written by khatabook | August 14, 2020

2021 मध्ये कमी पैशात सुरू करा ऑनलाईन व्यवसाय, सर्वोत्कृष्ट 15 आयडियांसह

×

Table of Content


कमी गुंतवणूकीसह ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आयडिया

स्वतःहून एखादा व्यवसाय सुरू करणे ही थोडी अवघडच बाब असते. तुम्हाला कोणत्या व्यवसायाची निवड करायची आहे याबद्दल तुम्ही सतर्क आहात? एक छोटासा व्यवसाय कसा सुरू करावा? तुम्ही किती पैसे गुंतवू इच्छिता? तुम्ही सहजपणे पैसे मॅनेज करू शकता? तुम्ही किती जोखीम घेऊ शकता? हे काही प्रश्न आहेत याविषयी तुम्हाला काळजी करावी लागेल. पण एक चांगली बातमी आहे! इंटरनेटच्या युगात या दिवसात तुम्हाला जास्त त्रास घेण्याची गरज नाही! ते दिवस गेले जेव्हा तुम्हाला व्यवसाय स्थापित करण्यासाठी जागेचा विचार करावा लागायचा आणि तुम्हाला व्यवसायात गुंतवणूकीसाठी भरपूर पैसे लागायचे. आता जगात इंटरनेटचे जाळे सर्वत्र पसरले आहे, तुम्ही तुमचा ऑनलाईन व्यवसाय जगातील कोणत्याही ठिकाणावरून सुरू करू शकता.

ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा फायदा काय?

ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा सर्वांत मोठा फायदा हा आहे की तो अगदी परवडणारा आहे आणि तो तुम्हाला घरातून किंवा अगदी भाड्याने घेतलेल्या जागेवर ही सुरू करता येवू शकतो. तुमच्याकडे उद्योगासंबधी उत्तम आयडिया असल्यास, चांगले इंटरनेट कनेक्शन जोडून ऑफिसात हव्या असणाऱ्या सर्वच गोष्टी तुम्ही घरी देखील आणू शकता. तुम्ही अगदी छोट्या आयडियापासून सुरूवात करू शकता आणि नंतर पूर्ण ताकदीने त्याचे रूपांतर मोठ्या व्यवसायात करू शकता. इंटरनेट बिजनेसच्या आयडियासाठी, तुम्हाला लाॅजिस्टिक्स आणि अतिरिक्त खर्चाबद्दल जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.

तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी

तुम्ही तुमची सध्याची नोकरी न सोडता तुमच्या घराशेजारीच छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. पण तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे की तुमच्याकडे व्यवसायाची चांगली आयडिया आहे. त्यासह, तुम्ही सॉलिड ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटींगची रणनीती आणि एक सपोर्टीव्ह ग्राहक सेवा दिली पाहिजे. इंटरनेटच्या आधारावर, भारतामध्ये छोट्या व्यावसायिक आयडियांची अंमलबजावणी करणे अगदी शक्य आणि सहज आहे! सुरूवातीलाच इन्व्हेंट्री, गोदाम इत्यादीसारख्या पारंपारिक बिजनेससाठी खर्च करावा लागतो. त्यापेक्षा स्टार्टअपच्या उभारणीसाठी तुम्ही सहज लक्ष केंद्रित करू शकता. खरं तर, तुम्ही बरेच इंटरनेट बिजनेस करू शकता आणि पैसे नसतानाही चालवू शकता कारण बऱ्याच मोफत सर्व्हीस यासाठी उपलब्ध आहेत. जसे की, ॲमेझाॅन, ईबे, वर्डप्रेस, यूट्यूब इ. आणि अखेरीस, तुम्हाला यामुळे स्वयंरोजगार मिळेल, चांगले पैसे कमवाल आणि तुमच्या स्वतःच्या ऑनलाईन बिजनेससह तुमची बिले भरण्यास सक्षम असाल. तुमचा स्वतःचा बिजनेस सुरू करणे हे स्वत:च मालक होण्याचा एक चांगला मार्ग आहे!

15 ऑनलाईन बिजनेस आयडिया

ऑनलाईन बिजनेस सुरू करण्यासाठी 15 बिजनेसच्या आयडियांच्या यादीवर चर्चा करूया आणि कमी पैसे लावून बिजनेस कसा करायचा ते पाहूया.

#1. ड्रॉपशिपिंग

जर तुम्ही ऑनलाईन उत्पादने विकत घेऊन विकण्यासाठी इच्छित असाल आणि माल खरेदी करण्यासाठी व कलेक्ट करण्यासाठी पैसे नसल्यास ड्रॉपशिपिंग ही तुमच्यासाठी परिपूर्ण निवड आहे. ड्रॉपशिपिंग एक ई-कॉमर्स बिजनेस मॉडेल आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त एक ऑनलाईन स्टोअर सेट करावा लागतो आणि अशा पुरवठादारांशी भागीदारी करायची जे भौतिक उत्पादने मॅनेज करण्यास तयार असतील आणि त्यांना कलेक्ट करून ग्राहकांकडे पाठवण्यास ते तयार असतील.

#2. भाषांतर

तुम्ही बहुभाषिक व्यक्ती असल्यास अपवर्क, फ्रीलांसर इ. वर खाते सेट करू शकता आणि तुमच्या कौशल्यांपासून कमाई करू शकता. तुम्ही भाषांतरासाठी गिगवर अर्ज करू शकता आणि जगभरातील विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता. असे केल्यास हळूहळू तुमचे ग्राहक विस्तारत जातील.

#3. सोशल मीडिया कन्सल्टंट

हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना सोशल मीडियाची आवड आहे. जर तुम्ही एक चांगले सर्जनशील लेखक असल्यास आणि नवीनतम सोशल मीडिया ट्रेंडच्या शीर्षस्थानी राहण्याचे हॅक माहित असल्यास तुमच्यासाठी ही कदाचित उत्तम संधी असू शकते. तुम्हाला सोशल मीडियाच्या सर्व बाबी आणि अस्सल अनुयायी कसे मिळवावेत हे माहित असल्यास तुम्ही यामध्ये पाऊल ठेवले पाहिजे.

#4. वेब डिझाईनर

वेबसाईट्स कशी डिझाईन करावी हे तुम्हाला माहित असल्यास तुम्ही यात शीर्षस्थानी राहाल. बर्‍याच लोकांनी त्यांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू केल्यामुळे वेबसाईट डिझायनिंगला मागणी आहे. तुम्ही वेबसाईट बिल्डिंग उद्योगात प्रवेश करू शकता आणि बरेच पैसे कमवू शकता.

#5. होम बेस्ड केटरिंग

तुम्ही असे आहात का जे नेहमीच होस्ट असता आणि तुमच्या मित्रांना नेहमीच काहीतरी चांगले जेवायला देता? तुमचे स्वयंपाकाविषयीचे प्रेम पैसे कमवणार्‍या बिजनेसच्या आयडियात रुपांतरित करा. तुमच्या स्वत:च्या घरी-आधारित केटरिंग सेट अप सुरू करा आणि तुमच्या स्वयंपाकासंबंधी कौशल्यांमधून पैसे मिळवा.

#6.ब्लाॅगिंग

तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी उत्साही असल्यास किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्राविषयी तुमच्या अंगी कौशल्य असल्यास तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता. वर्डप्रेस आणि ब्लॉगरसारखी विविध प्लॅटफॉर्म आहेत जी तुम्हाला स्वत:चा ब्लॉग मोफत सेट अप करण्याची परवानगी देतात. तुम्ही नियमितपणे तुमच्या प्रेक्षकांसाठी उपयुक्त असलेला मुळ कंटेंट पोस्ट केल्यास तुम्ही सर्च इंजिनमध्ये उच्च स्थान मिळवाल. गुगल ॲडसेन्स द्वारे जाहिराती देऊन तुम्ही तुमच्या ब्लॉगवर कमाई करू शकता. प्रति-क्लिक-प्रति-मॉडेलच्या आधारावर तुम्हाला मोबदला मिळतो. एफिलिएट मार्केटींगद्वारे पैसे कमवणे ही आणखी एक युक्ती म्हणजे एखाद्या संबद्ध कंपनीने विकलेल्या उत्पादनांसाठी जाहिराती देऊन त्यावर पैसे कमावणे होय. जेव्हा वापरकर्त्याने जाहिरातीवर क्लिक केले असेल तर ती लिंक त्याला/तिला एफिलिएटच्या साईटवर परत नेईल जिथे तो/ती विशिष्ट उत्पादन खरेदी करू शकेल.

#7. कस्टमाईज्ड वस्तू

लोक आजकाल कस्टमाईज्ड वस्तूंना प्राधान्य देतात ज्यांचा त्यांना वैयक्तिक स्पर्श असतो. जर तुम्ही वस्तू डिझाईन करण्यास तरबेज असल्यास, तुम्ही टी-शर्ट, फोन केसेस, पिशव्या, मग, इत्यादी डिझाईन करू शकता आणि त्यावर काही मजेदार वाक्य लिहू शकता. तसेच त्यांच्या मागणीनूसार ते ऑनलाईन बिजनेसद्वारे विकू शकता.

# 8.हस्तकलेच्या वस्तू

तुम्ही सर्जनशील असल्यास स्वतःच डीआयवाय मेणबत्त्या, साबण, कुंभारकाम, भेटवस्तू, ग्रीटिंग्ज कार्ड, भेटवस्तू बॉक्स इत्यादी बनवू शकता आणि त्या ऑनलाईन विकू शकता. तुमचे साहित्य ऑनलाईन विकण्यासाठी तुम्ही व्यासपीठ म्हणून सोशल मीडिया वापरू शकता. तुमचे अनुयायी वाढवण्यासाठी तुमचे स्वत: चे Instagram हँडल आणि YouTube चॅनेल इ. वापरा. असे केल्याने तुमचा ब्रँड अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

#9. ग्राफिक डिझाईनर

लोगो, ब्रँड पॅकेजेस, पोस्टर्स, ब्रोशर इ. कसे डिझाईन करायचे हे तुम्हाला माहित असल्यास तुम्ही तुमच्या ग्राफिक डिझायनिंग कौशल्यासह ऑनलाईन व्यवसाय करू शकता. ब्रँड आणि कंपन्यांसाठी डिजिटल आर्ट सुद्धा तयार करू शकता. बिजनेसच्या संधी मिळवण्यासाठी आवड म्हणून ग्राफिक डिझाईनचे कौशल्य विकसित करा.

#10. अ‍ॅप डेव्हलपर

आजकाल, प्रत्येकाकडे अ‍ॅप्सने भरलेला स्मार्टफोन आहे. तुमच्याकडे उत्कृष्ट कोडींग कौशल्य असल्यास, अ‍ॅप्स विकसित करणे तुमच्यासाठी चांगले आहे कारण आता मोबाईल वेबपेक्षा अ‍ॅप्स अधिक लोकप्रिय आहेत. तुम्ही पैसे कमावण्यासाठी स्वतःचे अ‍ॅप्स बनवू शकता किंवा इतरांसाठी अ‍ॅप्स तयार करू शकता.

# 11. ऑनलाईन कंटेंट निर्माता

जर तुम्ही विनोदबुद्धीने लोकांना हसवत असाल तर तुम्ही ऑनलाईन व्हीडिओ कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करू शकता! व्हीडिओ शूट करा आणि त्यांना Instagram, Facebook आणि YouTube सारख्या विविध प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन अपलोड करा. एकदा तुम्हाला चांगले व्यूव्हज्, फाॅलोअर्स, सबस्क्राईबर मिळाल्यानंतर तुम्ही जाहिरातीच्या भागाचा अंश कमावू शकता. तुम्ही कथाकथन किंवा कविता वाचन करण्यासाठी तुमचे स्वतःचे पॉडकास्ट सुरू करू शकता आणि त्यानंतर जाहिरातदारांद्वारे पैसे मिळवू शकता.

#12. ई-बुक लेखक

तुमचा ऑनलाईन बिजनेस तुम्हाला लेखणाच्या छंदात मदत करू शकतो! जर तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान असेल आणि तुमच्याकडे लेखनाचे कसब असेल तर तुम्ही त्या ज्ञानाचा वापर ई-बुकमध्ये रूपांतरित करू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची जाहिरात करा आणि पैसे लावत असल्यामुळे ते डाउनलोड करण्यासारखं बनवा.

#13. ऑनलाईन कोचिंग/शिकवणी

जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तज्ञ आहात आणि तुम्हाला शिकवण्यात स्वारस्य आहे अशावेळी तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण देऊ शकता. COVID नंतरचा जगातील हा सर्वोत्तम ऑनलाईन व्यवसाय आहे आणि प्रत्येकाला घराच्या सुखसोयीतून सर्व काही पाहिजे आहे. तुम्ही कोणताही विषय घेवू शकता जसे की, योग किंवा पाककला इत्यादी.

#14. आभासी सहाय्यक

तुम्ही नेहमी तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी साहित्य आयोजित करीत आहात? तुम्हाला सर्व गोष्टींचा जॅक म्हटले जाते का? मग, ही नोकरी तुमच्यासाठीच आहे! हे वैयक्तिक सहाय्यक बनण्यासारखे आहे. प्रकल्प व्यवस्थापनात तुम्ही काही मोठ्या लोकांना संशोधन करण्यास आभासी मदत करू शकता

#15. ऑनलाइन फॅशन बुटीक

तुम्ही फॅशनिस्ट असाल आणि इतरांना स्टाईल करून देण्यास आवडत असल्यास तुम्ही स्वतःची ऑनलाईन फॅशन बुटीक तयार करण्याचा आणि स्वतःचा फॅशन ब्रँड बनवण्याचा विचार करू शकता. तुम्ही ॲमेझॉन,मिंत्रा, फ्लिपकार्ट इ. सारख्या ई-कॉमर्सद्वारे कपडे आणि उपकरणे ऑनलाईन विकू शकता. शिवाय, तुम्ही फॅशन सल्लागार किंवा फॅशन सल्ल्याची आवश्यकता असलेल्या लोकांसाठी व्हर्च्युअल स्टायलिस्ट म्हणून देखील काम करू शकता!

फायनल टेकअवे!

तुम्हाला आता कळले असेल की इंटरनेटने संपूर्ण जग काबीज केले आहे, विशेषत: व्यवसाय जग. हे तुम्हाला घरातूनच जगापर्यंत पोहोचण्याची संधी देते. तुम्हाला आता कोण रोखत आहे? तुमच्या स्वप्नांना नवीन उड्डाण द्या! तुम्ही स्वतःचा बॉस व्हा! तुमच्या कार्याचे वेळापत्रक तयार करा आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करा. पैसे कमवण्यासाठी आता तुमचा ऑनलाईन बिजनेस सुरू करा. आत्ताच तुमचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करा. हे फक्त एक पाऊल दूर आहे.. आत्ताच तुमचा लॅपटॉप उघडा!

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.