written by Khatabook | November 16, 2021

जीएसटी: तिमाही रिटर्न फाईलिंग आणि कराचे मासिक पेमेंट (QRMP)

×

Table of Content


GST परिषदेने 5 ऑक्टोबर 2020 रोजी व्यवसायाच्या सुलभतेसाठी उपाय म्हणून आयोजित केलेल्या 42 व्या बैठकीत जीएसटी अंतर्गत तिमाही रिटर्न भरणे आणि करांचे मासिक पेमेंट किंवा QRMP योजनेची शिफारस केली. ही योजना 1 जानेवारी 2021 पासून लागू झाली. ती अनुपालनावरचा भार कमी करण्यासाठी आणि व्यवसाय सोपा करण्यासाठी (EODB) सुरू करण्यात आली. या योजनेतील व्यवसायांना आता मासिक कर भरण्यासह तिमाही रिटर्न भरण्याची परवानगी आहे. तुम्ही विशिष्ट मर्यादेच्या अंतर्गत आल्यास, तुम्ही तिमाही रिटर्न फाईलिंग आणि मासिक पेमेंट कर किंवा QRMP योजनेसाठी पात्र असाल. या योजनेअंतर्गत अनेक सरलीकृत नियम लागू केले आहेत त्यांची या लेखात चर्चा केली आहे.

या योजनेसाठी पात्र नोंदणीकृत व्यक्ती:

  • कोणतीही नोंदणीकृत व्यक्ती ज्याने मागील आर्थिक वर्षात वार्षिक एकूण उलाढालीची (AATO) मर्यादा ओलांडली आहे.
  • समजा 2019-2020 साठी, मर्यादा 5 कोटी होती. एखादी व्यक्ती जानेवारी-मार्च तिमाही, 2021 (31.01.2021 पर्यंत) साठी QRMP योजनेची निवड करू शकते परंतु, त्यांनी डिसेंबर 2020 साठी जीएसटीआर-3B फाईल करणे आवश्यक आहे (आधीच दाखल केले नसल्यास)
  • तुम्ही AATO चे कॅल्क्युलेट कॉमन पोर्टलवर करदात्याच्या मागील वर्षाच्या रिटर्नमध्ये दिलेले सर्व तपशील विचारात घेतल्यानंतरच करू शकता.
  • ज्या प्रकरणांसाठी AATO चालू आर्थिक वर्षात एका तिमाहीत 5 कोटीपेक्षा जास्त आहे, ती व्यक्ती पुढील तिमाहीपासून या योजनेसाठी पात्र राहणार नाही.

QRMP योजनेच्या पर्यायाचा वापर करणे:

तुम्ही वर्षभरात कधीही, जीएसटी पोर्टलवर (http://www.gstcouncil.gov.in/) QRMP योजनेच्या फायद्यांचा लाभ मिळवू शकता.

तुम्ही नोंदणीकृत व्यक्ती असल्यास, तुम्ही मागील तिमाहीतील दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या आत सध्याच्या तिमाहीच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या योजनेची निवड करणे आवश्यक आहे, पण तुम्ही पूर्वीचे रिटर्न भरणे आवश्यक आहे जे देय होते योजनेची तारीख निवडण्याच्या वेळी.

विधान सोपे करण्यासाठी, येथे एक उदाहरण आहे:

जर तुम्हाला हा पर्याय जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी वापरायचा असेल, तर तुम्ही 1 मे ते 31 जुलै या कालावधीत हे करणे आवश्यक आहे. तर, दिलेल्या तिमाहीसाठी तुम्ही 27 जुलैचा पर्याय निवडल्यास, तुम्ही 22 किंवा 24 जुलै रोजी (जसे असेल तसे) जूनचे रिटर्न भरणे आवश्यक आहे.

हेही वाचा: जीएसटी अंतर्गत वस्तूंचा सप्लाय करण्याचे ठिकाण

डीफॉल्ट मासिक/तिमाही रिटर्न जे दाखल करायचे आहे:

अनुक्रमांक.

नोंदणीकृत व्यक्तीचा तपशील

डिफाॅल्ट पर्याय

1

1.5 कोटीपर्यंत AATO असलेल्या नोंदणीकृत व्यक्ती आणि ज्यांनी सध्याच्या आर्थिक वर्षात प्रत्येक तिमाहीत जीएसटीआर-1 रिटर्न सादर केले आहे

तिमाही रिटर्न

2

1.5 कोटीपर्यंत AATO असलेल्या नोंदणीकृत व्यक्ती आणि ज्यांनी सध्याच्या आर्थिक वर्षात प्रत्येक महिन्यात जीएसटीआर-1 रिटर्न सादर केले आहे

मासिक रिटर्न

3

मागील आर्थिक वर्षात 1.5 कोटी ते 5 कोटीपेक्षा जास्त AATO असलेल्या नोंदणीकृत व्यक्ती

तिमाही रिटर्न

वरील डीफॉल्ट पर्याय नोंदणीकृत व्यक्तींच्या फायद्यासाठी आहेत. तथापि, त्यांना हवे असल्यास ते वरील पर्याय कधीही बदलू शकतात. कोणत्याही तिमाहीसाठी योजनेची निवड रद्द करण्याची सुविधा मागील तिमाहीच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चालू तिमाहीच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खुली राहते.

तुम्ही वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांका (जीएसटीआयएन) नुसार योजना निवडू शकता. म्हणून, वेगवेगळ्या लोकांना (त्याच पॅन अंतर्गत भिन्न जीएसटीआयएन) एक किंवा एकाधिक जीएसटीआयएनसाठी QRMP योजनेचा लाभ घेण्याचा पर्याय आहे. त्यामुळे, समान पॅन अंतर्गत काही जीएसटीआयएन या योजनेची निवड करू शकतात आणि उर्वरित जीएसटीआयएन दिलेल्या योजनेसाठी निवड करू शकत नाहीत.

जीएसटी अंतर्गत आयएफएफ (इनव्हॉईस सादर सुविधा):

आयएफएफ उपलब्ध आहे जेणेकरून पहिल्या महिन्यात केलेल्या B2B सप्लायचा तपशील जीएसटीआर-2A आणि जीएसटीआर-2B मध्ये दर्शवला जाईल आणि प्राप्तकर्त्यांना आयटीसीचा लाभ घेण्याची परवानगी दिली जाईल. ही सुविधा केवळ ऐच्छिक आहे आणि अनिवार्य नाही.

आयएफएफ वापरून, व्यवसाय त्यांच्या जावक सप्लायचे तपशील लगेचच पुढच्या महिन्याच्या 1 ते 13 व्या दिवसादरम्यान अपलोड करू शकतात, पण किंमत प्रत्येक महिन्याला पन्नास लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असावी. त्यांना फक्त तेच इनव्हाॅईस Iआयएफएफमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे, जिथे त्यांना त्यांच्या ग्राहकांच्या आयटीसी परिणामांचा विचार करायचा आहे.

जावक सप्लायचे तपशील सादर करणे:

ज्यांना जीएसटी QRMP योजनेची निवड करायची आहे त्यांनी त्यांच्या जावक सप्लायचे तपशील तिमाही जीएसटीआर-1 मध्ये सादर करणे आवश्यक आहे. तिमाहीच्या प्रत्येक पहिल्या आणि दुसर्‍या महिन्यासाठी, तुम्ही आयएफएफ वापरून तुमच्या जावक सप्लायचे तपशील सादर करणे आवश्यक आहे. तथापि, हा तपशील दरमहा पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त नसावा.

आयएफएफमध्ये इनव्हॉईसेसचे तपशील प्रदान करण्याची सुविधा फॉर्म जीएसटीआर-2A आणि प्राप्तकर्त्याच्या जीएसटीआर-2B फॉर्ममध्ये दर्शवल्या जाणार्‍या अशा सप्लायचे तपशील सादर करण्याची परवानगी दिली जाते. मागील महिन्यासाठी आयएफएफ सादर करण्याची सुविधा पुढील महिन्याच्या 13 तारखेनंतर उपलब्ध होणार नाही. व्यवसायांमध्ये सुलभतेचा उपाय म्हणून इनव्हाॅईस सतत अपलोड करण्याची सुविधा प्रदान केली जाते. नोंदणीकृत व्यक्ती लगेचच पुढील महिन्याच्या 1 ते 13 तारखेदरम्यान आयएफएफमध्ये त्यांचे इनव्हॉईस सेव्ह करू शकतात. सरलीकरणासाठी, खालील उदाहरण पाहूया:

उदाहरण: नोंदणीकृत व्यक्ती (ज्याने QRMP योजनेची निवड केली आहे) एका तिमाहीच्या पहिल्या महिन्यात जारी केलेल्या त्यांच्या एकूण दहा इनव्हॉईसपैकी दोन घोषित करू शकतात. ते आयएफएफ वापरून दोन इनव्हॉईसचे तपशील घोषित करू शकतात. उर्वरित 8 इनव्हॉईसचे तपशील संबंधित तिमाहीच्या जीएसटीआर-1 मध्ये घोषित केले जातील. घोषित केलेले दोन इनव्हाॅईस (आयएफएफमध्ये) तिमाहीच्या पहिल्या महिन्याच्या प्राप्तकर्त्याच्या जीएसटीआर-2B मध्ये दाखवले जातील. जीएसटीआर-1 रिटर्नमध्‍ये घोषित केलेले उर्वरित आठ इनव्हॉईस या तिमाहीत शेवटच्‍या महिन्‍याच्‍या प्राप्तकर्त्याच्‍या जीएसटीआर-2B मध्‍ये दाखवले आहेत. ही सुविधा 1 ते 13 ऑगस्ट या कालावधीत उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे, ऑगस्टसाठी, नमूद केलेली सुविधा 1 ते 13 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असेल.

जर एका तिमाहीत पहिल्या 2 महिन्यांत आयएफएफ वापरून इनव्हाॅईस तपशील घोषित केले असल्यास तुम्हाला जीएसटीआर-1 मध्ये तपशील पुन्हा सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणून, कोणत्याही नोंदणीकृत व्यक्तीने कोणत्याही तिमाहीत केलेल्या जावक सप्लायच्या तपशिलांमध्ये प्रत्येक पहिल्या दोन महिन्यांसाठी आयएफएफ वापरून इनव्हाॅईस तपशील आणि संबंधित तिमाहीसाठी जीएसटीआर-1 मध्ये सादर केलेले इनव्हाॅईस तपशील यांचा समावेश असेल. नोंदणीकृत व्यक्ती, त्यांच्या पर्यायानुसार, आयएफएफ न वापरता केवळ जीएसटीआर-1 मध्ये तिमाहीदरम्यान केलेल्या जावक सप्लायचे तपशील सादर करणे निवडू शकते.

मासिक कर भरणा:

QRMP योजनेंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही व्यक्तीने पहिल्या 2 महिन्यांपैकी प्रत्येक तिमाहीत देय कराची रक्कम भरावी. तथापि, त्यांनी फॉर्म जीएसटी PMT-06 मध्ये महिन्याच्या 25 तारखेपर्यंत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. चलान तयार करताना, करदात्यांनी चलान तयार करण्याचे कारण म्हणून 'तिमाही करदात्यासाठी मासिक पेमेंट' निवडणे आवश्यक आहे. सदर व्यक्ती पहिल्या दोन महिन्यांत मासिक कर भरण्यासाठी खाली दिलेल्या दोन पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडू शकते:

  • निश्चित रक्कम- या पर्यायांतर्गत, तुम्हाला मागील तिमाहीत (जर ते तिमाही जीएसटी रिटर्न असल्यास) रोखीने भरलेल्या कराच्या 35% इतकी रक्कम भरावी लागेल. किंवा ते मागील तिमाहीच्या शेवटच्या महिन्यात रोखीने भरलेल्या कराच्या रकमेइतके असू शकते (जर ते मासिक रिटर्न असल्यास). जीएसटी PMT-06 मध्ये प्री-भरलेले चलन जनरेट करण्यासाठी कॉमन पोर्टलवर ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

या पद्धतीद्वारे संबंधित महिन्यापूर्वीच्या संपूर्ण कर कालावधीसाठी रिटर्न भरण्यात अयशस्वी झालेल्या नोंदणीकृत व्यक्तींना मासिक कर भरणे उपलब्ध होणार नाही. लक्षात घ्या की, पूर्ण कर कालावधी म्हणजे जेव्हा व्यक्ती पहिल्या दिवसापासून कर कालावधीच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणीकृत असते.

  • स्व-मूल्यांकन -  नमूद केलेल्या नोंदणीकृत व्यक्ती जावक आणि आवक पुरवठ्यावरील कर दायित्व आणि जीएसटी PMT-06 मध्ये आयटीसीची उपलब्धता लक्षात घेऊन देय कराची रक्कम भरू शकतात. आयटीसीचा लाभ घेण्यासाठी, प्रत्येक महिन्याला जीएसटीआर-2B मध्ये स्वयं-मसुदा तयार केलेला आयटीसी विवरण सादर केला जातो.

कोणतीही नोंदणीकृत व्यक्ती कोणत्याही तिमाहीच्या कोणत्याही दोन महिन्यांत वर नमूद केलेल्या दोन कर भरणा पद्धतींपैकी एकाची निवड करण्यास स्वतंत्र आहे.:

निल कर दायित्वासाठी किंवा तिमाहीच्या पहिल्या महिन्यासाठी - ई-कॅश/ ई-क्रेडिट लेजरमध्ये पुरेशी रक्कम असली तरीही कोणतीही रक्कम जमा करण्याची गरज नाही.

निल कर दायित्वासाठी किंवा तिमाहीच्या दुसऱ्या महिन्यासाठी - ई-कॅश/ ई-क्रेडिट लेजरमध्ये पुरेशी रक्कम असली तरीही कोणतीही रक्कम जमा करण्याची गरज नाही.

कर भरणा करण्यासाठी तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांसाठी जमा केलेल्या रकमेचा परतावा करण्याचा कोणताही दावा या तिमाहीसाठी फॉर्म जीएसटीआर-3B मध्ये रिटर्न भरल्यानंतरच परवानगी दिली जाईल. तिमाही रिटर्न भरेपर्यंत करदात्याला ठेवीची रक्कम इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही.

जीएसटीआर-3B तिमाही फाईलिंग:

अशा तिमाहीनंतर महिन्याच्या 24 तारखेला किंवा त्यापूर्वी जीएसटीआर-3B तिमाही सादर करा. जीएसटीआर-3B मध्ये, तुम्ही तिमाहीत केलेला सप्लाय, आयटीसी घेतलेला आणि इतर सर्व आवश्यक तपशील सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या 2 महिन्यांत नोंदणीकृत व्यक्तीने जमा केलेली रक्कम केवळ त्या तिमाहीच्या जीएसटीआर-3B मधील दायित्वाची भरपाई करण्यासाठी वापरली जाऊ शकते. तथापि, त्या तिमाहीचा जीएसटीआर-3B दाखल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास, ती एकतर नंतरच्या तिमाहीत इतर कारणांसाठी वापरली जाऊ शकते किंवा परतावा म्हणून दावा केला जाऊ शकतो. जेव्हा तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांत अशा व्यक्तीची नोंदणी रद्द केली जाते, तरीही त्यांना संबंधित कर कालावधीसाठी जीएसटीआर-3B रिटर्न सादर करणे आवश्यक आहे.

वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये व्याज लागू:

व्याज खालील आधारावर उत्तरदायी असेल:

निश्चित बेरीज पद्धत:

अनुक्रमांक

प्रकरण

पेमेंट करावे लागणारे व्याज 

1

पुढील महिन्याच्या 25 तारखेपर्यंत पेमेंट केलेल्या आधीच-भरलेल्या जीएसटी PMT-06 फॉर्ममधील कर दायित्व.

निल

2

आधीच भरलेल्या जीएसटी PMT-06 मधील कर दायित्व पुढील महिन्याच्या 25 तारखेपर्यंत भरले नाही

कर दायित्वाच्या 18% (पुढील महिन्याच्या 26 तारखेपासून पेमेंटच्या तारखेपर्यंत)

3

पहिल्या दोन महिन्यांसाठी अंतिम कर दायित्व आधी-भरलेल्या जीएसटी PMT-06 द्वारे भरलेल्या करापेक्षा कमी किंवा समान आहे.

निल

4

पहिल्या दोन महिन्यांसाठी अंतिम कर दायित्व हे आधी-भरलेल्या जीएसटी PMT-06 द्वारे भरलेल्या करापेक्षा जास्त आहे आणि अतिरिक्त कर दायित्व जीएसटीआर-3B च्या देय तारखेमध्ये भरले गेले आहे.

निल

5

पहिल्या दोन महिन्यांसाठी अंतिम कर दायित्व हे आधी-भरलेल्या जीएसटी PMT-06 द्वारे भरलेल्या करापेक्षा जास्त आहे आणि अतिरिक्त कर दायित्व GSTR-3B च्या देय तारखेमध्ये भरले गेले नाही.

कर दायित्वाच्या 18% (जीएसटीआर-3B देय तारखेपासून* पेमेंटच्या तारखेपर्यंत)

[* करदात्याच्या राज्यावर आधारित अशा तिमाहीनंतरच्या महिन्याच्या 22 व्या किंवा 24व्या तारखेला.]

स्व-मूल्यांकन पद्धत:

करदात्याला तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांच्या देय तारखेनंतर न भरलेल्या किंवा भरलेल्या अंतिम कर दायित्वावर 18% व्याज द्यावे लागेल.

लक्षात घ्या की तिमाहीच्या तिसऱ्या महिन्यात उशीरा कर भरल्यास करदात्याला 18% व्याज द्यावे लागेल. वापरलेल्या पद्धतीचा प्रकार विचारात न घेता हे लागू आहे.

QRMP योजनेअंतर्गत विलंब शुल्क:

जर तुम्ही शेवटच्या GST पेमेंट तारखेपर्यंत देय कर भरला नाही, तर तुम्हाला त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागेल. जीएसटीआर-3B (तिमाही) देय तारखेमध्ये दाखल न केल्यास, मग दिलेल्या तक्त्यानुसार पेमेंट केले पाहिजे, कमाल विलंब शुल्क रु. 5000:

कायद्याचे नाव

उशीराच्या प्रत्येक दिवसासाठी विलंब शुल्क

उशीराच्या प्रत्येक दिवसासाठी विलंब शुल्क ('शून्य' कर दायित्वासाठी)

सीजीएसटी कायदा, 2017

Rs.25

Rs.10

एसजीएसटी कायदा, 2017

Rs.25

Rs.10

आयजीएसटी कायदा, 2017

Rs.50

Rs.20

तथापि, जीएसटी PMT-06 मधील तिमाहीत पहिल्या दोन महिन्यांत कर भरण्यास उशीर झाल्यास तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागणार नाही.

हेही वाचा: जीएसटी पोर्टलवर निल जीएसटीआर-1 रिटर्न कसे फाईल करायचे?

निष्कर्ष:

वरील नियमांचे पालन करून तुम्ही जीएसटी QRMP योजनेचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय अधिक वाढण्यास फायदा होईल. आम्हाला आशा आहे की आम्ही इतर माहितीसह या लेखाद्वारे QRMP योजना आणि जीएसटी तिमाही रिटर्न बाबत तुमच्या शंका दूर करण्यात यशस्वी झालो आहोत. जीएसटी अनुपालनांचे पालन करणे आवश्यक आहे आणि येथेच Khatabook ॲप समोर येते. या ॲपपद्वारे, तुम्ही तुमच्या फोनवर जीएसटीविषयी अधिक जाणून घेऊ शकता, तुमचा व्यवसाय आणि वैयक्तिक खातेवही मॅनेज करू शकता.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. मी QRMP योजनेची निवड किंवा निवड रद्द करू शकतो?

तुम्हाला तुमची वैध क्रेडेन्शियल वापरून जीएसटी पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि नंतर QRMP योजनेची निवड करण्यासाठी किंवा निवड रद्द करण्यासाठी सेवा > रिटर्न > तिमाही रिटर्न पर्यायाची निवड करा.

2. करदात्याच्या वतीने जीएसटी प्रॅक्टिशनर QRMP योजनेची निवड किंवा निवड रद्द करू शकतो का?

नाही, ते तसे करू शकत नाहीत. ते फक्त तपशील पाहू शकतात.

3. जर एखाद्या करदात्याने QRMP योजनेची निवड केली असेल आणि त्यांची वार्षिक एकूण उलाढाल (AATO) ₹ 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास ही योजना वैध असेल का?

नाही, जर करदात्याची वार्षिक एकूण उलाढाल (AATO) ₹ 5 कोटींपेक्षा जास्त असल्यास करदाता QRMP योजनेसाठी पात्र होणार नाही.

4. प्रत्येक तिमाही/वार्षिक पर्याय वापरणे आवश्यक आहे का?

नाही, नोंदणीकृत व्यक्तींना प्रत्येक तिमाहीत पर्याय वापरण्याची आवश्यकता नाही. पर्यायाचा वापर केल्यास, ते भविष्यातील कर कालावधीसाठी निवडलेल्या पर्यायानुसार रिटर्न देणे सुरू ठेवतील जोपर्यंत ते पर्याय बदलत नाही किंवा त्यांचा AATO पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त नसेल.

5. QRMP योजनेचे फायदे काय आहेत?

करदात्यांच्या सुलभतेसाठी, प्रणालीने छोट्या करदात्यांना जीएसटी तिमाही रिटर्नची आवृत्ती सोपवली आहे.

 

 

 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.