सोशल इंजिनिअरिंगचे डावपेच मोठी समस्या आहे आणि कधीकधी स्कॅमर्स त्यांना मॅनिप्युलेट करून पीडितांची फसवणूकीने वैयक्तिक माहिती काढून घेतात. Google Pay फ्राॅड हा रिअल-टाईम फसवणूकीचा एक प्रकार आहे जिथे स्कॅमर्स वापरकर्त्यांना अनोळखी लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडतात आणि त्यांचा संवेदनशील तपशील लिक केल्या जातो. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना पैसे पाठवण्यासाठी Google Pay चा वापर करू शकता, परंतु स्कॅमर तुमच्या प्रियजनांच्या रूपात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. Google पेमेंट फ्रॉड म्हणजे काय, अनधिकृत व्यवहारांपासून स्वत:चा बचाव कसा करायचा आणि UPI फ्रॉडच्या तक्रारी दाखल करण्यासाठी कोणत्या स्टेप उचलाव्या लागतात, याची सर्व माहिती या ब्लाॅगमध्ये देण्यात आली आहे. चला तर मग याविषयी संपूर्ण जाणून घेवूया.
तुम्हाला माहिती आहे का? Google Pay सुरुवातीला सप्टेंबर 2017 मध्ये Tez म्हणून लाँच करण्यात आले होते.
Google Pay फ्राॅड म्हणजे काय?
Google Pay फ्राॅडला अशा एखाद्या स्कॅमसारखे मानले जावू शकते, जिथे एखाद्या व्यक्तीला लालूच दाखवून किंवा मॅनिप्युलेट करून त्याच्याकडून पैसे ट्रान्सफर केले जाते. कोविड-19 महामारीने बिजनेस चालवण्याचा मार्ग बदलला आहे, अनेक मालकांनी पेमेंटसाठी डिजिटल मोडचा वापर करणे सुरू केले आहे. मोबाईल वॉलेट ॲपने गेल्या दोन वर्षांत अनेकांचे लक्ष वेधले आहे आणि Google Pay व्यवहार नियमित क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे केले जात आहेत. 50,000 हून अधिक वेबसाईट्स ऑनलाईन Google Pay UPI पेमेंटचा एक मोड म्हणून स्वीकार करत आहेत, याचाच अर्थ स्कॅमर्सना वापरकर्त्यांना फसवण्याच्या आणि त्यांचे पैसे चोरण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. मोबाईल वॉलेटचा वापर वाढल्याने, ग्राहकांना हे वॉलेट कसे कार्य करतात हे समजून घेणे आवश्यक आहे, ज्यात हे सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक स्टेपचा ही सहभाग आहे, ज्यामुळे त्यांचे खाते सुरक्षित राहतील आणि त्याचे कोणतेही उल्लंघन होणार नाही.
Google Pay कसे कार्य करते?
Google Pay वापरकर्त्यांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशीलांद्वारे UPI शी त्यांचे बँक खाते क्रमांक लिंक करण्याची अनुमती देते. हे वापरकर्त्यांना खरेदी करताना आणि व्यवहारांना मान्यता देण्यादरम्यान फक्त QR कोड स्कॅन करून POS टर्मिनल्सवर ऑनलाईन पेमेंट सुरू करू देते. हे ॲप कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स करण्यासाठी नियर-फील्ड कम्युनिकेशन्स तंत्रज्ञानाचा वापर करते आणि ते ग्राहकांना मर्चंट टर्मिनलवर कोणत्याही कागदपत्रांवर किंवा पेपरवर स्वाक्षरी न करता वायरलेस पद्धतीने पेमेंट करू देते.
हेही वाचा : कॅशबॅक स्कॅमचे ट्रेंड काय आहेत? त्यांच्यापासून सुरक्षित कसे राहायचे?
वापरकर्ते त्यांच्या Google Pay UPI मध्ये अनेक बँक खाती जोडू शकतात आणि ॲप व्हर्च्युअल खाते क्रमांक जनरेट करते जो वापरकर्ते इतर वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट अधिकृत करण्यासाठी शेअर करू शकतात. पेमेंट प्राप्त करण्यासाठी, वापरकर्त्याला त्यांचे UPI हँडल शेअर करावे लागेल आणि जेव्हा पैसे ट्रान्सफर केले जातात तेव्हा त्यांना पेमेंटची तपासणी करावी लागते. तथापि, लोक वापरकर्त्यांना पैसे ट्रानस्फर करण्याची विनंती ही पाठवू शकतात आणि पेमेंट मागू शकतात. वापरकर्त्यांनी त्यांना ॲपद्वारे अधिकृत करणे आवश्यक आहे आणि एकदा हे पूर्ण झाल्यानंतर पेमेंट प्रक्रिया आपोआप केली जाते. व्यवहार हिस्ट्री वापरकर्त्यांना ॲपद्वारे इतरांना केलेल्या त्यांच्या Google Pay पेमेंटची संपूर्ण यादी दाखवते.
Google Pay सुरक्षित आहे का?
Google Pay डिझाईनद्वारे सुरक्षित आहे कारण, सर्व पेमेंट तपशील खासगी सर्व्हरवर स्टोअर केले जातात. जेव्हा शेअर केले जाते, तेव्हा व्हर्च्युअल क्रमांक इतरांपर्यंत बँक तपशील उघड करण्याची आवश्यकता रोखतो. Google Pay मध्ये स्क्रीन लॉक यंत्रणा आणि एक पिन लॉक पर्याय आहे जो ॲपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी सुरक्षेचा अतिरिक्त थर जोडतो.
खात्यात किंवा खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी UPI पिन टाकावा लागतो. वापरकर्त्याचा फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो कोणत्याही रिमोट लोकेशनवरून लॉक करण्यासाठी ॲपमध्ये 'गुगल फाईंड माय डिव्हाईस' हा पर्याय उपलब्ध आहे. वापरकर्ते त्यांच्या Google खात्यातून लॉग आउट करू शकतात आणि स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी त्यांचा डेटा हटवू शकतात. ॲपद्वारे केलेले सर्व पेमेंट पूर्णपणे एन्क्रिप्टेड आहेत.
Google Pay फ्राॅडपासून सुरक्षित कसे राहायचे?
Google Pay फ्राॅड स्कीमपासून सुरक्षित राहण्यासाठी, खालील गोष्टींना फाॅलो करा:
- तुमचा Google Pay OTP शेअर करू नका - तुमचा Google Pay OTP खासगी ठेवला पाहिजे आणि तो कोणाशीही शेअर करू नये. तुमचे डिव्हाईस सुरक्षित आणि लॉक-स्क्रीन संरक्षित असल्याची खात्री करा. कारण, तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणालाही प्रत्यक्ष प्रवेश मिळावा आणि तुमच्या लॉग इन OTP सह त्याचा चुकीचा वापर व्हावा, हे तुम्हाला परवडणारे नाही आहे.
- मनी ट्रान्स्फर स्कॅमच्या जाळ्यात फसू नका - स्कॅमर्स अनेकदा खरेदीदारांना वस्तू आणि सेवा विकण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्याची पेमेंट देण्यास भाग पाडतात. तुम्ही ज्या लोकांना ओळखत नाही त्यांच्याशी कधीही Google पेमेंट करू नका आणि फक्त विश्वासू व्यक्तींशी व्यवहार करण्यासाठी ॲपचा वापर करा. जर तुम्ही त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नसाल, तर Google पेमेंट करू नका.
- भावनेच्या भरात व्यवहार करू नका- स्कॅमर्स तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी मानसिक डावपेचांचा वापरही करू शकतात. कधीकधी ते व्यक्तींना घाबरवू शकतात किंवा त्वरित पैशांची गरज असल्याचे नाट्य ही रचू शकतात. जागरूक राहा आणि या डावपेचांच्या आहारी जाऊ नका. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही अनोळखी मेसेज आणि लिंक वाचू आणि उघडू नका. ते डिलीट करा, दुर्लक्ष करा आणि पुढे चला.
- मजबूत पासवर्डचा वापर करा- जर तुमचा पासवर्ड सोपा असेल आणि त्याचा अंदाजा लावणे सहज शक्य असल्यास, तुमचा पासवर्ड हॅक होऊ शकता. तुमचा पासवर्ड सेट करण्यासाठी अक्षरे, संख्या आणि चिन्हे यांच्या मजबूत काॅम्बिनेशनचा वापर करा. लॉक स्क्रीन ॲप वापरा आणि तुमचे डिव्हाईस व्हिज्युअल पॅटर्नसह सक्षम करा. तसेच, सुरक्षित राहण्यासाठी महिन्यात एकदा तुम्ही पासवर्ड बदलणे गरजेचं आहे. तसेच, इतर मोबाईल ॲप्सवर तुमचा Google Pay UPI पासवर्ड वापरणे टाळा.
- ॲप अपडेट करायला विसरू नका- जेव्हा जेव्हा नवीन रिलीज किंवा पॅचेस बाहेर येतात तेव्हा तुमचे Google Pay अपडेट करणे आवश्यक आहे. अपडेट न केल्याने ते विविध ॲपच्या असुरक्षांसह आणि हॅक होण्याची शक्यता वाढते. ॲप अपडेट असल्याची खात्री करून तुम्ही फ्रॉड व्यवहार रोखू शकता.
- अनोळखी पेमेंट विनंत्या मंजूर करणे टाळा- लोक UPI द्वारे तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याच्या विनंत्या करू शकतात. Google Pay UPI विनंती मंजूर करण्यापूर्वी डबल-चेक करा.
- अनोळखी सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका- Google Pay UPI शी संबंधित समस्यांचे समर्थन मिळवण्यासाठी किंवा निराकरण करण्यासाठी स्कॅमर्स तुम्हाला "विशेष ॲप" डाउनलोड करण्यास सांगू शकतात. या फायलींमध्ये गुंतण्याचा आणि त्यांना डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. या फाईल्स डाउनलोड केल्यास बॅकग्राऊंडमध्ये ते मालवेअर इन्स्टॉल करतात आणि स्कॅमर्सना तुमच्या डेव्हलपर ऑप्शनमध्ये ॲक्सेस देतात.
- बनावट हेल्पलाईन नंबरपासून सावध राहा- रेस्टॉरंट्स आणि आऊटडोअर लोकेशन्सवर वापरला जाणारा हा एक कॉमन स्कॅम आहे. जेव्हा तुम्ही एखादा फोन नंबर बाहेर पाहाल, तेव्हा तेथे Google लिस्टिंग म्हणून दर्शवलेला एक नंबर असू शकतो (जो व्हेरिफाय केलेला नसतो आणि तो एखाद्या स्कॅमरचा असू शकतो.) जेव्हा तुम्ही त्याला कॉल करता, तेव्हा स्कॅमर ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवतो आणि वापरकर्त्यास UPI द्वारे आंशिक किंवा पूर्ण पेमेंट देण्यास प्रवृत्त करतो.
- बनावट UPI- बनावट UPI हे असे ॲप्स आहेत जे Google Pay सारखेच दिसायला असतात आणि ॲप स्टोअरवर सूचीबद्ध आहेत. जेव्हा एखादा नवीन वापरकर्ता डाउनलोड आणि रजिस्टर करतो, तेव्हा स्कॅमरला त्यांच्या संपूर्ण बँक तपशीलात प्रवेश मिळतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे ॲप्स शोधणे सोपे असते कारण त्यांचे Google Play Store वर कमी डाउनलोड आणि खराब रिव्ह्युव्ह असतात. Google Pay ॲपविषयी फारशी माहिती नसल्यास नवीन वापरकर्ते या गोष्टीला बळी पडतात. आणखी एक धोका म्हणजे अप्रमाणित वेबसाइट्सवरून बनावट Google Play ॲप डाउनलोड करणे आणि येथून वापरकर्त्याचा डेटा सहज चोरी करता येतो. साईन अप करण्यापूर्वी आणि ऑनलाईन UPI व्यवहार करण्यापूर्वी Play Store वरून अधिकृत ॲप डाउनलोड करणे नेहमीच योग्य आहे.
जर तुम्हाला Google Pay फ्रॉडचा अनुभव आला असल्यास काय करावे?
जर तुम्हाला शंका असेल की तुमच्यासोबत स्कॅम झाला आहे किंवा अनधिकृत व्यवहार झाला असल्यास, तुम्ही खालील स्टेप्स उचलू शकता: ज्या बँकेशी किंवा वित्तीय संस्थेशी तुमचे Google Pay खाते जोडलेले आहे त्याच्याशी संपर्क साधा. तुम्ही रिपोर्ट ॲक्टिव्हिटी-Google Pay Help येथे फॉर्म भरू शकता आणि Google ला या प्रकरणाचा रिपोर्ट सबमिट करू शकता. बँका स्कॅम व्यवहारांची नोंद करण्यासाठी 24 x 7 समर्थन प्रदान करतात. तुम्ही फसव्या व्यवहाराबद्दल तक्रार दाखल करा आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील सायबर पोलिस विभागाशी संपर्क साधा
हेही वाचा : e-RUPI काय आहे?
तुमचा UPI व्यवहार आयडी शोधा आणि तुमच्या खात्यातून पैसे कोणी डेबिट केले ते पाहा. शक्यता आहे की, त्यांच्या बँकेशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि या प्रकरणाचा रिपोर्ट देऊ शकता. एफआयआर दाखल करण्यासाठी आणि पुराव्यासाठी तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला भेट द्या. प्रकरणाची फाईल दुसऱ्या बँकेकडे पाठवून त्यांनी हे प्रकरण तपासावे, अशी त्यांना विनंती करा. या गोष्टीची दाट शक्यता आहे की स्कॅमर्सना त्यांच्या बँकेकडून कॉलला उत्तर देण्यास आणि पाठपुरावा करण्यास भाग पाडले जावू शकते.
निष्कर्ष
तुम्हाला माहिती आहे की स्कॅमर्स विविध मार्ग वापरून Google Pay UPI वापरकर्त्यांना टार्गेट करतात, आता तुम्ही ते रोखण्यासाठी आवश्यक स्टेप्स उचलू शकता.
ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.
कृपया या प्रकरणाचा रिपोर्ट एकतर तुमचे कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडे करा किंवा जवळच्या सायबर क्राइमला संपर्क करा. या प्रकरणाचा रिपोर्ट करण्यासाठी cybercell@khatabook.com वर ई-मेल पाठवा.
महत्वाचे: SMS किंवा अन्य चॅनेलद्वारे प्राप्त होणारे OTP, पिन किंवा अन्य कोड कोणासोबतही शेअर करू नका. तसेच, तुमचा खाते क्रमांक किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील सार्वजनिक प्लॅटफाॅर्मवर कधीही शेअर करू नका.