला आशा आहे की हा लेख तुम्‍हाला छोटा बिजनेस सुरू करण्‍यासाठी उपलब्‍ध असलेले विविध पर्याय प्रदान करेल. ज्यासाठी किमान 1 लाखापेक्षा कमी गुंतवणुकीची आवश्‍यकता आहे. कमीतकमी गुंतवणुकीत किफायतशीर बिजनेस निर्माण करण्यासाठी तुमचे कौशल्य वाढवा आणि योग्य बिजनेस योजना विकसित करा. अधिक बिजनेस-संबंधित टिप्ससाठी Khatabook ॲप डाउनलोड करा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. बिजनेस सेटअपसाठी 1 लाख गुंतवणूक करणे आवश्यक आहे का?

नाही, बिजनेस सेटअपसाठी 1 लाख गुंतवणूक करणे आवश्यक नाही. 1 लाखाखालील बिजनेस  सुरू करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

2. आजकाल फूड व्हॅन उभारण्याला प्राधान्य का दिले जात आहे?

रेस्टॉरंट उघडण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते, तर 1 लाखापेक्षा कमी गुंतवणूक करून फूड व्हॅन सुरू करता येते. त्यामुळे सध्या फूड व्हॅन उभारण्याला प्राधान्य दिले जात आहे.

3. तुमचे स्वतःचे बुटीक सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे?

अंदाजे 25,000 रुपयाच्या खर्चासह, तुम्ही घरबसल्या बुटीक सेवा सुरू करू शकता.

4. आहार आणि पोषण-आधारित सल्लामसलत यांना खूप मागणी का आहे?

लठ्ठपणाची वाढती पातळी आणि तंदुरुस्त आणि आरोग्यदायी जीवनाची चिंता यामुळे आहार आणि पोषण-आधारित सल्लामसलत यांना खूप मागणी आहे.

5. क्लाउड किचन सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे?

आपण अंदाजे 50000 रुपयात क्लाउड किचन सुरू करू शकतो.
 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.