written by Khatabook | September 2, 2021

जाॅब वर्कसाठी एक्सेल आणि वर्डमध्ये डिलीव्हरी चलनाचा फॉरमॅट

×

Table of Content


प्राॅडक्ट किंवा सेवांच्या सप्लायसाठी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 31 नुसार कर इनव्हाॅईस तयार करणे आवश्यक आहे. तरीही, काही व्यवहारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टची आवश्यकता असली तरीही सप्लाय म्हणून मानले जात नाही. या प्रकरणांमध्ये, आपल्याला डिलीव्हरी चलन आवश्यक आहे. 

उदाहरणासाठी:

  • माल एका ठिकाणी नेला जातो आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर परत त्याच ठिकाणी आणला जातो.
  • एकाच राज्यात वस्तू एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवणे.

डिलीव्हरी चलन काय आहे?

हे एक कागदपत्र असून याचा वापर प्राॅडक्टला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेण्यासाठी करण्यात येतो. ट्रान्सपोर्टच्या परिणामास्वरूप विक्री होवू शकते आणि नाहीसुद्धा, हे डिलीव्हरी चलन वस्तूच्या डिलीव्हरीसह पाठवण्यात येते. 

यात या गोष्टी समाविष्ट आहे:

  • शिप केलेल्या वस्तूंचा तपशिल

  • डिलीव्हर केलेल्या प्राॅडक्टचे प्रमाण

  • डिलीव्हरीचा पत्ता

  • खरेदीदाराचा पत्ता

कर इनव्हाॅईस आणि डिलीव्हरी चलन यांच्यातील फरक

कर इनव्हाॅईस

डिलीव्हरी चलन

कर इनव्हाॅईस विशिष्ट प्राॅडक्टचे मूल्य दर्शवते.

डिलीव्हरी चलनामध्ये सहसा असे मूल्य समाविष्ट नसते परंतु, कधीकधी प्राॅडक्टचे मूल्य समाविष्ट असू शकते.

वस्तू आणि सेवांच्या मालकीचा हा कायदेशीर पुरावा आहे.

ग्राहकाने वस्तूची पावती स्वीकारल्याचे हे सादर करते, परंतु कायदेशीर मालकी दाखवत नाही.

विक्रीवर प्रदान केलेली कागदपत्रे.

प्राॅडक्टचे वर्णन, स्थिती आणि रक्कम लक्षात घेताना ते एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थानावर नेण्यासाठी याचा वापर केला जातो, तसेही त्याची विक्री व्हावी हे गरजेचे नसते.

हे वस्तूचे वास्तविक मूल्य दाखवते

हे वस्तूचे खरे मूल्य प्रदर्शित करत नाही. डिलीव्हरी चलनामध्ये डिलीव्हरी चलनवर दर्शवलेल्या प्राॅडक्टचे मूल्य समाविष्ट असू शकते, परंतु त्यात देय कर समाविष्ट होणार नाही.

डिलीव्हरी चलनाच्या प्रती

सीजीएसटी नियमांच्या नियम 55 (2) नुसार, डिलीव्हरी चलनासाठी तयार केलेल्या प्रतींचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

डिलीव्हरी चलनाचे प्रकार

कोणासाठी तयार केले?

मूळ

खरेदीदारासाठी तयार केलेले

डुप्लिकेट

ट्रान्सपोर्टरसाठी तयार केलेले

ट्रीप्लिकेट

विक्रेत्यासाठी तयार केलेले

डिलीव्हरी चलनाचे स्वरूप

​​​​

दस्तऐवज सर्व क्रमाने आणि सोळा वर्णांपेक्षा जास्त असतात. प्रत्येक डिलीव्हरी चलन स्वरूपात खालील माहिती समाविष्ट असते:

  • डिलीव्हरी चलनाची तारीख आणि नंबर.

  • जर माल पाठवणारा, जो एक व्यक्ती किंवा पार्टी आहे जो दुसऱ्या पार्टीच्या वतीने विक्रीसाठी वस्तू आणतो आणि ते नोंदणीकृत आहे. तर त्याचे नाव, पत्ता आणि जीएसटीआयएन त्यात सामील असते.

  • वस्तूचा एचएसएन कोड.

  • वस्तूचा तपशिल.

  • डिलीव्हरी केलेल्या प्राॅडक्टची संख्या (जेव्हा डिलीव्हरी करायची अचूक मात्रा ज्ञात असते).

  • पुरवठ्याचे मूल्य जे करपात्र आहे.

  • जिथे कंसाईनीला वस्तू पाठवण्यासाठी ट्रान्सपोर्टचा वापर होतो, तिथे जीएसटी कर दर असावा. तसेच, रक्कम सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी आणि जीएसटी उपकरात विभागली पाहिजे.

  • वस्तूंच्या आंतरराज्य ट्रान्सपोर्टच्या बाबतीत पुरवठ्याचे स्थान महत्त्वाचे आहे.

  • हस्ताक्षर

तुम्हाला डिलीव्हरी चलनाची आवश्यकता कधी असते?

सीजीएसटी नियमांचे कलम 55 (1) अशा घटनांची रूपरेषा देते, जेव्हा एखादा सप्लायर पावत्याऐवजी डिलीव्हरी चलन जारी करू शकतो. ते खालीलप्रमाणे आहेत. 

  • जेव्हा डिलीव्हरी केलेल्या वस्तूंची संख्या माहिती नसते: जसे की लिक्वीड गॅसच्या डिलीव्हरीच्या बाबतीत जेव्हा सप्लायरच्या ठिकाणावरून काढलेली गॅसची मात्रा माहिती नसते.
  • जेव्हा जाॅब वर्कसाठी प्राॅडक्टची ट्रान्सपोर्ट केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत डिलीव्हरी चलन आवश्यक असते :
  • जेव्हा मूळ उद्योजक (प्रमुख) कामगारांना कामासाठी माल पाठवतो
  • एक जाॅब वर्कर एखादी वस्तू जुसऱ्या जाॅब वर्करला पाठवतो
  • जाॅब वर्कर जेव्हा प्रमुखाला माल परत करतो
  • जेव्हा प्राॅडक्टला सप्लाय करायच्याआधी एका कारखान्यातून दुसऱ्या गोदामात किंवा एका गोदामातून दुसऱ्या गोदामात ट्रान्सफर केले जाते

हेही वाचा : भारतात जीएसटीचे प्रकार - सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी म्हणजे काय?​​​​​

डिलीव्हरी चलन जारी करण्यासाठी अन्य प्रकरणे

शिवाय, अशी काही प्रकरणे आहेत, जिथे ट्रान्सपोर्ट केलेल्या मालासाठी डिलीव्हरी चलन जारी केले जावू शकते. ते हे आहेत:

  • मंजुरीच्या आधारावर वस्तू ट्रान्सपोर्ट करणं:
    • जेव्हा आंतर किंवा आंतर-राज्य प्राॅडक्टचे ट्रान्सपोर्ट विक्री किंवा रिटर्नच्या आधारावर होते परंतु, सप्लाय होण्यापूर्वी ते मागे घेतले जाते.
  • गॅलरीमध्ये 'कलाकृती' डिलीव्हर करणे:
    • कलाकृती प्रदर्शनासाठी गॅलरीमध्ये नेल्या जातात आणि नंतर ते परत आणण्यासाठी चलन जारी केले जाते.
  • जाहिरात किंवा प्रदर्शनासाठी परदेशात पाठवलेल्या वस्तू:
    • हे सीबीआयसी परिपत्रक क्रमांक 108/27/2019-जीएसटी दिनांक 18 जुलै, 2019 नुसार आहे.
    • प्रदर्शन किंवा प्रचारात्मक हेतूंसाठी भारताबाहेर पाठवलेल्या वस्तूंना "सप्लाय" किंवा "निर्यात" मानले जात नाही.
    • म्हणूनच, असे ट्रान्सपोर्ट हे डिलीव्हरी चलन वापरून करायला हवे.
  • अनेक शिपमेंटमध्ये डिलीव्हर केलेल्या वस्तू
    • जेव्हा माल अर्धवट किंवा पूर्णतः तयार अवस्थेत शिपिंगच्या अनेक नवीन साधनांचा वापर करून ट्रान्सफर केला जातो:
    • आधी माल पाठवण्यापूर्वी, सप्लायरने सर्वसमावेशक चलन सबमिट करणे आवश्यक आहे.
    • प्रत्येक वस्तू यशस्वीरित्या पोहचवण्यासाठी, सप्लायरने डिलीव्हरी चलन सादर करणे आवश्यक आहे ज्यात इनव्हाॅईस संदर्भ समाविष्ट आहे.
    • प्रत्येक वस्तूंसह योग्य डिलीव्हरी चलन आणि इनव्हाॅईसच्या प्रती असणे आवश्यक आहे.
    • चलनाची मूळ प्रत डिलीव्हरी चलनाच्या मूळ प्रतीसह असणे आवश्यक आहे.
  • वस्तूच्या डिलीव्हरीच्या वेळी कर इनव्हाॅईस तयार करणे अशक्य असल्यास
    • जर विक्री किंवा सप्लायदरम्यान कर इनव्हाॅईस जारी करणे अशक्य असल्यास, सप्लायर वस्तूंच्या ट्रान्सपोर्टींगसाठी डिलीव्हरी चलन तयार करू शकतात.
    • हे सीजीएसटी आणि एसजीएसटी नियम, 2017 च्या नियम 55 (4) नुसार आहे.
    • सप्लायर प्राॅडक्टच्या डिलीव्हरीनंतर कर इनव्हाॅईस देऊ शकतो.
  • जेव्हा ई-वे बिल आवश्यक नसते
    • या प्रकरणात, ई-वे बिल आवश्यक नसल्यास सप्लायर डिलीव्हरी चलन जारी करतात.
    • या प्रकरणात, कर इनव्हाॅईस किंवा सप्लायचे बिलदेखील आवश्यक नाही.
    • हे सीजीएसटी नियमांच्या नियम 55ए नुसार आहे, जे 23 जानेवारी, 2018 रोजी लागू झाले.

कोणत्या व्यवसायांना डिलीव्हरी चलन आवश्यक आहे?

आपण अनेक उदाहरणांवर चर्चा केली आहे, जिथे सप्लायरला कर चलनाऐवजी डिलीव्हरी चलन आवश्यक आहे. ज्या व्यवसायांना त्यांच्या ऑपरेशनसाठी या डिलीव्हरी चलनांची आवश्यकता असते, ते हे आहेत:

  • ट्रेंडिंग व्यवसाय
  • ज्या कंपन्यामध्ये अनेक गोदामे आहेत, जिथे गोदामांमध्ये वस्तूंचे ट्रान्सपोर्ट केले जाते.
  • वस्तूचा सप्लाय करणारे व्यवसाय
  • उत्पादक
  • व्होलसेलर

एक्सेल आणि वर्ड टेम्पलेटमध्ये जीएसटी डिलीव्हरी चलन फॉरमॅटसाठी काय कंटेंट आहे?

जीएसटी डिलीव्हरी चलन स्वरूपात एक्सेलमध्ये पाच विभाग आहेत:

  • सेक्शन 1: हेडर
  • पाठवणाऱ्याची माहिती असलेला विभाग.
  • ट्रान्सपोर्टची माहिती असलेला विभाग
  • प्राॅडक्टची माहिती असलेला विभाग
  • स्वाक्षरी आणि रिमार्कसाठी विभाग

 

विभाग

तपशिल

हेडर विभाग

हेडर विभागात अशा प्रकारची माहिती असेल:

  • फर्मचे नाव
  • पत्ता
  • लोगो
  • जीएसटीआईएन
  • टाॅपवर "जीएसटी डिलीव्हरी चलन" हे शीर्षक असलेले दस्तऐवज

मालवाहू तपशिल विभाग


 

ट्रान्सपोर्टच्या बाबतीत, माल पाठवणारी ती व्यक्ती आहे जे कार्गो प्राप्त करते.

या विभागात माल पाठवणाऱ्याची माहिती असेल जसे की:

  • नाव
  • पत्ता
  • जीएसटीआईएन
  • डिलीव्हरी चलन नंबर
  • सप्लायची जागा (पाॅस)
  • जारी करण्याची तारीख

ट्रान्सपोर्ट तपशिल विभाग

या विभागात ट्रान्सपोर्टच्या तपशिलाचा समावेश आहे, जसे की:

  • ट्रान्सपोर्ट मोड (वायू मार्ग / भू मार्ग /जल मार्ग)
  • ट्रान्सपोर्ट कंपनीचे नाव
  • वाहनाची संख्या
  • वस्तू पाठवण्याची तारीख

प्राॅडक्ट तपशिल

 

या विभागात प्राॅडक्टचे तपशिल आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:

  • सिरियल नंबर
  • प्राॅडक्टचा रंग, आकार, आकारमान इत्यादींचे वर्णन.
  • एचएसएन/एसएएसी कोड: सुसंगत प्रणाली नामकरण प्राॅडक्टचे किंवा सेवा अकाउंटींग कोड
  • वस्तूचे प्रमाण
  • प्राॅडक्टचे युनिट, म्हणजे किती मीटर, पिशव्या किंवा वस्तूंचे तुकडे
  • प्राॅडक्टचा दर
  • एकूण विक्री म्हणजे त्यांच्या दराद्वारे गुणा केलेल्या प्राॅडक्टचे प्रमाण
  • सूट उपलब्ध असल्यास 
  • करपात्र मूल्य स्तंभाची गणना आपोआप केली जाते
   
स्वाक्षरी आणि रिमार्क विभाग

या विभागात समाविष्ट आहे:

  • चलन एकूण शब्दात 
  • अधिकृत स्वाक्षरी बॉक्स
  • नोट्स
  • बिजनेस ग्रीटींग्ज

वर्डमध्ये डिलीव्हरी चलन फॉरमॅटचा कंटेंट

वर्ड टेम्पलेटमधील डिलीव्हरी चलन फॉरमॅटमधील माहिती एक्सेल फॉरमॅटसारखीच आहे. डिलीव्हरी चलनामध्ये अचूक व्यवहार सुनिश्चित करताना डिस्पॅचची माहिती समाविष्ट असते.

दस्तऐवजात खालील माहिती असणे आवश्यक आहे:

  • डिलीव्हरी चलनाचा नंबर
  • डिस्पॅचची तारीख
  • खरेदीचा ऑर्डर क्रमांक
  • एचएसएन/एसएएसी कोड
  • ग्राहकाची माहिती
  • प्राॅडक्टचे वर्णन
  • सेल्स कर

बिजनेस एक्सेल आणि वर्ड फाॅर्मेटमध्ये डिलीव्हरी चलन स्वतंत्रपणे डाउनलोड करू शकतात. कारण, तीन प्रती आवश्यक आहे, सप्लायर प्रत्येक वेळी दस्तऐवजाची तीन काॅपी बनवते.

हेही वाचा : टीडीएस - जाणून घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टी​​​​​

जीएसटीअंतर्गत जाॅब वर्कसाठी पाठवलेला माल

प्रमुख(प्रिंसिपल) - जीएसटी करदाते ज्यांचे प्राॅडक्ट जाॅब वर्कच्या प्रक्रियेदरम्यान वापरली जातात.

  • जीएसटी-नोंदणीकृत व्यक्ती जॉब वर्क करण्यासाठी कच्चा माल, भांडवली वस्तू किंवा अर्ध-तयार वस्तू डिलीव्हर करू शकते.
  • जी व्यक्ती कामासाठी साहित्य पाठवते, त्याला जीएसटी भरण्याचा किंवा जीएसटी न भरण्याचा पर्याय असतो.

प्रक्रिया केलेला माल वेळेत परत आणणे

  • जॉब वर्कची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रमुख(प्रिंसिपल) जॉब वर्क प्रक्रियेसाठी साहित्य पुरवते, ते वस्तूंना त्यांच्या ठिकाणी परत करू शकतात.
  • याव्यतिरिक्त, ते जॉब वर्करच्या स्थानावरून निर्यातीसह थेट त्यांच्या अंतिम ग्राहकांना या गोष्टी पुरवू शकतात.
  • इनपुटच्या बाबतीत, वस्तूंना जॉब वर्कर परिसरातून इतरांना सप्लाय करावे लागेल किंवा त्या परत आणल्या पाहिजेत.
  • मोल्ड आणि डाईज वगळता भांडवली वस्तू, जसे की जिग्स आणि फिक्स्चर किंवा टूल्स, तीन वर्षांच्या आत जॉब वर्करच्या परिसरात उपलब्ध केल्या जातील किंवा परत केल्या जातील.

प्रमुखावर(प्रिंसिपल) दायित्व

  • जाॅब वर्कसाठी प्रदान केलेल्या वस्तूंवर ट्रॅक ठेवणे आणि जीएसटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्यांना परत करणे ही प्रमुखाची(प्रिंसिपल) जबाबदारी आहे.
  • जर ते असे करण्यात अयशस्वी झाले, तर सामान्य नियम म्हणून, जाॅब श्रमासाठी जारी केल्यावर सप्लाय केला गेला असे मानले जाईल.
  • ते वस्तूची एकूण रक्कम भरण्यासाठी जबाबदार असतील.
  • जॉब वर्करच्या ठिकाणाहून शेवटच्या ग्राहकाला पुरवलेल्या वस्तूंची गणना प्रमुखाकडून(प्रिंसिपल) सप्लाय म्हणून केली जाते.

जाॅब वर्क डिलीव्हरी चलन

  • जीएसटीअंतर्गत जॉब वर्क चलन डाउनलोड केल्यानंतर, प्रमुख (प्रिंसिपल)जॉब वर्क प्रक्रियेसाठी वस्तू पाठवू शकतात.
  • जीएसटीमधील डिलीव्हरी चलन फॉरमॅट एक्सेलमध्ये भरुन डाउनलोड केले जाते.
  • दस्तऐवज जीएसटीआर 4 रिटर्नसाठी रेकॉर्ड ठेवायला मदत करेल
  • जॉब वर्क चलनाचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा जॉब वर्कर प्रक्रिया केल्यानंतर प्रमुखाला (प्रिंसिपल) माल परत करतो.
  • पुढील बदलांसाठी तुम्ही एक्सेलमध्ये डिलीव्हरी चलन फॉरमॅट डाउनलोड करू शकता. तुम्ही ते वर्ड फाईलमध्ये बदलू शकता.

निष्कर्ष

आपण डिलीव्हरी चलनाचे महत्त्व आणि ते जाॅब वर्कच्या सर्व कार्यपद्धतींमध्ये स्पष्टता कशी आणते, हे पाहिले आहे. हे आवश्यक दस्तऐवजही आहे जे रेकॉर्ड ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. यामुळे, प्रभावी डिलीव्हरी चलन बनवणे महत्वाचे आहे. चलन अधिक कार्यक्षम करण्यासाठी, एखाद्याने एचएसएन कोड, करपात्र रक्कम आणि वर्णन यासारख्या वस्तूंचे विशिष्ट तपशिल सामील करणे आवश्यक आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न

डिलीव्हरी चलन कधी जारी केले जाते?

खालील प्रकरणांमध्ये डिलीव्हरी चलन जारी केले जाते:

  • जेव्हा सप्लाय केलेल्या वस्तूंचे विशिष्ट प्रमाण अज्ञात असते
  • जाॅब वर्कसाठी वस्तू पाठवणे
  • ट्रान्सपोर्ट केलेला माल विक्री किंवा सप्लाय म्हणून मानला जात नाही

डिलीव्हरी चलनामध्ये ट्रान्सपोर्टचा तपशिल असतो का?

होय, चलनामध्ये ट्रान्सपोर्टच्या पद्धतीचा आणि वाहनाचा तपशिल असायला पाहिजे.

विविध राज्यांमध्ये वस्तू ट्रान्सपोर्ट करताना डिलीव्हरी चलन वापरले जाऊ शकते का?

होय, आंतरराज्यीय वस्तू ट्रान्सपोर्टदरम्यान डिलीव्हरी चलन वापरले जाते. चलनामध्ये डिलीव्हरी स्थानाचा तपशिल असायला पाहिजे.

आपण ई-वे बिलाऐवजी डिलीव्हरी चलन वापरू शकतो का?

काही प्रकरणांमध्ये, जेव्हा वस्तू ट्रान्सपोर्ट करताना ई-वे बिल जारी करता येत नाही, तेव्हा डिलीव्हरी चलनाचा वापर केला जातो.

जाॅब वर्कदरम्यान एखादे प्राॅडक्ट किंवा वस्तू निर्धारित वेळेत परत न झाल्यास, कोण जबाबदार असेल?

जर ते निर्धारित वेळेत परत न झाल्यास, कच्च्या मालाचा प्रमुख किंवा सप्लायर वस्तूंवर जीएसटी भरण्यास जबाबदार असेल.



 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.