mail-box-lead-generation

written by Khatabook | September 2, 2021

कलम 87ए अंतर्गत आयकर सूट

×

Table of Content


तुमचा आयटीआर दाखल करताना कलम 87ए अंतर्गत सूट ही महत्त्वाची आयटी तरतूद आहे. हे वैयक्तिक करदात्यांना त्यांचे कर दायित्व किंवा करपात्र उत्पन्न कमी करण्यास मदत करते. जेव्हा तुमचे वित्तीय वर्षातील एकूण उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसल्यास, तुम्ही कलम 87ए अंतर्गत या कर सूटचा दावा करू शकता. या सूटचा दावा केल्यानंतर तुमचे कर दायित्व शून्यावर आणले जाते.

कलम 87ए अंतर्गत सूट काय आहे?

कलम 87ए अंतर्गत सूट आयकर तरतूद असून करदात्यांना त्यांचा आयकर कमी करण्यास मदत करते. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसल्यास तुम्ही कलम 87ए अंतर्गत सूटसाठी दावा करू शकता. या सूटचा दावा केल्यास, तुमचे आयकर दायित्व नील होते.

केंद्रीय अर्थसंकल्प 2019 च्या अपडेट

2019 च्या अर्थसंकल्पीय घोषणांनी करदात्यांसाठी खालील लाभ सादर केले आहे.

 • 5,00,000 रुपयांचे करपात्र उत्पन्न असलेले सर्व करदाते/ व्यक्ती आयकर कलम 87ए अंतर्गत पूर्णतः कर सवलतसाठी पात्र आहेत.
 • पगारदार कर्मचाऱ्यांसाठी मानक कपातीची मर्यादा 40,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आली आहे.
 • कलम 54 अन्वये भांडवली नफा करातून सूट मिळवण्याचे फायदे एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत खरेदी केलेल्या 2 घरांपर्यंत वाढवला आहे.
 • पोस्ट ऑफिस बचत आणि बँक ठेवींमधून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (स्त्रोत कर कपात) मर्यादा 10,000 रुपयांवरून 40,000 रुपये केली आहे.

कलम 87ए अंतर्गत कर सूटचा दावा

बऱ्याचदा चुका टाळण्यासाठी आयटीआर दाखल करण्यासाठी आणि कपातीचा दावा करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक असणे सर्वांत चांगले आहे. येथे कलम  87ए अंतर्गत सूटसाठी मार्गदर्शक आहे.

 • पहिले वित्तीय वर्षाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरा.
 • कर-बचत साधने आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाती इत्यादीसारख्या वैध कर कपातीत कपात करा.
 • सर्व कपात केल्यानंतर वित्तीय वर्षासाठी निव्वळ उत्पन्नावर पोहोचा.
 • एकूण उत्पन्न, निव्वळ उत्पन्न आणि कपात दाखवत तुमचा आयटीआर दाखल करा.
 • जर तुमचे उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास, कलम 87ए अंतर्गत कर सूटचा दावा करा.
 • 2020-21 च्या मूल्यांकन वर्षासाठी सूट 87ए अंतर्गत कमाल मर्यादा 12,500 रुपये आहे.
 • चला 2020-21 च्या वित्तीय वर्षात किंवा 2019-20 च्या मूल्यांकन वर्षामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसाठी सूट मोजणीच्या उदाहरणावरून जाणून घेऊया.

तपशिल(वित्तीय वर्ष 2019-20) 

उत्पन्न(INR)

एकूण ग्राॅस उत्पन्न

6,25,000

कमी: कलम 80सी अंतर्गत कपात*

1,50,000

एकूण उत्पन्न

4,75,000

लागू आयकर दर 2.5 ते 5 लाख रुपयाच्यादरम्यान उत्पन्न स्लॅब 5% आहे.

11,250

कमी: 87ए अंतर्गत सूट दावा जास्तीत जास्त 12,500/- आहे

11,250

देय कर

नील

कलम 87ए अंतर्गत सूटचा दावा कोण करू शकतो?

आरोग्य आणि शिक्षण उपकर मोजण्यापूर्वी तुम्हाला कलम 87ए अंतर्गंत सूट लागू करावी लागेल.

 • भारतीय रहिवासी असलेल्या व्यक्ती कलम 87ए अंतर्गत सूटचा दावा करू शकतात.
 • ज्येष्ठ नागरिक (60 ते 80 वर्षे) हे कलम 87ए अंतर्गत सूट वापरू शकतात.
 • ज्येष्ठ नागरिक म्हणजे 80 वर्षांवरील व्यक्ती या सूटचा दावा करू शकत नाहीत.
 • सूट रक्कम 12,500 रुपये आहे जी निर्दिष्ट मर्यादा 87ए अंतर्गत आहे किंवा प्रत्यक्ष कर जो भरावा लागेल. वरील उदाहरणात दाखवल्याप्रमाणे तुम्ही उपकर मोजण्यापूर्वी ते लागू करणे आवश्यक आहे.

कलम 87ए अंतर्गत सूटसाठी पात्रता अटी

जेव्हा तुम्ही खाली दिलेल्या निकषांची पूर्तता करता तेव्हा तुम्ही वित्तीय वर्ष 2019-20, 2020-21 साठी 87ए अंतर्गत सूट वापरू शकता:

 • आयटीआर दाखल करणारा निवासी व्यक्ती.
 • विशिष्ट आर्थिक वर्षात एकूण निव्वळ उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास.

वित्तीय वर्ष 2017-18, 2018-19 आयटीआर 87ए अंतर्गत सूटसाठी पात्र व्हायला खालील गोष्टी आवश्यक आहेत :

 • तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे.
 • सेस कपातीपूर्वी आणि U/C VI-A U/S 80सी, 80जी, 80डी, 80ई इत्यादी नंतर तुमचे एकूण उत्पन्न INR 3.5 लाख पेक्षा कमी असायला पाहिजे.
 • सूटची एकूण रक्कम जास्तीत जास्त INR 2,500 आहे.
 • उपलब्ध कपात आणि सूट मिळाल्यानंतर तुम्ही करपात्र एकूण उत्पन्नावर कलम 87ए अंतर्गत कर सवलत लागू करणे आवश्यक आहे. परंतु, हे आरोग्य आणि शिक्षण उपकर मोजण्यापूर्वी व्हायला पाहिजे.

हे लक्षात घ्या की, वित्तीय वर्ष 2019-20 साठी 87ए मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी सूट 87ए अंतर्गत सारखीच आहे आणि उपकर बदलला आहे. वित्तीय वर्ष 2017-18 साठी देय करासाठी तुम्हाला 3% सेसच्या दराने मोजणी करणे आवश्यक आहे. तर 2,500 रुपयांवर 3% सेस 75 रुपये आहे तर कलम 87ए अंतर्गत सूट वित्तीय वर्ष 2018-19 साठी 4% सेस 2500 रुपयांवर 100 रुपये आहे.

हेही वाचा : जाॅब वर्कसाठी एक्सेल आणि वर्डमध्ये डिलीव्हरी चलनाचा फॉरमॅट

कलम 87ए अंतर्गत सर्व वित्तीय वर्षासाठी सूट चार्ट

दर कधीकधी गोंधळात टाकू शकतात. म्हणून येथे एक चार्ट दिला आहे. ज्यात कलम 87ए अंतर्गत उपलब्ध सूट दरांची यादी आहे. जो 2013-14 पासून सुरू होवून वित्तीय वर्ष 2021-22 पर्यंत आहे.

                वित्तीय वर्ष

एकूण उत्पन्न मर्यादा INR

INR मध्ये कलम 87ए अंतर्गत सूट

2021-22

5 लाख

12,500

2020-21

5 लाख

12,500

2019-20

5 लाख

12,500

2018-19

3.5 लाख

2,500

2017-18

3.5 लाख

2,500

2016-17

5 लाख

5,000

2015-16

5 लाख

2,000

2014-15

5 लाख

2,000

2013-14

5 लाख

2,000

मूल्यांकन वर्ष 2021-22 किंवा वित्तीय वर्ष 2020-21 साठी वैयक्तिक करदात्यांचे दर 

आयकर कायद्यांतर्गत, वैयक्तिक भारतीय करदात्यांचे 3 गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.

 • 60 वर्षांखालील अनिवासी/निवासी व्यक्ती.
 • 60-80 वर्षे वयोगटातील निवासी ज्येष्ठ नागरिक.
 • 80 वर्षांवरील निवासी सुपर ज्येष्ठ नागरिक.

येथे कराचे दर समजण्यासाठी चार्ट आहे.

उत्पन्न रेंज INR

कर INR (60 वर्षांपर्यंत)

2.5 लाख

कोणताही कर नाही

2.5 ते 5 लाख

2.5 लाखापेक्षा जास्त रकमेवर  5% 

5 ते 10 लाख

5 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 12,500 अधिक 20% 

10 लाख आणि त्यापेक्षा अधिक

10 लाखापेक्षा जास्त रकमेवर 1,12,500 अधिक 30% 

उत्पन्न रेंज INR

कर INR (60 ते 80 वर्ष)

3 लाख

कोणताही कर नाही

3 ते 5 लाख

3 लाखापेक्षा जास्त रकमेवर  5% 

5 ते 10 लाख

5 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 10,000 अधिक 20%  

10 लाख आणि त्यापेक्षा अधिक

10 लाखापेक्षा जास्त रकमेवर 1,10,000 अधिक 30% 

उत्पन्न रेंज INR

कर INR ( 80 वर्षापेक्षा अधिक)

5 लाख

कोणताही कर नाही

5 ते 10 लाख

5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर  20% 

10 लाख आणि त्यापेक्षा अधिक

10 लाखापेक्षा जास्त रकमेवर 1,00,000 अधिक 30% 

टीप: तुम्हाला अधिभार आणि आयकर रकमेच्या प्रत्येक मोजणीवर अतिरिक्त 4% आरोग्य आणि शिक्षण उपकर भरावा लागेल. आकारलेला अधिभार उत्पन्नाच्या स्लॅबवर अवलंबून असतो.

हेही वाचा : सॅलरी स्लीप म्हणजे काय? ती का महत्वाची आहे?

निष्कर्ष

आयटीआर रिटर्न भरताना निवासी भारतीय व्यक्ती कलम 87ए अंतर्गत ही सूटचा दावा करू शकतात. या सूटचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न  5 व्या अध्यायातील कपातीनंतर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. आयकर कायद्याच्या कलम 87 ए अंतर्गत एनआरआय सूट मिळवू शकते का?

नाही. सवलत फक्त निवासी व्यक्तींसाठी आहे.

2. कलम 87 ए अंतर्गत सूट सर्व निवासी भारतीय करदात्यांना उपलब्ध आहे का?

कलम 87 ए अंतर्गंत सूट वैयक्तिक एचयूएफ सदस्य/ निवासी भारतीय/ ज्येष्ठ नागरिक, एओपी/ट्रस्ट व्यक्तींची संघटना इत्यादींसाठी उपलब्ध आहे. ती कंपन्या, फर्म, संपूर्ण एचयूएफ इत्यादींना लागू होत नाही.

3. मी मूल्यांकन वर्ष 2019-20 साठी सूट कधी मिळवावी?

वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये मूल्यांकन वर्ष 2019-20 साठी तुमचा आयटीआर  दाखल करताना.

4. जेव्हा तुमचा टीडीएस आधीच कपात केला असल्यास आणि तुम्ही 87 ए अंतर्गत सूटसाठी पात्र असल्यास काय होते?

आयटीआर रिटर्न भरताना रहिवासी भारतीय व्यक्ती 87ए अंतर्गत ही सूटचा दावा करू शकतात. वित्तीय वर्ष 2019-20 ला लागू झाल्याप्रमाणे, जर तुमचे उत्पन्न 5 व्या अध्यायातील कपातीनंतर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास आणि तुम्ही स्व-मूल्यांकन कर भरल्यास, तुम्ही 12,500 रुपयाचा दावा करू शकता. जिथे टीडीएस कपात केला आहे परंतु अध्याय सहावा-ए लागू झाल्यानंतर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तेव्हा तुम्ही 12,500 रुपयांपर्यंत भरलेल्या टीडीएस रकमेचा परतावा मागू शकता.

5. कपातीनंतर माझे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास मी 87ए च्या सूटचा दावा करू शकतो का?

नाही. निर्दिष्ट केलेली मर्यादा निव्वळ करपात्र उत्पन्न म्हणून 5 लाख रुपये आहे, म्हणजे कपातीनंतर पण उपकर लागू करण्यापूर्वी. त्यानंतर तुम्ही सूट आणि कपातीसाठी वर नमूद केलेले इतर कर बचत पर्याय शोधू शकता आणि अशा प्रकारे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत कमी करून 12,500 रुपयांची सूट 87 ए अंतर्गत मिळवू शकता.

6. आयटी स्लॅब दरवर्षी बदलतात का?

आयटी स्लॅब वार्षिक अर्थसंकल्पात निर्धारित केले आहेत आणि दरवर्षी बदलू शकतात.

7. स्त्री आणि पुरुषांचे आयटी स्लॅब वेगवेगळे आहेत का?

नाही, आयकर स्लॅब लिंग-आधारित नाहीत आणि पुरुष किंवा महिला सर्व व्यक्तींना समान लागू होतात.

8. माझ्या करपात्र उत्पन्नात सूट असल्यास, मी आयटीआरमधील व्याज आणि उत्पन्नाचे सर्व स्त्रोत उघड करावे का?

होय, कर दायित्वाची पर्वा न करता तुम्ही आयटीआर दाखल करताना नेहमीच सर्व स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न, मिळवलेले व्याज आणि सूट मिळकत उघड करणे आवश्यक आहे.

9. कृषी उत्पन्न करपात्र आहे का?

कृषी उत्पन्न आयकरातून मुक्त आहे. तथापि, करदात्याने मिळवलेले वेतन, पेन्शन, भाडे, एफडी व्याज इत्यादी इतर सर्व स्त्रोतांना कर भरावा लागतो.

10. करदात्यांमध्ये आयटीआर भरण्याची अंतिम तारीख समान आहे का?

नाही, आयटीआर दाखल करणे व्यक्ती, कंपन्या, एचयूएफ इत्यादींसाठी समान नाही.

11. कलम 87 ए अंतर्गत सूट कशी मोजावी?

 • प्रथम, मूल्यांकन वर्षाच्या एकूण उत्पन्नाची गणना करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरा.
 • कर-बचत साधने आणि एससीएसएस खाती इत्यादी वैध कर कपातीत कपात करा.
 • सर्व कपात केल्यानंतर मूल्यांकन वर्षासाठी निव्वळ उत्पन्नावर पोहोचा.
 • एकूण उत्पन्न, निव्वळ उत्पन्न आणि कपात दाखवत तुमचा आयटीआर दाखल करा.
 • जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर कलम 87 ए अंतर्गत कर सूटचा दावा करा.
 • 2020 ते 21 च्या मूल्यांकन वर्षासाठी सूट 87A अंतर्गत कमाल मर्यादा 12,500 रुपये आहे.

12. मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी 87ए अंतर्गत कोणती सूट लागू आहे?

नवीन आणि जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी सूट रक्कम अपरिवर्तित आहे. 5 लाख रुपयांपेक्षा कमी करपात्र उत्पन्न असलेले वैयक्तिक निवासी करदात्याला एकूण 12,500 रुपयांची सूट मिळते जेव्हा ते 12,500 रुपयांपेक्षा कमी असते.

13. मूल्यांकन वर्ष 2019-20 साठी 87ए अंतर्गत काय सूट आहे?

मूल्यांकन वर्ष 2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पात 5 लाख रुपयांपेक्षा कमी करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी कलम 87ए अंतर्गत करात संपूर्ण सूट जाहीर करण्यात आली. याचा अर्थ अस्तित्वात असलेली 2,500 रुपयांची मर्यादा 12,500 रुपये करण्यात आली आहे.

14. नवीन कर व्यवस्था 87ए अंतर्गत सूट देते का?

होय. 87 ए अंतर्गत सूट लाभ सर्व व्यक्ती आणि वयोगटांसाठी समान आहेत जे नवीन आणि जुन्या दोन्ही कर प्रणाली अंतर्गत भारतीय निवासी आहेत. 2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पात, 5 लाख रुपयांपेक्षा कमी करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी 12500 रुपयांपर्यंत कलम 87 ए अंतर्गत करात संपूर्ण सूट जाहीर करण्यात आली.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
×
mail-box-lead-generation
Get Started
Access Tally data on Your Mobile
Error: Invalid Phone Number

Are you a licensed Tally user?

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.