written by | October 11, 2021

व्हाट्सएप मार्केटिंग

×

Table of Content


व्हॉटस्अप मार्केटिंग : व्यवसायवृद्धीचा नवा फंडा

कोविड १९ प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम म्हणून संतोष जाधव यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय पुर्णतः बंद होता. जवळची सेव्हिंग देखील संपण्याच्या मार्गावर असताना त्यांना एक दिवस व्हॉटस्अपवर तुमच्याकडे भाजी आहे का अशी विचारणा करणारा एक मेसेज आला, आणि तिथंच त्यांच्या डोक्यात आपला व्यवसाय नव्या रुपात आणण्याच्या कल्पनेने जन्म घेतला. संतोष यांनी आपल्या परिसरातील व्हॉटस्अप ग्रुपमध्ये भाजी उपलब्ध असल्याचे मेसेज प्रसृत करायला सुरुवात केली. याशिवाय आपल्या संपर्क यादीतील लोकांना एकत्र करुन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केली. त्यांनाही आजच्या ताज्या उपलब्ध भाज्या या शीर्षकाखाली भाज्यांची यादी पाठवायला सुरुवात केली. याचा अतिशय चांगला परिणाम झाला. संतोष जाधव यांचा व्यवसाय एका आठवड्यात पुर्वपदावर आला. आता संतोष केवळ भाजीपालाच नाहीतर डेअरी प्रोडक्ट, किराणा सामान आणि इतर किरकोळ स्टेशनरी देखील व्हॉटस्अपच्या माध्यमातून घरपोच आणून देता. हा त्यांचा व्यवसाय पुर्वीपेक्षाही चांगल्या पद्धतीने सुरु आहे. घरपोच सामान पोहोचविण्यासाठी संतोष यांच्याकडे तीन-चार मुले काम करतात हे प्रकर्षाने नमूद करण्याची गोष्ट. ते सांगतात की, थेट ग्राहकांच्या घरात-हातात आणि हृदयात उतरण्याचे सामर्थ्य या व्हॉटस्अप मार्केटिंगमध्ये आहे. शिवाय आपल्या सेवेबद्दलचा फिडबॅक ग्राहक तातडीने देतो.त्यामुळे आपल्याला सुधारणा करण्यास देखील वाव आहे.सध्याच्या परिस्थितीत हे कौशल्य अंगी बाणवून घेण्याची तयारी दाखविली तर छोटे व किरकोळ व्यावसायिक नव्याने भरारी घेऊ शकतील.आपल्या समोरचे, सभोवताली वावरणारे आणि जवळच्या संबंधांतील लोक यामुळे आणखी घट्टपणे जोडली जातात हा त्याचा आणखी एक फायदा. संतोष व्हॉटस्अप मार्केटींग बाबत उत्साही आहेत आणि त्यांना यातून दूरगामी फायदा दिसतो. 

सन २००८-२००९ च्या काळात जेंव्हा स्मार्ट फोनच्या दुनियेत क्रांती झाली तेंव्हा व्हॉटस्अप नावाचे एक मोफत असणारे अप बाजारात आले.सुरुवातीपासून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत फेब्रुवारी २०२० पर्यंत त्याचे सुमारे दोन अब्ज सबस्क्राईबर आहेत आणि त्यामध्ये सातत्याने वाढच होत आहे. ही वाढ अद्भुत आहे. असंही कालमानानुसार मार्केटिंग अर्थात विपणाच्या पद्धतींमध्ये सातत्याने बदल करणे आवश्यक आहे.सोशल माध्यमे अतिशय उत्तमरित्या समाजात मिसळली असताना त्यांचा वापर करुन आपला व्यवसाय वाढविणे हे प्रत्येक व्यावसायिकासाठी आवश्यक आहे. ही काळाची पाऊले ओळखूनच कोणता सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आवश्यक आहे त्याची चाचपणी करणे अत्यावश्यक आहे. सध्यातरी सबस्क्राईबर्स, त्याची पोहोच आणि हाताळण्यातील सुलभता आणि उद्योगासाठी आवश्यक असणारी सुरक्षिततता अशा सर्व बाजूंचा विचार केला तर व्हॉटस्अप मार्केटींग हा एक अतिशय दमदार पर्याय म्हणून समोर येतो. नमूद करण्याची बाब म्हणजे व्हॉटस्अप आजही गुगल प्ले स्टोअरवर मोफत मिळणारे अप आहे. ते अँड्रॉईड अथवा इतर कोणत्याही ऑपरेटींग सिस्टिमवर चालते.त्याचे डेस्कटॉप वर्जन देखील उपलब्ध असल्यामुळे त्यावर लक्ष ठेवणे देखील सोपे झाले आहे. याचा वापरकर्ता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या उत्पादनाची निगडीत समान विचारांच्या, स्वभावाच्या लोकांचे स्थान-गावनिहाय वेगवेगळे ग्रुप तयार करु शकतो. आपल्या उत्पादनाबाबत थेट त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकतो. जाहिरातींसाठीची अफाट गुंतवणूक ही अनेक पटींने कमी झालीय हे या यंत्रणेचा आणखी एक ठळकपणे सांगता येणारा फायदा.    

आवर्जून नमूद करण्याची बाब म्हणजे २०१४ साली सोशल मिडियाच्या जगातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या फेसबुकने तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून व्हॉटस्अप विकत घेतली होती. हा व्यवहार केवळ अतिशय चर्चेतीलच नव्हता तर महागडा देखील होता. हा व्यवहार झाला तेंव्हा व्हॉटस्अपचे सबस्क्राईबर्स अर्ध्या अब्जाच्या घरात होते.केवळ चार वर्षांच्या आतच ही संख्या दोन अब्जांच्या पुढे गेली. सर्वच वयोगटांमध्ये व्हॉटस्अपची स्वीकार्हता अतिशय परिणामकारकरित्या वाढलेली आहे.त्यांच्या सबस्क्राईबर्समध्ये झालेली वाढ ही या  या व्यवहाराची उपयुक्तता लक्षात येण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. व्हॉटस्अपचा खुबीने वापर करुन घेतल्यास जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत सोप्या-सहज आणि जलद मार्गाने पोहोचणे शक्य होईल. विपणन(मार्केटिंग) शास्त्रातील ई विपनन ही तशी तरुण शाखा आहे. यामध्ये सोशल माध्यमाच्या सहाय्याने केले जाणारे मार्केटिंग ही अगदी अलिकडची बाब आहे.नव्या तंत्रज्ञानाची व्यापारशास्त्राशी सांगड घालून थोडी कल्पकतेची जोड देणारा व्यापारी हमखास यशस्वी होतोच.व्हॉटस्अप मार्केटिंगच्या बाबतीत ही तंतोतंच लागू पडते. 

मोठ्या वस्तुंच्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्पादक ते ग्राहक असा थेट व्यापार देखील या माध्यमातून होऊ शकतो. परिणामी वस्तुचे भाव ग्राहकाला देखील परवडणारे, तुलनेने स्वस्त असू शकतात. थेट उत्पादकाशीच तुमचा संवाद होत असेल तर वस्तुची उपयोगिता,सेवा आणि इतर तांत्रिक बिघाड आदींच्या बाबतीत उत्पादकांना मिळणारा प्रतिसाद व त्यानार उत्पादकांकडून केली जाणारी उपाययोजना यामध्ये जास्तीत जास्त सुलभता,सफाईदारपण व गती येऊन ग्राहक-उत्पादक व प्रसंगी दुकानदार यांच्यासाठी देखील ते फायद्याचे ठरेल. ग्राहकांच्या थेट भागिदारीतून किंवा सहभागातून नवीन व्यवसाय आकर्षिक करणे, विद्यमान व्यवसाय टिकवून ठेवणे आणि ब्रँडबाबतची विश्वासार्हता टिकविणे व वाढविणे शक्य होईल. व्हॉटस्अप मार्केटींगचा हा महत्वाचा फायदा आपल्याला सांगता येईल. फॅक्टरी ते ग्राहक हा नवा ट्रेँड जोपासणे व त्याची वाढ करणे उत्पादकांना शक्य होईल अर्थात हे केवळ गृहितक असले तरी सध्याचा ट्रेंड बघता तो रुढ व्हायला फारसा वेळ लागणार नाही. उत्पादकांनी आतापासूनच यानुसार आपल्या व्यापाराच्या दिशा व धोरणांची आखणी करायला सुरुवात करण्यात हरकत नाही. व्हॉटस्अप मार्केटींगचे ठळक फायदे पुढीलप्रमाणे सांगता येऊ शकतात. 

  1. ग्राहकांची माहिती वेगा, तातडीने व कोणत्याही वेळी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते.
  2. मार्केटींगसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात मोठी बचत 
  3. तुमच्या व्यवसाय अथवा कंपनीचा आकार केवढा आहे हे फारसे महत्वाचे नसते. 
  4. तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी अतिशय मोलाची मदत होऊ शकते. 
  5. ग्राहकांचा थेट प्रतिसाद तुम्हाला जाणून घेता येतो. 
  6. एखादी चुकीची गोष्ट घडली तर फार मोठे नुकसान होत नाही. थोडक्यात कमी जोखीम
  7. महत्वाचे म्हणजे तुम्हाला एकाच व्यवसायाच्या साच्यात अडकून पडता येत नाही.तुमची संपर्कयादी जेवढी मोठी तेवढा तुम्हाला नवनव्या व्यवसायाच्या संधी तपासून व आजमावून पाहता येतात. 

आता हे वापरायचे कसे

व्हॉटस्अप हे वापरायला अतिशय सोपे आणि सुटसुटीत आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन हे अप डाऊनलोड करुन घेतल्यानंतर तुमच्या संपर्कयादीतील व व्हॉटस्अप वापरणाऱ्या सर्व ग्राहकांची नावे तुम्हाला व्हॉटस्अपमध्ये दिसू लागतील. त्यांची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा.

लोकांना वारंवार फोन करुन तुमच्या उत्पादनांची माहिती देत असाल तर तुम्हाला त्याचा फारसा चांगला प्रतिसाद मिळणार नाही. परंतु जर तुम्ही व्हॉटस्अप मार्केटींगचा आधार घ्याल तर त्याचा सुमारे ४० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो. शिवाय या संवादात अनौपचारिकता व मोकळेपणाचा अंतर्भाव असतो. तुम्ही तुमच्या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी कल्पकतेने तुमच्या व्हॉटस्अप डीपी आणि स्टेटसचा वापर करु शकता. यामुळे तुमचा आणि ग्राहकांचा संवाद अधिक मोकळा होण्यास देखील मदत होईल. 

तुमचे उत्पादन किंवा सेवा यांच्याबाबतीत जर इन्स्टॉलेशन, वार्षिक देखभाल अथवा दुरुस्ती याबाबतची सेवा द्यायची असेल त्यासाठी व्हॉटस्अपचा वापर अतिशय चांगला होऊ शकतो. तुम्ही थेट ग्राहकाच्या स्मार्टफोनवर याबाबतची माहिती, सूचना आणि इतर महत्वाच्या गोष्टी मेसेज, फोटो मेसेज, व्हिडिओ मेसेज किंवा ऑडिओ मेसेज यांच्या स्वरुपात पाठवून त्यावर ग्राहकाची प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद तातडीने मिळवू शकता. अलिकडच्या काळात ऑनलाईन पेमेंटचे वाढलेले प्रमाणा पाहता तातडीने डिजिटल रिसीट देखील पाठवून आपला व्यवहार अधिक पारदर्शक ठेवू शकाल. 

अलिकडच्या काळात व्हॉटस्अपने व्यावसायिकांची गरज ओळखून बिझिनेस व्हॉटस्अप सुरु केले आहे. नेहमीच्या व्हॉटस्अपच्या लोगोत इंग्रजी बी (B) या अक्षराचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे.तुम्हाला मिळालेल्या ऑर्डर्स आणि त्याचाबाबतचा तपशील यांची योग्य ती रचना तुम्हाला यामध्ये करता येते व त्यानुसार ग्राहकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ शकते. व्यापार सुलक्ष, अधिकाधिक ग्राहकाभिमुख, मोकळा आणि उत्तम करता येणे यामुळे शक्य आहे. 

 अर्थात यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहेच. त्यानुसार आपल्या भागात कोणते इंटरनेट उत्तम मिळते त्याची वर्गवारी करुन किमान दोन कंपनीचे सीमकार्ड तुमच्या स्मार्टफोनमध्ये असायलाच हवं. जर डेस्कटॉप वर्जन वापरत असाल तर जलद गतीचे कनेक्शन तुम्हाला उपलब्ध असायला हवं जेणेकरुन तुमची कनेक्टिव्हिटी तुटणार नाही व तुम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकाल. लक्षात घ्या ज्याची कनेक्टिव्हिटी चांगली त्याचा व्यवसाय उत्तम.. हेच सुत्र व्हॉटस्अप मार्केटिंगला देखील लागू होते. 

तर मग, कधी सुरु करताय व्हॉटस्अप मार्केटिंग ?     

 

 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.