written by Khatabook | February 10, 2022

जीएसटी पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी कसा बदलायचा?

×

Table of Content


जीएसटीमध्ये ई-मेल आयडी कसा बदलायचा आणि जीएसटीमध्ये मोबाईल फोन नंबर कसा बदलायचा याची प्रक्रिया खूप सोपी आहे. परंतु काहीवेळा, जीएसटी पोर्टलवरील मुख्य अधिकृत स्वाक्षरीकर्त्याचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल पत्ता बदलणे गोंधळात टाकणारे असू शकते. म्हणून, या लेखातून स्टेप्सनुसार ते कसे करायचे ते समजून घेऊया.

जीएसटी पोर्टलबाबत महत्त्वाची तथ्ये

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा, 2017ला लागू झाल्यापासून, 01.07.2017 पासून, सर्व जीएसटी-संबंधित उपक्रम ऑनलाईन आयोजित केले गेले आहेत. लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे जीएसटी वेबसाईट किंवा पोर्टल वापरून, www.gst.gov.in वर केले जाते. जिथे सर्व जीएसटी अनुपालन ऑपरेशन्स पूर्ण केल्या जाऊ शकतात. 

जीएसटी लॉग इन पोर्टलवर तुम्ही जीएसटी नोंदणी, रिटर्न फाईलिंग, कर भरणे, रिफंड अर्ज, त्यांच्या नोटीसला उत्तर देणे, अपील दाखल करणे इत्यादी कामे पूर्ण करू शकता. नोंदणी क्रमांक मिळवताना किंवा करदात्यांची नावनोंदणी करताना, त्यांनी ई-मेल पत्ता किंवा मोबाईल फोन नंबर पुरवणे आवश्यक आहे, जे विविध कारणांमुळे नंतर अपडेट करावे लागेल.

करदात्यांची नोंदणी दोनपैकी कोणत्याही एका प्रकारे केली जाते. काहींनी सध्याच्या नोंदणीच्या आधारावर पुरवलेल्या तात्पुरत्या आयडीद्वारे जीएसटी शासनात स्थलांतर केले आहे, म्हणजे, राज्य व्हॅट नोंदणी किंवा केंद्रीय उत्पादन शुल्क किंवा सेवा कर नोंदणीमध्ये. याउलट, जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर इतरांनी नवीन नोंदणी केली आहे.

बरेच लोक नोंदणीसाठी व्यावसायिकांची मदत घेतात तर काही जण स्वतः प्रक्रिया पूर्ण करतात. कोणत्याही परिस्थितीत, त्यांना नोंदणीच्या वेळी ई-मेल पत्ता किंवा मोबाईल नंबर आवश्यक आहे. एखाद्या व्यावसायिकाने त्यांचे संपर्क तपशिल बदलले असल्यास मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी अपडेट करणे आवश्यक असते.

जीएसटी पोर्टलमध्ये मोबाईल नंबर कसा बदलायचा?

हे तपशिल बदलण्यासाठी, ते करण्याचे दोन मार्ग आहेत. हे एखाद्या घटकाकडे असलेल्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांच्या एकूण संख्येवर आधारित असेल.

(अ) एकापेक्षा जास्त अधिकृत स्वाक्षरीकर्ता असल्यास किंवा अधिकृत स्वाक्षरीकर्ता मालक/प्रवर्तकांपेक्षा वेगळा असल्यास, या स्टेप्सचे अनुसरण करा:

स्टेप 1: सेवावर जा -> नोंदणी -> जीएसटी वेबसाईट (http://www.gst.gov.in/)  नोंदणी नॉन-कोर फील्ड्समध्ये सुधारणा  करा.

स्टेप 2: ड्रॉप-डाउन मेन्यूमधून अधिकृत स्वाक्षरीकर्ता पर्याय निवडा. ड्रॉप-डाउन मेन्यूमधून 'नवीन जोडा' निवडा.

स्टेप 3: ई-मेल पत्ता आणि फोन नंबर यासह नवीन अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांची माहिती भरा. ड्रॉप-डाउन मेन्यूमधून 'सेव्ह' निवडा.

स्टेप 4: ड्रॉप-डाउन मेन्यूमधून 'व्हेरिफिकेशन' निवडा. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे (DSC)/ई-स्वाक्षरी/इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) सह फॉर्म सबमिट करण्यासाठी आवश्यक माहिती एंटर केल्यानंतर डिक्लेरेशन चेकबॉक्सवर खूण करा.

स्टेप 5: 15-20 मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर जीएसटी पोर्टलवर लॉग इन करा. तुमच्या नोंदणीमध्ये सुधारणा करण्यासाठी, सेवा -> नोंदणी -> नोंदणी दुरुस्तीवर जा. गैर-आवश्यक फील्ड.

स्टेप  6: 'अधिकृत स्वाक्षरी' टॅबवर जा आणि आधीच्या अधिकृत स्वाक्षरीच्या पुढील बॉक्स अनचेक करा.

स्टेप 7: मुख्य अधिकृत स्वाक्षरीकर्त्याला नवीन अधिकृत स्वाक्षरीकर्त्याला नियुक्त करा. प्रदान केलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता बरोबर असल्याची खात्री करा. याची पुष्टी करण्यासाठी, तुम्हाला एक OTP प्राप्त होईल.

स्टेप 8: व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वरील स्टेप 5 मध्ये दिलेल्या स्टेप्सचे किंवा प्रक्रियेचे अनुसरण करा.

स्टेप 9: एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला त्याच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी ARN क्रमांकासह एक पुष्टीकरण मेसेज प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही 'चेंजेस अप्रूव्ह्ड' असा मेसेज पाहता तेव्हा तो तुमचा मोबाईल नंबर आणि ई- मेल पत्ता योग्यरितीने सुधारला गेला आहे असे सूचित करतो.

हेही वाचा: जीएसटी अंतर्गत प्रासंगिक करपात्र व्यक्ती कोण आहे?

(ब) अधिकृत स्वाक्षरीकर्ता आणि भागीदार/संचालक/प्रवर्तक/मालक समान व्यक्ती असल्यास, या स्टेप्सचे अनुसरण करा:

स्टेप 1: GST पोर्टलवर सेवा -> नोंदणी -> नोंदणी नॉन-कोर फील्ड्समध्ये सुधारणा करा.

स्टेप 2: 'प्रवर्तक/भागीदार' पर्याय निवडा. 'कृती' अंतर्गत, ज्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्याची माहिती तुम्ही अपडेट करू इच्छिता त्यापुढील 'संपादित करा' बटणावर क्लिक करा.

स्टेप 3: तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी बदलायचा असल्यास, फोन नंबर किंवा ई-मेल पत्ता अपडेट करा. ड्रॉप-डाउन मेन्यूमधून 'सेव्ह' निवडा.

स्टेप 4: दिलेल्या फोन नंबर आणि ई-मेल पत्त्यावर वन-टाइम पासवर्ड (OTP) दिला जाईल. OTP टाका. केलेले बदल दिसून येतील.

स्टेप 5: ड्रॉप-डाउन मेन्यूमधून 'व्हेरिफिकेशन' निवडा. DSC/E-signature/EVC सह फॉर्म सबमिट करण्यासाठी, आवश्यक माहिती एंटर केल्यानंतर डिक्लेरेशन चेकबॉक्सवर खूण करा.

EVC पद्धत निवडल्यास, अपडेट केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जारी केला जाईल, जो व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एंटर करणे आवश्यक आहे.

स्टेप 6: एकदा अर्ज सबमिट केल्यावर, तुम्हाला त्याच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी ARN क्रमांकासह एक पुष्टीकरण मेसेज प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही 'चेंजेस अप्रूव्ह्ड' असा मेसेज पाहता तेव्हा तो तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता योग्यरितीने सुधारला गेला आहे असे सूचित करतो.

जीएसटी पोर्टलमध्ये ई-मेल आयडी कसा बदलायचा?

नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि नोंदणीकृत ई-मेल आयडी बदलण्याची प्रक्रिया वरील परिच्छेदांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणेच आहे. म्हणजे तश्याच स्टेप्सचे अनुसरण करावे लागेल.

हेही वाचा: जीएसटी पोर्टलवर निल जीएसटीआर-1 रिटर्न कसे फाईल करायचे?

निष्कर्ष:

नोंदणीकृत व्यक्तीसाठी, जीएसटी पोर्टलमधील मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. जीएसटी वेबसाईटशी संबंधित किंवा जीएसटी कायद्यातील इतर आवश्यक अनुपालनांशी संबंधित सर्व माहिती आणि सूचना प्रदान केलेल्या मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्त्यावर पाठवल्या जातात. त्यामुळे, तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्त्यासह तुमचे जीएसटी पोर्टल अपडेट करण्यास विसरू नका आणि जर तो अपडेट केला नसेल तर जीएसटी पोर्टलमध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी कसा बदलायचा? यासाठी वर दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा. जीएसटी संबंधी पुढील अपडेट्ससाठी Khatabook ॲप डाउनलोड करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: जीएसटी पोर्टलवर नॉन-कोर फील्ड काय आहेत?

उत्तर:

जीएसटी पोर्टलवर कोर फील्ड वगळता इतर सर्व फील्ड नॉन-कोअर फील्ड म्हणून गणल्या जातात.

प्रश्न: जीएसटी पोर्टलवर मुख्य फील्ड काय आहेत?

उत्तर:

जीएसटी पोर्टलवरील मुख्य फील्ड आहेत: व्यवसायाचे पॅन, व्यवसायाचे ठिकाण आणि भागीदार/संचालक/प्रवर्तकांची नावे इत्यादी.

प्रश्न: दोन भिन्न जीएसटी क्रमांकांसाठी एकच ई-मेल पत्ता अपडेट केला जाऊ शकतो का?

उत्तर:

होय, दोन भिन्न जीएसटी क्रमांकांसाठी एकच ईमेल पत्ता अपडेट केला जाऊ शकतो.

प्रश्न: एकाच व्यक्तीचा मोबाईल नंबर दोन वेगवेगळ्या जीएसटी नंबरसाठी अपडेट केला जाऊ शकतो का?

उत्तर:

होय, एकाच व्यक्तीचा मोबाईल नंबर दोन भिन्न जीएसटी क्रमांकांसाठी अपडेट केला जाऊ शकतो.

प्रश्न: जीएसटी पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई-मेल पत्ता बदलण्यासाठी किती वेळ लागतो?

उत्तर:

वर दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करून, जीएसटी पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल पत्ता बदलण्यासाठी 15-20 मिनिटे लागतात.

प्रश्न: जीएसटी पोर्टलवर जीएसटी मोबाईल नंबर बदलणे किंवा ई-मेल पत्ता बदलणे कोण करू शकते?

उत्तर:

फर्म/कंपनी/व्यवसाय मालकाने अधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती जीएसटी पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल पत्ता बदलू शकते.

प्रश्न: जीएसटी अंतर्गत एखादी व्यक्ती कशी नोंदणी करू शकते?

उत्तर:

करदात्यांची नोंदणी दोनपैकी कोणत्याही एका प्रकारे केली जाते. काहींनी एकतर सध्याच्या नोंदणीच्या आधारावर पुरवलेल्या तात्पुरत्या आयडीद्वारे जीएसटी शासनात स्थलांतर केले आहे, उदा. राज्य व्हॅट नोंदणी किंवा केंद्रीय उत्पादन शुल्क किंवा सेवा कर नोंदणीमध्ये. याउलट, जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर इतरांनी नवीन नोंदणी केली आहे.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.