written by Khatabook | March 21, 2022

नवशिक्यांसाठी सर्वोत्तम ऑनलाईन प्रूफरीडिंग जाॅब्स

×

Table of Content


प्रूफरीडिंग (मुद्रितशोधन) हा शब्द लेखणाच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक आहे. एवढंच अनेकाना माहिती असेल. पण यातही मोठ्या प्रमाणात जाॅब्स उपलब्ध आहेत. तसेच, जे पालक बाहेर जावू शकत नाही त्यांच्यासाठी घरातून ही नोकरी करणं हे उत्तम ठरू शकतं. कारण, ते कोणत्याही वेळी केले जाऊ शकते. तुमच्याकडे कोणताही अनुभव नसला आणि तुम्ही नुकतेच तुमच्या कारकीर्दीची सुरुवात करत असला तरीही तुम्ही नोकरी मिळवू शकता. एखाद्या प्रोजेक्टवर आधारित चांगले पैसे कमवू इच्छिणाऱ्या नवीन मुलांसाठी अनेक ऑनलाईन प्रूफरीडिंग जॉब्स उपलब्ध आहेत. हे काम तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. तर, चला ऑनलाईन प्रूफरीडिंग जॉब्सबद्दल अधिक जाणून घेऊया.

तुम्हाला माहिती आहे का? प्रूफरीडिंग हे प्रिंटिंग इतकंच जुने आहे. प्रूफरीडिंगचा पहिला ज्ञात प्रकार 15 व्या शतकात शोधला जाऊ शकतो.

प्रूफरीडर्सचे कर्तव्य काय आहे?

लिखित आशयात व्याकरणाच्या कुठल्याही चुका नसल्याची हमी देणे ही प्राथमिक जबाबदारी आहे, जसे की शुद्धलेखन, फॉरमॅटिंग, वाक्यरचना आणि टंकलेखनातील त्रुटी. संपादन प्रक्रियेतील ही शेवटची पायरी आहे. प्रूफरीडर वेब कंटेंट, ई-बुक्स, व्हाईट पेपर्स, विद्यार्थी प्रबंध/निबंध आणि अगदी वापरकर्त्याच्या मॅन्युअलसह विविध आशयावर काम करतात. लिहिताना नकळत चुका होवू शकतात आणि त्या परत वाचल्या तरच लक्षात येवू शकतात.   यामुळे लिखानात प्रूफरीडिंग महत्त्वाची स्टेप आहे. चला तर मग घरबसल्या करता येणाऱ्या ऑनलाईन प्रूफरीडिंग जॉब्सबद्दल जाणून घेऊयात.

प्रूफरीडिंग आणि कॉपी एडिटिंगमधील तुलना

 • प्रूफरीडिंग आणि कॉपी एडिटिंग हे असे शब्द आहेत, जे नेहमीच गोंधळात टाकतात आणि आलटून-पालटून वापरले जातात. या क्षेत्रात जाॅब करायचं ठरलं असल्यास, या दोघातील फरक जाणून घेणे, ऑनलाईन प्रूफरीडिंग जाॅबसाठी प्रयत्न करणाऱ्यांना गरजेचं आहे. कारण, यामुळे त्यांना मदत मिळू शकते.
 • प्रूफरीडिंगमध्ये कंटेंटचे पुनरावलोकन करणे आणि भाषा, शैली, शुद्धलेखन आणि टायपोग्राफीमधील त्रुटी शोधणे समाविष्ट आहे. प्रूफरीडर मजकुर निट-नेटका करतो.
 • संपादनात प्रकाशनाच्या तयारीसाठी हस्तलिखिताला वाचण्यायोग्य बनवण्यासाठी त्याची उजळणी करणे, दुरूस्ती करणे किंवा त्यात बदल करणे समाविष्ट आहे. दस्तऐवजाच्या एकूण कार्यात संपादकाचा सहभाग मिनिटापासून ते संरचनात्मक बदलांपर्यंत असतो. 

प्रूफरीडर बनण्याचे फायदे आणि तोटे

फायदे

 1. प्रूफरीडर होण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही
 2. हे साईड जॉब म्हणून सहजपणे सुरू केले जाऊ शकते आणि नंतर आवश्यक असल्यास वाढवले जाऊ शकते
 3. व्याकरणाच्या चुका शोधण्यात ज्यांचा हातखंडा आहे, त्यांच्यासाठी हे परिपूर्ण काम आहे
 4. तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार आणि घरातूनही काम करू शकता

तोटे

 1. त्यासाठी अतिरिक्त शैक्षणिक आवश्यकतांची  गरज असू शकते
 2. तेथे डेडलाईन पाळणे आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वे असू शकतात ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे
 3. जो कोणी सहजपणे विचलित होत असेल, तो या नोकरीसाठी योग्य नाही

प्रूफरीडर होण्यासाठी कोणत्या आवश्यकता आहेत?

 • प्रूफरीडर बनण्यासाठी, तुम्हाला अधिक क्षमतांची आवश्यकता नसते, परंतु अपवादात्मक शुद्धलेखन आणि व्याकरणिक कौशल्ये आवश्यक आहेत, तसेच तुम्ही ज्या भाषेत प्रूफरीडिंग करीत आहात त्या भाषेचे दृढ आकलन आवश्यक आहे. 
 • दोष त्वरित आणि सहजतेने ओळखण्यास सक्षम असणे महत्वाचे आहे.
 • मूळ लेखकाने ज्या चुकांकडे दुर्लक्ष केले त्या ओळखून व्यवस्थित करणे जमले पाहिजे. 
 • तुमच्याकडून चुकीचे शब्द नकळतपणे वाचल्या जावून, ते आहेत तसेच समोर जावू शकतात. जर तुम्ही पेपर प्रूफरीडिंगमध्ये चांगले असल्यास अशा  प्रकारच्या त्रुटी तुम्हाला लगेच दिसू शकतात.
 • तथापि, जर तुम्हाला यातून बिजनेस सुरू करायचा असल्यास, बऱ्याच अनुभवाची गरज असेल. तसेच, काही अतिरिक्त कौशल्ये किंवा प्रमाणपत्रे आवश्यक असतील. 
 • प्रूफरीडर म्हणून काम करण्यासाठी पदवीची आवश्यकता नाही; तथापि, काही उच्च-पगाराच्या साईट याचे काम देतात. नवशिक्या म्हणून तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही या क्षेत्रात सहजपणे काम मिळवू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. 

हेही वाचा : 1 लाखाच्या आत सुरू होणाऱ्या सर्वोत्तम बिजनेस कल्पना

सर्वोत्तम ऑनलाईन प्रूफरीडिंग जॉब्स

काही उत्तम वेबसाईट्स खाली देण्यात आल्या आहेत:

Upwork

अपवर्क नवशिक्यांसाठी ऑनलाईन प्रूफरीडिंगची नोकरी शोधणे सुरू करण्यासाठी ही एक चांगली जागा आहे. अपवर्कची सर्वांत चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही त्यांच्या डेटाबेसमधून तुमचे ग्राहक आणि नोकरी निवडू शकता. हे एक रोजगार मंडळ असून फ्रीलान्सच्या संधींनी भरलेले आहे. तुम्हाला फक्त तुमच्या प्रूफरीडिंग सेवांची ऑनलाईन यादी करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन प्रूफरीडर म्हणून काम करण्यासाठी विविध इंटरनेट उद्योजक किंवा कंपन्यांना नियुक्त करणे आवश्यक आहे.

Lionbridge

तुम्हाला पूर्ण वेळ ऑनलाईन प्रूफरीडर म्हणून काम करायचे आहे का? लाॅयनब्रिज हे प्रारंभ करण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. लाॅयनब्रिजमध्ये वर्क-फ्रॉम-होमच्या विविध संधी आहेत, परंतु प्रूफरीडिंगसाठी हे सर्वांत लोकप्रिय आहे. तुम्ही विविध देश आणि भाषांमध्ये काम करण्याची संधी मिळवू शकता. तथापि,  तुम्ही ज्या भूमिकेसाठी अर्ज करीत आहात त्या भूमिकेची भाषा आणि संस्कृती यावर तुमचा हातखंडा असल्यास, ते फायद्याचे ठरेल; अन्यथा, कोणत्याही अतिरिक्त अनुभवाची किंवा शिक्षणाची आवश्यकता नाही.

Craigslist

क्रेगलिस्ट नोकरी विभागात अधिक स्थिर झाला आहे, यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. तुम्ही कोणत्याही शहरातील क्रेगलिस्टमध्ये जाऊन "लेखन आणि संपादन" विभागात पाहिल्यास तुम्हाला बऱ्याच कार्यक्रमाविषयी माहिती मिळू शकते. हे शक्य आहे की तुम्ही येथे खाजगी ग्राहक शोधू शकाल, ज्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच रोमांचक असतो! हे लक्षात ठेवा की घरून काम करणे मोफत आहे आणि तुम्हाला यासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही.

Fiverr

ऑनलाईन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्ती फिव्हरवर साईन अप करू शकतात, जे त्वरित पेमेंट आणि प्रतिष्ठित ग्राहकांसाठी ओळखल्या जाते. ते काही वर्षांपासून बाजारात असून प्रूफरीडिंगच्या नोकऱ्यासाठी विस्तृत साखळी प्रदान करतात. तुम्ही इच्छित असलेल्या किंमतीत त्यांच्या वेबसाईटवर तुमच्या सेवा विकू शकता. जेव्हा तुम्ही फिव्हरसह साईन अप करता, तेव्हा तुम्ही प्रूफरीडिंग सेवा विकू शकता आणि  थोड्या प्रमाणात पैसे कमवू शकता. जसजसा वेळ जाईल तसतसे तुम्ही अधिक पैसे कमवू शकाल.

Freelancer

कारण हे फ्रीलान्सिंग मार्केटप्लेस आहे आणि फ्रीलांसर हे अपवर्कसारखेच आहे. हे केवळ प्रूफरीडरसाठी नाही; हे फ्रीलान्सर्सच्या विस्तृत साखळीसाठी खुले आहे. तुम्ही प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला पाहिजे त्या नोकरीसाठी प्रयत्न करण्यास तुम्ही सक्षम असाल.

Proofreadingservices.com

तुम्हाला प्रूफरीडर म्हणून काम करायचे आहे. पण, कुठे सुरू करायचे हे माहित नसल्यास,  ProofreadingServices.com तुमच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला येथे पूर्ण-वेळ आणि अर्ध-वेळ ऑनलाईन प्रूफरीडिंगचे काम मिळू शकेल, परंतु कोणतेही काम नियुक्त करण्यापूर्वी तुम्हाला 20 मिनिटांची स्क्रीनिंग चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या सेवेचा फायदा असा आहे की यामुळे तुम्हाला जागतिक स्तरावरील काही सर्वोत्कृष्ट इंग्रजी प्रूफरीडरशी संपर्क साधता येतो.

Click Worker

हे ग्राहकांसाठी भाषांतर, प्रूफरीडिंग आणि संपादन यासारख्या मायक्रोटास्कचे इतर गोष्टींसह आउटसोर्सिंग करण्याचे विलक्षण टूल आहे. शिवाय, कारण प्रत्येक क्लिक-वर्कर हा एक स्वतंत्र कंत्राटदार आहे जो चेक-इन करू शकतो आणि विविध असाइनमेंट पाहू शकतो, ते तुमच्या गरजेनुसार एक प्रकल्प निवडणे सोपे करतात.

जेव्हा प्रूफरीडिंग जॉब्सचा विचार केला जातो, तेव्हा उद्योजक मजबूत भाषा कौशल्ये आणि संपादन प्रतिभा शोधत असतात. अनुभव घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर लेखक म्हणून प्रारंभ करावा लागेल आणि एकदा तुम्ही काही मजकूर निर्मिती असाइनमेंट पूर्ण केल्यावर, तुम्ही प्रूफरीडिंग मूल्यांकन चाचणी देण्यास पात्र व्हाल. जर तुम्ही उत्तीर्ण झालात, तर उपलब्ध प्रूफरीडिंगची कामं तुम्हीच पाहू शकाल.

Polished Paper

पॉलिश्ड पेपर अधिक अनुभवी प्रूफरीडर्सची पूर्तता करतो आणि त्यानुसार ते पैसे ही देतात. त्यांचा अर्ज भरा आणि साईन अप करण्यासाठी 35-प्रश्नांची परीक्षा द्या. त्यांना हे सुनिश्चित करायचे असते की, एखाद्या अननुभवी प्रूफरीडरकडून ज्या चुका होतात, त्या टाळल्या जाव्या म्हणून ते परीक्षा घेतात. तुम्ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, प्रूफरीडिंग असाइनमेंट घेऊ शकता. 

Guru

तुम्ही नवशिखे असलात तरी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फ्रीलान्स प्रूफरीडिंगची चांगली कामं मिळू शकतात. उद्योजक आणि फ्रीलान्सिंग काम करणाऱ्या दोघांसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. गुरूवर, तुम्ही इतर सेवांसह प्रूफरीडर्स, भाषांतरकार आणि संपादक शोधत असलेले ग्राहक शोधू शकता. अर्थात, प्रूफरीडिंगची कामे शोधण्यासाठी तुम्हाला काही संशोधन आणि ब्राउजिंग करावे लागेल, परंतु खात्री बाळगा की तुम्हाला येथे असे काहीतरी मिळेल जे तुमच्या शेड्युल आणि कौशल्यांच्या अनुकूल असेल.

Flexjobs

फ्लेक्सजॉब्स ही एक वेबसाईट आहे जी विविध क्षेत्रातील फ्रीलान्स जॉबची यादी करते. हे शोधण्यासाठी की, कोणाला हायर करायचे आहे, "ऑनलाईन प्रूफरीडिंग" साठी सामान्य शोध घ्या. कारण, तुम्ही घरून काम करू शकता, तुम्हाला नोकरीच्या पोस्टला लोकेशननुसार दाखवण्याची आवश्यकता नाही.

LinkedIn

येथे तुम्हाला सुप्रसिद्ध कंपन्यांकडून रिमोट प्रूफरीडिंगचे काम मिळू शकते. ऑनलाईन प्रूफरीडिंगची नोकरी शोधण्यासाठी ही चांगली जागा आहे कारण, बरेच लोकं येथे उपलब्ध आहेत. याठिकाणी काम मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु वैध ग्राहक शोधत राहा जे तुम्हाला तुमच्या कौशल्यांसाठी योग्य सॅलरी देतील. तुम्हाला येथे पूर्ण-वेळ आणि अर्ध-वेळ प्रूफरीडिंग नोकरी मिळू शकते, ज्यांचे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मूल्यांकन आणि निवड करू शकता.

Domainite

हे कमी सॅलरी मिळण्याचे व्यासपीठ असले तरी नवशिक्यांना अनुभव प्राप्त करण्यासाठी उत्तम स्थान आहे. विशेषत: जर त्यांना दुसऱ्या नेटवर्कवर ग्राहक शोधण्यात अडचण येत असल्यास. यांच्याबरोबर काम करण्यास प्रारंभ करण्यासाठी, तुम्हाला त्यांचा अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे आणि त्यांनी प्रदान केलेली नमुना चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत काम सुरू करू शकता.

Proofreading Pal

प्रूफरीडर्सनी नवीनच सुरूवात केली असली तरी त्यांना चांगले पैसे दिले जातात. ते महाविद्यालयात असलेल्या तसेच अनुभवी ग्रेड्स असलेल्या लोकांना प्राधान्य देतात. त्यामुळे शिक्षण घेत असताना उत्पन्नात भर घालायची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आदर्श व्यासपीठ आहे. येथे मास्टर डिग्री आणि पाच वर्षांचा अनुभव असलेल्या प्रूफरीडरसाठी ही ओपनिंग आहेत.

Scribbr

सर्व संभाव्य संपादकांना स्क्रिबर यांची प्रारंभिक भाषेची परीक्षा देणे आवश्यक आहे. तुम्ही उत्तीर्ण झाल्यास, त्यांच्या कंपनीसाठी चांगले आहात की नाही हे पाहण्यासाठी ते तुमचा रेझ्युमे पाहतील. तुम्हाला स्क्रिबर अकॅडमीमध्ये स्वीकारले जाईल. जर त्यांना वाटलं तुम्ही योग्य आहात, तेव्हा तुम्हाला 2-5 ऑर्डर संपादित करायला सांगतिल. स्क्रिबर तुम्हाला प्रूफरीडिंगबद्दल अभिप्राय देईल आणि सूचना देईल. तुम्ही एक पात्र स्क्रिबर संपादक व्हाल आणि एकदा अकादमी पूर्ण केल्यावर तुम्हाला पैसे दिले जातील.

Wordvice

वर्डवाईस प्रूफरीडिंग तसेच संपादन सेवा प्रदान करते. येथे काम करण्यासाठी पदवी प्रोग्राम पूर्ण करणे आवश्यक आहे. तथापि, ते अर्ध-वेळ काम प्रदान करतात जे घरूनही केले जावू शकते. त्यांच्याकडे बरेच ग्राहक आहेत जे जगभरातील मूळ इंग्रजी प्रूफरीडर शोधत आहेत. अर्जाचा एक भाग म्हणून तुम्हाला संपादन नमुना सबमिट करण्यास सांगितले जाईल आणि तुम्हाला निवडल्यास ई-मेलद्वारे सूचित केले जाईल.

Gramlee

ग्रॅमली नेहमीच प्रूफरीडर्सच्या शोधात असते. कारण ते एक सामान्य प्रूफरीडिंग कंपनी आहे, ते विविध विषयांना हाताळू शकतात. या प्रूफरीडिंग ऑनलाईन नोकरीसाठी अर्ज करणे ही एक सरळ प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही कर्मचारी अर्जावरील काही प्रश्नांची उत्तरे देता तेव्हा ते तुमच्याशी संपर्क साधतील.

Editfast

एडिटफास्टचे मेंबर होण्यासाठी तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आणि त्यांचे पुनरावलोकन पास केले पाहिजे. त्यानंतर, ते प्रूफरीडर थेट ग्राहकांशी जोडतील; परिणामी, त्यांनी तुम्हाला प्रकल्पासाठी निवडले तरच कामावर घेतले जाईल. एडिटफास्ट एकूण प्रोजेक्ट फीच्या 40% रक्कम ठेवते, तरी या साईटवर भरपूर पैसा कमवला जावू शकतो.

Writer’s Relief

रोजच, ते अनेक लोकांना लेखन आणि स्वयं-प्रकाशनासाठी मदत करतात. नवीन रोजगाराच्या शोधात असलेल्या प्रूफरीडर्सला रायटर्स रिलीफमध्ये नोकरीच्या विविध संधी आहेत. याव्यतिरिक्त, ते सर्जनशील लेखकांना त्यांचे कार्य प्रकाशित करण्यात मदत करण्यासाठी प्रूफरीडिंग सेवा प्रदान करतात. त्यांची अर्ज करण्याची प्रक्रिया सरळ आहे. मात्र, ते मोजकेच अर्ज स्वीकारतात.

हेही वाचा : भारतात हार्डवेअर शाॅप कसे उघडायचे? या पायऱ्यांद्वारे जाणून घ्या

निष्कर्ष

ऑनलाईन प्रूफरीडिंग हे विस्तृत व्याप्ती असलेले एक मनोरंजक क्षेत्र आहे. ही सर्वांत सोयीस्कर, हवं तेव्हा करता येणारी आणि चांगल्या पगाराची नोकरी आहे. ऑनलाईन प्रूफरीडिंगची चांगली नोकरी मिळवण्यासाठी त्या व्यक्तीकडे चांगले इंग्रजी कौशल्य असले पाहिजे. आम्हाला आशा आहे की या लेखामुळे तुम्हाला काही सर्वोत्कृष्ट ऑनलाईन प्रूफरीडिंग जॉब्स आणि वैध प्रूफरीडिंग ऑनलाईन जॉब्सविषयी माहिती मिळाली असेल.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (MSME), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंग संबंधित नवीनतम अपडेट, न्यूज, ब्लाॅग आणि लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: प्रूफरीडरची प्राथमिक जबाबदारी काय आहे?

उत्तर:

लिखित आशयात व्याकरणाच्या कुठल्याही चुका नसल्याची हमी देणे ही प्राथमिक जबाबदारी आहे, जसे की शुद्धलेखन, फॉरमॅटिंग, वाक्यरचना आणि टंकलेखनातील त्रुटी. संपादन प्रक्रियेतील ही शेवटची पायरी आहे.

प्रश्न: ऑनलाईन प्रूफरीडिंग जॉबसाठी मूलभूत गरज काय आहे?

उत्तर:

प्रूफरीडर बनण्यासाठी, तुम्हाला अधिक क्षमतांची आवश्यकता नसते, परंतु अपवादात्मक शुद्धलेखन आणि व्याकरणिक कौशल्ये आवश्यक आहेत, तसेच तुम्ही ज्या भाषेत प्रूफरीडिंग करीत आहात त्या भाषेचे दृढ आकलन आवश्यक आहे. दोष त्वरित आणि सहजतेने ओळखण्यास सक्षम असणे देखील महत्वाचे आहे.

प्रश्न: प्रूफरीडर असण्याचे काही फायदे काय आहेत?

उत्तर:

काही फायदे असे आहेत:

 • प्रूफरीडर होण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही
 • हे साईड जॉब म्हणून सहजपणे सुरू केले जाऊ शकते आणि नंतर आवश्यक असल्यास वाढवले जाऊ शकते
 • व्याकरणाच्या चुका शोधण्यात ज्यांचा हातखंडा आहे, त्यांच्यासाठी हे परिपूर्ण काम आहे
 • तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार आणि घरातूनही काम करू शकता

प्रश्न: अशा कोणत्या वेबसाईट्स आहेत, ज्या ऑनलाईन प्रूफरीडिंगची सर्वोत्तम जाॅब देतात?

उत्तर:

ऑनलाईन सर्वोत्तम प्रूफरीडिंग जॉब देणाऱ्या काही वेबसाईट्समध्ये अपवर्क, फिव्हर, स्क्रिबर, क्रेगलिस्ट, लाॅयनब्रिज, क्लिकवर्कर आदींचा समावेश आहे.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.