written by Khatabook | March 7, 2022

टाॅप ट्रेडिंग बिजनेस आयडिया

×

Table of Content


बिजनेस सुरू करायचा विचार आहे? तर मग ट्रेडिंग (व्यापार) बिजनेस हा उत्कृष्ट पर्याय आहे, जेथे खरेदी हा अविभाज्य घटक आहे. ज्यांनी नुकताच हा बिजनेस सुरू करायचं ठरवलं आहे किंवा ज्यांना ट्रेडिंग बिजनेसविषयी काहीच माहित नाही. ते ग्राहक आणि सप्लायर यांच्यासोबत होणाऱ्या संवादातून बरंच काही शिकू शकतात. तसेच, एकदाच खूप पैसे गुंतवण्याची गरजही नाही. यामुळे चांगले नियोजन करून, तुमच्या वेळेचा उपयोग थोड्या गुंतवणुकीसह ट्रेडिंग बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्ही करू शकता. शेवटी, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, मेझॉन इत्यादीसारख्या जवळपास सर्वच मोठ्या कंपन्यानी त्यांची सुरूवात होम-बेस्ड आणि गॅरेज-स्थापित प्रकल्प म्हणून केली होती. हा लेख तुम्हाला भारतात शून्य, कमी गुंतवणूक किंवा माफक गुंतवणुकीसह छोट्या ट्रेडिंग बिजनेस आयडियांविषयी माहिती देतो.

ट्रेडिंग म्हणजे काय? 

व्यापारी सामान्यत: घाऊक(व्होलसेलर) विक्रेत्यांकडून किंवा उत्पादकांकडून(मॅन्युफॅक्चर्स) कमी किमतीत मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो आणि त्या ग्राहकांना किंवा इतर किरकोळ विक्रेत्यांना बाजारभावाने विकतो, ज्याद्वारे नफा मिळवला जातो.

ट्रेडिंग बिजनेस कसा सुरू करायचा?

तुम्ही तुमचा ट्रेडिंग बिजनेस सुरू करण्यापूर्वी या गोष्टी पहिले पूर्ण करा:

तुमच्या बाजार विभागाचे संशोधन करा: तुम्ही कोणताही ट्रेडिंग बिजनेस सुरू करण्यापूर्वी, उपलब्ध पर्याय आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम बाजार विभागाचे विश्लेषण करून नंतर ते ठरवणे महत्त्वाचे आहे. निर्णय घेण्यापूर्वी तुमचा अनुभव आणि संशोधन वापरा.

उत्पादन आणि बाजार संशोधन: हे क्षेत्र यश मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. उत्पादन, त्याचे तपशील, गुणवत्ता, किंमत, मागणी आणि सप्लायची उपलब्धता इत्यादींचे संशोधन करा. तसेच, घाऊक विक्रेते, त्यांच्या किंमती, तुमचे प्रतिस्पर्धी आणि बाजारात सुधारणांच्या उपायांची यादी तयार करा.

स्पर्धक विश्लेषण: तुमच्या प्रतिस्पर्ध्यांची ट्रेडिंग बिजनेस धोरणे समजून घेणे तुम्हाला जिंकण्यास आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी वापरलेल्या धोरणातून प्लॅन बनवायला मदत करते. हे तुम्हाला बाजारातील इनसाईट, सप्लाय आणि मागणीचे ज्ञान आणि बाजाराच्या मुख्य मुद्द्यांची माहिती देते.

पेपरवर्क: तुम्ही तुमची कागदपत्रे, परवाना, लेखा आणि बरंच काही अपडेट असणे आवश्यक आहे. छोटा ट्रेडिंग बिजनेस सुरू करण्यासाठी तुमच्याकडे योग्य भाडे करार, GST नोंदणी, दुकान किंवा व्यापारी नोंदणी इत्यादी असल्याची खात्री करा.

मार्केटिंग: ट्रेडिंग फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने केला जातो. प्रभावी मार्केटिंग धोरणांद्वारे विक्री वाढवणे, तुमच्या सेवांचा प्रचार करणे, जाहिराती आणि अशा गोष्टी बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि चांगली विक्री मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

ट्रेडिंग बिजनेस आयडिया: 

येथे काही नवीन आणि अधिक पैसे मिळवून देणाऱ्या छोट्या ट्रेडिंग बिजनेस आयडिया आहेत:

  • बिअर डिस्ट्रीब्युटरशीप:

बिअरची ट्रेडिंग ही घाऊक विक्रेत्यासारखीच असते आणि तुम्ही मोठ्या ब्रुअर्स आणि किरकोळ विक्रेते किंवा ग्राहक यांच्या ट्रेडिंगचा मध्यस्थ बनता. तुमचे लोकेशन शाळांपासून दूर असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला बिअरची वाहतूक करण्यासाठी ट्रकची व्यवस्था करणे आवश्यक असेल.

बिअरला सभोवतालच्या किंवा थंड तापमानात साठवले जाणे आवश्यक आहे कारण, ते आंबवले जाते. बिअर आयातदारांमार्फत परदेशी बिअर ब्रँड्स उपलब्ध आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही व्यवसाय व्यवस्था करू शकता.

  • ड्रॉपशिपिंग: 

ड्रॉपशिपिंगच्या संकल्पनेमध्ये भौतिक उत्पादनाची ऑनलाईन विक्री करण्याचा समावेश आहे. उत्पादन निर्मात्याद्वारे तयार केले जाते, साठवले जाते आणि पाठवले जाते. जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक तुमच्या वेबसाईटवर उत्पादन ऑनलाईन खरेदी करतो तेव्हा तुमचे स्वयंचलित सॉफ्टवेअर निर्मात्याला सूचित करते आणि उत्पादन थेट निर्मात्याकडून ग्राहकाकडे पाठवले जाते.

ही उत्पादन ट्रेडिंग बिजनेस आयडिया सुरू करायला जास्त खर्च लागत नाही आणि यातून अधिक नफा होवू शकतो. तुम्ही कालांतराने याचे रुपातंर ई-कॉमर्स स्टोअरमध्ये करू शकता जिथे तुम्ही स्टॉक करता आणि ग्राहकांना ते स्वतः पाठवता. बाजार संशोधन आणि सखोल अभ्यासाद्वारे एखादे चांगले उत्पादन शोधून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता, या बिजनेसमध्ये उत्पादन शोधणे महत्वाचे आहे .

हेही वाचा : भारतात स्टारबक्स फ्रँचायजी खर्चाविषयी संपूर्ण माहिती

  • फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) उत्पादने: 

FMCG उत्पादनांची शेल्फ लाईफ मर्यादित असते आणि म्हणून त्यांची वेगाने विक्री होते. ब्रेड, चॉकलेट, बिस्किटे, डिटर्जंट, साबण यासारख्या वस्तू ही अशा उत्पादनांची उदाहरणे आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या यादीत FMCG चा चौथा क्रमांक लागतो.

FMCG ब्रँड डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी, तुम्हाला किराणा स्टोअर्स, किरकोळ विक्रेते, छोटी दुकाने इत्यादींना सप्लाय करताना त्यांच्या वस्तूंची खरेदी आणि स्टॉक करणे आवश्यक आहे. नफा मिळवण्यासाठी ऑर्डर व्हॉल्यूम-ओरिएंटेड असणे आवश्यक आहे. भारतातील या ट्रेडिंग बिजनेससाठी तुम्हाला सप्लायची व्यवस्था, वेअरहाऊस, डिलीव्हरीसाठी स्टाफ, लॉजिस्टिक आणि मॅनेजमेंट सपोर्ट आदींची आवश्यकता असेल.

  • घाऊक किराणा ट्रेडिंग:

किराणा मालातील या घाऊक ट्रेडिंग बिजनेसच्या आयडियांमध्ये अधिक नफा मार्जिन आहे. तुम्ही मध्यस्थ आहात, जो उत्पादकाकडून फूड आणि किराणा सामान खरेदी करतो, त्यांचा साठा करतो आणि नंतर ग्राहकांना किंवा इतर किराणा विक्रेते, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादींना थेट विकतो.

जर तुम्हाला दुधाचे पदार्थ, थंड पेये इत्यादींचा साठा करायचा असेल तर वस्तूंचा साठा करण्यासाठी तुम्हाला पुरेशी गोदामाची जागा, योग्य स्टोरेज बाॅक्स, डिलीव्हरी सुविधा आणि फ्रीझर/कूलरची आवश्यकता असेल.

  • कॉफी निर्यात:

जागतिक कमोडिटी मार्केटमध्ये तेलानंतर कॉफी दुसरा क्रमांक लागतो. यूके, युरोप आणि यूएसए, भारत आणि ब्राझीलमधून कॉफी आयात करतात. गेल्या पाच वर्षांत, कॉफी विक्रीची मागणी 90% वाढली आहे. भारतातील ट्रेडिंग बिजनेससाठी हे सर्वोत्तम उत्पादन आहे. हे फायदेशीर आणि ज्ञानात भर पाडणारे आहे आहे कारण निर्यात/आयात करण्यासाठी अनेक प्रक्रियांचे पालन करावे लागते आणि तुम्हाला कॉफी आयातदारांशी चांगला संपर्क आवश्यक आहे.

कॉफी निर्यातदार अनेक कॉफी आउटलेटसह मोठ्या रेस्टॉरंट्स आणि फूड साखळीला कॉफी विकू शकतो. या बिजनेसमध्ये सावध असणे गरजेचे आहे! कारण, कॉफीच्या किमती अस्थिर असतात आणि हवामानातील फरकांमुळे सप्लायवर सहज परिणाम होतो. ब्राझील हा कॉफीचा सर्वांत मोठा निर्यातदार असला तरी भारतीय कॉफीची चव, बाजारपेठ आणि मागणी आहे. या प्रकारचा ट्रेडिंग बिजनेस सुरू करण्यापूर्वी भारतीय कॉफीचे सर्वांत मोठे आयातदार युरोप, यूएसए आणि यूके यांना होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सप्लाय साखळीचा अभ्यास करा.

  • स्क्रॅप बिजनेस

जर तुम्ही पर्यावरणाला हानी न पोहचवता इको-फ्रेंडली ट्रेडिंग बिजनेसचा शोध घेत असल्यास, स्क्रॅप बिजनेस हा चांगला मार्ग आहे. यातून अधिक परतावा मिळण्याची संधी आहे आणि जंकमधील संधींना भारतातील सर्वोत्तम ट्रेडिंग बिजनेस म्हणून रेट केले जाते. या बिजनेसमध्ये वापरलेल्या वस्तू खरेदी करणे, त्यांना व्यवस्थित बनवून विकणे, बायो-डायजेस्टरसाठी कचरा वापरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून सोने परत मिळवणे, संरचना आणि इमारतीना तोडण्यासाठी टीमचा वापर करणे आणि अजूनही बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

मटेरियल हाताळणीसाठी, तुमच्याकडे प्लॅटफॉर्म आणि हँगिंग स्केल, गॅस टँक, ॲसिटिलिन टॉर्च, टूल्स, पुली इत्यादी दोन्हीचे वजन करता येणाऱ्या वस्तूंचा साठा करण्यासाठी गोदाम असणे आवश्यक आहे. वस्तू क्लायंटच्या ठिकाणाहून शेवटच्या ठिकाणावर पोहचवण्यासाठी वाहतूक करण्यासाठी तुम्हाला डिलीव्हरी ट्रकची आवश्यकता आहे. जुन्या, वापरल्या जाणार्‍या आणि पुनर्वापर केलेल्या वस्तूंच्या खरेदीदारांसोबत ओळख ठेवा आणि गॅरेज, कारखाने, शाळा इत्यादींमधून बल्कमध्ये भंगार मिळवण्याचा मार्ग शोधा. वेबसाईट आणि ऑनलाईन पद्धतीचा वापर करून बिजनेस वाढवणे अधिक सोपे आहे.

  • गारमेंट ट्रेडिंग: 

गारमेंटशी संबंधित बिजनेसची मागणी बारा महिनेही पाहायला मिळते. त्यामुळे हा बिजनेस सुरू करण्याआधी तुम्हाला मार्केट आणि फॅशन ट्रेंडचा अभ्यास करावा लागेल. लहान मुलांचे पोशाख, पुरुषांचे पोशाख, बिजनेस सूट, महिलांचे वेडिंग लेहंगे इत्यादींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. यानंतर तुम्हाला व्होलसेल विक्रेता, निर्माता किंवा कंपनी पाहावी लागेल, ज्यांच्याकडून तुम्हाला कपडे खरेदी करता येतील. या बिजनेससाठी भांडवल, स्टाफ, मार्केटिंग आणि स्टोअरची आवश्यकता असेल.

तुमचे गोदाम आणि मार्केटिंगचे लोकेशन घाऊक कपड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यावसायिक क्षेत्रात असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सुरत संपूर्ण आशियामध्ये कापड आणि पोशाखांसाठी ओळखले जाते. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे कपड्यांसाठी अनेक घाऊक बाजारपेठा आहेत ज्यात हजारो सर्वोत्तम ट्रेडिंग बिजनेस दुकाने आहेत. आता प्रत्येक कापड दुकानात लहान मुलांच्या पोशाखासाठी वेगळा विभाग असणे आवश्यक आहे. कारण, लहान मुलांच्या कपड्याची मागणी वेगाने वाढत आहे आणि ती कधीच संपणार नाही!

  • सॉफ्ट ड्रिंक्समध्ये ट्रेडिंग: 

सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांचे डिस्ट्रीब्युटर छोट्या-मोठ्या उपक्रमातून नफा मिळवतात. यामुळे विवाहसोहळा, रेस्टॉरंट, किरकोळ विक्रेते, लहान दुकाने इत्यादींना सॉफ्ट ड्रिंक्स पुरवनारी एजन्सी म्हणून प्रारंभ करा. हा मर्यादित शेल्फ लाईफ असलेला आणि त्वरित पैसे कमवून देणार बिजनेस आहे. सण, लग्न आणि अन्य समारंभात सॉफ्ट ड्रिंक्सची मागणी अधिक असते. नामांकित ब्रँड परवान्यांसाठी भांडवली गुंतवणूक ₹5 लाखांपर्यंत असू शकते. या अत्यंत फायदेशीर बिजनेसमध्ये तुम्हाला स्टॉकिंग वेअरहाऊस, डिलीव्हरी ट्रक, कर्मचारी आणि विक्रेते यांची आवश्यकता असेल.

  • कार्पेट्स निर्यात करणे:

कार्पेट्स(चटई) निर्यात हा अत्यंत फायदेशीर बिजनेस आहे आणि भारतातील टाॅप ट्रेडिंग बिजनेस आयडियांपैकी आहे. मुघल कालखंडाने हस्तकला क्षेत्रातील चटई व्यापार अतिशय लोकप्रिय बनवला आणि हा छोट्या ट्रेडिंग बिजनेस आयडियांपैकी एक आहे. भारत उच्च-गुणवत्तेच्या कार्पेट्सचे उत्पादन करतो आणि जागतिक कार्पेट मार्केटमध्ये 35% भाग आहे. भारतात, चटई उत्पादनाची केंद्रे बनारस, जयपूर आणि आग्रा येथे आहेत. 

तुम्हाला निर्यात परवाना, IEC (इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड) प्रमाणपत्र आवश्यक असेल आणि तुम्हाला कार्पेट उत्पादक आणि खरेदीदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच, CEPC- कार्पेट एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलमध्ये नावनोंदणी करा जी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, घाऊक विक्रेते सदस्य आणि इच्छुक खरेदीदार यांच्यात मध्यस्थी करते. तुम्हाला लॉजिस्टिक आणि शिपिंगसाठी सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. कार्पेट इंडस्ट्रीतील सर्व छोट्या गोष्टी माहिती असायला पाहिजे, जसे की गुणवत्तेच्या दर्जाचा मापदंड, नॉट्स प्रति स्क्वेअर इंच आणि मटेरियल कुठे वापरलं आणि बरंच काही.

  • घाऊक दागिन्यांचा बिजनेस:

दागिन्यांना स्टायलिश मानले जाते आणि ते कायम ट्रेंडमध्ये असतात. तुम्ही चांदी, सोने, हिऱ्याच्या वस्तू किंवा कृत्रिम दागिन्यांचा व्यापार करू शकता. अलीकडील ट्रेंड दर्शवते की नकली दागिन्यांच्या वस्तूंना त्यांच्या कमी किमतीमुळे वाढती मागणी आहे.

तुम्हाला फॅशन ट्रेंडचा अभ्यास करावा लागेल, सर्वोत्तम घाऊक विक्रेते आणि उत्पादक शोधणे आवश्यक आहे. यासाठी जास्त जागेची आवश्यकता नाही आणि कमी-गुंतवणुकीच्या बजेटसह तुम्ही हे सुरू करू  शकता. दागिन्यांच्या वस्तूंचे उत्पादन करणे ही देखील एक चांगली कल्पना आहे जिथे तुम्ही त्या किरकोळ विक्रेत्यांना आणि थेट ग्राहकांना ऑनलाईन विकू शकता. तथापि, लक्षात ठेवा की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात आणि मार्केटिंगवर अधिक भर देणे आवश्यक आहे.

हेही वाचा : महिलांना घरबसल्या करता येणाऱ्या 10 बिजनेस आयडिया

बिजनेस टिप्स:

तुम्ही कोणती बिजनेस आयडिया निवडली हे महत्त्वाचे नाही, तुमच्या आयडिया रूपांतरित करण्यात मदत करण्यासाठी येथे काही टिपा आहेत.

  • अनेक फ्रँचायजी ऑपरेशन आयडियामधून तुम्ही लाखो कमवू शकतात जसे की अपोलो फार्मसी, केएफसी आणि अजूनही बऱ्याच फ्रँचायजी आहेत.
  • तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकांचे संशोधन करा आणि गरज असेल तेव्हा व्यावसायिक मदत घेण्यास कधीही अजिबात संकोच करू नका. 
  • तुमची गुंतवणूक वापरा किंवा एंजेल गुंतवणूकदार शोधा. 
  • तुमच्या प्रोफाईलचे मूल्य वाढवण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये गुंतून राहा किंवा प्रमाणित प्रशिक्षण संस्थांमध्ये नावनोंदणी करा.

निष्कर्ष: 

ट्रेडिंग ही एक अतिशय फायदेशीर बिजनेस आयडिया असू शकते. गुंतवणुकीच्या श्रेणीसह अनेक बिजनेस आयडिया आहेत. ज्या कमी ते अधिक विस्तार करू शकतात किंवा उच्च/कमी कमिशन ते मध्यम किंवा प्रचंड नफा मार्जिनच्या संदर्भात परतावा मिळवून देवू शकतात! प्रत्येक व्यापाऱ्याने खाते मेंटेन केली पाहिजे आणि GST अधिकाऱ्यांकडे अनिवार्यपणे नोंदणी केली पाहिजे.

तुम्हाला माहिती आहे का की Khatabook कडे वन-स्टॉप सोल्यूशन आहे जिथे तुम्ही तुमचे खाते सहज मेंटेन करू शकता आणि बिजनेस रिपोर्ट तयार करू शकता? ॲप वापरायला सोपे आहे आणि विशेषतः लहान वाढणाऱ्या बिजनेससाठी डिझाईन केलेले आहे. Khatabook वर स्विच करून तुमचा वेळ, मेहनत आणि पैसा वाचवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करणे हे ट्रेडिंग बिजनेस आहे का?

उत्तर:

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हे व्यापाऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासारखे आहे. हा एक मंच आहे जेथे खरेदीदार आणि विक्रेते एकत्र येतात आणि त्यांचे बिजनेस व्यवहार करतात. तुम्ही विक्रीतून कमिशन मिळवू शकता, गेटवे सुविधा देऊ शकता आणि किफायतशीर परताव्यासाठी इतर सेवा देऊ शकता.

प्रश्न: ड्रॉपशिपिंग हा ट्रेंडिंग बिजनेस का आहे?

उत्तर:

ड्रॉप-शिपिंगमधील बिजनेस मॉडेलचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या वेबसाईटवर विक्री करत असलेली भौतिक उत्पादने तुम्हाला शिप आणि स्टॉक करण्याची गरज नाही. कारण, उत्पादक ग्राहकांना ते पाठवतो. ही एक शून्य-गुंतवणुकीची संधी आहे जिथे तुम्हाला फक्त निर्मात्याच्या उत्पादनांचे संशोधन आणि विक्री करावी लागेल. यातून  चांगली कमाई करता येते. ही एक अतिशय लोकप्रिय बिजनेस आयडिया म्हणून उदयास आली आहे.

प्रश्न: गेल्या वर्षी घाऊक किराणा बिजनेस खूप फायदेशीर का होता?

उत्तर:

साथीच्या रोगामुळे घाऊक किराणा बिजनेसच्या विक्रीत वाढ झाली. COVID-19 लॉकडाऊन आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे लोकांनी किराणा विकत घेतला आणि साठवला. याचा अर्थ किराणा मालाच्या घाऊक विक्रेत्यांना अधिक मागणी आणि पुरवठा झाला.

प्रश्न: घाऊक किमतीत ट्रेडिंग करण्यासाठी मी इमिटेशन ज्वेलरी कोठे खरेदी करू शकतो?

उत्तर:

दिल्लीतील सदर बाजार हे देशातील सर्वांत मोठ्या दागिन्यांच्या बाजारपेठांपैकी एक आहे. तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असल्यास, तुम्ही येथून खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकता:

  • Eindiawholesale.com हा जयपूर स्थित कृत्रिम दागिन्यांचा घाऊक विक्रेता आहे. ऑर्डर मूल्य ₹15,000/- पेक्षा जास्त असल्यास ते विनामूल्य शिपिंग प्रदान करतात. सवलत तुमच्या खरेदी क्षमतेवर अवलंबून असते.
  • Manekratna.com हे मुंबई स्थित आहे आणि बीडेड, अमेरिकन डायमंड, कुंदन, पोल्की, अँटीक, इत्यादी डिझाईन्समध्ये पारंपारिक दागिन्यांच्या वस्तू ऑफर करतात. विनामूल्य शिपिंग उपलब्ध आहे आणि सवलत तुमच्या खरेदीच्या प्रमाणात आहे.
  • चायनाब्रँड्स हा एक प्रतिष्ठित घाऊक विक्रेता/ड्रॉप शिपर आहे जो विविध प्रकारची आणि वाजवी घाऊक किमती देतो. ते जगभरात 24-तास शिपिंगसह होम डेकोर वस्तू, सौंदर्य उत्पादने, कपडे, उपकरणे इत्यादी विकतात. सहयोगासाठी त्यांची ऑफर कमी जोखमेची आहे आणि त्यात शून्य गुंतवणूक समाविष्ट आहे.
  • Kanhaijewels.com देखील मुंबई स्थित इमिटेशन ज्वेलरी, वेस्टर्न वेअर आयटम्स ऑफ ज्वेलरी आणि अजूनही बऱ्याच वस्तूंचे ते घाऊक विक्रेते आहेत. वस्तू  4 ते 5 दिवसात शिप करतात आणि त्यांच्याकडे शून्य सवलत धोरण आहे.
  • Padmavatijewellery.com हे इमिटेशन ज्वेलरींची खूप विस्तृत आणि रोमांचक श्रेणी असलेले घाऊक विक्रेते आहेत.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.