written by Khatabook | February 21, 2022

महिलांना घरबसल्या करता येणाऱ्या 10 बिजनेस आयडिया

×

Table of Content


बाजारपेठा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळेच पैसे कमावण्याच्या आयडियांमध्येही वाढ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रमाणपत्रापेक्षा कौशल्याला आणि अनुभवापेक्षा ज्ञानाला प्राधान्य दिले जात आहे. तसेच, प्रमाणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोक त्यांना हव्या त्या गुणवत्तेसाठी पैसे देण्यास तयार आहेत. तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे बिजनेसने भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत. बिजनेस सुरू करण्यासाठी, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी, ज्ञान, कला शेअर करण्यासाठी आणि कमाईचा नवीन प्रवाह सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला हवे असते. म्हणून, जर तुम्ही महिला असाल आणि तुमच्या आवडीला तुम्हाला फाॅलो करायचे असल्यास, येथे महिलांसाठी बिजनेस आयडिया आहेत. ज्या तुम्ही कमीतकमी गुंतवणुकीत सुरू करू शकता आणि यातून कमाईचा सर्वोत्तम स्रोत तयार करू शकता 

महिलांसाठी 10 सर्वोत्कृष्ट घरबसल्या करता येणाऱ्या बिजनेस आयडिया

1. बेकरी आणि केक बनवण्याचा बिजनेस 

बेकरी हा अशा बिजनेसपैकी एक आहे ज्याने महामारीच्या काळात तेजी पाहिली आहे. केक हा प्रेम आणि उत्सव व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि प्रत्येक संस्मरणीय क्षणांसाठी तो सर्वांत प्रमुख घटक आहे. कोणीही बेकरी कौशल्ये सहज आत्मसात करू शकतो आणि कमीतकमी गुंतवणूक करून बेकरी उत्पादनांच्या ऑर्डर घेणे सुरू करू शकतो. हा बिजनेस कमी गुंतवणुकीत आणि घरबसल्या सुरू करता येतो.

तसेच, बेकरी वर्ग घेणे महिलांसाठी चांगली गृह-आधारित बिजनेस आयडिया ठरू शकते. थोडी मेहनत घेतल्यास केक डेकोरेशन किंवा खास स्वीट बनवण्यात कोणीही स्वत:ची छाप पाडू शकतो. तुम्ही जवळचे नातेवाईक, कुटुंब आणि मित्रांपासून सुरुवात करून, दर्जेदार उत्पादने, वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी आणि सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने बिजनेस वाढवू शकता.

गुंतवणूक आणि नफा: महिलांना घरबसल्या हा बिजनेस सुरू करण्यासाठी ₹10,000 पेक्षा कमी गुंतवणूक करणे आवश्यक आहे आणि नफा बिजनेस किती वाढतो यावर अवलंबून आहे.

2. हाताने बनवलेल्या वस्तूंचा बिजनेस

गिफ्ट आणि सरप्राईज दिल्या जाणाऱ्या वस्तूंना वैयक्तिक स्पर्श देण्याची पद्धत सुरू झाली आहे. आता ते दिवस गेले जेव्हा रेडिमेड गिफ्ट दिली जायची. आज, लोक प्रेम आणि काळजी दर्शवण्यासाठी त्यांच्या प्रियजनांना हस्तनिर्मित वस्तू मोठ्या प्रमाणावर देत आहेत. जर तुम्ही कला आणि हस्तकलेत निपुन असल्यास, तुम्ही तुमची आवड जपूण हा बिजनेस करू शकता.

हस्तनिर्मित उत्पादने, विशेषत: विशेष पॅकेजिंगसह डिझाईन केलेली असतात आणि त्यांना चांगली मागणी आहे. तसेच, लोक अशा गोष्टींसाठी पैसे देण्यास तयार आहेत. यात पेंटिंग्ज, दागिने, मेणबत्त्या, घर-सजावट, कपड्यांचा समावेश होतो. या वाढलेल्या बाजारपेठेची मोठी व्याप्ती असून ग्राहकापर्यंत वस्तू पोहचवण्यासाठी अनेक साईट्स विक्रेत्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यास, जाहिरात करण्यास आणि ऑनलाईन विकण्यास मदत करतात. यामुळे सर्जनशीलतेला उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये बदलण्याचा हा एक योग्य मार्ग आहे.

गुंतवणूक आणि नफा: गुंतवणूक बिजनेससाठी वापरल्या जाणार्‍या सामग्रीवर अवलंबून असते. ते कमीतकमी 500 रुपयांपासून ते 10000 पर्यंत असू शकते. नफा उत्पादनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. साधारणपणे, हाताने बनवलेल्या उत्पादनांची किंमत अधिक असते आणि त्यातून चांगली कमाई केली जाऊ शकते.

3. केटरिंग बिजनेस किंवा होम डिलीव्हरी 

समजा स्वयंपाक बनवण्याची तुम्हाला प्रचंड आवड आहे आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला बिजनेस करायला मिळाल्यास, तुमच्यासाठी ते सर्वोत्तम असेल. बरोबर ना? या धावपळीच्या करिअर युगात अनेक कुटुंबीयाना घरी जेवण बनवायला किंवा रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ मागवायला वेळ मिळत नाही. ज्यामुळे जास्तीत जास्त दुष्परिणामांना सामोरे जावे लागतं आहे. तसेच, सद्य परिस्थितीत आरोग्य जपण्याकडे लोकांचा अधिक कल वाढला आहे, लोक नियमितपणे घरगुती जेवणास प्राधान्य देत आहेत. या गोष्टींचा विचार केल्यास, पैसे घेवून तुम्ही इतरांसाठी घरगुती जेवण बनवून देणारी व्यक्ती होवू शकता. ऑफिसला जाणार्‍या लोकांसाठी टिफिन तयार करणे किंवा तुमचा स्वतःचा केटरिंग बिजनेस सुरू करणे देखील तुम्हाला तुमचा बिजनेस वाढवण्यासाठी पुरेसे पैसे मिळवून देईल. स्वयंपाकाच्या वर्गांनाही मोठी मागणी आहे. यामुळे महिलांसाठी हा पैसे कमवण्याचा चांगला स्रोत ठरू शकतो.

गुंतवणूक आणि नफा: गुंतवणूक कमीतकमी 1000 रुपये किंवा त्याहूनही कमी लागू शकतात. वापरलेली सामग्री आणि घटकांनुसार गुंतवणूक आणि नफा भिन्न असतील.

4. डे-केअर सेंटर आणि पेट सिटिंग सर्व्हिसेस 

डे-केअर सेंटर्सची मागणी सध्या वाढली असून ते लोकप्रिय झाले आहे. जे लोक जाॅबवर आहेत आणि ज्यांना मुलं आहेत, असे लोक वेळेच नियोजन करून, त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करतात. जर तुमच्याकडे लहान मुलांना हाताळण्याचे आणि योग्य काळजी घेण्याचे कौशल्य असल्यास, महिलांसाठी हा एक चांगला घरबसल्या करता येणारा बिजनेस ठरू शकतो. डे-केअर सेंटरमध्ये तुम्हाला बाळाचे नॅपकिन्स, टॉवेल, कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ, पाळणे आणि मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सामग्रीची व्यवस्था करावी लागेल. तुमच्याकडे असलेले कौशल्य आणि गुंतवणुकीने तुम्ही सहज सेंटरचे व्यवस्थापन करू शकता.

तुम्ही देऊ शकता अशी दुसरी सेवा म्हणजे पेट केअर सेंटर. 

आजकाल, लोक अनेक कारणांसाठी घरी पाळीव प्राणी ठेवण्यास प्राधान्य देत आहेत आणि पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पेट केअर सेंटरची गरज वाढली आहे. हे बाल संगोपनापेक्षा वेगळे आहे. यामुळे, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, त्यांच्या गरजा, त्यांचे राहणीमान आणि त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींची चांगली जाणीव असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्राणी प्रेमी असल्यास किंवा तुमच्याकडे पाळीव प्राणी असल्यास, तो बोनस आहे. गुंतवणुकीत वाढ करून तुम्हाला प्रत्येक प्राण्यासाठी स्वतंत्र कप्पे ठेवण्याची आवश्यकता असू शकते. हा मेट्रो शहरांमधील वाढत्या बिजनेसपैकी एक आहे जेथे पाळीव प्राणी असणे सामान्य होत आहे.

गुंतवणूक आणि नफा: मुलांसाठी डेकेअर सेंटर सुरू करायला कमीतकमी 10,000 रुपये ते 20,000 रुपये आवश्यक आहे आणि नफा मार्जिन तुमची फी आणि तुम्ही किती मुलांना प्रवेश देता यावर अवलंबून आहे.

पेट केअर सेंटरसाठी, तुम्हाला सुमारे 20,000 रुपये ते 25,000 रुपयांची आवश्यकता असेल आणि महिन्याला तुम्हाला किती पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायची आहे यावर तुमचा नफा दर अवलंबून असेल.

5. ऑनलाईन कन्सलटन्सी

कन्सलटन्सी सेवेची आज प्रत्येक व्यक्तीला खूप गरज आहे. ते बिजनेस, आरोग्य, नातेसंबंध, काम, मन, लग्न, शिक्षण, कुटुंब, करिअर इत्यादींशी संबंधित असू शकते. लोक या सर्व परिमाणांमध्ये मदत शोधत असतात आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता. चांगली संभाषण कौशल्ये, मानसशास्त्राची समज आणि या क्षेत्राशी संबंधित ज्ञान अशा बाबी तुम्हाला कन्सलटन्सी सेवांसाठी मार्ग मोकळा करू शकतात. अर्थात, व्यावसायिक कन्सलटन्सी सेवांसाठी विशिष्ट पदवी आणि वैद्यकीय, आर्थिक, कर आकारणी इत्यादी प्रमाणपत्रांची आवश्यकता असू शकते. अशा सेवा सुरू करताना ज्ञान आणि बिजनेसच्या सर्व आवश्यक बाबींची काळजी घेतली पाहिजे. कॉल, वन-टू-वन अपॉइंटमेंट आणि वेबिनार किंवा मास्टरक्लास आयोजित करून तुम्ही सेवा देऊ शकता.

यामध्ये ऑनलाईन कोर्सेसची विक्री करणे देखील समाविष्ट असू शकते जेथे आवश्यक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अनेक व्हीडिओ किंवा ऑडिओ तयार केले जातात. फी पॅकेज म्हणून कौशल्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या लोकांना अशी सामग्री प्रदान केली जाते.

गुंतवणूक: गुंतवणुकीची सुरुवात शून्यापासून होते आणि तुमच्या बिजनेसच्या प्रमाणानुसार ती वाढू शकते. नफा  ग्राहकांची संख्या आणि आकारले जाणारे शुल्क यावर आधारित असतो.

हेही वाचा : 1 लाखाच्या आत सुरू होणाऱ्या सर्वोत्तम बिजनेस कल्पना

6. ब्लॉगिंग किंवा YouTube चॅनेल 

कंटेंट राजा आहे. ज्ञान आणि कौशल्ये असलेल्या कोणालाही त्यांचा कंटेंट जगासोबत शेअर करण्यासाठी इंटरनेटवर खुले व्यासपीठ आहे. ब्लॉगिंग, कंटेंट रायटिंग किंवा YouTube चॅनेलमध्ये, लोकांना शिक्षित करण्याची शक्ती आहे. काम विशिष्ट होवू शकते जसे की, तंत्रज्ञान, अध्यात्मिक, प्रेरक, आरोग्य, फिटनेस, शिक्षण, कौशल्ये, स्व-मदत, कला, संस्कृती, गायन आणि नृत्य. अशा कौशल्यामध्ये प्रभुत्व असल्यास असा कंटेंट प्लॅटफॉर्मवर वाढण्यास दर्शक, सदस्य, सशुल्क सहयोग, जाहिराती इत्यादींची मदत मिळू शकते. म्हणून, घरी बसलेल्या महिलांसाठी हा उत्तम बिजनेस ठरू शकतो.

गुंतवणूक आणि नफा: येथे आवश्यक असलेली किमान गुंतवणूक चांगले इंटरनेट कनेक्शन आणि ज्ञान आहे. कंटेंटच्या गुणवत्तेवर आणि तुम्हाला मिळणारे अनुयायी यावर नफा आधारित असतो.

7. डिजिटल मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंग 

ऑनलाईन मार्केटिंग आणि बिजनेसच्या वाढीमुळे उत्पादने आणि सेवा जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग हा असाच एक पर्याय आहे ज्यामुळे हे घडले आहे. लोक नवीन उत्पादने आणि सेवा आकर्षक वाटल्यास ते वापरून पाहण्यास तयार असतात आणि डिजिटल मार्केटिंग तेच करते. लहान प्रचारात्मक व्हीडिओंद्वारे, आकर्षक वर्णने, उत्पादने आणि सेवांची इंटरनेटवर विविध वेब पेज, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इत्यादींवर ऑफर आणि जाहिरात केली जाते. तुम्ही इतर बिजनेसच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी एफिलिएट मार्केटिंग करू शकता. बॅकएंडवर योग्य ग्राहकांसाठी योग्य सेवा समजून घेण्यासाठी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय सॉफ्टवेअर देखील वापरू शकता, ज्यामुळे विक्रेत्यांसाठी बिजनेस सुलभ होईल.

फ्रीलान्सिंग हा उत्पन्नाचा आणखी एक स्रोत आणि महिलांसाठी एक उत्कृष्ट बिजनेस आयडिया आहे जिथे एखादी व्यक्ती त्यांच्या कौशल्याचा त्यांच्या क्लायंटसाठी कधीही, कुठेही उपयोग करू शकते आणि चांगली कमाई करू शकते. ही सर्वांत वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे जिथे लोक समाधान-आधारित करार शोधत आहेत आणि अनुभवी सेवांसाठी चांगली रक्कम देण्यास तयार आहेत.

गुंतवणूक आणि नफा: सर्वांसाठी चांगले इंटरनेट कनेक्शन आणि काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असणे आवश्यक आहे. नफा तुमच्याकडे असलेल्या ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून असतो. तुम्ही करत असलेल्या कामाच्या प्रकारानुसार प्रत्येक क्लायंटसाठी ₹ 1 लाखापर्यंत नफा होऊ शकतो.

8. योगा प्रशिक्षण 

बदलत्या काळानुसार फिटनेसला खूप महत्त्व आले आहे आणि त्याचप्रमाणे आरोग्यालाही. योगाकडे जीवन जगण्याची कला म्हणून पाहिले जाते आणि लोक या कलेचा सराव करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यास प्राधान्य देतात. तुम्हाला आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल चांगले ज्ञान आणि अनुभव असल्यास, तुम्ही योगा प्रशिक्षक म्हणून सुरुवात करू शकता कारण ती महिलांसाठी भारतातील सर्वोत्तम बिजनेस आयडियांपैकी एक आहे. तुमच्याकडे फक्त ज्ञान आणि कौशल्ये असणे आवश्यक आहे. त्यांचा वापर करून तुम्ही फिटनेस उत्साही लोकांना वैयक्तिकृत प्रशिक्षण देऊ शकता. तसेच, ऑनलाईन क्लासेस किंवा YouTube चॅनेलद्वारे तुम्ही तुमच्या ग्राहकांना तुमच्या कौशल्यांचा परिचय करून देवू शकतो.

गुंतवणूक:  गुंतवणूक कमीतकमी 500 रुपये ते ₹ 5000 रुपयांपर्यत करावी लागू शकते. नफा तुमचे कौशल्य आणि प्रवेश फीवर आधारित असेल.

9. ऑनलाईन ट्युशन 

अवघड गोष्ट सहज आणि किचकट भाषा न वापरता सांगण्याचे कौशल्य असल्यास, ऑनलाईन ट्युशन हा महिलांसाठी घरगुती बिजनेस आयडियामधील सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो. मूलभूत स्तरावर, तुम्ही तुमच्या कनिष्ठांसाठी वर्ग आयोजित करू शकता. एकदा तुम्ही प्रभुत्व प्राप्त केल्यानंतर, तुम्ही चांगले व्हीडिओ आणि ऑडिओ कंटेंटसह अभ्यासक्रमांचे पॅकेज तयार करू शकता किंवा विविध प्लॅटफॉर्मवर थेट शिकवण्याचे सत्र आयोजित करू शकता.

गुंतवणूक आणि नफा: गुंतवणुकीत सर्वोत्तम ऑडिओ आणि व्हीडिओ सुविधा असलेले चांगले डिव्हाईस असणे समाविष्ट आहे जे ₹ 5000 पासून असू होऊ शकते. नफा तुमच्या कौशल्यांवर आणि तुम्हाला मिळणाऱ्या प्रवेशांवर आधारित असतो.

10. ब्युटी पार्लर किंवा सलून 

सौंदर्य आणि स्कीन-केअरच्या नवीन ट्रेंडसह, सौंदर्य उपचार, मेकअप, केशरचना, ड्रेपरी यासाठी सलून उघडणे, तुमच्याकडे आवश्यक कौशल्य असल्यास फायदेशीर ठरू शकते. बिजनेस सुरू करण्यापूर्वी परवान्याच्या आवश्यकतांविषयी जागरूक राहा आणि ते मिळवा. भाड्याने घेतलेली छोटी जागा आणि काही प्रकारच्या उपकरणांसह, हा बिजनेस सुरू केला जावू शकतो. तसेच, आकर्षक पॅकेजेस देऊन विशिष्ट क्लायंटच्या ऑर्डर्स घेतल्या जाऊ शकतात. महिलांसाठी घरगुती आयडियांपैकी ही सर्वोत्तम आहे. तसेच, ब्युटी ब्लॉग आणि ब्युटी चॅनेल या बिजनेसला वाढवण्यास मदत करू शकतात. तुम्ही वर्ग चालवू शकता आणि चांगली कमाई करू शकता.

गुंतवणूक आणि नफा: गुंतवणुक कमीतकमी 50,000 रुपयापर्यंत करावी लागू शकते. ग्राहकांच्या संख्येवर नफा आधारित असतो.

हेही वाचा : भारतात हार्डवेअर शाॅप कसे उघडायचे? या पायऱ्यांद्वारे जाणून घ्या

निष्कर्ष

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे हे प्रमाणपत्रे आणि अनुभवापेक्षा कौशल्ये आणि ज्ञानाविषयी अधिक आहे. महिलांना ऑनलाईन बिजनेस सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन, उत्कृष्ट ज्ञान आणि कौशल्य असण्याची गरज आहे. तुमची आवड ओळखा, बिजनेसची बाजारपेठ आणि लक्ष्यित प्रेक्षकांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करून बिजनेस सुरू करा. ज्यांच्याकडे सर्वोत्तम कौशल्य आहे अशा महिला त्यांचा वापर करून, आरामात घरात बसून कमाई करू शकतात, ही या काळातील सर्वांत मोठी भेट आहे.

अधिक बिजनेस टिप्ससाठी , Khatabook डाउनलोड करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: स्पर्धेच्या दृष्टीने ऑनलाईन बिजनेस स्थापित करणे कठीण आहे का?

उत्तर:

ऑनलाईन बिजनेसची विस्तृत पोहोच आहे आणि हे नवीन प्रवेशकर्त्यांसाठी खुला आहे. त्यामुळे नेहमीच अधिक स्पर्धा असते. यात सर्वांत विशेष काही असेल तरी ती म्हणजे ऑफर केलेल्या सेवांची गुणवत्ता ही एकाला दुसऱ्यापासून वेगळे करते. पुनरावलोकने, टिप्पण्या, प्रशंसापत्रे, रेटिंग हे कोणत्याही ग्राहकासाठी ऑनलाईन मार्केटमधील कोणत्याही विशिष्ट विक्रेत्याचा विचार करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असतात.

प्रश्न: ऑनलाईन बिजनेससाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे का?

उत्तर:

ऑनलाईन बिजनेस सुरू करण्यासाठी कोणत्याही मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता नाही. त्यासाठी फक्त कौशल्य आणि ज्ञान आवश्यक आहे. जर एखाद्याकडे हे असेल तर बाकीचं बरंच सोपे होते. अर्थात, गुंतवणुकीचे प्रमाण आणि बिजनेसचा प्रकार आणि इतर आवश्यकता जसे की, भाड्याने जागा, परवाना आणि मंजूरी, उपकरणाची आवश्यकता, उपकरणे इत्यादींवर अवलंबून असते.

प्रश्न: ऑनलाईन बिजनेसचे उत्पन्न करपात्र आहे का?

उत्तर:

उत्पन्नाची कर क्षमता उत्पन्नाच्या स्त्रोतावर आणि सेवा प्रदान केलेल्या ठिकाणावर अवलंबून असते. देशाच्या महसूल कायद्यानुसार, उत्पन्नाने विशिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर बिजनेसची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, जर उत्पन्न विक्रेत्यासाठी मूळ सूट मर्यादा ओलांडत असेल तर ते करपात्र होते.

प्रश्न: ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बिजनेस वाढवण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?

उत्तर:

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचार आणि जाहिरात. चांगल्या दर्जाच्या सेवा ही प्राथमिक गोष्ट आहे, परंतु योग्य प्रकारे प्रचार आणि  मार्केटिंग न केल्यास वाढत्या स्पर्धेच्या अनुषंगाने राहणे कठीण होईल. बिजनेसचा विस्तार करण्यासाठी अचूक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

प्रश्न: महिलांना ऑनलाईन बिजनेस सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे?

उत्तर:

 ऑनलाईन बिजनेससाठी आवश्यक क्षेत्रातील कौशल्ये आणि ज्ञानासह चांगले उपकरण आणि इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.