written by Khatabook | November 15, 2021

जीएसटी अंतर्गत वस्तूंचा सप्लाय करण्याचे ठिकाण

×

Table of Content


वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी वस्तू किंवा सेवांच्या उत्पत्तीवर आकारला जात नाही. हे गंतव्यस्थान किंवा सप्लायच्या ठिकाणावर अवलंबून असते जेथे सेवा किंवा वस्तूंचा वापर केला जातो. म्हणून, हा गंतव्यस्थान आधारित जीएसटी कर किंवा गंतव्य-केंद्रित कर आहे आणि ज्या राज्यामध्ये सेवा/वस्तूंचा वापर केला जातो त्या राज्याला जीएसटी कर आकारणीचा अधिकार आहे.

जीएसटी अंतर्गत सप्लायचे ठिकाण काय आहे?

जीएसटी कर प्रणालीमध्ये सप्लायचे स्थान महत्त्वाचे आहे, कारण हे निर्धारित करते की व्यवहार राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यीय म्हणून गणले जावे आणि 3 जीएसटी करांपैकी कोणता कर- केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी), एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) आणि राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) कलेक्ट करावा.

'वस्तूंचा सप्लाय' आणि 'जीएसटी अंतर्गत वस्तूंची ने-आण सुरू असताना सप्लायचे ठिकाण' यातील फरक

चला सुरुवातीलाच मूल्यांकन करूया की वस्तूंचा सप्लाय आणि वस्तूंच्या सप्लायच्या ठिकाणाचा काय अर्थ आहे, जेव्हा वस्तूंची ने-आण समाविष्ट असते.

वस्तू किंवा सेवांचा सप्लाय

वस्तू किंवा सेवांच्या जीएसटीमध्ये सप्लायचे ठिकाण

वस्तू किंवा सेवांचा हा शब्द सप्लाय खरेदीदार, सप्लायर किंवा अन्य लोकांद्वारे वस्तू किंवा सेवांच्या ने-आणचा संदर्भ देते.

सप्लायचे ठिकाण हे वस्तू किंवा सेवांचे स्थान असते जेव्हा मालाची हालचाल संपते तेव्हा प्राप्तकर्ता वस्तू/सेवा प्राप्त करतो.

या टर्म अंतर्गत, वस्तूंचा सप्लाय म्हणजे जेव्हा वस्तू किंवा सेवा विक्रेत्याकडून खरेदीदाराला वितरीत केल्या जातात. यात वस्तूच्या ने-आणदरम्यान किंवा त्यापूर्वी एजंटसारख्या तिसऱ्या पक्षाचा समावेश असतो आणि सामान्यत: शीर्षक हस्तांतरणासह होतो.

असे गृहीत धरले जाते की तिसऱ्या व्यक्तीला वस्तू मिळाली आहे, आणि म्हणून, वस्तूंच्या सप्लायचे जीएसटी ठिकाण हे तिसऱ्या पक्षाच्या बिजनेसचे प्रमुख ठिकाण असेल.

सप्लाय नियमांचे जीएसटी ठिकाण आणि त्यावर होणारी कर आकारणी समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहू.​​​​​

राज्यांतर्गत जीएसटी उदाहरण:

मुंबईतील एबीसी एंटरप्रायजेसचे श्री. मोहन यांचे उदाहरण घ्या, जे महाराष्ट्रातील पुणे येथे श्री. भास्करला 20 लॅपटॉप पुरवतात. वस्तूची उत्पत्ती आणि सप्लाय करण्याचे ठिकाण दोन्ही महाराष्ट्रात असल्याने, मुंबईत व्यवहारवर एसजीएसटी लागतो.

जीएसटीमध्ये आंतरराज्य खरेदीचे उदाहरण:

चला उदाहरण गंतव्य बदलासह घेऊया. मुंबईतील एबीसी एंटरप्रायजेसचे श्री. मोहन यांच्या व्यवहाराचा विचार करूया, जे कर्नाटकातील बंगळुरू येथे श्री. भास्कर यांना 20 लॅपटॉप पुरवतात. या प्रकरणात, हा आंतरराज्यीय पुरवठा आहे, आणि म्हणून, व्यवहारावर आयजीएसटी लावला जातो.

निर्देशांनुसार तिसऱ्या पक्षाला वितरणाचे उदाहरण:

आता तिसऱ्या-पक्षाच्या हस्तक्षेपासह उदाहरण वापरूया. म्हैसूरचे श्री. वैभव यांनी मुंबईतील एबीसी एंटरप्रायजेसचे श्री. मोहन यांच्याकडून 20 लॅपटॉप विकत घेतले आणि ते महाराष्ट्रातील पुणे येथील श्री. भास्कर यांना देण्याची विनंती केली. या प्रकरणात, वस्तू कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील श्री, वैभव यांना परत केली जाते असे गृहीत धरले जाते. त्यामुळे जीएसटी अंतर्गत वस्तूंच्या सप्लायचे ठिकाण म्हैसूर, कर्नाटक आहे, जरी लॅपटॉपचे मूळ आणि वितरण ठिकाण महाराष्ट्र राज्यात आहे. या प्रकरणात, कर आकारणी हा आंतरराज्यीय व्यवहार मानला जाईल आणि कर्नाटकसाठी जीएसटी नियमांनुसार कलेक्ट केला जाईल.

प्राप्तकर्त्याद्वारे वस्तूंच्या एक्स-फॅक्टरी वितरणाचे उदाहरण:

उदाहरणासह, जीएसटीमध्ये सप्लायचे ठिकाण विचारात घ्या, जेथे मुंबई, महाराष्ट्रातील श्री. वैभव यांना मदुराई, तामिळनाडू येथील डिजीटेक एंटरप्रायजेसकडून 150 लॅपटॉपच्या सप्लायसाठी ऑर्डर मिळते. डिजिटेकने नमूद केले आहे की मदुराईला वाहतुकीची व्यवस्था करण्याची आणि श्री. वैभवच्या मुंबईतील एक्स-फॅक्टरीमधून माल घेण्याची त्यांची इच्छा आहे. येथे, सप्लायचे ठिकाण तामिळनाडूमधील मदुराई आहे, जरी मूळ आणि वितरण मुंबई, महाराष्ट्रात होते. त्यामुळे तामिळनाडूमधील मदुराई असलेल्या सप्लायच्या ठिकाणी आयजीएसटी लागू होईल.

ई-कॉमर्स विक्रीचे उदाहरण:

विचार करा की, महाराष्ट्रातील मुंबई येथील श्री. मोहन यांनी डिजीटेक एंटरप्रायजेसकडून 54 इंचाचा स्मार्ट टीव्ही ऑर्डर केला आणि तो त्यांच्या 30 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून कर्नाटकातील बेंगळुरू येथील त्यांचे वडील श्री. राम यांना देण्याची ऑर्डर केली. चेन्नई, तामिळनाडू येथील नोंदणीकृत डिलिव्हरी एजंट क्विक डिलिव्हरी, डिजीटेक एंटरप्रायझेसच्या बिलांतर्गत श्री. राम यांना टीव्हीवर प्रक्रिया करण्याचे आणि वितरित करण्याचे काम सोपवले आहे.

या प्रकरणात असे मानू या की,  डिजीटेक एंटरप्रायजेसने महाराष्ट्रातील मुंबईहून श्री. मोहन यांना माल वितरित केला आहे. कर्नाटकातील बंगलोर येथील श्री. राम हे प्राप्तकर्ता आहेत ज्यांना टीव्ही भेट म्हणून मिळाला आहे आणि चेन्नई, तामिळनाडू येथील नोंदणीकृत डिलीव्हरी एजंट क्विक डिलिव्हरी आहे. सप्लायचे ठिकाण, या प्रकरणात, मुंबई, महाराष्ट्र असेल आणि जीएसटी गंतव्यस्थानावर आधारित कर आयजीएसटी कायद्यानुसार कलेक्ट केला जाईल.

हेही वाचा: जाॅब वर्कसाठी एक्सेल आणि वर्डमध्ये डिलीव्हरी चलनाचा फॉरमॅट

'वस्तूंचा सप्लाय' आणि ' वस्तूंचा सप्लाय, जेव्हा त्यात ने-आण होत नाही' यात काय फरक आहे?

आता वस्तूंची ने-आण होत नसताना सप्लायच्या ठिकाणी कसा परिणाम होतो ते पाहू.

वस्तूंचा सप्लाय प्रकार

वस्तूंचा सप्लाय करण्याचे ठिकाण

या प्रकारच्या वस्तूंच्या सप्लायमध्ये, प्राप्तकर्ता किंवा सप्लायरकडून जीएसटी अंतर्गत वस्तूंची कोणतीही ने-आण होत नाही.

वितरण किंवा मालकी हस्तांतरित करताना प्राप्तकर्त्याच्या हातात असलेल्या वस्तूंचे स्थान म्हणून सप्लायचे स्थान मानले जाते.

वस्तू केवळ साईटवर स्थापित आणि एकत्र केल्या जातात.

या प्रकरणात, वस्तूंच्या सप्लायचे ठिकाण म्हणजे ठिकाण किंवा एकत्र करण्याचे ठिकाण किंवा स्थापित होय.

सप्लायचे ठिकाण आणि त्यामुळे आकारली जाणारी कर आकारणी समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहू.

जेव्हा मालाची ने-आण नसते तेव्हा:

चेन्नई, तामिळनाडू येथे असलेल्या डिजिटेक लि. चे उदाहरण विचारात घेवूया, जे बेंगळुरू, कर्नाटक येथे शोरूम उघडते. ते बेंगळुरू, कर्नाटकच्या M/S Akai रियाल्टर्सकडून प्लग-अँड-प्ले सुविधांसह शोरूम खरेदी करतात. वस्तूंची डिलीव्हरी कर्नाटकातील बेंगळुरू येथे असल्याने मालाची ने-आण होत नाही.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की इमारत खरेदी केल्याने जीएसटी भरावा लागतो आणि केवळ व्यावसायिक मालमत्तेवरील भाड्यावर जीएसटी लागतो. प्लग-अँड-प्ले सुविधा असलेली वर्कस्टेशन्स आधीच मालमत्तेवर असल्याने आणि स्थावर मालमत्ता असल्याने, जीएसटी अंतर्गत सप्लायचे ठिकाण बेंगळुरू, कर्नाटक असेल. म्हणून, बेंगळुरूमध्ये, एसजीएसटी आणि सीजीएसटी या दोन्ही कर आकारणीसह जीएसटी लागू आहे.

जीएसटी विभागातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वरील सप्लायचे स्थान स्पष्ट करण्यासाठी येथे एक तक्ता आहे.

त्याच राज्यात वितरित केलेल्या वस्तू परंतु दुसर्‍या राज्यात बिलिंग पत्त्यावर जीएसटी कसा लागू होईल?

सप्लायचा प्रकार

सप्लायर लोकेशन

प्राप्तकर्ता नोंदणीकृत कार्यालय लोकेशन

स्थापना किंवा एकत्र करण्यासाठी साईट स्थान

सप्लायचे ठिकाण

जीएसटी

 

 

 

 

 

 

वस्तू साईटवर स्थापित किंवा एकत्र केल्या जातात

ओडिशा

बेंगळुरू

हैदराबाद

हैदराबाद जीएसटी

सीजीएसटी एसजीएसटी

 (हैदराबाद )

मुंबई

मुंबई

मुंबई

मुंबई जीएसटी

सीजीएसटी एसजीएसटी

 (मुंबई)

झारखंड

झारखंड

महाराष्ट्र

महाराष्ट्र

सीजीएसटी एसजीएसटी

 (महाराष्ट्र)

तामिळनाडू

तामिळनाडू

तामिळनाडू

तामिळनाडू

सीजीएसटी एसजीएसटी

 (कर्नाटक)

तामिळनाडू

कर्नाटक

महाराष्ट्र

महाराष्ट्र

सीजीएसटी एसजीएसटी (महाराष्ट्र)

जहाजावर पुरवठा केलेला माल:

आता जीएसटी अंतर्गत सप्लाय नियमांच्या ठिकाणी मालवाहतूक किंवा जहाजाद्वारे वस्तूंची ने-आण कधी होते याचा विचार करूया.

वस्तूंचा सप्लाय प्रकार

सप्लायचे ठिकाण

वस्तू  वाहन किंवा जहाज किंवा ट्रेन किंवा विमान किंवा मोटार वाहनात असतात.

असे ठिकाण ज्या ठिकाणी असा माल बोर्डवर नेला जातो.

जहाजातून प्रवास करताना वस्तूंचे उदाहरणः

हे लक्षात घ्या, श्री. राज मुंबई ते बेंगळुरू विमानाने प्रवास करताना स्नॅक्स, कॉफी आणि घड्याळ ऑर्डर करतात. एअरलाईनची नोंदणी बेंगळुरू आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी आहे. या प्रकरणात, बोर्डिंगचे ठिकाण मुंबई असल्याने, वस्तू मुंबईची आहे, आणि म्हणून सप्लायचे जीएसटी ठिकाण मुंबई आहे आणि एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही आकारले जातात.

नोट: ट्रेन किंवा विमानाने प्रवास करताना, सप्लायचे ठिकाण तेच असेल जिथे खाद्यपदार्थ मिळाले होते. तसेच, विमान सेवा आणि रेल्वे सेवांची सामान्यत: संपूर्ण भारतातील उपस्थिती असल्याने, जीएसटी अंतर्गत मालाची वाहतूक लागू होते आणि एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही सप्लाय ठिकाणावर अवलंबून आकारले जातात.

एमेक्स एंटरप्रायजेस, बेंगळुरूचे श्री. मोहन यांचे आणखी एक उदाहरण विचारात घेवूया, जे आग्रा ते दिल्ली-लखनौ-बेंगळुरू ट्रेनने प्रवास करत होते. त्यांनी दुपारचे जेवण दिल्लीत घेतले होते आणि ते आग्रा येथे उतरतात आणि लगेच जेवणाची ऑर्डर देतात. ट्रेनमध्ये देखील संपूर्ण भारतातील उपस्थिती असल्याने आणि प्राप्तकर्त्याची किंवा एमेक्स एंटरप्रायजेसची नोंदणी बेंगळुरूची आहे, सप्लाय करण्याचे ठिकाण तेच आहे जिथे खाद्यपदार्थ मिळाले होते. या प्रकरणी दिल्लीत बोर्ड करण्यात आले. जीएसटीसाठी सप्लायचे ठिकाण दिल्ली मानले जाते आणि यूटीजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही लावले जातील.

नोट: सप्लायचे ठिकाण संदिग्ध असल्यास, ते जीएसटी कौन्सिल आणि संसदेच्या नियमांच्या शिफारशींनुसार निश्चित केले जाईल.

निर्यात/आयात सप्लाय ठिकाण:

या प्रकरणात, वस्तूंच्या सप्लायचे ठिकाण खालील नियमांचे पालन करते:

  • जर वस्तू भारतात आयात केली जाते, तर सप्लायचे ठिकाण हे आयातदाराचे स्थान मानले जाते.
  • जर भारतातून वस्तू निर्यात केल्यास, सप्लायचे ठिकाण हे आयातदाराचे भारता बाहेरील ठिकाण म्हणून मानले जाते.

वस्तूंचा सप्लाय प्रकार

सप्लाय ठिकाण

जीएसटी कर आकारणी

भारतात आयात केलेल्या वस्तू

आयातदाराचे स्थान

आयजीएसटी नेहमी आयातीवर आकारला जातो

भारतातून निर्यात केलेल

आयातदाराचे भारता बाहेरचे स्थान

निर्यातीवरील जीएसटी परत करण्यायोग्य आहे.

आयात/निर्यात उदाहरण:

बेंगळुरू, कर्नाटक येथे नोंदणीकृत M/S ABC एंटरप्रायजेस चीनमधून 500 खेळणी आयात करते. सप्लायचे ठिकाण कर्नाटक जीएसटी आहे आणि आयजीएसटी आकारला जातो.

लक्षात घ्या की, कर्नाटकात नोंदणीकृत M/S म्हैसूर अगरबत्ती इंडोनेशियाला अगरबत्तीची 1000 पाकिटे निर्यात करतात. सप्लायचे ठिकाण हे आयातदाराचे भारता बाहेरील ठिकाण आहे. निर्यातदाराचे स्थान म्हैसूर, कर्नाटक जीएसटी येथे सप्लायचे ठिकाण मानले जाते, परंतु जीएसटी भरल्यास सूट किंवा परतावा मिळेल.

हेही वाचा: जीएसटी अंतर्गत आयटीसी रिव्हर्सलविषयी जाणून घ्या

निष्कर्ष:

जीएसटी अनुपालन अनिवार्य आहे आणि हे खूप गोंधळात टाकणारे आहे. म्हणून, आम्ही आशा करतो की या लेखाद्वारे, आम्ही जीएसटी किंवा जीएसटी गंतव्यस्थानावर आधारित करामधील सप्लाय ठिकाणाच्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. जीएसटीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Khatabook ला भेट द्या. जीएसटी आणि व्यवसायासंबंधित उपयुक्त माहितीव्यतिरिक्त, हे लहान व्यवसाय मालकांना त्यांची खाते मॅनेज करायला आणि जीएसटी आदेशांचे पालन करण्यास मदत करते.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. जीएसटीला गंतव्य कर का म्हणतात?

वस्तू किंवा सेवांच्या उत्पत्तीवर जीएसटी लावला जात नाही. हे गंतव्यस्थान किंवा सप्लायच्या ठिकाणावर अवलंबून असते जेथे सेवा किंवा वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे हा गंतव्य-केंद्रित कर आहे आणि ज्या राज्यामध्ये वस्तू किंवा सेवा वापरल्या जातात त्या राज्याला जीएसटीचा दावा करण्याचा अधिकार आहे.

2. मी लहान निर्यातदार असल्यास जीएसटी कराचे काय होईल?

वस्तू किंवा सेवांच्या निर्यातीचा विचार शून्य-रेट केलेल्या सप्लायसाठी केला जातो, त्यामुळे छोट्या निर्यातदाराला जीएसटी भरावा लागणार नाही.

3. मी चीनमधून कारचे पार्ट्स आयात केल्यास आणि जीएसटी दिल्लीत नोंदणीकृत असल्यास, मी जीएसटी भरण्यास जबाबदार आहे?

होय, वस्तूंच्या सप्लायचे ठिकाण, या प्रकरणात, आयातदाराचे स्थान असेल आणि तुम्ही यूटीजीएसटी आणि सीजीएसटी भरण्यास जबाबदार आहात कारण सप्लायचे ठिकाण दिल्ली, दिल्ली यूटीजीएसटी आहे.

4. मी बेंगळुरूवरून नेहमीच विमानाने प्रवास करत असतो आणि माझा खर्च बेंगळुरूमधील माझी कंपनी उचलते. विमानात दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थसाठी कोणता जीएसटी भरावा लागेल?

ट्रेन किंवा विमानाने प्रवास करताना, सप्लायचे ठिकाण ते असेल जेथे खाद्यपदार्थ घेतले होते. तसेच, विमान सेवा आणि रेल्वे सेवांची सामान्यत: संपूर्ण भारतातील उपस्थिती असल्याने, सप्लायच्या ठिकाणावर अवलंबून एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही आकारले जातात. तुमच्या बाबतीत, सप्लायचे ठिकाण बेंगळुरू, कर्नाटक जीएसटी असेल, असे गृहीत धरून तुम्ही बेंगळुरू येथे बोर्ड करता आणि खाद्यपदार्थ देखील बेंगळुरू येथे मिळते. जर तुमची परतीची फ्लाईट मुंबईहून असेल आणि खाद्यपदार्थही मुंबईत घेतले असतील, तर सप्लायचे ठिकाण मुंबई असेल आणि मुंबई जीएसटी लागू होईल. दोन्ही प्रकरणांमध्ये, एसजीएसटी आणि सीजीएसटी कलेक्ट केले जातात.

5. मी इलेक्ट्रिक पॅनेलचा सप्लाय करतो जे साईटवर स्थापित आणि एकत्र असतात. मी बेंगळुरूमध्ये नोंदणीकृत आहे आणि माझा खरेदीदार मुंबईत नोंदणीकृत आहे. तथापि, साईटचे स्थान अहमदाबाद, गुजरातमध्ये आहे. जीएसटीची गणना कशी होईल?

या प्रकरणात, साईटचे स्थान हे सप्लायचे ठिकाण मानले जाते. तुमच्या बाबतीत, सप्लायचे ठिकाण अहमदाबाद आहे आणि अहमदाबाद जीएसटी लागू आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही लागू होतील. तुम्ही अहमदाबाद किंवा गुजरातमध्ये जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत असल्याची खात्री करा. तुम्ही गुजरात जीएसटी अंतर्गत या ऑर्डरसाठी प्रासंगिक करदाता म्हणून नोंदणी देखील करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यासाठी 90 दिवस मिळतात. फक्त ते अपूर्ण असल्यास, तुम्ही कारण दाखवून आणखी 90 दिवसांसाठी मुदतवाढीची विनंती करू शकता.

 

 

 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.