written by Khatabook | July 25, 2022

बाप्पांच्या मूर्तीचा व्यवसाय सुरू करायचा? मग 'ही' माहिती तुमच्यासाठीच

×

Table of Content


कोणत्याही कामाची सुरूवात करायची म्हटल्यावर, श्रीगणेशाची पूजा करूनच नवीन कामाचा श्रीगणेशाय होतो. सर्व भारतभरच लोक बाप्पाला खूप मानतात. त्यातही वर्षातून एकदा येणाऱ्या गणेश चतुर्थीची वाट सर्व भाविक आणि बालगणेश पाहत असतात. गणपती म्हटलं की डोळ्यासमोर आपसूकच बाल मंडळ येतं. त्यांचा गणेशोत्सवात उत्साह पाहण्यासारखा असतो. हो की नाही? बाल मंडळच नाही तर प्रत्येकजण बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेला असतो. सगळ्यांची नजर फक्त बाप्पाच्या आगमनाकडे असते. कारण, बाप्पा आहेतच सर्वांच्या लाडाचे. या लाडामुळेच अनेकांचे घर चालत आहेत. कितीतरी लोकांना बाप्पामुळे रोजगार मिळाला आहे. गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे, याचा फायदा अनेकांना झाला आहे. पण, कोरोनामुळे मागील 2 वर्षात वातावरण जीवघेणं असल्यामुळे आणि नियमावलीमुळे मूर्तीच्या व्यवसायात मंदी होती. आता सर्व पूर्ववत होत असून लोकांनी कंबर कसली आहे. त्यामुळे ज्यांना हाताला काम पाहिजे आहे. ते बाप्पांच्या मूर्तीच्या व्यवसायात उतरू शकतात. हा व्यवसाय सीझनेबल आणि चांगली कमाई करून देणारा असला तरी त्याविषयी रिसर्च आवश्यक आहे. या लेखात आम्ही तुम्हाला व्यवसाय कसा सुरू करायचा आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची  माहिती असणे आवश्यक आहे. याविषयी माहिती देणार आहोत.

गणेशोत्सवाची परंपरा

ज्या दिवशी बाप्पांचे आगमन होते, त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यानंतर 11 दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला बाप्पाच्या विसर्जनानंतर संपतो. महाराष्ट्र, गुजरात आंध्रप्रदेशामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरी गणपतीची लहान मूर्ती आणली जाते व 11 दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते. या काळात रोज सकाळी व संध्याकाळी आरती केली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते.

या उत्सवाची खरी सुरूवात भाऊ रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1892 साली सुरू केली असल्याची माहिती त्यांच्या वंशजांकडून मिळते. पण, या गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं असं जाणकारांच मत आहे. कारण, याच माध्यमातून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं. तसेच, राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी गणेशोत्सवाचा वापर केला आणि गणपतीच्या आराधनेला सार्वजनिक स्वरुप दिले. तसेच, जनशक्ती संघटीत करुन जनजागृतीच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यास योग्य दिशा दिली. तोच उत्सव आजही आपण भक्तिभावाने साजरा करीत आहोत. या उत्सवामुळे महाराष्ट्रात नवचैतन्य पसरतं, ते नवचैतन्य द्विगुणीत करण्याची संधी सर्व गणपती मूर्ती बनवणाऱ्या व विकणाऱ्या  व्यावसायिकांना आहे. कारण, महाराष्ट्रात घरोघरी बाप्पांची मूर्ती यांच्या मेहनतीमुळेच बसवली जाते. त्याच मेहनतीमुळे त्यांना यातून चांगला नफाही कमवता येवू शकतो आणि परंपरा ही जपता येते.       

हेही वाचा : टिकल्यांचा बिजनेस कसा सुरू करायचा?

बाप्पांच्या मूर्तीचा व्यवसाय कसा सुरू करायचा?

बाप्पांच्या मूर्तीचा व्यवसाय म्हणजे फक्त व्यवसाय नसून कला आहे. यात बरेच प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. ज्यांनी त्यांच पूर्ण आयुष्य या व्यवसायाला अर्पण केले आहे. तुम्हाला ही यात स्वत:च ठसा उमटवायचा असल्यास, तुम्ही त्याचे प्रशिक्षण घेवून हा व्यवसाय सुरू करू शकता. ते शक्य नसल्यास तुम्ही ठोक मूर्ती घेवून किंवा किरकोळ विक्रेता म्हणूनही या व्यवसायात उतरू शकता. तुम्हाला जर ठोक किंवा किरकोळ विक्रेता म्हणून हा व्यवसाय सुरू करायचा असल्यास, तुम्ही ज्या परिसरात राहता त्यानुसार तुम्हाला नियोजन करावे लागेल. कारण, एकाच वेळी जास्त मूर्ती घेतल्यास तुम्हाला त्याचा तोटा ही सहन करावा लागू शकतो. स्वत:च कारखाना उघडायचा असल्यास, त्यासाठी बरीच मेहनत करावी लागू शकते. यासाठी जागा ही गरजेची असते. तसेच, मुनष्यबळ ही मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे यासर्व बाबी विचारात घेवून श्रीगणेशाय करायला हरकत नाही.

बाप्पांच्या मूर्ती कुठून घ्यायच्या?  

महाराष्ट्रात गणेशमूर्ती म्हटलं की पेण हे शहर डोळ्यांसमोर उभं राहते. कारण, येथूनच बाप्पांच्या मूर्ती भारतातच नाही तर जगभर पाठवल्या जातात. तसे पाहायला गेलो तर बाप्पांच्या मूर्ती बनवणारे मूर्तिकार सर्वत्रच आहेत. पण, याचा शहराला सर्वांची पसंती आहे. पेण शहरात जवळपास एक हजाराहून अधिक गणपती मूर्तींचे कारखाने आहेत. त्यामुळे या व्यवसायात मनुष्यबळही एका लाखाहून अधिक आहे. ऐवढ्या मोठी प्रमाणात रोजगार या व्यवसायानं निर्माण केला आहे. वर्षभर येथील लोक हाच व्यवसाय करतात. वर्षभरातले 11 महिने मूर्तीकाम आणि शेवटच्या महिन्यात विक्री करायची, असे या व्यवसायाचे स्वरुप आहे. 

तसेच, बदलत्या काळानुसार या व्यवसायात बरेच बदल झाले आहेत. आधी येथून सर्व भारतभर मूर्ती पाठवण्यासाठी अडचणी यायच्या, मूर्ती तुटायची जास्त भीती असायची. पण, जेव्हापासून शाडू मातीऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार होऊ लागल्या, मग त्या दूरवर पाठवणे एकदम सोपे झाले. कारण, मातीच्या मूर्तीपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या टिकावू असतात. नंतर मोठ्या शहरात कच्च्या मूर्ती नेऊन तेथे त्यांच्यावर शेवटचा हात फिरवून त्या विकण्याची वेगळी बाजारपेठ तयार झाली. त्यामुळे पेण तालुक्यात कच्च्या मूर्ती तयार करणारे कारखानेही उभे राहिले.

मुंबईतील काही भागातही मोठे आणि प्रसिद्ध कारखाने पाहायला मिळतात. यात, परळ वर्क शाॅप किंवा आर्थर रोड नाक्याजवळ तुम्ही गेल्यास, तुम्हाला गणपतींच्या मूर्ती रांगेने मांडलेल्या दिसतील. येथेही वर्षभर मूर्ती बनवायचे काम सुरूच असते. तसेच, पुण्यातील केशवनगर भागातही मूर्तिकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही जर मुंबई-पुणे परिसरात राहत असल्यास तुम्हाला पेणसह या दोन्ही ठिकाणावरून बाप्पांच्या मूर्ती सहज उपलब्ध होतील. तसेच अन्य विभागातही मूर्तिकार आहेत. त्यामुळे तुम्हाला जेथून सोयिस्कर पडेल, तेथून तुम्ही मूर्ती विकत घेवू शकता.

मूर्ती विकायच्या कशा? 

तुम्ही जर ठोक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेता या दोघांपैकी व्यवसायासाठी एकाची निवड केल्यास, तुमच्यासाठी समोरचा रस्ता सोपा होईल. तसेच त्या कशा विकायच्या हेही ठरवता येईल. कारण, ठोक विक्रेता म्हणून चालू करायचा असल्यास तुम्ही एखाद्या कारखान्यातून तुम्हाला हव्या तशा मूर्ती बनवून घेवू शकता. तसेच, त्या बनवून घेताना आपल्या क्षेत्राचा अभ्यास करणं गरजेच आहे. यामुळे, ठोक विक्रेता म्हणून सुरू केल्यास अंदाजे 100 मूर्ती विकत घेवून तुम्ही सुरू करू शकता.  किरकोळ विक्रेता म्हणून सुरू केल्यास, तुम्ही ठोक विक्रेता किंवा थेट कारखान्यातूनही मूर्ती घेवू शकता. यासाठी तुम्हाला बाजाराची किंवा ज्या विभागात तुम्ही राहता. तेथील माहिती तुम्हाला असायला पाहिजे. त्यावरून तुम्ही कोणत्या मूर्तींची मागणी करू शकता. हे ठरवायला सोपं जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी काहीतरी नवीन ट्रेंड येतो आणि लोक त्यानुसार मागणी करतात. त्यामुळे याविषयी देखील व्यावसायिकांनी अपडेट राहायला पाहिजे. पहिल्यांदाच किरकोळ विक्रेता म्हणून सुरू करत असल्यास 20 किंवा 25 मूर्ती घेवून तुम्ही त्या विकण्यासाठी स्टाॅल लावू शकता.

कारखानदार म्हणून सुरू करायचा असल्यास मेहनत घ्यावी लागेल. कारण, बरेच जुने मूर्तिकार असल्याने लोक त्यांनाच पसंती देतात. त्यामुळे तुम्हाला मनमोहक आणि सुंदर मूर्ती घडवून त्यांना बाहेर मांडायला लागेल. जणेकरून, त्या लोकांना दिसल्या पाहिजे. सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते जेव्हा गणपती ठरवायला येतात. तेव्हा त्या मूर्तींनी त्यांच लक्ष वेधून घेतलं पाहिजे. मूर्ती कोणती आणि कशी हवी हे आधीच कार्यकर्ते मूर्तिकारांना भेटून सांगतात. त्यानंतर मूर्तिकार त्यांनी सांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवायला सुरूवात करतात. त्यामुळे तुम्ही नवीन कारखाना टाकायचा विचार करत असल्यास, जिथे मूर्ती बनवण्याचे मार्केट आहे. तेथेच जागा मिळण्याची खात्री करून घ्या. असं केल्यास, मूर्ती विकणे सोपे होईल.

मूर्तीची किंमत अंदाजे 100 रुपयांपासून 40000 हजारापर्यंत असते. भावात काही चढ-उतारही असू शकतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आणि शाडू मातीच्या मूर्तींची किंमतीत फरक असतो. शाडूच्या मूर्ती जास्त महाग असतात. तसेच, ज्या मूर्ती 10 फूटांच्या वर असतात, त्यांची किंमत ही जास्त असते. कारण, त्या बनवण्यासाठी जास्त मनुष्यबळ आणि खूप वेळ लागतो. यामुळे तुम्हाला जे परवडेल आणि ज्या मूर्ती विकल्या जाईल अशाच मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्या. 

कोणत्या मूर्तींची मागणी जास्त असते?

दरवर्षी बाजारात मूर्तींचे वेगवेगळे ट्रेंड असतात. पण, काही लोकांच ठरलेलं असत, ते मूर्ती बदलवत नाही. म्हणजे, एखादी व्यक्ती लालबागच्या गणपतीला मानत असल्यास, त्याच मूर्तीच्या रुपाची स्थापना करेल. यात काही जणांचा नवस असतो. मग ज्या गणपतीला त्यांनी नवस कबूल केला असेल. त्याच बाप्पांच्या रुपाची मूर्ती ते आणतात. बाजारात लालबागचा राजा, बालगणेश, राजसिंहासन, पेशवाई, नवश्या गणपती, अष्टविनायकातील सर्वच रुपे, जास्वंद गणेश, मल्हार गणेश जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. पण काही वेळा बच्चे कंपनीच्या हट्टानुसारही चालावे लागते. त्यांना जी मूर्ती हवी तिच घ्यावी लागते. यामध्ये छोटा भीम आणि महाबलीचे रूप धारण केलेला बाप्पा यांची मागणी अधिक असते. यावर्षी बाप्पाच्या कोणत्या मूर्तीला मागणी असेल हे समजायला फक्त आता काहीच दिवस उरले आहेत.     

व्यवसाय सुरू करायचा खर्च?

मूर्तींचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही जर कारखाना टाकायचे ठरवल्यास, खर्च अंदाजे लाखोंच्या घरात जातो. कारण, कारखाना सुरू करायचा म्हटल्यास, मुनुष्यबळासह बरेच उपकरणं आणि साहित्य विकत घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे जागाही मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे ऐवढा मोठा लवाजामा उभा करायला लाखोंच्या घरात खर्च येवू शकतो. तुमची तेवढी तयारी असल्याची खात्री करून तुम्ही पुढचे पाऊल उचलू शकता. 

ठोक विक्रेता म्हणून सुरू केल्यास, तुम्हाला मूर्ती ठेवण्यासाठी मोठी जागा भाड्याने किंवा विकत घ्यावी लागेल. हे शक्य नसल्यास तुम्ही मूर्ती थेट किरकोळ विक्रेत्यांना घरपोच देवू शकता. त्यामुळे यासाठी तुमच्याजवळ जागा किंवा वाहन आणि मनुष्यबळ आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला अंदाजे 2 लाखापर्यंत खर्च येवू शकतो. हा खर्च उचलण्याची तुमची तयारी असल्यास, व्यवसाय सुरू करायला हरकत नाही.

किरकोळ विक्रेता म्हणून सुरू करायचे ठरवल्यास, तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. यासाठी तुम्हाला स्टाॅलपुरती जागा मिळाली तरी तुमचा व्यवसाय सुरू होईल. स्थानिक प्रशासन यासाठी जागा ठरवून देते, त्यांचे जे काही चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागू शकतात. तसेच, यासाठी तुम्हाला अंदाजे जास्तीत जास्त 25 हजार ते 50 हजारापर्यंत खर्च येवू शकतो. तुम्ही कमी मूर्ती आणल्यास, यापेक्षा कमी खर्च येवू शकतो. त्यामुळे कमी पैसे गुंतवूण तुम्ही यातून चांगेल पैसे कमवू शकता. त्यामुळे वरीलपैकी कोणती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे. ते ठरवून तुम्ही हा सीझनेबल मूर्तींचा व्यवसाय सुरू करू शकता.

पर्यावरणपूरक मूर्ती काय आहे?

मागील 2 वर्षात कोरोनामुळे मूर्तींच्या व्यवसायात मंदी आली होती. यंदा सर्वांनी कंबर कसली असून प्रशासनाने काही नियम घातले आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे प्रदुषण वाढते, त्यामुळे केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  2020 मध्ये यावर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असल्यामुळे त्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, त्यापासून बनवलेल्या मूर्ती विक्री आणि खरेदी करू नये असेही त्यांनी म्हटले आहे. त्याऐवजी पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कारण, या मातीत घातक रसायनाचा समावेश नसतो. मूर्ती विसर्जनानंतर ती सहज पाण्यात विरघळते. या सर्व गोष्टींची खबरदारी घेवून आणि सर्व नियम पाळून हा व्यवसाय सुरू करायला हरकत नाही. 

हेही वाचा : भारतातील 'या' खास चाॅकलेट ब्रॅंडविषयी माहिती आहे?

निष्कर्ष

बाप्पांच्या आगमनाची ओढ सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे बाप्पांच्या स्वागताची तयारी आगमनापूर्वीच जोरात सुरू होते. कारण, वर्षातून एकदाच बाप्पा आपल्या भाविकांना भेटायला येतात. त्यामुळे भाविकही त्यांच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. त्यामुळे भाविकांना बाप्पांच्या भेटीसाठी कोणताही अडथळा येवू नये आणि त्यांना पाहिजे तशी मूर्ती मिळावी. यासाठी तुम्ही त्यांना हा व्यवसाय सुरू करून, मदत करू शकता. तसेच, यातून पैसे ही कमवू शकता. एखाद्याला आनंद देवून पैसे मिळत, असेल तर त्यात वावग काय आहे. मूर्तीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखात दिली असल्याची आम्हाला आशा आहे. त्या सर्व बाबींची माहिती घेवून तुम्ही या व्यवसायाचा श्रीगणेशाय करू शकता. तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक शुभेच्छा..

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: गणपती मूर्तीचा व्यवसाय किरकोळ विक्रेता म्हणून सुरू करायला खर्च किती लागतो?

उत्तर:

किरकोळ विक्रेता म्हणून सुरू करायचे ठरवल्यास, तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. यासाठी तुम्हाला स्टाॅलपुरती जागा मिळाली तरी तुमचा व्यवसाय सुरू होईल. स्थानिक प्रशासन यासाठी जागा ठरवून देते, त्यांचे जे काही चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागू शकतात. तसेच, यासाठी तुम्हाला अंदाजे जास्तीत जास्त 25 हजार ते 50 हजारापर्यंत खर्च येवू शकतो.

प्रश्न: मी गणपती मूर्तीचा व्यवसाय किरकोळ विक्रेता म्हणून करू शकतो?

उत्तर:

होय. तुम्ही किरकोळ विक्रेता म्हणूनही हा व्यवसाय सुरू करू शकता.

प्रश्न: बाप्पांच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?

उत्तर:

बाप्पांच्या मूर्तीसाठी पेण शहर प्रसिद्ध आहे. या ठिकाणावरून तुम्ही व्यवसायासाठी मूर्ती घेवू शकता.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.