तुम्ही पगारदार कर्मचारी आहात आणि तुम्हाला ईपीएफबद्दल काही शंका आहेत? ईपीएफओ ई-सेवा म्हणजे काय त्याविषयी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लाॅगमध्ये देण्यात आली आहेत. ईपीएफओ ई-सेवा पोर्टल एक प्लॅटफाॅर्म आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा तपशील मॅनेज करू शकता.
व्याख्या:
ईपीएफः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही सर्व कर्मचार्यांना उपलब्ध असलेल्या निवृत्ती लाभ योजनांपैकी एक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे योगदान कर्मचार्याच्या बेसिक सॅलरीच्या बारा टक्के असते. 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला लागू असलेला व्याज दर 5.5 टक्के आहे.
ईपीएफओ: ईपीएफओ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला रेफर करते. ही सरकारने तयार केलेली कायदेशीर संस्था आहे. ही 1951 मध्ये अस्तित्वात आली असून ते कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ईपीएफ लोकांना सेवानिवृत्तीसाठी बचत ठेवण्यास प्रवृत्त करते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे संचालन केंद्रीय विश्वस्त मंडळाद्वारे केले जाते, जे तीन योजनांतर्गत कार्यरत आहे. त्या खालीलप्रमाणे आहेत
1. कर्मचारी भविष्य निर्वाह योजना
2. कर्मचारी पेन्शन योजना
3. कर्मचारी ठेव संबंधित विमा योजना
ईपीएफओ ही कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय विश्वस्त मंडळाला (ईपीएफ) मदत करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे.
ईपीएफओ ई-सेवा
ई-सेवा-पोर्टल
ई-सेवा पोर्टल एक कर्मचारी ऑनलाईन पोर्टल आहे जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विनंत्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ईपीएफओ कार्यालयाला प्रत्यक्ष भेट न देता ऑनलाईन सेवा वापरू शकता. तसेच, तुम्ही अन्य वैशिष्ट्यांसह, तुम्ही योगदान दिलेला सर्व तपशील प्राप्त करू शकता.
संस्था नोंदणी करण्यासाठी सुरूवातीची मर्यादा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अॅक्टनुसार 20 हून अधिक कर्मचारी असलेल्या संघटनांनी ईपीएफओकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी स्टेप्स
1. उद्योजकाने त्याची संघटना ईपीएफओ ई-सेवा पोर्टलवर नोंदवायला पाहिजे.
2. ईपीएफओ ई - सेवा पोर्टल प्राथमिक लॉग इनसाठी उद्योजकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सिस्टमने-तयार केलेल्या, वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड पाठवेल. या तात्पुरत्या वापरकर्ता नाव आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा आणि तुमचा कायमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
3. पुढील स्टेप्स सर्व आवश्यक फील्ड भरणे आणि नंतर कागदपत्र जसे की, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि इतर तपशील जोडणे आहे.
4. आता तुमचा अर्ज सबमिट करा. सहसा, विभागाकडून अर्जावर प्रक्रिया करायला आठवडा लागतो.
5. एकदा तुमच्या अर्जावर प्रक्रिया झाल्यानंतर आणि मंजूर झाल्यावर तुम्ही तुमचा परतावा भरणे सुरू करू शकता.
ऑनलाईन नोंदणीचे फायदे
1. येथे कागदपत्राच्या गुंतागुंतीचे काम नाहीत. कागदपत्रांच्या भौतिक व्हेरिफिकेशनऐवजी ऑनलाईन अपलोड केल्यामुळे तुमचा वेळ वाचायला मदत होईल.
2. एक सोपी आणि सहज ऑनलाईन पेमेंट सिस्टम जलद पेमेंट देण्यात मदत करते. तसेच, तुम्ही केलेल्या कोणत्याही पेमेंटची पुष्टी एसएमएसद्वारे केली जाते.
3. ऑनलाईन डेटा व्हेरिफिकेशन शक्य आहे, जे बऱ्याच वेळा तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.
ईपीएफओ ई सेवेच्या सुविधेचा उपयोग
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्योजक त्यांचे इलेक्ट्रॉनिक परतावे अपलोड करू शकतात.
- उद्योजकाने अपलोड केलेले परतावे डिजिटल स्वाक्षरीकृत प्रत म्हणून दर्शवले जाईल आणि तुम्ही ते पीडीएफ स्वरूपात जतन करू शकता. तुम्ही रेकॉर्ड ठेवण्यासाठी ते प्रिंट ही करू शकता.
- मंजूर झाल्यानंतर, अपलोड केलेल्या परताव्याच्या आधारे स्क्रीनवर एक चालान दिसेल.
- उद्योजक इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे देऊ शकतो. चालानची हार्ड कॉपी प्रिंट करण्याचा आणि नंतर जवळच्या बँक शाखांमध्ये पैसे देण्याचा पर्याय ही उपलब्ध आहे.
- एक संदर्भ म्हणून आणि दस्तऐवजीकरणासाठी, उद्योजकाने हार्ड कॉपी आणि चालानची प्रत दोन्ही ठेवायला पाहिजे.
ई-परतावा टूल डाउनलोड करण्याच्या स्टेप्स येथे आहेतः
- ईपीएफओ वेबसाईटवर जा.
- ई-रिटर्न विभागावर जा.
- विंडोज इन्स्टॉलर 3_5 सारखे आवश्यक घटक डाउनलोड करा.
- तुम्ही भिन्न आवृत्त्यांच्या दोन टूलसाठी डाउनलोड लिंक पाहू शकता. तुम्ही आवश्यक लिंकवर क्लिक करून, डाउनलोड करू शकता.
- ‘मदत फायली आणि सूचना’ या शीर्षकाअंतर्गत, तुम्ही तुमच्या इन्स्टाॅलेशन व इतर प्रश्नोत्तरांसाठी वापरकर्ता मॅन्यूअल सूचना प्राप्त करू शकता.
ई-चालान निर्मितीसाठी स्टेप्स
- ई-सेवा पोर्टलवर लॉग इन करा.
-
तुम्हाला ईसीआर अपलोडचा पर्याय निवडायला पाहिजे आणि तयार केलेला ईसीआर अपलोड करायला पाहिजे. तुम्ही ज्या महिन्यासाठी आणि वर्षासाठी ईसीआर अपलोड करत आहात, त्याची फेर तपासणी केली पाहिजे.
- मजकूर फाईल योग्यरित्या अपलोड केल्यानंतर, सारांश पेज स्क्रीनवर पॉप अप होते. ‘एकूण ईपीएफ तपासणी शुल्क’, एकूण ईडीएलआय योगदान आणि तपासणीसाठी वेगळा शुल्क भरा. डीफॉल्टनुसार बारा टक्के योगदान दर लागू केला जातो. परंतु, ते तुमच्या संघटनेवर लागू होत असल्यास तुम्ही ते दहा टक्क्यांपर्यंत बदलू शकता. शेवटी, तुमचा ईसीआर सबमिट करा.
- साइट स्क्रीनवर एक डिजिटल स्वाक्षरी केलेली फाईल प्रदर्शित करेल. तुम्ही एसएमएस अलर्टची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर, तुम्ही अपलोड केलेल्या ईसीआर फाईलसह पीडीएफमधील डेटाची फेर-तपासणी केली पाहिजे.
- पुढील स्टेपमध्ये, तुम्हाला पीडीएफला मंजूरी द्यावी लागेल आणि ईपीएफ चालान तयार करण्यासाठी मंजूर बटणावर क्लिक करावे लागेल.
- ईसीआरली मंजूरी मिळाल्यानंतर वेबसाईट तात्पुरता परतावा रेफरंस नंबर (टीआरआरएन) तयार करेल. हे स्क्रीनवर चालान रसीद फाईल आणि पोचपावती प्रदर्शित करेल.
- तुम्ही ‘डाउनलोड’ या पर्यायावर क्लिक करुन चालान पावती डाउनलोड करू शकता.
- डाउनलोड केलेले चालान टीआरआरएन नंबरसह प्रिंट करा.
- ‘केवळ स्थापनेसाठी वापरा’ या शीर्षकाअंतर्गत तपशील मॅन्युअली अपडेट करा.
- एसबीआयच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाला ऑनलाईन पैसे भरू शकता. तुम्ही डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे पैसे देऊ शकता, जे तुम्हाला नियुक्त केलेल्या बँक शाखेत जमा करावे लागेल.
- एकदा तपासणी आढळल्यानंतर ईपीएफओ तुम्हाला एसएमएस अलर्ट पाठवेल. एका महिन्याचा ईसीआर भरण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक चालानसह परतावा (ईसीआर) तयार करण्यासाठी खालील पूर्व शर्ती आहेतः
-
उद्योजकाने आधीपासूनच उद्योजक ई-सेवा पोर्टलवर संस्थेची नोंदणी केली पाहिजे.
-
त्यांनी ईसीआर डाउनलोड केला पाहिजे.
-
प्रक्रियेसंदर्भात स्पष्ट कल्पना मिळावी म्हणून उद्योजकाने वेबसाईटवर दिलेल्या सामान्य प्रश्नांसह परिचित असायला पाहिजे.
अॅंड्राॅईड अॅप्ससाठी यूएएन मेंबर ई-सेवाः
-
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन), हा बारा-अंकी क्रमांक असून, भारत सरकारच्या अंतर्गत रोजगार आणि कामगार मंत्रालयाद्वारे जारी केला जातो. ईपीएफओच्या सर्व मेंबरना तो देण्यात येतो.. अशा प्रकारे ते त्यांचे पीएफ खाते सहजपणे मॅनेज करू शकतात.
-
प्रत्येक व्यक्तीच्या लाभार्थीसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) या योजनेद्वारे यूएएनचे वाटप केले आहे. जर ती व्यक्ती पगारदार कर्मचारी असेल आणि आवश्यक योगदान दिले असल्यास, तुम्ही ईपीएफचे मेंबर होऊ शकता.
-
यूएएन लॉग इन पोर्टल एक एकल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे कर्मचारी त्यांचे सर्व पीएफ खाते कनेक्ट करुन त्यात प्रवेश करू शकतो. या पोर्टलवर केवायसी तपशील, यूएएन कार्ड आणि सेवा नोंदी यासारखे बरेच तपशील ईपीएफ मेंबरसाठी उपलब्ध आहेत. ईपीएफ ई-सेवेच्या मेंबरसाठी भविष्य निर्वाह निधीचे हस्तांतरण आणि पैसे काढण्याची प्रक्रिया खूप सहज आणि सोपी झाली आहे.
कर्मचार्यांसाठी यूएएन मेंबर पोर्टल
- तुमच्याकडे प्रथम सक्रिय यूएएन असणे आवश्यक आहे. यूएएन सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला ईपीएफ मेंबर पोर्टल उघडणे आवश्यक आहे आणि नंतर 'सक्रिय यूएएन' पर्यायावर जा. तुमचे यूएएन, आधार, पॅन, मेंबर आयडी, मोबाईल नंबर, नाव, ईमेल आणि जन्मतारीख याविषयी सर्व तपशील आणि माहिती द्या.
- यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पिन प्राप्त करण्यासाठी 'अधिकृत पिन मिळवा' वर क्लिक करा. व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त केलेला पिन दाखल करा.
- शेवटी, यूएएन पोर्टलसाठी तुमचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड तयार करा.
कर्मचाऱ्यांच्या यूएएन मेंबर पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी खालील स्टेप्स आहेत.
- ईपीएफओ वेबसाईटवर जा.
- ‘आमच्या सेवा’ वर क्लिक करा आणि नंतर निवडा ‘कर्मचार्यांसाठी’.
- त्यानंतर ‘मेंबर यूएएन/ऑनलाईन सेवा’ वर जा.
- पुनर्निर्देशित केलेल्या पेजवर यूएएन, पीएफ मेंबर आयडी, नोंदणीकृत मोबाईल नंबर यासारखी आवश्यक सर्व माहिती दाखल करा.
- कॅप्चा भरा.
- 'अधिकृत पिन मिळवा' वर क्लिक करा.
- 'मी सहमत आहे' वर क्लिक करा आणि त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी दाखल करा.
- आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला पासवर्ड दाखल करुन तुम्ही पोर्टलवर प्रवेश करू शकता.
उद्योजकांसाठी यूएएन सदस्य पोर्टल
उद्योजकासाठी ईपीएफओ पोर्टलमध्ये लॉग इन करण्याच्या पद्धती कर्मचाऱ्यांसारख्याच आहेत. उद्योजकांसाठी यूएएन मेंबर पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी खालील स्टेप्स आहेतः
- सर्व प्रथम, उद्योजकाला ईपीएफओ वेबसाईटवर जावे लागेल.
- ईपीएफओ उद्योजक लॉग इन वर क्लिक करा. पेजच्या उजव्या बाजूला साइन इन करण्याचा पर्याय दिसेल.
- नंतर वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरून 'साइन इन' करा.
- पुढे, ते उद्योजकाच्या ईपीएफओ पोर्टलच्या दुसर्या पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे उद्योजकाने केवायसी तपशील दाखल करणे आवश्यक आहे.
यूएएन मेंबर पोर्टलवर नोंदणी कशी करावी?
यूएएन लॉग इन पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी, तुमचे यूएएन सक्रिय करावे लागेल त्यासाठी खाली स्टेप्स दिल्या आहेत:
- सर्वांत पहिले, तुम्हाला ईपीएफ मेंबर पोर्टलवर जावे लागेल.
- 'महत्त्वाच्या लिंक' विभागात 'सक्रिय यूएएन' पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर सर्व आवश्यक तपशील सबमिट करा आणि 'अधिकृत पिन मिळवा'वर क्लिक करा.
- ईपीएफओ नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पिन पाठवेल.
- तुम्ही तुमच्या यूएएन खात्याच्या सक्रियतेसाठी तुमचा पिन दाखल करणे आवश्यक आहे.
- आता ईपीएफओ पासवर्ड तयार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवेल.
- प्रत्येक लॉग इन सत्रानंतर पासवर्ड बदलण्याची शिफारस केली जाते.
तुमचे यूएएन स्टेट्स जाणून घ्या
अस्तित्त्वात असलेल्या ईपीएफ खात्यासह तुमच्या यूएएनचे स्टेट्स खाली दिलेल्या स्टेपनुसार जाणून घ्या:
-
वेबसाईट www.epfoesewa.com वर जा
-
'तुमचे स्टेट्स जाणून घ्या' वर क्लिक करा
-
त्यानंतर सर्व आवश्यक तपशील जसे की, मेंबर आयडी, पीएफ नंबर, पॅन, आधार इत्यादी दाखल करा.
-
मेंबर आयडीवर क्लिक करा आणि तुम्ही सध्या वास्तव्यास असणारे राज्य, सध्याचे कार्यालय आणि तुमच्या मेंबर आयडीसारखी सर्व आवश्यक माहिती भरा आणि तुमच्या पगाराच्या स्लीपमध्ये नमूद करा.
-
तुम्हाला अजूनही आवश्यक तपशील सबमिट करावा लागले जसे की, तुमचे नाव, संपर्क क्रमांक, जन्मतारीख आणि नंतर तुम्हाला कॅप्चा दाखल करणे आवश्यक आहे.
-
'अधिकृत पिन मिळवा' वर दाबा.
-
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. मग तुम्ही ओटीपी दाखल करा आणि 'प्रमाणीकृत ओटीपी' वर दाबा आणि यूएएन मिळवा.
-
ईपीएफओ तुम्हाला यूएएन नंबर आणि स्टेट्स नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवेल.
यूएएन मेंबर पोर्टलवर पासवर्ड रिसेट कसा करायचा?
यूएएन मेंबर पोर्टलवर पासवर्ड रिसेट करण्यासाठी खाली स्टेप्स दिल्या आहेत:
-
लॉग इन पेज उघडा आणि नंतर 'पासवर्ड विसरलो'वर दाबा.
-
तुमचा यूएएन नंबर सबमिट करा आणि कॅप्चा दाखल करा.
-
ओटीपी पाठवा क्लिक करा त्यानंतर ओटीपी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.
-
ओटीपी दाखल करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
-
आता तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता.
उद्योजकांना ई-सेवा पोर्टल वापरण्याचे फायदे
ईफीएफ ई-सेवामध्ये खालील फायद्यांचा समावेश आहे
- उद्योजकांना पेपर परतावा न निवडण्याचा पर्याय आहे.
- फॉर्म 5/10/12अ, 3अ आणि 6अ अंतर्गत इतर परतावे यापुढे सबमिट करणे आवश्यक नाही.
- एकदा पैसे भरल्यानंतर ईपीएफओ एसएमएसद्वारे विना त्रास पुष्टीकरण पाठवेल.
- ईपीएफ योगदानाची रक्कम महिन्यावारी मेंबरच्या खात्यात जमा केली जाईल.
सतत विचारले जाणारे प्रश्न
जर एखादा उद्योजक ईपीएफओ ई-सेवेवर नोंदणी करत नसेल तर काय होईल?
ई-चालानची ऑनलाईन निर्मिती तेव्हाच शक्य होईल जेव्हा उद्योजक त्याची संस्था नोंदणी करेल. वापरकर्तानाव आणि पासवर्ड तयार करून, तुम्ही उद्योजक ईपीएफओ पोर्टलवर प्रवेश करू शकता.
ऑनलाईन तयार केलेल्या चालानाची वैधता काय आहे?
ऑनलाईन तयार केलेल्या चालानाची वैधता बारा दिवसांची आहे.
उद्योजक एकाधिक संघटनांमध्ये लॉग इन करण्यासाठी सारखाच तपशील वापरू शकतो?
नाही. उद्योजक एकाधिक संघटनांमध्ये लॉग इन करण्यासाठी सारखाच तपशील वापरू शकत नाही. तुमच्याकडे वेगवेगळ्या संघटनांसाठी स्वतंत्र लॉग इन तपशील असणे आवश्यक आहे.
एखादा मेंबर ई-सेवा पोर्टलवर त्याचे किंवा तिचे खाते पाहण्यासाठी नोंदणी करू शकतो?
नाही, फक्त वैध ईपीएफ नंबर असलेल्या संघटनेचे कर्मचारी खाते पाहू शकतात.
मोबाईल नंबर आणि इतर तपशील समावेशाचा उपयोग काय आहे?
ईपीएफओ साइट प्रोफाईल नोंदणी आणि संपादनाव्यतिरिक्त उपक्रमांसाठी मोबाइल नंबरवर मेसेज आणि वन-टाईम पासवर्ड पाठवेल.
एखाद्या आस्थापनाचे प्रोफाईल तपशील कसे बदलता येतील?
प्रथम, आपण उद्योजक पोर्टलवर लॉग इन केले पाहिजे. प्रोफाईल शीर्षकअंतर्गत, आपण संपादन प्रोफाईल लेबलच्या लिंकवर क्लिक केले पाहिजे. आपण आवश्यक बदल करू शकता आणि नंतर पिन मिळवा लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर आपल्या नोंदणीकृत प्राथमिक मोबाईल नंबरवर आपल्याला तपशील प्राप्त होईल. दिलेला पिन दाखल करा आणि आपले प्रोफाईल अपडेट करा.
शेवटी, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत प्राथमिक मोबाईल नंबरवर एक पुष्टीकरण एसएमएस प्राप्त होईल जेणेकरून तुम्ही तुमचे प्रोफाईल अपडेट केल्याची तुम्हाला माहिती मिळेल.