written by Khatabook | December 25, 2022

भारतात टाॅपवर असलेले 9 क्राउडफंडिंग प्लॅटफाॅर्म

×

Table of Content


सध्या जगभर क्राउडफंडिंगची चलती आहे, याचा सर्वाधिक फायदा छोटे व्यवसाय आणि उद्योजकांना होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे लोकांना नवीन व्यवसायांना यशस्वी होण्यासाठी मदत करण्याची अनुमती देते, परंतु त्याचबरोबर हे जगभरातील प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या देणगीदारांचे एक मोठे नेटवर्क देखील आहे.

तर, वापरण्यासाठी भारतातील विविध क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म कोणते आहेत? तुम्हाला एखाद्या चांगल्या कारणासाठी पैसे उभारायचे असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या भारतातील सर्वांत लोकप्रिय क्राउडफंडिंग साइटचा विचार करू शकता. ज्या सुविधा आणि ऑफर त्यांनी देवू केले आहेत ते पाहा आणि  तुमच्यासाठी जे प्लॅटफॉर्म योग्य आहे ते निवडा.

तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही वैयक्तिक माहिती जोडल्यास, तुम्हाला 79% पर्यंत अधिक समर्थक मिळू शकतात. होय, एका मोहिमेत ज्या प्राप्तकर्त्यांनी नाव, वय आणि फोटो प्रदान केला होता, त्यांना अज्ञात प्राप्तकर्त्याच्या मोहिमेतील तुलनेत 79% अधिक समर्थक मिळाले होते.

क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म काय आहे?

क्राउडफंडिंग ही संकल्पना नवीन नाही. पाश्चात्य बाजारपेठांमध्ये एक ट्रेंड म्हणून याची सुरूवात झाली होती आणि आता ते मुख्य प्रवाहात आहे, विशेषत: स्टार्टअपसाठी. वैद्यकीय खर्च आणि सामाजिक प्रभाव व्यवसायांसह विविध क्षेत्रांद्वारे भारतात स्टार्टअप्ससाठी क्राउडफंडिंगची लोकप्रियता वाढली.

तस पाहायला गेलो तर अजूनही तुलनेने हे सर्व नवीनच आहे. मात्र, भारतातील अनेक उद्योजकांनी त्यांच्या सामाजिक प्रभावाच्या प्रकल्पांसाठी आणि धर्मादाय कारणांसाठी क्राउडफंडिंगमध्ये यश मिळवले आहे.

प्रत्येक प्लॅटफॉर्म बाजाराच्या वेगळ्या विभागावर लक्ष केंद्रित करतो. यामध्ये इक्विटी, लोन आणि रिवॉर्ड-आधारित क्राउडफंडिंगचा समावेश आहे. धर्मादाय क्राउडफंडिंग हा भारतातील क्राउडफंडिंगचा सर्वांत मोठा विभाग आहे.

क्राउडफंडिंग प्रकल्पात उतरण्यापूर्वी उद्योजकांनी या प्लॅटफॉर्मचे नियम आणि विनियम समजून घेतले पाहिजेत. क्राउडफंडिंगचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, प्राॅडक्टची वेळेच्याआधी आवृत्ती बनवणे होय. अनेक उद्योजक एखादे प्राॅडक्ट किंवा सेवा लवकर रिलीज करण्यासाठी क्राउडफंडिंगचा वापर करतात. लाभ आणि बक्षिसे देऊन, गुंतवणूकदार प्राॅडक्ट किंवा सेवेभोवती समुदाय (कम्युनिटी) तयार करू शकतात.

उदाहरणासाठी, एक सेंद्रिय सौंदर्य प्राॅडक्ट जे लोकांना स्वतःविषयी चांगला फिल यायला मदत करते ते आधी येणाऱ्या अनेक समर्थकांना आकर्षित करू शकते. एखाद्या गोष्टीला समर्थन देवून फंड उभारू इच्छिणाऱ्या ना-नफा संस्थांना प्राॅडक्टच्या पहिल्या बॅचमध्ये प्राथमिकता प्रवेश प्राप्त करून फायदा होऊ शकतो.

वापरण्यासाठी भारतातील विविध क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म

1. TheHotStart

टाॅपच्या क्राउडफंडिंग वेबसाईट्सपैकी, TheHotStart पहिल्या स्थानावर आहे, जी 2014 मध्ये लॉन्च केली होती. प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणतेही शुल्क नसतात परंतु, TheHotStart जमा केलेल्या फंडवर 10% शुल्क आकारते. TheHotStart ने भारतीय उद्योजकांना वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि खाद्यपदार्थ आणि पेय यासह विविध प्रकल्पांसाठी मदत केली आहे.

त्याचा नवीन आणि उल्लेखनीय विभाग तुम्हाला नवीन मोहिमांचे अनुसरण करणे आणि देणगी देणे आणि Crowdfunding जगात नवीन काय सुरू आहे याविषयी अपडेट ठेवण्याची सुविधा देते.

TheHotStart मध्ये विविध टूल्स आणि फिचर्स आहेत जी तुम्हाला तुमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम प्राॅडक्ट तयार करण्यास सक्षम करतात. तुम्हाला आवश्यक असलेले पैसे उभारण्यासाठी मदत करताना त्याचे व्यवसाय सल्लागार तुम्हाला प्रक्रियेत मार्गदर्शन करतात. तसेच, हे सर्वोत्तम ऑनलाईन क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.

2. Indiegogo


टाॅपच्या क्राउडफंडिंगमधील दुसरी निवड Indiegogo आहे. हे क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म निर्मात्यांना सुलभ फंड पर्याय ऑफर करताना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याची सुविधा प्रदान करते. मोहिमांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त, Indiegogo चा समुदाय-आधारित दृष्टीकोन देखील प्रक्रिया सुलभ करायला मदत करते. तथापि, Indiegogo वर मोहीम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

तुम्हाला सुरुवातीला कोणत्या प्रकारचा निधी वापरायचा आहे हे ठरवावे लागेल. किकस्टार्टरच्या विपरीत, Indiegogo दोन प्रकारचा फंड ऑफर करते: निश्चित आणि सुलभ. पूर्वीचा प्रकार "ऑल-ऑर-नथिंग" फंड म्हणून ओळखला जातो आणि समर्थकांना त्यांचे योगदान मिळेल जरी प्रकल्पाने त्यांच्या फंडिंगचे उद्दिष्ट पूर्ण केले नसले तरी.

दुसरीकडे, सुलभ फंड निर्मात्यांना मोहिमेदरम्यान त्यांनी उभारलेल्या पैशाची टक्केवारी काढून घेण्याची अनुमती देते, जे समर्थकांसाठी कमी धोकादायक असते परंतु कंपन्यांसाठी अधिक जोखीमचे असते.

3. Start51 

 

चला जाणून घेवूया की, सर्वोत्कृष्ट क्राउडफंडिंग साइट्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे. या क्रमांकावर Start51 शिवाय दुसरे कोणीच असू शकत नाही. भारतात इतर अनेक प्लॅटफॉर्म आहेत. Start51, उदाहरणार्थ, स्टार्टअपसाठी कल्पना-आधारित क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म आहे. उद्योजकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे फंड उभारणे शक्य तितके सोपे बनवण्यावर ते लक्ष केंद्रित करते. युजर कंपनीसाठी उभारलेल्या फंडपैकी 5% रक्कम देतात, ज्यामुळे त्यांना इतर गुंतवणूकदारांच्या नेटवर्कमध्ये सहज प्रवेश मिळतो.

4. GoFundMe

 

लक्षावधी देणगीदार GoFundMe ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर त्यांच्या महत्त्वाच्या कारणांसाठी पैसे उभारण्यासाठी करतात. साइट देणगीदारांना कोणत्या मोहिमांना समर्थन द्यायचे आहे ते निवडण्याची मुभा देते आणि नंतर पेमेंट प्रोसेसरद्वारे देणग्या मार्गी लावते.

देणग्या सामान्यतः नामांकित लाभार्थ्याला दिल्या जातात, परंतु काहीवेळा मोहीम आयोजकांना पैशाचा एक भाग प्राप्त होतो. स्त्रोत काहीही असो, GoFundMe देणग्यांमध्ये कोणतीही कपात करत नाही.

GoFundMe वर मोहीम सुरू करण्यासाठी, तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता किंवा Facebook खाते वापरून साइन अप करणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही साइन अप केल्यानंतर, तुम्हाला एक मोहीम तयार करावी लागेल, तुम्हाला फंड उभारणीचे ध्येय सेट करावे लागेल आणि फोटो किंवा व्हीडिओ जोडावे लागतील.

तसेच, एकदा तुम्ही तुमची मोहीम सेट केल्यानंतर, तुम्ही ती सोशल मीडिया किंवा वैयक्तिक कनेक्शनद्वारे शेअर करणे सुरू करू शकता. एकदा तुम्ही पुरेसे पैसे गोळा केले की, देणगीदार तुमच्या मोहिमेला समर्थन देण्यासाठी आणि कोणतीही रक्कम दान करण्यासाठी निवडू शकतील. GoFundMe ची ट्रस्ट आणि सेफ्टी टीम मोहिमेची आणि देणग्यांची सुरक्षा सुनिश्चित करते.

5. Wishberry

Wishberry, सर्जनशील क्षेत्रांसाठी भारतीय क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म आहे, हा आणखी एक लोकप्रिय पर्याय आहे. तसेच, Wishberry त्यांच्या देणगीदारांना बक्षिसे देते आणि कल्पनांना जिवंत करण्यासाठी मदत करते. सर्जनशील कल्पना आणि प्रकल्पांना जोडून भारतात संरक्षकांचा समुदाय तयार करणे हे Wishberry चे ध्येय आहे. क्राउडफंडिंगच्या मदतीने, उद्योजक हा फंड प्राॅडक्ट विकास आणि सामाजिक कारणांसाठी वापरू शकतात.

6. Mightycause - ऑनलाईन Crowdfunding साठी एक ना-नफा मार्गदर्शन

MightyCause म्हणजे काय? हा क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म ना-नफा संस्थांना फंडच्या काही हिस्स्याच्या बदल्यात मोहिमा तयार करण्याची अनुमती देतो. Kickstarter च्या विपरीत, Mightycause फक्त राष्ट्रीय प्रकल्प अनुदान प्रदान करते.

गॅनेट फाऊंडेशनकडून एक समिती राष्ट्रीय प्रकल्प निवडते. प्रादेशिक समित्या संचालन अनुदान देतात, तर प्रोत्साहन अनुदान फंड उभारणीच्या बेरजेवर आधारित दिले जाते.

Mightycause ना-नफा संस्थांना अमर्यादित फंड उभारणी आणि संघ मोहिमा तयार करण्याची अनुमती देते, ज्याचा वापर क्राउडफंडिंग किंवा पीअर-टू-पीअर फंड संकलनासाठी केला जाऊ शकतो.

Mightycause Facebook आणि Twitter द्वारे थेट सोशल मीडिया शेअरींग आणि व्हीजिटर्सना तुमच्या मोहिमेद्वारे थेट देणगी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर विजेट्स एम्बेड करण्याची क्षमतही प्रदान करते.

हे सुलभ देणगी आणि कार्यक्रम नोंदणीसाठी देखील अनुमती देते. Mightycause प्लॅटफॉर्ममध्ये स्वतंत्र मॉड्यूल समाविष्ट आहेत जे ना-नफा संस्थांना त्यांच्या फंड उभारणी मोहिमा आयोजित आणि व्यवस्थापित करण्यात मदत करतात. याचा अर्थ ना-नफा संस्थांना त्यांच्या मोहिमा यशस्वी करण्यासाठी टूल्स मिळू शकतात.

दात्याचे संबंध व्यवस्थापित करण्यासाठी ते Mightycause देखील वापरू शकतात. सॉफ्टवेअर ऑनलाईन क्राउडफंडिंगमध्ये सर्वांत कमी किमतीचा दावा करते आणि नवीनतम डोनर व्यवस्थापन तंत्रज्ञान फिचरदेखील सादर करते. ऑनलाईन फंड उभारणी प्लॅटफॉर्मची आवश्यकता असलेल्या ना-नफा संस्थांसाठी, Mightycause दोन किंमतीचे स्तर ऑफर करते - मोफत आणि प्रीमियम.

7. Ketto

तुम्ही स्टार्टअप्ससाठी सर्वोत्तम क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म शोधत असल्यास, Ketto, तुमच्यासाठी खास आहे. मुंबईत असलेल्या या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्ममध्ये निवडण्यासाठी विविध मोहिमा आहेत. यामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, क्रीडा, प्राणी कल्याण आणि वैयक्तिक काळजी इत्यादी मोहिमांचा समावेश आहे.

यात त्वरित फंड-आवश्यक मोहिमांसाठी समर्पित विभाग देखील आहे आणि हे समर्थकांना कर लाभ प्रदान करते. Ketto कॅश पिकअप सुविधा देखील देते. त्याच्या अनेक फायद्यांव्यतिरिक्त, Ketto ने भारतातील विविध क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मच्या यादीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

8. SeedInvest

भारतीय स्टार्टअपसाठी दुसरा पर्याय म्हणजे SeedInvest. दोन्ही साईट्समध्ये सारखेच फिचर्स आहेत परंतु, तुमचे योगदान मिळवण्यासाठी ते आकारत असलेल्या शुल्कात अंतर आहे.

उदाहरणार्थ, SeedInvest, वापरण्यासाठी मोफत आहे परंतु, रिपब्लिक अल्प प्रमाणात प्लॅटफॉर्म शुल्क आकारते. हे शुल्क एकूण उभारलेल्या रकमेच्या जवळपास 3% आहे आणि रिपब्लिक गुंतवलेल्या पैशाच्या दोन ते पाच टक्के दरम्यान शुल्क आकारते. प्लॅटफॉर्मवर अवलंबून, आकारलेली रक्कम एकूण 8% इतकी जास्त असू शकते.

9. Fuel-A-Dream

भारतात स्थित क्राउडफंडिंगसाठी आणखी एक प्लॅटफाॅर्म म्हणजे Fuel-A-Dream. ही क्राउडफंडिंग वेबसाईट बक्षिस-आधारित प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करते आणि यात दोन फंडींग पर्याय उपलब्ध आहेत - ऑल ऑर नथिंग प्लॅन ॲन्ड कीप व्हॉट यू गेट प्लॅन. भारतातील स्टार्टअप्ससाठी हे एक चांगले क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म ठरू शकते.

Fuel-A-Dream च्या साइटवर दर महिन्याला सुमारे 20 सक्रिय प्रकल्प आहेत, ज्यात सिंचन कालव्यापासून ते सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कार्सपर्यंत आहेत. साइट तुलनेने नवीन असल्याने, तिच्याकडे आधीपासूनच एक सक्रिय समुदाय आहे, प्रत्येक महिन्याला साइटवर 20 नवीन प्रकल्प जोडले जातात.

हे 9 प्लॅटफाॅर्म होते. तुमचा प्रकल्प पूर्ण करण्यापूर्वी तुमच्या बिजनेसचा प्लॅन बनवणे तुमच्यासाठी सर्वांत फायदेशीर राहिल.

क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म कसे निवडायचे?

तुम्ही क्राउडफंडिंग मोहीम सुरू करत असल्यास, तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी सर्वोत्तम क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म निवडणे ही चांगली कल्पना आहे. शेकडो प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, पण त्यापैकी एकाची निवड करणे, म्हणजे मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. तुमच्या विशिष्ट गरजांसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म निवडण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

 • क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मची रचना
 • मोहिमेचा उद्देश
 • प्लॅटफॉर्म फी आणि मिस्ड टार्गेट
 • प्लॅटफॉर्म समर्थन पर्याय
 • उपलब्ध पेमेंट पद्धती
 • नियम आणि निर्बंध

काही तपशीलवार स्पष्टीकरण:

 • लक्षात ठेवा क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचे यश त्याच्या मार्केटिंग प्रयत्नांवर आणि तुमच्या नेटवर्कमध्ये शेअर करण्यावर अवलंबून असते. तुमच्या मोहिमेची उद्दिष्टे आणि बजेटमध्ये उत्तम प्रकारे बसणारे प्लॅटफाॅर्म निवडा. 
 • तुमच्या मोहिमेची उद्दिष्टे आणि टाईमलाईन निश्चित करा. तुमचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती काळ फंड उभारायचा आहे हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही मोहिमेचा रोडमॅप वापरू शकता. हे तुम्हाला किती समर्थक मागतात हे निर्धारित करण्यात मदत करेल.
 • काही क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म बक्षिस ऑफर करतात, तर काही विविध बक्षिस स्ट्रक्चर्स देतात. देणगी-आधारित मॉडेल धर्मादाय आणि ना-नफा संस्थांसाठी लोकप्रिय आहेत.

निष्कर्ष

अनेक पर्याय आणि समविचारी लोकांशी संपर्क साधण्याच्या क्षमतेसह, उद्योजक आणि व्यवसायांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणारे प्लॅटफाॅर्म शोधण्याची आवश्यकता आहे, जे सर्वांत चांगले काम करेल. प्रत्येक गरजेसाठी योग्य क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तुम्हाला सर्व बॅलेन्स शीट पेमेंटची माहिती ठेवायची असल्यास, आम्ही तुम्हाला मोफत ऑनलाईन प्लॅटफॉर्म Khatabook वापरण्याची शिफारस करतो. जे तुम्हाला अनेक प्रभावी फिचर्स आणि सुविधा देते.

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: क्राउडसोर्स फंडिंग म्हणजे काय?

उत्तर:

क्राउडफंडिंग नवीन व्यवसाय उपक्रमासाठी वित्तपुरवठा जमवण्यासाठी लोकांकडून छोट्या रोख रकमा (जसे देणग्या) वापरते.

प्रश्न: भारतातील सर्वोत्तम क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म कोणते आहेत?

उत्तर:

Kickstarter, Indiegogo आणि Fuel-A-Dream हे देशातील विविध क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म आहेत.

प्रश्न: सर्वोत्तम क्राउडफंडिंग वेबसाईट्स कोणत्या आहेत?

उत्तर:

क्राउडफंडिंगसाठी खाली काही प्रसिद्ध वेबसाईट्स दिल्या आहेत:

 • Indiegogo.
 • Mightycause.
 • SeedInvest Technology.
 • StartEngine.
 • Patreon.
 • GoFundMe.

प्रश्न: कोणत्या क्राउडफंडिंग कंपन्या यशस्वी आहेत?

उत्तर:

जगातील सर्वांत यशस्वी क्राउडफंडिंग कंपन्यांची यादी येथे आहे:

 • Oculus
 • Veronica Mars
 • Flow
 • Glowforge
 • Exploding Kittens
 • Tile

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.