written by Khatabook | January 3, 2022

भारतीय अर्थव्यवस्थेवर जीएसटीचा प्रभाव

×

Table of Content


संपूर्ण देशासाठी एकच कर असावा ही कल्पना समोर ठेवून  2017 मध्ये भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू करण्यात आला. ही कर सुधारणा सर्वांत मोठ्या कर सुधारणांपैकी एक मानली जाते. जीएसटीमध्ये अनेक कर समाविष्ट केले गेले, ज्यामुळे करांचा व्यापक प्रभाव नाहीसा झाला. जीएसटीचा संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी,जीएसटी म्हणजे काय आणि ते कसे लागू केले जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. जीएसटीचा विविध क्षेत्रांवर कसा परिणाम होतो हेही आपण या लेखात तपशिलवार पाहूया.

जीएसटी म्हणजे काय?

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा देशाच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर आणि विक्रीवर लादला जातो. उत्पादन प्रक्रियेची प्रत्येक पायरी कर आकारणीच्या अधीन आहे. खरेदीदार आणि उत्पादक दोघेही जीएसटीच्या अधीन आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, जीएसटी उपभोगाच्या ठिकाणी गोळा केला जातो. म्हणजेच, आपण जर हरियाणात उत्पादन बनवून दिल्लीत विकल्यास दिल्लीत कर लागू होईल. याव्यतिरिक्त, उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जातो, जेव्हा अतिरिक्त मूल्य समाविष्ट केल्या जाते.

जीएसटीचे प्रकार

भारतात, उत्पादने आणि सेवांच्या निर्मिती आणि विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जातो. जेव्हा वस्तू किंवा सेवांचा उपभोग घेतला जातो, तेव्हा हा कर लागू केला जातो. खाली जीएसटीचे प्रकार दिले आहेत:

  1. सीजीएसटी(केंद्रीय वस्तू आणि सेवा कर): केंद्र सरकार वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्य विक्रीवर सीजीएसटी गोळा करते.
  2. एसजीएसटी (राज्य वस्तू आणि सेवा कर): हा कर राज्य सरकारकडून वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्य पुरवठ्यावर लावला जातो.
  3. आयजीएसटी (एकत्रित वस्तू आणि सेवा कर): दोन राज्यांमधील वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीवर आयजीएसटी कर आकारला जातो. संघराज्य आणि राज्य सरकारे कर महसूल विभाजित करतात.

जीएसटीची अंमलबजावणी

सर्वांसाठी लाभाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी देशभरातील 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जीएसटी लागू करण्यात आला. कमी कर भरणे, विशिष्‍ट नियम आणि साधी खातेवही पद्धती निर्माते आणि व्यापार्‍यांना यामुळे मदत होईल; उत्पादने आणि सेवांसाठी ग्राहकांना कमी पैसे द्यावे लागतील. महसूल गळती थांबवून सरकार अधिक महसूल मिळवेल. जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे, वास्तविक परिस्थिती वेगळीच आहे. तर, जीएसटीचा भारतात काय प्रभाव आहे?

अर्थव्यवस्थेवर जीएसटीचा तात्काळ प्रभाव

  • सरलीकृत कर रचना

जीएसटीमुळे देशाची कर रचना सुव्यवस्थित झाली आहे. जीएसटी हा एकच कर असल्याने, विविध पुरवठा साखळी स्तरांवर करांची गणना करणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे भारतावर जीएसटीचा प्रभाव सकारात्मक मानला जाऊ शकतो. ग्राहक आणि उत्पादक दोघेही त्यांच्याकडून किती कर आकारला जाईल आणि तो  कशा प्रकारे मोजला जाईल हे पाहू शकतात. तसेच, कर अधिकारी आणि अन्य अधिकारी यांच्याशी व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी टाळणेही शक्य आहे.

  • एसएमईसाठी समर्थन

लहान आणि मध्यम आकाराचे व्यवसाय आता जीएसटी रचना योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतात. या व्यवस्थेअंतर्गत ते त्यांच्या वार्षिक महसुलावर आधारित कर भरतात. परिणामी वार्षिक महसूल 1.5 कोटी असलेल्यांनी फक्त 1% जीएसटी भरणे आवश्यक आहेत. तसेच, 50 लाखांची उलाढाल असलेल्या इतर व्यवसायांना 6% दराने जीएसटी भरावा लागेल.

  • उत्पादनासाठी अतिरिक्त निधी

एकूण करपात्र रकमेतील कपात हा भारतीय अर्थव्यवस्थेवर जीएसटीचा आणखी एक परिणाम आहे. वाचवलेला हा पैसा आउटपुट वाढवण्यासाठी उत्पादन प्रक्रियेत पुन्हा गुंतवला जाऊ शकतो.

  • करांचा व्यापक  प्रभाव हटवणं

जीएसटी अंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारचे कर एकत्र केले गेले आहेत. यामुळे करांचा व्यापक प्रभाव दूर झाला आहे, खरेदीदार आणि विक्रेता दोघांवरील भार कमी झाला आहे. त्यामुळे, तुम्ही मोठ्या प्रमाणात कर भरत असल्याचे दिसत असले तरी, तुम्ही कमी छुपे कर भरत आहात.

  • भारतभर सुधारित ऑपरेशन्स

टोल प्लाझा आणि चेकपॉइंट्स यांसारखे कर अडथळे आता टाळता येतील. पूर्वी, यामुळे वाहतुकीदरम्यान असुरक्षित वस्तूंचे नुकसान यासारख्या समस्या उद्भवल्या होत्या. परिणामी, नुकसान भरून काढण्यासाठी उत्पादकांना बफर स्टॉक राखून ठेवावा लागला. त्यांचा नफा स्टोरेज आणि वेअरहाउसिंगच्या अतिरिक्त खर्चामुळे मर्यादित होता. जीएसटीच्या सकारात्मक प्रभावाची पूर्तता करणाऱ्या एकात्मिक कर प्रणालीद्वारे या समस्या कमी झाल्या आहेत. ते आता त्यांचे सामान भारतभर सहज ने-आण करू शकतात. परिणामी, संपूर्ण भारतात त्यांचे कामकाज सुधारले आहे.

  • उत्पादन वाढवणे

भारतीय किरकोळ उद्योगानुसार एकूण कर घटक उत्पादन खर्चाच्या सुमारे 30% आहे. भारतात जीएसटीच्या प्रभावामुळे कर कमी झाले आहेत. परिणामी, अंतिम ग्राहक कमी कर भरतो. कराचा बोजा कमी केल्याने किरकोळ आणि इतर व्यवसायांचे उत्पादन आणि वाढ वाढली आहे.

  • निर्यातीत वाढ

निर्यात होणाऱ्या उत्पादनांवरील सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे. भारतातील जीएसटीच्या प्रभावामुळे स्थानिक बाजारपेठेतील उत्पादन खर्च कमी झाला आहे. या सर्व कारणांमुळे देशाचा निर्यात दर वाढला आहे. जेव्हा जगभरात आपल्या कंपन्या विकसित करण्याची गोष्ट येते आहे, तेव्हा कंपन्या अधिक स्पर्धात्मक झालेल्या दिसत आहेत.

जीएसटी लागू केल्याने राज्य आणि संघराज्य करांचे एकत्रीकरण करण्यात मदत झाली आहे. याचा परिणाम म्हणून असंख्य करांचा व्यापक प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे व्यवसाय आणि ग्राहकांवरील कराचा बोजा कमी झाला आहे. तसेच, करदात्यांची संख्या वाढली आहे, परिणामी कर उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण कर प्रणाली आता प्रशासनासाठी सोपी झाली आहे. शिवाय, छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना त्यांचे कार्य वाढवण्यास मदत झाली आहे. असे मानले जाते की जीएसटीचा सकारात्मक प्रभाव अधिकाधिक भारतीय व्यवसायांना परदेशी बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत करेल.

हेही वाचा: जीएसटी: तिमाही रिटर्न फाईलिंग आणि कराचे मासिक पेमेंट (QRMP)

जीएसटीचा प्रभाव: छोटे उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर 

ग्राहकांना आता त्यांनी खरेदी केलेल्या बहुतांश वस्तू आणि सेवांवर अधिक कर भरावा लागेल. मोठ्या प्रमाणात दैनंदिन वस्तूंवर आता समान दराने किंवा थोडासा जास्त कर आकारला जातो. शिवाय, जीएसटी स्वीकारण्याशी संबंधित अनुपालनाची किंमत आहे. अनुपालनाची ही किंमत छोटे-उत्पादक आणि व्यापार्‍यांसाठी अधिक आणि महाग असल्याची दिसून येते, त्यांनी याचा विरोधदेखील व्यक्त केला आहे. त्यांना त्यांच्या मालासाठी अधिक शुल्क भरावे लागू शकते.

जीएसटीचा ग्राहकांवर काय प्रभाव आहे?

  • अल्प-मुदतीच्या प्रभावांवर आधारित ग्राहकांना आता त्यांनी खरेदी केलेल्या उत्पादनांवर आणि सेवांवर जास्त कर भरावा लागेल.
  • मोठ्या प्रमाणात आवश्यक उपभोग्य वस्तूंवर समान दराने किंवा जास्त दराने कर आकारला जाईल. सरासरी व्यक्तीवर जीएसटीचे फायदे किंवा सकारात्मक प्रभाव अनेक आहेत.
  • लघु-उद्योगांनादेखील अनुपालनाची किंमत मोजावी लागेल, ज्यामुळे त्यांच्या वस्तूंच्या किंमतींचा प्रभाव ग्राहकांवर होऊ शकतो.
  • भारतातील जीएसटी प्रभावांचे अनेक दीर्घकालीन फायदे आहेत. फास्ट-मूव्हींग कंझ्युमर गुड्स किंवा एफएमसीजीसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्यांसाठी देय कर कमी केल्यामुळे, ऑटोमोबाईल उद्योगाला त्याच्या उत्पादनांची किंमत कमी करण्यास भाग पाडले जाईल. यामुळे या सेवा मिळवण्याचा प्रयत्न करताना ग्राहक कमी पैसे देण्यास सक्षम होतील.
  • किंमतीतील कपात त्वरित मागणी वाढवेल, उत्पादन चक्राला गती देईल आणि नफा वाढवेल. खरेदीदार आणि विक्रेता दोघांचेही शेवटी पैसे वाचतील आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.
  • उत्पादनातील वाढीमुळे विकासाचा मार्ग तयार होईल, ज्यामुळे अधिक नोकऱ्या मिळतील आणि अधिक महसूल जीएसटी प्रभावांना पूर्ण करेल. हे केवळ सरासरी व्यक्तीसाठी संधीच वाढवत नाही तर अर्थव्यवस्थेलाही मदत करते.
  • जीएसटी लागू केल्याने कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी इनव्हाॅईस तयार करणे आवश्यक आहे.
  • चांगल्या बिलिंग सिस्टममुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होईल. भारतातील काही व्यक्तीसाठी हे त्रासदायक घटक आहेत.

जीएसटीचा विविध क्षेत्रांवर परिणाम

  • फार्मा

याच्या सुव्यवस्थित कर रचनेमुळे, औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा उद्योगांना भारतातील जीएसटीच्या प्रभावाचा फायदा होईल. आरोग्यसेवा अधिक परवडणारी आणि सर्व आर्थिक स्तरावरील व्यक्तींसाठी योग्य बनवण्याच्या बदल्यात याला कर सूट ही मिळेल.

  • ई-कॉमर्स

ई-कॉमर्समध्ये विस्तारासाठी भरपूर वाव आहे जसे की कर दर कमी करून वस्तूंच्या उत्पादनाच्या पुरवठा साखळी प्रक्रियेला फायदा होतो. दुसरीकडे, ई-कॉमर्स व्यवसायांना स्त्रोत घटकावर गोळा केलेल्या जीएसटी कराचा सामना करावा लागेल.

  • दूरसंचार क्षेत्र

स्टोरेज, शिपिंग आणि इतर खर्च कमी झाल्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील किंमती घसरण्याचा अंदाज आहे.

  • लॉजिस्टिक (रसद)

आपल्यासारख्या मोठ्या देशाच्या अर्थव्यवस्थेत लॉजिस्टिक महत्त्वाची भूमिका बजावते. एक सुव्यवस्थित आणि संरचित लॉजिस्टिक व्यवसाय, विशेषत: मेक इन इंडिया बॅनरखाली, मोठ्या प्रमाणावर विकसित होण्याची क्षमता आहे.

  • फास्ट-मूव्हींग कंझ्युमर गुड्स किंवा एफएमसीजी

एफएमसीजी कंपन्या लॉजिस्टिक आणि वितरणावर खूप पैसे वाचवतील कारण जीएसटी अनेक विक्री डेपो हटवेल.

  • शेती आणि कृषी

भारताच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा सर्वाधिक आहे, म्हणजेच वाटा 18% पेक्षा जास्त आहे. लॉजिस्टिक अधिक कार्यक्षम झाल्यामुळे कृषी मालासाठी वाहतूक खर्च ही कमी होईल. परिणामी, जीएसटीचा घाऊक विक्रेत्यांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

  • स्टार्टअप्स

जीएसटीमुळे भारतीय उद्योजकांना खूप फायदा झाला आहे, जसे की अनुपालन दृष्टीकोन स्वत: करा, उच्च नोंदणी मर्यादा, उत्पादने आणि सेवांची मुक्त ने-आण आणि खरेदीवर कर क्रेडिट. संपूर्ण भारतात उपस्थिती असलेल्या, विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांसाठी कर मोजणे सोपे झाले आहे. तुम्ही लघुउद्योगात काम करत असल्यास, तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेवर जीएसटीच्या प्रभावांची जाणीव असायला हवी.

  • ऑटोमोबाईल

उत्पादन शुल्क, व्हॅट, विक्री कर, रस्ता कर, मोटार वाहन कर आणि नोंदणी शुल्क यासह जुन्या करप्रणाली अंतर्गत अनेक कर लागू केले गेले होते, ज्याची जागा आता जीएसटीने घेतली आहे. ऑटोमोबाईल खर्च कमी होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे विक्री आणि नफा वाढेल.

  • वस्त्रोद्योग क्षेत्र

वस्त्रोद्योग हे भारतातील कुशल आणि अकुशल दोन्ही कामगारांचे प्रमुख नियोक्ते आहेत. सीमा शुल्क काढून टाकल्यामुळे, भारतातील कापड क्षेत्र, जे एकूण निर्यातीपैकी 10% आहे, वाढण्याची अपेक्षा आहे. कापसावर अनेक छोट्या-मोठ्या कापड कंपन्या अवलंबून असतात, त्यावर जीएसटीचा सकारात्मक परिणाम होईल. छोट्या व्यवसायांवर जीएसटीचे हे काही परिणाम आहेत.

  • स्वतःसाठी काम करणाऱ्या व्यक्ती

स्वयंरोजगार किंवा फ्रिलान्सिंग हा आपल्या देशात तुलनेने नवीन व्यवसाय आहे. तरीही, जीएसटी स्वीकारल्यानंतर, कर भरणे सोपे झाले आहे कारण, ते सेवा पुरवठादारांच्या श्रेणीत येतात. अशा व्यक्तींनी हे समजून घेतले पाहिजे की जीएसटी त्यांच्या व्यवसायावर कसा परिणाम करेल आणि जीएसटीअंतर्गत नियम आणि नियमांचे पालन कसे करावे लागेल.

जीएसटीचा भारतावर परिणाम: भविष्यात काय आहे?

दीर्घकालीन फायद्यांचा विचार केल्यास, जीएसटीमुळे कर दर आणि कर स्लॅब कमी होतील अशी अपेक्षा आहे. ज्या देशांमध्ये वस्तू आणि सेवा कराने आर्थिक परिवर्तनास मदत केली आहे तेथे फक्त दोन किंवा तीन दर वापरले जातात: एक मध्यम दर, आवश्यक उत्पादनांसाठी कमी दर आणि चैनीच्या वस्तूंसाठी उच्च कर दर.

भारतात, आपल्याकडे आता तीन दरांसह पाच स्लॅब आहेत: एकात्मिक दर, एक केंद्रीय दर आणि राज्य दर. या व्यतिरिक्त, उपकर शुल्क आहे. महसूल बुडण्याच्या भीतीने सरकारने कमी किंवा स्वस्त शुल्काचा प्रयोग करणे टाळले आहे. जीएसटी आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम दीर्घकाळात लक्षणीय लाभ देईल अशी अपेक्षा आहे. जीएसटीमुळे महागाईही कमी होईल कारण करावर कोणताही कर लागणार नाही.

यामुळे सरकारचा महसूल वाढेल आणि भारतात अधिक थेट विदेशी गुंतवणूक येईल. जीएसटीमुळे भारतात व्यवसाय करणे सुलभ होईल.

निष्कर्ष

जीएसटी ही भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठी कर सुधारणा आहे. जीएसटीचे अनेक फायदे आणि तोटे आहेत जे ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही प्रभावित करतात. यामुळे भारतात व्यवसाय करणे सोपे होईल, महागाई कमी होईल आणि भारतात थेट परकीय गुंतवणुकीत वाढ होईल. जीएसटीचा जीडीपीवर होणारा परिणाम नकारात्मक आहे कारण त्यामुळे महागाईचा दर वाढतो कारण कर दराने काही उत्पादने आणि सेवा जसे की फार्मा उत्पादने, दूरसंचार, दुग्धव्यवसाय इत्यादींच्या किमती वाढल्या आहेत. या पैलूंचा ही विचार केला पाहिजे. एकीकडे, कर अधिक सोपे झाले आहेत, अनुपालन खर्च वाढला आहे. अशा प्रकारे, भारतीय अर्थव्यवस्थेवर जीएसटीच्या प्रभावाचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. भारतातील जीएसटी प्रभावाचे मूल्यमापन करताना सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे.

जीएसटीविषयी अधिक माहितीसाठी Khatabook अ‍ॅप डाउनलोड करा.

हेही वाचा: जीएसटी अंतर्गत वस्तूंचा सप्लाय करण्याचे ठिकाण

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. जीएसटीचे तीन प्रकार कोणते आहेत?

जीएसटीचे तीन प्रकार आहेत सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर), एसजीएसटी (राज्य वस्तू आणि सेवा कर), आणि आयजीएसटी (एकत्रित वस्तू आणि सेवा कर).

2. जीएसटीचे तोटे काय आहेत?

अनेक वस्तूंचे कराचे दर वाढवण्यात आले आहेत, परिणामी खर्च वाढला आहे. टेक्सटाईल, मीडिया, फार्मास्युटिकल्स, डेअरी उत्पादने, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार या उद्योगांना वाढीव कराचा फटका बसला आहे.

3. जीएसटीचे अध्यक्ष कोण आहेत?

केंद्रीय अर्थमंत्री जीएसटीचे अध्यक्ष आहेत.

4. भारतातील जीएसटीचा सामान्य व्यक्तीवर काय परिणाम होतो?

पूर्वीच्या कररचनेत अनेक स्तरावरील कर आणि उपकर असल्यामुळे सरासरी माणूस करावर कर भरत होता. तथापि, एकत्रित जीएसटीमुळे, उत्पादने आणि सेवांवर कमी कराचा बोजा लादला जाईल आणि किंमती कमी होतील, ज्याचा फायदा अंतिम ग्राहकांना होईल.

5. भारतात जीएसटीचा दर किती आहे?

भारतातील जवळपास सर्व उत्पादने आणि सेवा जीएसटीच्या अधीन आहेत, जे चार दरांमध्ये विभागले गेले आहेत: 5%, 12%, 18% आणि 28%.

6. जीएसटीचे काही फायदे काय आहेत?

जीएसटीचे काही फायदे म्हणजे सरलीकृत कर रचना, करांचा व्यापक प्रभाव दूर करणे, महसुलात वाढ आणि उत्पादनासाठी अधिक निधी इत्यादी आहेत.






 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.