written by Khatabook | September 13, 2021

सर्टिफाईड जीएसटी प्रॅक्टिशनर बनायचं आहे?

×

Table of Content


GST किंवा वस्तू आणि सेवा कायदा संपूर्ण देशामध्ये आकारल्या गेलेल्या अप्रत्यक्ष करांसाठी एकच कायदा निर्दिष्ट करतो. या अंतर्गत प्रत्येक पीओएस किंवा पॉइंट ऑफ सेलवर कर लावला जातो. अशा प्रकारे तीन प्रकारचे कर आहेत:

  • CGST किंवा केंद्राने आकारलेला केंद्रीय GST.
  • SGST किंवा राज्याने आकारलेला राज्य GST.
  • IGST किंवा एकात्मिक GST जो आंतरराज्य विक्रीसाठी आकारला जातो.

2017 पासून, GST कायद्यांतर्गत 1 कोटींपेक्षा जास्त करदात्यांना रिटर्नसाठी अर्ज करताना, नोंदणी करताना शंकाना तोंड द्यावे लागते. यासाठीच सरकारने करदात्यांना रिटर्नसाठी अर्ज करताना आणि अन्य आवश्यकतांसाठी मदत करायला GST प्रॅक्टिशनर आणि फेसिलियशन सेंटर सुरू केले आहेत.

GST प्रॅक्टिशनर्स

GSTP किंवा GST प्रॅक्टिशनर्स कोण आहेत?

GSTP किंवा GST प्रॅक्टिशनरला राज्य आणि केंद्र सरकारकडून करदात्यांच्या वतीने खालील उपक्रम करण्यास मान्यता दिली जाते.

  • योग्य अर्जांसह नोंदणी रद्द करणे किंवा दुरुस्त करणे.
  • GST  कायद्यांतर्गत नवीन नोंदणी अर्ज दाखल करणे.
  • GST रिटर्न मासिक, त्रैमासिक वार्षिक आणि सुधारणांसह किंवा अंतिम रिटर्न जसे की फॉर्म GSTR –1, फॉर्म GSTR –3B, फॉर्म GSTR –9  इत्यादी दाखल करणे.
  • आवक किंवा जावक सप्लाय तपशील प्रदान करणे.
  • उशिरा दाखल केल्याबद्दल दंड, कर, व्याज, शुल्क इत्यादी विविध शीर्षकांअंतर्गत देय देवून इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर क्रेडिट्स बनवून ठेवणे.
  • करदात्याचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उत्तर देणे आणि अपील न्यायाधिकरण किंवा प्राधिकरण, विभागाचे अधिकारी इत्यादींच्या समोर हजर होणे.
  • परतावा किंवा दाव्यांचा अर्ज दाखल करणे.

चला आता GST प्रॅक्टिशनर कसे बनता येईल यावर एक नजर टाकूया. GST प्रॅक्टिशनर होण्यासाठी पात्रता अटींसह प्रारंभ करूया.

GSTP पात्रता आणि अटी:

GST प्रॅक्टिशनर हा:

  • एक भारतीय नागरिक असावा.
  • मानसिक स्वास्थ चांगले असावे.
  • त्याची आर्थिक क्षमता असायला पाहिजे किंवा कधीही दिवाळखोर म्हणून घोषित केलेला नसावा.
  • चारित्र्यवाण असावा आणि दोन वर्षापेक्षा जास्त दिवसांसाठी कारावासात गेलेला नसावा.
  • GST प्रॅक्टिशनरच्या भूमिकेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

GST प्रॅक्टिशनरकडे GST कायद्यामध्ये निर्दिष्ट केलेल्या पात्रता निकषांनुसार खालीलपैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.

  • निवृत्त अधिकारी जसे राजपत्रित गट-ब अधिकारी किंवा समान स्तरावर दोन वर्षांचा कामाचा अनुभव असलेले, राज्य सरकार, व्यावसायिक कर विभाग किंवा केंद्रीय सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क अधिकारी.
  • कायदा, वाणिज्य, बँकिंग, व्यवसाय व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन, उच्च लेखापरीक्षण इत्यादी पदव्या असलेल्या भारतीय विद्यापीठांमधून पदव्युत्तर/पदवीधर आणि स्वायत्त परदेशी विद्यापीठातील पदवीधरदेखील पात्र मानले जातात.
  • त्याने GSTP म्हणून नियुक्तीसाठी शासकीय परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • नोंदणीकृत कर परतावा तयार करणारा किंवा विक्री कर प्रॅक्टिशनर म्हणून पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्ती.
  • परदेशी/भारतीय विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे पदवीधर आणि खालीलपैकी कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण असायला पाहिजे.
  • इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा
  • इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा
  • इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा

बहुतेक नावनोंदणी आणि GSTP च्या सरावासाठी संगणक ऑपरेशन, एक्सेल शीट, स्प्रेडशीट आणि फॉर्ममध्ये योग्य माहिती आवश्यक असल्याने, तुमच्याकडे खालील बाबी असणे आवश्यक आहे-

  • आधार कार्डसह लिंक मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड
  • ई-मेल आयडी
  • व्यावसायिक पत्ता
  • आधार कार्ड

GST प्रॅक्टिशनर परीक्षा महत्वाची का आहे?

GST प्रॅक्टिशनर परीक्षा सर्व GST प्रॅक्टिशनरसाठी अनिवार्य आहे. हे प्रमाणित करते की तुम्ही सक्षम आहात आणि करदात्यांचा विश्वास आणि विश्वासार्हता कमवण्यास योग्य आहात. GST प्रॅक्टिशनर म्हणून नावनोंदणीच्या दोन वर्षांच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण करायला पाहिजे. 1 जुलै 2018 पूर्वी GSTP  म्हणून नोंदणी केलेल्यांना GST प्रॅक्टिशनर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 1 वर्ष मिळते. GST प्रॅक्टिशनरचा पगारदेखील प्रमुख आकर्षण आहे. कारण, भारतात सरासरी कमाई वार्षिक 6,40,000 रुपये आहे.

हेही वाचा: भारतात जीएसटीचे प्रकार - सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी म्हणजे काय?​​

GST प्रॅक्टिशनर कसे व्हावे?

तुम्हाला GSTP साठी GST पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक GSTP परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील. 2-स्टेपमध्ये खाली प्रक्रिया स्पष्ट केली आहे.

स्टेप 1:

फॉर्म PCT-01 वापरून GST पोर्टलवर नोंदणी आणि नावनोंदणी प्रमाणपत्रासह GST प्रॅक्टिशन म्हणून नावनोंदणीसाठी PCT-02 फाॅर्म भरा. ही नोंदणी आणि नावनोंदणी प्रक्रिया TRN किंवा तात्पुरता संदर्भ क्रमांक निर्माण करण्यासाठी GST पोर्टलवर केली जाते. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाला एक ओटीपी प्राप्त होतो आणि तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड करू शकता. अशा नोंदणीच्या व्हेरिफिकेशनच्या 15 दिवसांच्या आत नोंदणी क्रमांक आणि प्रमाणपत्र नोंदणीकृत मेल-आयडीवर पाठवले जाते.

स्टेप 2:

GST प्रॅक्टिशनर म्हणून सर्टिफिकेशनसाठी NACIN च्या जीएसटीपी परीक्षेत क्वालिफाई करा: GST प्रॅक्टिशनर परीक्षा नोंदणी आणि प्रमाणन GSTP नावनोंदणीच्या 2 वर्षांच्या आत मंजूर होणे आवश्यक आहे. NACIN (नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स) GSTP परीक्षेत प्रमाणित GST प्रॅक्टिशनर म्हणून पात्र होण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत. येथे या परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर, करदात्यांनी त्यांच्या पसंतीच्या GST प्रॅक्टिशनरशी संपर्क साधण्यासाठी नोंदणी केलेल्या प्रॅक्टिशनरची यादी GST पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल.

GST पोर्टलवर GST प्रॅक्टिशनर म्हणून प्रमाणपत्रासाठी नावनोंदणी आणि नोंदणी करण्यासाठी येथे स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया दिली आहे.

स्टेप -1: GSTP नोंदणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया:

  • https://www.gst.gov.in/ ही लिंक वापरून वेबसाईटवर लॉग इन करा.

 

  • "सेवा" टॅबवर क्लिक करा. 'नोंदणी' निवडा आणि 'नवीन नोंदणी' टॅबवर क्लिक करा.

 

अशा पद्धतीची स्क्रीन खाली दिसेल.

  • ड्रॉप-डाउनमध्ये दिसणाऱ्या 'मी एक आहे' सूचीमधून तुम्ही GSTP निवडणे आवश्यक आहे आणि ड्रॉप-डाउन बॉक्समधील सूचीमधून केंद्रशासित प्रदेश /राज्य /जिल्हा निवडावा लागेल.
  • कायदेशीर नावाअंतर्गत, तुमच्या पॅन कार्डवरील नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • OTP प्राप्त करण्यासाठी अधिकृत स्वाक्षरीकर्ता/ GSTP चा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर दाखल करा.
  • कॅप्चा चाचणीमध्ये कोड वर्ण दाखल करा आणि पेजच्या तळाशी असलेल्या 'पुढे जा' टॅबवर क्लिक करा. हे त्या पेजवर नेते जेथे पॅनशी संबंधित GSTP आयडी, प्रोव्हिजनल आयडी/ GSTIN/ GSTIN प्रदर्शित आणि मान्य केले जातात. मग तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन पेजवर नेण्यात जाते .
  • मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP आणि त्यानंतर नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवलेला OTP दाखल करा. एकदा तुम्ही दोन्ही  OTP दाखल केल्यानंतर, पेजच्या शेवटी 'पुढे जा' टॅबवर क्लिक करा.
  • आता तुम्ही पुढील पेजवर पोहोचाल जिथे तुम्हाला सर्व तपशील भरावा लागेल, कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • तुम्हाला ई-मेलद्वारे 15 अंकांचा तात्पुरता संदर्भ क्रमांक प्राप्त होईल. TRN क्रमांक आणि कॅप्चा कोड दाखल करा. नंतर पुढे जावर क्लिक करा.
  • तुम्हाला 2 OTP फोनवर आणि अन्य ई-मेल द्वारे प्राप्त होतील. पुढील पेजवर, "माझे सेव्ह केलेले अर्ज" वर OTP दाखल  करा आणि कृती अंतर्गत संपादित चिन्हावर क्लिक करा.

 

खालीलप्रमाणे 'सामान्य तपशील' भरा.

  • ड्रॉप-डाउन सूचीमधून योग्य नोंदणी प्राधिकरणासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेश/केंद्र दाखल करा.
  • योग्य बॉक्समधून संस्था/विद्यापीठाचा तपशील, पदवीचे वर्ष, पात्रता पदवी तपशील आणि पुरावा दस्तऐवजाचा प्रकार आणि त्यांची ड्रॉप-डाउन यादी दाखल करा.
  • सर्व संबंधित दस्तऐवज JPEG/PDF कम्प्रेस्ड स्वरूपात निवडा आणि अपलोड करा.
  • एकदा पूर्ण झाल्यावर, पुढे जाण्यासाठी 'सेव्ह करा आणि सुरू ठेवा' बटण वापरा.

अर्जदाराचा सर्व तपशिल भरा

  • जन्म तारीख.
  • पहिले नाव, मध्य आणि आडनाव/ शेवटचे नाव.
  • लिंग.
  • आधार क्रमांक.
  • JPEG फोटोग्राफ अपलोड करा.
  • पुढील स्टेप भरण्यासाठी सेव्ह करा आणि सुरू ठेवा' वर क्लिक करा.

व्यावसायिक पत्ता भरा

  • योग्य पिन कोडसह सरावाच्या जागेचा पूर्ण पत्ता दाखल करा.
  • पत्त्याचा पुरावा म्हणून तयार केलेले दस्तऐवज निवडा आणि नंतर PDF/JPEG स्वरूपात दस्तऐवज अपलोड करा.
  • सेव्ह करा आणि सुरू ठेवा' वर क्लिक करा.

पूर्ण व्हेरिफिकेशन

  • व्हेरिफिकेशन स्टेटमेंट चेक बॉक्समध्ये टिक करा.
  • नावनोंदणी स्थळाचा तपशील प्रविष्ट करा.
  • सबमिशन आणि व्हेरिफिकेशन स्वरूप जसे की Sign, DSC किंवा EVC निवडण्यासाठी पर्यायांवर क्लिक करा.

ई-स्वाक्षरीचा वापर करणे

  • 'ई-साइनसह सबमिट' बटण निवडा आणि 'सहमत' बटणावर क्लिक करा.
  • SMS  ईमेलद्वारे पाठवलेली ई-स्वाक्षरी आणि 2 OTP दाखल करा आणि 'सुरू ठेवा' बटण दाबा.
  • सबमिशनची पावती 15 मिनिटांमध्ये ई-मेल आणि SMS द्वारे तयार केली जाते.

DSC चा वापर करणे

  • 'DSC सह सबमिट' बटण निवडा आणि DSC पर्याय वापरून सबमिट करण्यासाठी 'पुढे जा' वर क्लिक करा.

EVC- इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड वापरणे

  • 'EVC सह सबमिट करा' टॅब निवडा आणि "सहमत" वर क्लिक करा.
  • आधार-लिंक केलेल्या फोन क्रमांकावर पाठवलेला OTP दाखल करा आणि 'सुरू ठेवा' वर क्लिक करा.
  • ARN- सह एक पावती अप्लिकेशन संदर्भ क्रमांक तयार केला जातो आणि 15 मिनिटांच्या आत ई-मेल आणि SMS द्वारे पाठवली जाते.

GSTP परीक्षा कशी द्यायची याविषयी येथे तुम्हाला कळेल.

हेही वाचा: ई-वे बिल काय आहे? ई-वे बिल कसे तयार करावे?

स्टेप-2: NACIN च्या GSTP सर्टिफिकेशनसाठी पात्र कसे व्हावे

GST प्रॅक्टिशनर परीक्षा

सर्व पात्र उमेदवारांनी:

  1. पात्रता व्हेरफिकेशनसाठी संबंधित अधिकाऱ्याला भेटा.
  2. फॉर्म PCT-01 वापरून GST पोर्टलवर नोंदणी करा आणि फॉर्म PCT-02 वापरून ARN नोंदणी क्रमांक मिळवा.
  3. उमेदवाराने GSTP म्हणून नावनोंदणी केल्यावर दोन वर्षांच्या आत GSTP प्रमाणन परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

संचालन प्राधिकरण:

NACIN- नॅशनल ॲकडमी ऑफ कस्टम्स, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटिक्स परीक्षांना सरकारद्वारे GST प्रॅक्टिशनर कोर्स प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.

GST प्रॅक्टिशनर परीक्षेची तारीख: 

GSTP परीक्षा द्विवार्षिकपणे भारतभरातील नियुक्त केंद्रांवर आणि GST पोर्टल, वर्तमानपत्र आणि GST कौन्सिलच्या सचिवालयात NACIN द्वारे अधिसूचित केलेल्या तारखांवर आयोजित केल्या जातात.

GST प्रॅक्टिशनर परीक्षा वेबसाईट तपशील:

तुम्ही GST नोंदणीसाठी क्रमांक वापरकर्ता आयडी आणि पॅनचा तपशील पासवर्ड म्हणून वापरून http://nacin.onlineregistrationform.org या लिंकवर GSTP परीक्षेसाठी नोंदणी करू शकता.

GST परीक्षा शुल्क तपशील:

GST प्रॅक्टिशनर परीक्षेचा तपशील ऑनलाईन नोंदणी शुल्क NACIN वेबसाईटवर पेमेंट पर्यायांसह उपलब्ध आहे.

GSTP परीक्षा:

जीएसटी प्रॅक्टिशनरची परीक्षा ही ऑनलाईन परीक्षा आहे ज्यामध्ये 100 मल्टिपल चॉईस प्रश्नांची उत्तरे 2.5 तासात द्यायची असतात आणि 50% गुण पात्र व्हायला पाहिजे असतात. दोन वर्षांच्या प्रयत्नांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही.

निकाल जाहीर करणे:

NACIN परीक्षेच्या एका महिन्यात पोस्ट/ई-मेल द्वारे निकाल कळवते.

GST प्रॅक्टिशनर कोर्स परीक्षा अभ्यासक्रम:

GST प्रॅक्टिशनर परीक्षेचे प्रश्न 2017 च्या खालील कायद्यांमध्ये नमूद केलेल्या 'GST प्रक्रिया आणि कायद्यावर आधारित आहेत.

  • IGST- एकात्मिक वस्तू आणि सेवा कर कायदा
  • CGST- केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा
  • SGST-राज्य वस्तू आणि सेवा कर कायदा
  • GST कायद्यांतर्गत राज्यांना भरपाई
  • UTGST- केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर कायदा
  • केंद्रीय, एकात्मिक वस्तू आणि सेवा आणि सर्व राज्यांचे GST नियम
  • वरील नियम आणि नियमांनुसार जारी केलेले आदेश, अधिसूचना, नियम आणि आदेश.

GSTP परीक्षेत काय करावे आणि काय करू नये

करा:

  • GSTP परीक्षेसाठी नेहमी आगाऊ नोंदणी करा आणि परीक्षा शुल्क वेळेवर भरल्याची खात्री करा.
  • फाईलिंग प्रक्रिया, नियम, विविध कायदे आणि अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या आदेशांचा अभ्यास करा.
  • ॲडमिट कार्ड, व्होटर आयडी, पॅन, पासपोर्ट, आधार कार्ड इत्यादी मूळ प्रती घेतल्याच्या खात्री करा.

करू नका:

  • परीक्षा सुरू होण्याच्या 15 मिनिटांपूर्वी गेट बंद होण्याच्या कारणाने उशीरा नका पोहचू. नेहमी अर्धा तास पुढे राहा.
  • तेथील सॉफ्टवेअर/हार्डवेअरसह छेडछाड करू नका.
  • ब्लूटूथ साधने, मोबाईल फोन इत्यादी घेवून जाऊ नका, योग्य साधनांचा वापर करा, कॉपी किंवा गैरवर्तन करू नका.

परवाना वैधता:

GST प्रॅक्टिशनर परवाना आयुष्यभर आणि केवळ नोंदणी केलेल्या क्षेत्रातच वैध आहे.

GST प्रॅक्टिशनरद्वारे सराव:

  • नावनोंदणीवर, GST प्रॅक्टिशनर GST प्रॅक्टिशनर लॉगिनसाठी पोर्टल वापरून क्लायंटसाठी रिटर्न भरू शकतो आणि अधिकृततेसाठी GST PCT -05 फॉर्म भरू शकतो.
  • GSTP व्हेरिफाय करण्यासाठी आणि वेळेवर रिटर्न भरण्यास बांधील आहे आणि योग्य काळजी घेऊन अशा फॉर्ममध्ये GSTP डिजिटल स्वाक्षरी असल्याची खात्री करते.
  • भरलेले GST रिटर्न व्हेरिफाय आणि GST अधिकाऱ्याने मंजूर केले आहेत आणि SMS आणि ई-मेलद्वारे दाखल केलेल्या रिटर्नची पुष्टी करण्यासाठी नोंदणीकृत करदात्याची आवश्यकता आहे.
  • जर क्लायंट शेवटच्या फाईलिंग तारखेपूर्वी असे करण्यात अयशस्वी झाला, तर GSTP ने दिलेले रिटर्न अंतिम मानले जाईल.
  • जर ग्राहक क्लायंट GSTP सेवांबाबत असमाधानी असेल तर ते GST पोर्टलवर सबमिट केलेले अधिकृतता फॉर्म मागे घेऊ शकतात.
  • GST प्रॅक्टिशनर्सने नोंदवलेल्या कोणत्याही गैरव्यवहाराची GST अधिकाऱ्याद्वारे GSTP ची निष्पक्ष सुनावणी करण्याची तरतूद आहे, त्यांना GSTP सराव परवाना रद्द/ अपात्र ठरवण्याचा अधिकृत अधिकार आहे.

GST प्रॅक्टिशनर फॉर्म:

GST प्रॅक्टिशनरसाठी आवश्यक फॉर्म आहेत:

फाॅर्म GST PCT-1

GSTP नावनोंदणी अर्ज.

फाॅर्म GST PCT-2

GST अधिकाऱ्याने जारी केलेल्या GST प्रॅक्टिशनरसाठी नावनोंदणी प्रमाणपत्र फॉर्म.

फाॅर्म GST PCT-3

GSTP च्या नावनोंदणी अर्जावर/ गैरव्यवहाराची तक्रार नोंदवण्याची कारणे दाखवा नोटीस.

फाॅर्म GST PCT-4

गैरव्यवहार प्रकरणांमध्ये नामांकन नाकारणे/ GSTP अपात्रतेबाबत आदेश.

 

सराव कसा असतो:

GST प्रॅक्टिशनरचा सराव साधारणपणे खालील स्टेपचे अनुसरण करतो.

  • ग्राहक फॉर्म GST PCT-5 वापरून पोर्टलवरील GSTP सूचीमधून GSTP निवडतो आणि GSTP PCT-6 वापरून रिटर्न भरण्यास आणि तयार करण्यासाठी GSTP ला अधिकृत करतो. फॉर्म GST PCT -7 वापरून अशा प्रकारच्या अधिकृततेला मागे घेता येते. 
  • GST प्रॅक्टिशनर GST पोर्टलवर आपली ओळख सिद्ध करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी वापरून रिटर्न तयार करतो, व्हेरिफाय आणि फाईल करतो.
  • रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत क्लायंटकडून SMS/ई-मेलद्वारे पुष्टीकरण आवश्यक आहे. प्रदान न केल्यास, पोर्टलवर प्रवेश केलेले आणि GSTP द्वारे दाखल केलेले रिटर्न अंतिम मानले जातात.
  • करपात्र क्लायंटने नेहमी भरलेले GSTP स्टेटमेंट व्हेरिफाय करणे आवश्यक आहे कारण सादर केलेल्या रिटर्नची जबाबदारी क्लायंटची असते GST प्रॅक्टिशनरची नाही.

GST प्रॅक्टिशनर म्हणून सराव सुरू करण्यासाठी नावनोंदणी आणि परीक्षेच्या शुभेच्छा!

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. GST प्रॅक्टिशनर कोण आहे?

GST प्रॅक्टिशनर एक व्यावसायिक आहे जो कर परतावा आणि इतर संबंधित उपक्रम तयार करायला मदत करतो.

2. मी माझ्या क्लायंटसाठी GST रिटर्न भरू शकतो का?

होय, तुम्ही हे करू शकता. फक्त यासाठी तुम्ही नोंदणीकृत GST प्रॅक्टिशनर असावे.

3. मी माझा GST प्रॅक्टिशनर नोंदणी अर्ज पूर्ण करू शकत नसल्यास ते सेव्ह करू शकतो का?

होय, तुम्ही तुमचे नोंदणी अर्ज सेव्ह करू शकता. परंतु ते तुमच्या TRN जनरेशन तारखेपासून केवळ 15 दिवसांसाठी वैध आहे.

4. मी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात नोंदणी करावी का?

अखिल भारतीय आधारावर सराव करण्यासाठी एकच नोंदणी पुरेशी आहे.

5. GSTN मला माझ्या क्लायंटच्या वतीने काम करण्यासाठी स्वतंत्र वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड देईल का?

होय, GSTN तुम्हाला तुमच्या क्लायंटच्या वतीने काम करण्यासाठी GSTP ला वेगळा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड देतो.

6. करदाते GSTP बदलू शकतात का?

होय, करदाता GST पोर्टलवर आपला GSTP बदलू शकतो.

7. GST प्रॅक्टिशनरच्या परीक्षेसाठी मी किती पैसे द्यावे?

GST प्रॅक्टिशनरची परीक्षा फी NACIN द्वारे सेट केली जाते. सध्या ते 500 रुपये आहे.

 

 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.