written by khatabook | October 26, 2020

भारतात बेकरी व्यवसाय कसा उघडायचा? अधिक महसूल निर्मितीसाठी काही टिप्स!

×

Table of Content


तुम्हाला केक बनवणे किंवा बेकिंग डिश आवडतात का? मजेदार वेळेत डिशेसवर प्रयोग करण्याची सवय आहे? कपकेक्स आणि बिस्किटांबद्दल विचार करत आहात? तुम्ही तुमच्या बेकिंग कौशल्यांवर काम करून कमाई करण्याचा विचार करत आहात? मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला येथे व्यवसायाच्या महत्वाच्या टिप्स मिळतील! भारतात स्वतःचा बेकिंग व्यवसाय उघडायची हीच चांगली वेळ आहे आणि तुम्ही निर्णय घेतला असल्यास ते खूप उत्तम होईल! भारतात बेकरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे. जागतिकीकरण आणि भारतीयांकडून नवीन गोष्टींच्या मागणीमुळे बेकरी वस्तूंच्या मागणीत गेल्या काही वर्षांत निरंतर वाढ झाली आहे. तुमच्या लक्षात आले असेल की, भारतीय शहरातील प्रत्येक रस्त्यावर कमीतकमी एक बेकरीचे शाॅप आहे आणि त्या शाॅपवर खरेदीदारांची गर्दी बऱ्याच प्रमाणात दिसून येते. मार्च 2019 मध्ये आघाडीच्या बाजार संशोधन कंपनी IMARC ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतीय बेकरी बाजाराने 2018 मध्ये 7.22 अब्ज डॉलर्सचे महसूल गाठले असल्याचे नमूद केले आहे. पुढील 5 वर्षांत बाजार मूल्य 12 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याचा अंदाज ही त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळेच बेकरी शाॅप उघडण्यासाठी त्याविषयी सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळेच या विषयी आपल्याला चर्चा करणं गरजेचे आहे, चला तर मग बेकरी उघडायला कोणत्या पायऱ्यांची आवश्यकता आहे ते पाहूया.

भारतात बेकरी व्यवसाय कसा सुरू करायचा?

तुमच्या बेकरी व्यवसायाची रचना, प्रकार आणि स्वरूप निश्चित करा.

  • होम ऑनलाईन बेकरी : तुमच्या कामाची चित्रे आणि ग्राहकांच्या प्रशस्तिपत्रांसह एखादी वेबसाईट तयार करा. तुम्ही बेकरी सेवा ऑनलाईन सुरू करू शकता आणि तुमच्या घरातूनच चालवू शकता. यासाठी तुम्हाला स्टोअर उघडायची देखील आवश्यकता नाही.
  • काउंटर सर्व्हीस बेकरी शाॅप : तुम्ही स्टोअरफ्रंट बेकरीचे शाॅप उघडू शकता जेथे ग्राहकांची नियमीत ये-जा असते. यामुळे ग्राहकांना बेकरीचे प्राॅडक्ट घेवून जायला सोपे होईल.
  • बेकरी शॉपमध्ये बसायला जागा हवी: तुम्ही ते अशा ठिकाणी उघडू शकता जेथे तुमचे ग्राहक खरेदी करू शकतात, बसू शकतात आणि बेक केलेल्या केकचा आनंद घेऊ शकतात.
  • फूड ट्रक बेकरी शॉप: बेकरी शाॅप तयार करण्याऐवजी तुम्ही तुमचे प्राॅडक्ट्स घरी बेक केल्यावर मोबाईल ट्रकमधून विकू शकता.
  • घाऊक बेकरी: तुमची प्राॅडक्ट्स थेट ग्राहकांना विकण्याऐवजी तुमचे प्राॅडक्ट्स इतर अनेक व्यवसाय जसे की कॅफे, रेस्टॉरंट्स आणि किराणा दुकानात देखील विकू शकता.

बेकरी शॉप व्यवसायाचा प्लॅन तयार करा

भारतात बेकरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, विविध बाबींचा अभ्यास करून आणि बेकरी उद्योजकांचा सल्ला घेतल्यानंतर एक ठोस व्यवसाय प्लॅन तयार करा. हे तुमच्या बेकरीचे बजेट आणि कार्यप्रणाली ठरवून कामाचा आराखडा सोपा करायला मदत करेल.

  • व्यवसाय प्लॅनचा सारांश: तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचे स्पष्ट मिशन स्टेटमेंट, तुमच्या बेकरी शाॅपचा पूर्ण इतिहास, त्याची कल्पना आणि भविष्यातील योजनेचा मार्ग असावा, तुमच्या बेकरी शॉपचे ध्येय आणि मालक म्हणून संपूर्ण रचना तयार असायला पाहिजे.
  • बाजार विश्लेषण : बाजार, स्थान, गुंतवणूकदार, टार्गेट प्रेक्षक आणि प्रतिस्पर्धी यांचे सखोल विश्लेषण करा.
  • व्यवसाय ऑफरिंग आणि मेनू: यात तुमच्या बेकरी शाॅप व्यवसायाचे पुनरावलोकन आणि तुम्ही प्रदान केलेल्या सेवांच्या प्रकारांचा समावेश असेल. तसेच, तुम्ही तुमच्या ग्राहकांना ऑफर करणार असलेल्या मेनू आणि पदार्थांचा समावेश ही असेल.
  • तुमच्या कामांची क्रमवारी लावा :रोजच्या बेकरी, ऑर्डर-प्लेसमेंट सर्व्हीसेस, मेनूच्या कामकाजाच्या तपशिलांसह इमारत, कच्च्या मालाची खरेदी, कर्मचारी भरती इत्यादींच्या कामाची स्पष्ट योजना तयार करा.
  • आर्थिक विश्लेषण : यात कॅश फ्लो स्टेटमेंट, ऑपरेटींग खर्च, निश्चित आणि आवर्ती खर्च, नफा मार्जिन इत्यादींचा समावेश असेल.
  • SWOT विश्लेषण : हे SWOT विश्लेषण तुम्हाला तुमच्याशी संबंधित स्वतःची सामर्थ्ये, कमकुवतपणा, संधी आणि धोके ओळखण्यास मदत करेल.

तुमच्या बेकरी शाॅपसाठी एक आदर्श स्थान निवडा

  • एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे तुमच्या बेकरी दुकानाचे व्यवसायाचे स्थान ठरवणे होय. कारण, त्याचा थेट परिणाम तुमच्या विक्रीवर होईल. आदर्श स्थान हे हाय-एंड स्ट्रीट किंवा शॉपिंग मार्केटआहे जेथे लोकांची गर्दी खूप जास्त असते. तसेच, त्या जागेवर पाणीपुरवठा व ड्रेनेजची कार्यक्षम सुविधा असायला पाहिजे.
  • त्याचप्रमाणे इमारतीच्या तळ मजल्यावरील दृष्टीस पडणारे बेकरी शाॅप व्यवसायासाठी योग्य आहे. तुम्ही पहिल्या मजल्यावर एक पूर्णपणे सुसज्ज आणि कार्यात्मक स्वयंपाकघर आणि तळ मजल्यावर सर्व्हींग क्षेत्र तयार करू शकता. तसेच, तुम्ही ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी नेमकेच तयार केलेले प्राॅडक्ट विक्रीस ठेवण्याचा प्लॅन ही करू शकता.
  • तुमच्या घरमालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यायला विसरू नका. तिची/त्याची मालमत्ता व्यवसायासाठी वापरली जात असल्यामुळे त्यांना कोणतीच समस्या नसायला पाहिजे.

बेकरी सुरू करायला किती खर्च येतो?

भारतात बेकरी व्यवसाय उघडण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांची किंमत अंदाजे खालीलप्रमाणे आहे. हे तुम्ही उदाहरण म्हणून वापरू शकता.

  • भाडे: Rs. 60,000
  • परवाने: बेकरी चालवण्यासाठी विविध परवाने घेणे आवश्यक आहे. तुम्हाला FSSAI कडून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. ज्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये खर्च येईल. टीआयएन क्रमांकासाठी 10,000 रुपये खर्च येईल. मनपा आरोग्य परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला सुमारे 3000 रुपये आणि फायर परवान्यासाठी काही ठिकाणी 1000 ते 2000 खर्च येईल. तुम्हाला सर्वच परवाने काढण्यासाठी अंदाजे 30,000 च्या जवळपास खर्च येवू शकतो.
  • मनुष्यबळासाठी खर्च : तुम्हाला प्रमुख शेफ, मदतनीस, सेवा देणारी मुले, कॅशियर आणि सफाई कामगार इत्यादीसाठी 1 लाख रुपयांची आवश्यकता असेल.
  • स्वयंपाकघर उपकरणे : संपूर्ण स्वयंपाकघर सेट अप करण्यासाठी आणि बेकरी यंत्रसामग्रीसाठी सुमारे 8 लाख रुपयांपर्यंत खर्च येवू शकतो.
  • मार्केटींग: सोशल मीडिया मार्केटींग, प्रदर्शन बोर्ड आणि पत्रके यासारख्या मार्केटींगसाठी जवळपास 50,000 खर्च येईल.
  • संकीर्ण खर्च : गणवेश, डिसप्ले, इत्यादी इतर विविध बाबींसाठी 20,000 रुपयांपर्यंत खर्च येवू शकतो.

भारतात बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण अंदाजे किंमत सुमारे 10-12 लाख रुपये आहे. तथापि, उपकरणांची किंमत आणि स्थान यामुळे अंदाजित किंमतीत बरेच फरक होऊ शकतात.

भारतात बेकरी व्यवसाय उघडण्यासाठी उपकरणे आवश्यक आहेत

मूलभूत किंवा सर्वोत्तम बेकरीचे स्वयंपाकघर असायला पाहिजे. जर तुम्हाला उत्कृष्ट प्राॅडक्ट तयार करायची असतील तर अत्यंत उच्च प्रतीची उपकरणे असणे गरजेच आहे. कारण, प्रत्येक उच्च प्रतीची उपकरणे भक्कम आणि दीर्घकाळ टिकणारी स्टेनलेस स्टील किंवा उच्च-काचेच्या वस्तूंनी बनलेली असतात.

  • कणिक तयार करणे आणि केक उत्पादक : बेकरीसाठी प्रमुख उपकरणामध्ये मिक्सर, ओव्हन, डीप फ्रिज, कूलिंग फ्रिज, टेबल, गॅस स्टोव्ह, सिलेंडर्स इत्यादी असायला पाहिजे.
  • स्टोअरेज: चांगली स्टोअरेज करणारी भांडी तुम्हाला स्वंयपाकघर व्यवस्थित ठेवण्यात मदत करेल. तसेच, पिठ आणि साखर यांच्या मोठ्या पिशव्या स्वयंपाकघरात फिरवण्यासाठी ट्रक आणि कार्टमध्ये गुंतवणूक करा.
  • प्रदर्शन आणि विक्री : प्रदर्शन प्रकरणे निवडताना सावधगिरी बाळगा कारण ते जितके अधिक आकर्षक असेल, तेवढी अधिक विक्री होईल. तुमच्या वस्तूंच्या पॅकेजिंग आणि विक्रीसाठी स्टाईलिश बॉक्स निवडा.
  • साफसफाई आणि स्वच्छता : तुमच्या साफसफाईच्या क्षेत्रासाठी तीन भाग तयार करा. तुमच्या कर्मचारी आणि ग्राहकांसाठी तुमच्याकडे हँडवॉशिंग स्टेशन आहेत याची खात्री करा. चांगल्या स्वच्छतेसाठी तुम्हाला डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरणे आवश्यक आहे. तुम्ही साफसफाईची रसायने, स्क्रबर्स आणि इतर आवश्यक साफसफाईच्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत.
  • POS आणि बिलिंग सॉफ्टवेअर इन्स्टाॅल करा : आजकाल, POS यादी व्यवस्थापन सॉफ्टवेअरसह एकीकृत झाले आहे . हे तुमचे बिलिंग करते तसेच तुमच्या शेल्फवर बिल केलेल्या वस्तूंचा आणि यादीतील नाशवंत वस्तूंचा मागोवा ठेवते.

 

या टीपांचा वापर करून अतिरिक्त महसूल मिळवा

  • पॅकेजिंगला आकर्षक बनवा : गेल्या काही दिवसांत लोक छोट्या ब्रँडकडे देखील आकर्षित होत आहेत. कारण, त्यांचे ब्रॅंड सर्वांपेक्षा वेगळे बनवण्यासाठी ते कलात्मक पॅकेजिंगचा वापर करत आहेत. मानवी स्पर्शासह अद्वितीय पॅकेजिंग, सौदर्यशास्त्राची काळजी घेत तुमच्या प्राॅडक्टशी संबंधित विशेष आठवणी ते बनवत आहेत.
  • सोशल मीडियाचा वापर : तुमचा फोन वापरून किंवा डीएसएलआर कॅमेरा वापरून चांगल्या इमेज क्लिक करा. त्या इमेज Instagram, Snapchat, Facebook आणि Pinterest सारख्या इमेज-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे राजदूत म्हणून कार्य करतील. ते व्हिज्युअल ग्राहकांना आकर्षित करून तुमच्या प्राॅडक्ट्सची ऑर्डर देण्यास प्रवृत्त करतात.
  • चांगले डिसप्ले आणि वातावरण तयार करा : तुमच्या कॅफे किंवा बेकरी शाॅपमधील डिस्पले कॅबिनेट सौंदर्यदृष्ट्या आकर्षक आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या प्राॅडक्ट्ससह असायला पाहिजे जसे की, केक, पेस्ट्री, मफिन इत्यादी.
  • मोफत सॅम्पल ऑफर करा : केक, पाई किंवा मफिनचा अतिरिक्त पीस मोफत दिल्यास कोण नाही म्हणणार आहे! जेव्हा तुमचे संभाव्य ग्राहक एखाद्या विशिष्ट मूल्यापेक्षा काही अधिक ऑर्डर करतात तेव्हा तुम्ही त्यांना सर्वोत्तम पाककृतींचा आनंद घ्यायला लावू शकता. पुढच्या वेळी, ते जेव्हा काही ऑर्डर करतील तेव्हा त्यांना जास्त विचार करायची गरज पडत नाही. अशा प्रकारे तुम्ही कमी विक्री प्राॅडक्ट्सच्या विक्रीस प्रोत्साहन देऊ शकता.
  • बेकिंग वर्ग ऑफर करा: जर तुम्ही बेकिंगमध्ये चांगले आहात आणि तुम्हाला माहित आहे असे बरेच लोक आहेत ज्यांना बेकिंग मजेदार आहे असे वाटते, तर त्या आयडियाला तुम्ही कॅशमध्ये रूपांतरित करू शकता! तुम्ही स्वत:चे ब्रॅंडेड बेकिंग ऑफलाईन तसेच ऑनलाईन वर्ग प्रारंभ करा. या वर्गासाठी तुम्ही बरेच पैसे आकारू शकता आणि अशा प्रकारे तुमच्याकडे उत्पन्नाचा वैकल्पिक प्रवाह देखील तयार होऊ शकतो.

तर, तुम्ही कशाची वाट पाहत आहात? पहिले पाऊल उचला. योग्य जागा आणि स्थान शोधा, आवश्यक निधी, परवाने आणि परवानग्या मिळवा, स्वत:च्या बेकरी व्यवसायाच्या दुकानात मालकीचा प्रवास सुरू करा. आमच्याकडून तुम्हाला नवीन व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा!

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.