written by Abhishek | June 12, 2021

इलेक्ट्रिकल शॉप सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी विशेष माहिती

×

Table of Content


बिजनेसच अशी गोष्ट आहे जिथे तुम्ही स्वतःचाच बॉस असता. तिथे ना कोणी तुम्हाला रोखणारा असतो ना कोणी टोकणारा असतो. तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता आणि परिपूर्ण कामाचा समतोल ठेवू शकता. सध्या सर्वत्रच इलेक्ट्रिकल उपकरणांची गरज रात्री झोपल्यापासून ते उठेपर्यंत असते. तसेच इलेक्ट्रिकल उपकरणांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने, या बिजनेसची मार्केटमध्ये नेहमीच मागणी असते.

एखादा बिजनेस चालवणे, विशेषत: इलेक्ट्रिकल शॉप बिजनेसच्या बाजाराचे विश्लेषण करून मागणीची क्षेत्रे व समस्येचे क्षेत्र ओळखल्यास, तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होवू शकतो. यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम आणि त्याच्याशी संबंधित नोकरी करणे गरजेचे आहे. कारण, असे केल्यास तुम्हाला त्या क्षेत्राची बरीच माहिती मिळण्यास मदत होईल. एकदा माहिती मिळाल्यास, तुमचा बिजेनस सुरू करायचा मार्ग मोकळा होईल. तसेच, तुम्हाला सर्व लायसेन्स मिळवण्याची खात्री करावी लागेल आणि कायदेशीरपणे बिजनेस चालवावा लागेल.

मार्केटमध्ये विविध प्राॅडक्टच्या मागणीत थोडा चढ-उतार असू शकतो. परंतु, इलेक्ट्रिकल उपकरणांच्या बाबतीत हे घडण्याची शक्यता कमीच असते. याची मार्केटमध्ये मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तुम्ही जर हा बिजनेस सुरू करायचा विचार करत असल्यास ते योग्यच ठरणार आहे. जर तुम्हाला आधीच या बिजनेसचे बारकावे माहित असून तुम्हाला योग्य लोकांच्या संपर्कातून ग्राहक मिळवणे शक्य असल्यास तुम्ही योग्य मार्गावर आहात.

इलेक्ट्रिकल शॉप कसे सेट करायचे?

तुम्हाला स्वतःचा बिजनेस सुरू करायचा म्हटल्यावर थोडी जोखीम घ्यावीच लागणार आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बिजनेसची योजना आखता आणि प्रारंभ करता तेव्हा बिजनेसच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे. तुमच्याजवळ स्वत:च्या बिजनेसचे मॅनेजमेंट करण्यासाठी काही अंगभूत कौशल्ये असली तरीही तुम्हाला पुष्कळ योजनांची आवश्यकता असते. म्हणूनच, सगळी काम सुरळीत होण्यासाठी एक ठोस योजना तयार करणे गरजेचे आहे. जरी एखादा बिजनेस चढ-उतारांनी भरलेला असला तरी त्यातून तुम्हाला मार्ग काढणे जमेल?

येथे 9 स्टेप्स दिल्या आहेत, त्याद्वारे तुम्हाला स्वतःचा इलेक्ट्रिकल बिजनेस कसा सुरू करायचा याविषयी संपूर्ण माहिती मिळेल

स्टेप 1: तुमचे आदर्श लोकेशन निवडा

स्टेप  2: तुमच्या बिजनेसला नाव द्या

स्टेप  3: ऑर्डरद्वारे तुमचे लायसेन्स आणि परमिट मिळवा

स्टेप  4: तुमचा विमा मिळवा

स्टेप  5: प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा निश्चित करा

स्टेप  6: टीम तयार करा

स्टेप  7: आवश्यक साधने खरेदी करा

स्टेप  8: डिजिटल व्हा

स्टेप  9: मार्केटिंग करा

स्टेप 1:  तुमचे आदर्श लोकेशन निवडा

एकदा तुमच्याकडे बिजनेस सुरू करण्यासाठी भांडवल जमल्यास, तुम्हाला तुमच्या स्वप्नातील बिजनेसचे लोकेशन निवडायची वेळ आली असे समजा. बिजनेससाठी निवडलेले योग्य लोकेशनच तुमच्या बिजनेसचे भवितव्य ठरवते. तुमच्या आवडीच्या लोकेशनवर खालीलपैकी कोणते घटक लागू आहे की नाही ते तपासा.

  • संपूर्ण क्षेत्रात किंवा शेजारच्या भागात इलेक्ट्रिकलचे कोणतेही शाॅप नाहीत.
  • इलेक्ट्रिकल शॉप आहे पण ग्राहक त्यांच्या सेवांबाबत नाखूष आहेत. ते जे प्राॅडक्ट, सेवेची गुणवत्ता आणि ज्या किंमतीला विकतात त्या जुळत नाहीत.
  • शेजारच्या भागात विजेचे शाॅप होते पण आता त्यांनी सेवा देणे बंद केले आहे.
  • एकाच भागात अनेक इलेक्ट्रिकल शाॅप्स आहेत परंतु सर्वांत प्रसिद्ध असलेले शाॅप बंद केले आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी गेले आहे. हीच तुम्हाला शाॅप सुरू करण्यासाठी एंट्री तिकिट आहे.
  • ते इलेक्ट्रिकल शॉप मार्केट आहे किंवा मार्केटचे क्षेत्र इलेक्ट्रिकल शॉप्ससाठी लोकप्रिय आहे.

यापैकी कोणतीही परिस्थिती तुम्ही निवडलेल्या अतिपरिचित क्षेत्रामध्ये असल्यास शाॅप सुरू करण्यास हरकत नाही.

स्टेप 2: तुमच्या बिजनेसला नाव द्या

 नाव सोपे आणि प्रभावी असणे आवश्यक आहे, ते खूप कठीण नसायला पाहिजे. एखादे नाव निवडताना तुम्ही खालील गोष्टींचा विचार करायला पाहिजे:

  • नाव वाचता क्षणी किंवा पाहता क्षणीच कायम आठवणीत राहायला पाहिजे.
  • असे नाव निवडल्यास लोक शाॅपमध्ये आवर्जून येतात.
  • तुमच्या नावातून विश्वास निर्माण व्हायला पाहिजे.
  • विश्वासार्ह नाव लोकांना खरेदी करण्यास आणि तुमच्या इलेक्ट्रिकल सेवा वापरण्यास आकर्षित करते.

अशी शिफारस केल्या जाते की, तुम्ही निवडलेल्या नावावर तुमचा धर्म, श्रद्धा किंवा तत्वज्ञान जोडायला नाही पाहिजे. त्यास तटस्थ ठेवा जेणेकरुन सामान्य लोक त्या विशिष्ट नावाला सहज आत्मसात करू शकतील. साधी कल्पना अशी आहे की एखादे नाव सहजतेने समजू शकेल, बिजनेसला वाढवू शकेल व संभाव्य ग्राहकांच्या हृदयात  स्वतःचे स्थान निर्माण करू शकेल.

स्टेप  3: ऑर्डरद्वारे तुमचे लायसेन्स आणि परमिट मिळवा

कोणताही बिजनेस सुरू करायचा म्हटल्यावर योग्य लायसेन्स आणि परमिट मिळवणे ही मुख्य आवश्यकता आहे आणि तुमचे इलेक्ट्रिकल शॉपही याला अपवाद नाही. त्याची आवश्यकता वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी असते. तुम्ही शाॅप व आस्थापना लायसेन्स, ट्रेड लायसेन्स, लेबर लायसेन्स यासारख्या विविध लायसेन्ससाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. काही वेबसाईट सल्लागारांची ऑफर देखील करतात जे इलेक्ट्रिकल बिजनेससाठी आवश्यक असलेल्या सर्व लायसेन्ससाठी नोंदणी करण्यात तुमची मदत करू शकतात.

स्टेप  4: तुमचा विमा मिळवा

स्वतःचा इलेक्ट्रिकल बिजनेस उघडण्याची पुढील पायरी म्हणजे तुमच्या शाॅपचा विमा काढणे होय. काही विमा कंपन्यांची माहिती मिळवा आणि त्यांनी ऑफर केलेल्या धोरणांबद्दल जाणून घ्या. तुमच्यासाठी जे उत्तम असेल ते घेण्यासाठी दुसऱ्या एखाद्याशी त्याची तुलना करा.

नियम व शर्ती समजून घेण्यास एखादा जाणकार व्यक्ती पाहा, जो तुम्हाला मदत करू शकेल. जितक्या लवकर हे पूर्ण होईल तेवढे चांगले. विम्याचे कवच नसताना एखादा बिजनेस सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. तुमचे धोरण कधीही चुकणार नाही याची खात्री करा. तसेच, योग्य माहिती द्या आणि तुमचे प्रीमियम वेळेवर भरा.

स्टेप  5: प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा निश्चित करा

या क्षणी तुम्ही तुमच्या ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या सेवा देऊ इच्छिता हे ठरवणे आवश्यक आहे. तुमच्याकडे तीन पर्याय आहेतः

  • घराची देखभाल (निवासी)
  • बिजनेसेसची देखभाल (व्यावसायिक)
  • दोन्हींची देखभाल

आता कोणत्या मार्गाने जायचे ते निवडा. त्यानंतर तुम्ही काही सेवांमध्ये विशेष आणि सेवांच्या उत्कृष्ट गुणवत्तेची ऑफर देऊ इच्छिता की नाही ते ठरवणे आवश्यक आहे. किंवा त्या सर्वांना ऑफर करा आणि तुमचा बिजनेस पसरवा. तुम्ही प्रदान करणार असणाऱ्या सेवांच्या प्रकाराव्यतिरिक्त होम डिलीव्हरी, विक्रीनंतरची सेवा इत्यादी सेवा तुम्ही समाविष्ट करू शकता. तसेच, कोणत्या सेवा प्रदान करायच्या आहेत याची योजना ही आखू शकता.

जर तुम्ही व्यावसायिक मार्गाने जाणे निवडले असल्यास तुम्ही एखाद्या बांधकाम कंपनीसह दीर्घकालीन कराराची सुरूवात देखील करू शकता. हे तुम्हाला इलेक्ट्रिकल वस्तू आणि सेवा नियमितपणे पुरवण्याची संधी मिळवण्यात मदत करू शकते. तुमच्या वस्तू आणि सेवा पुरवण्याच्या दीर्घ मुदतीच्या कराराच्या बदल्यात तुम्ही प्राॅडक्टला थोड्या सवलतीच्या किंमतीवर ऑफर करू शकता.

सुरूवातीच्या काळात सेवांची निवड केल्यानंतर तुम्ही हळूहळू त्याचा विस्तार करू शकता जसे की, तुम्ही त्यासाठी संसाधने आणि ग्राहकांचा आधार एकत्रित करत असता. त्याच्याच आधारावर बिजनेसची वाढ व्हायला मदत होते.

स्टेप  6: टीम तयार करा

तुमचा बिजनेस चालवायला एखादी टीम नियुक्त करायची आहे की स्वतःच त्याचे मॅनेजमेंट करायचे आहे. हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही ग्राहक हाताळणी, होम डिलीव्हरी आणि विक्रीनंतरच्या सेवांची पूर्तता करण्यासाठी एखाद्याला नियुक्त करू शकता. मात्र, तुम्ही नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांमध्ये पात्रता आणि कौशल्ये असल्याची खात्री करा.

तुम्ही शोधत असलेली कौशल्ये असलेल्या लोकांना कामावर ठेवणे चांगले. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी थोडा वेळ आणि पैसा खर्च करणे ही महत्त्वाचे ठरेल. तुम्ही बिजनेसमध्ये पारंगत असलेल्या एखाद्या कुटुंबातील सदस्याला बोर्डात आणू शकता.

अर्थात हे तुमच्या बिजनेसच्या आकारावरही अवलंबून असेल. तुमचा बिजनेस अद्याप लहान असल्यास तुम्हाला मोठ्या टीमची गरज भासणार नाही. तुमच्या शाॅपचा बिजनेस वाढायला सुरूवात झाल्यास हवे तेवढे कर्मचारी तुम्ही नियुक्त करू शकता.

स्टेप  7: आवश्यक साधने खरेदी करा

तुम्ही प्रदान केलेल्या सेवांसाठी तुम्हाला विविध साधनांची आवश्यकता असेल. या साधनांमध्ये मल्टीमीटर, व्होल्टेज टेस्टर, वायर स्ट्रिपर्स, सर्किट फाइंडर, स्क्रू ड्रायव्हर्स आणि नट ड्रायव्हर्स, पिलर्स आणि हातोडा समाविष्ट असेल.

तुमच्याकडे स्वतःची साधने आणि उपकरणे असणे गरजेचे आहे. तसेच, साधने आणि उपकरणे खरेदी करणे ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे. तुम्ही योग्य साधने, उपकरणांशिवाय इलेक्ट्रिकल बिजनेस चालवू शकत नाही.

सुरूवातीला तुम्ही ते सेकंड हॅंड विकत घेवू शकता किंवा पैशांची काटकसर करता यावी यासाठी रेंटवरही घेवू शकता. जेव्हा तुमच्याकडे पैसे येणे सुरू होईल, तुमचा बिजनेस वाढेल तेव्हा तुम्ही ती स्वतःची खरेदी करू शकता आणि अपग्रेड करू शकता.

स्टेप  8: डिजिटल व्हा

स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. हे आत्ता डिजिटल गोष्टींचे युग आहे हे नाकारण्यासारखे नाही. एखाद्या इलेक्ट्रिकल शाॅपमध्ये जायच्याआधी लोक गूगलवर “माझ्या जवळील इलेक्ट्रिकल दुकाने” सर्च करतात. तुम्ही कदाचित त्यांना ती माहिती द्याल.

तुम्ही तुमच्या शाॅपचे लोकेशन गूगल मॅपवर दर्शवू शकता. तुम्ही शाॅपचे नाव, मोबाईल नंबर आणि वेळही दाखवू शकता. हे कसे करावे हे माहिती नसल्यास एखाद्याची मदत घ्या. हे सोपे आहे आणि यामुळे ग्राहकांना तुमचे शाॅप शोधायला मदत मिळू शकते.

स्टेप  9: मार्केटिंग करा

कल्पना करा की प्रत्येक स्टेप व्यवस्थित असून लोकांची तुमच्या शाॅपवर गर्दी आहे. एवढे असूनही सर्व स्टेपनंतर मार्केटिंगच का? जर तुम्हाला खरंच तुमच्या शाॅपची वाढ करायची असल्यास आणि लोकांपर्यंत तुमचे प्राॅडक्ट पोहचवायचे असल्यास याची नितांत गरज आहे.

तुमचा स्थानिक इलेक्ट्रिकल पुरवठा अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी तुम्ही स्थानिक इलेक्ट्रिशियनशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संबंध स्थापित करू शकता. त्या बदल्यात तुम्ही त्यांना थोडी सवलत देण्याचा विचार ही करू शकता.

तसेच, तुम्ही वृत्तपत्रात, रेडिओत जाहिराती देवू शकता. तुमची जाहिरात आकर्षक बनवा आणि योग्य ती माहिती पुरवा. कारण, चांगली मार्केटिंग गेम-चेंजर ठरू शकते. 

तुम्ही आता तुमचे इलेक्ट्रिक शॉप सुरू करण्यास सज्ज आहात

आता बिजनेसचा आकार, प्रदान केलेल्या सेवांचा प्रकार इत्यादी महत्त्वाचे अंतिम निर्णय झाले आहेत. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, बाजारात चढ-उतार होऊ शकतात आणि ग्राहकांच्या गरजा बदलू शकतात.

बिजनेस नक्कीच अनिश्चित आहे आणि कमी वेळातच चांगल्या परिस्थितीतही पोहचवू शकते. यामुळेच तुम्ही तुमच्या बिजनेसच्या भविष्यातील मार्गाचा पूर्ण अंदाज बांधू शकत नाही. तुम्हाला अगदी लहान तपशिलांकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. तथापि, योग्य संशोधन, नियोजन आणि बिजनेसची मानसिकता ठेवून, या सर्वांतून तुम्ही योग्य मार्ग शोधू शकता! आम्ही तुम्हाला तुमचे इलेक्ट्रिक शॉप स्थापित करण्यात यश मिळावे यासाठी शुभेच्छा देतो.

सतत विचारले जाणारे प्रश्न

भारतात इलेक्ट्रिकल शॉप सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

इलेक्ट्रिक शाॅप कुठेही सुरू करायचा असल्यास भांडवलासाठी कमीतकमी 3 लाख ते 20 लाखापर्यंत खर्च येवू शकतो. विशेषत: शाॅपच्या लोकेशननुसार खर्च कमी जास्त होवू शकतो.

इलेक्ट्रिकल बिजनेस फायदेशीर आहे का?

तंत्रज्ञानाची होणारी वाढ आणि इलेक्ट्रिकल वस्तूंच्या मागणीमुळे हा बिजनेस फायदेशीर आहे.

सुरूवातीला कोणत्या गुंतवणूकी आवश्यक आहेत?

इलेक्ट्रिकल शॉपसाठी केलेली प्राथमिक गुंतवणूक म्हणजे साधने आणि वाहन जे रेंटवर देखील घेतल्या जावू शकते.

मी माझ्या इलेक्ट्रिक शॉपची जाहिरात कशी करू शकतो?

ऑनलाईन मार्केटिंग, पत्रके, होर्डिंग्ज आणि अर्थातच माऊथ पब्लिसिटी यासारखे बिजनेसची जाहिरात करण्याचे अनेक मार्ग आहेत.

माझ्या इलेक्ट्रिक शॉपसाठी मी ग्राहक कसे मिळवू शकतो?

विक्रेत्यांशी चांगले संबंध ठेवून तसेच, संभाव्य ग्राहकांचा डेटाबेस राखून आणि बांधकाम कंपन्यांशी करार केल्यास ग्राहक मिळू शकतात.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.