written by | October 11, 2021

फॅन्सी स्टोअर व्यवसाय

×

Table of Content


फॅन्सी स्टोअर व्यवसाय कसा सुरू करावा 

फॅन्सी स्टोअर म्हणजे काय?

फॅन्सी स्टोअर व्यवसाय हा एक उत्तम लहान गुंतवणूकीचा व्यवसाय आहे ज्यात दागदागिने आणि स्त्रियांशी संबंधित इतर फॅन्सी सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. हा व्यवसाय उच्च नफा देणारा व्यवसाय आहे  .

 हा व्यवसाय चालू करण्यासाठी काही महत्वपूर्ण पायर्‍या – 

भाग १. फॅन्सी  शॉपची कल्पना ठरवा 

आपल्या फॅन्सी  शॉपसाठी शैली ठरवा. 

काही शॉप मध्ये फक्त कानातले झूमके, नेकलेस, बांगड्या अश्या स्त्रियांना आकर्षित करतील अश्या वस्तू असतात तर काही शॉप मध्ये ह्या गोष्टीसह वहीं, पेन, पेन्सिल पासून ते अगदी गिफ्ट्स वैगरे असतात. 

जर आपण फक्त स्त्रियांना आकर्षित अश्या गोष्ठी ठेवल्या तर जसे की दागिने, मेहंदी, सौंदर्य प्रसाधननाच्या वस्तू, अंगठ्या, बांगड्या तर आपले दुकान स्त्री विशेष कॅटेगरी मध्ये जाईल म्हणजेच आपले लक्ष्य ग्राहक फक्त स्त्रिया असतील अश्या दुकानात स्त्रियाच्या बाबतीतील सर्व गोष्टी मिळतील 

दुसर्‍या प्रकारच्या दुकानात स्त्रीयांना हव्या असणार्‍या तसेच वही, पेन, गिफ्ट्स अश्या वस्तू ही असल्याने विविधता ही मिळते 

आपण कोणत्या प्रकाराचे दुकान सुरू करणार आहात ते आपण सुरुवातीलाच ठरवा 

 इतर फॅन्सी  शॉप्सकडून शिका.

कोणतेही फॅन्सी शॉप चालू करण्यासाठी किवा ते चालण्यासाठी कोणत्याही प्रकारची शिक्षणाची अट नाही पण कोणताही अनुभव नसताना कोणत्याही उद्योगात शिरणे ही योग्य नाही. 

आपले स्वतःचे शॉप सुरू करण्यापुर्वी 

आपल्या क्षेत्रातील दुकानांना भेट द्या, त्यांची यादी मधील विविधता पहा, त्याची प्रदर्शन करण्याची शैली पहा आणि ते त्यांचा व्यवसाय कसा चालवतात ते ही पहा. 

त्यांच्या व्यवसायाचे तास, स्थान, माल, वस्तू आणि सेवा यासारख्या माहितीवर नोट्स मिळवा. 

जर आपल्याला जमत असल्यास आपण शॉप मालकाला काही प्रश्न विचारू शकता जसे की – 

 • एक ग्राहक सरासरी किती पैसे खर्च करतो? 
 • ग्राहक कोणत्या वस्तू जास्त खरेदी  करतात?
 •  डिस्काउंट ऑफर दिल्यावर किती गर्दी वाढते? 
 • कोणत्या हंगामात जास्त लोक खरेदी करतात? 

तुम्ही त्या दुकान मालकाला ग्राह काची मनस्थिती , आर्थिक परिस्थिती,  दुकानात लागणारे साहित्य आणि तुम्हाला कोणतीही शंका असल्यास त्या विषयीचे प्रश्न विचारू शकता 

भाग  2. यादी शोधून बनवणे आणि व्यवस्थापन करणे

 • विश्वसनीय स्त्रोत याकडून यादी मिळवा.
 •  नक्कीच आपल्या यादीतील काही (किंवा बहुसंख्य) वस्तू या 
 • विशिष्ट घाऊक कंपन्यांकडून खरेदी केली जाऊ शकते, परंतु त्यास पाठपुरावा करण्यासाठी इतर स्त्रोत देखील आहेत. 
 • दागिने बनवणारी लोक ह्याचा पाठपुरावा करा. त्याच्या कडून ही तुम्ही माल खरेदी करू शकता. 

विविध प्रकारच्या ग्राहकांना आवाहन करणारे चांगले स्टॉक आपल्या शॉप मध्ये असण्यासाठी आपल्याला बहुदा एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून यादी मिळवणे आवश्यक आहे.

 • आणि विविध ठिकाणावरून माल आणणे देखील जरूरी आहे 
 • ऑनलाईन आपल्या व्यवसाया संबंधी काही आहे का ह्याची माहिती घ्या. 
 •  वस्तूचा साठा करा . 

आपल्या प्रकारातील यादीसाठी योग्य श्रेणी शोधा आणि आपला सर्व शेल्फ आणि प्रदर्शन भरण्यासाठी पुरेशी जागा मिळवा. 

हे लक्षात ठेवा की ग्राहक विशिष्ट प्रकारच्या वस्तू शोधू शकतात, परंतु एका विभागात भिन्न प्रकाराच्या वस्तू ठेवल्यास त्याच्या बरोबर आपल्यालाही त्रास होऊ शकतो 

उदाहरणार्थ

एक पूर्ण शेल्फ आपण बांगड्या साठी करू शकतो मग त्यात आपण काचेच्या, सिल्वर लाइन असलेल्या, प्लास्टिक च्या एका खाली एक ठेवू शकतो जेणेकरून सामना शोधताना आणि काढताना आपल्याला आणि पाहताना ग्राहकाला देखील त्रास होणार नाही. 

लोकप्रिय वस्तूंवर विशेष लक्ष्य द्या 

जवळजवळ सर्व फॅनसी शॉप्सची दुकान मालक त्याच्या कडे असलेल्या यादीतील वस्तू घाऊक बाजारात घाऊक किमतीने खरेदी करतात त्यानंतर आपला शिक्का मारून जास्तीच्या भावाने विकतात. पण जर आपल्याला कोणती वस्तू ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत हे माहीत असेल तर त्या वस्तू च्या किमतीत आपण इतरच्या तुलनेने कमी ठेऊ शकतो आणि त्यांना सर्वाना दिसेल अश्या शेल्फवर ठेऊ याकडे मागणी नुसार आपण त्याच्या किंमती खाली किवा वर करू शकतो. 

उदाहरणार्थ, जर तुम्ही लक्ष्य दिले असेल तर रक्षाबंधनाच्या काळात जवळ पास सर्व जण राख्या जास्त भावाने विकतात अश्या काळात जर आपण त्याच्या तुलनेने कमी भाव ठेवला तर आपल्याकडे जास्त ग्राहक आकर्षित होतील .

भाग ३. शॉप चालवा. 

ग्राहकांना आवाहन करणार्या अतिरिक्त सेवा ऑफर करा.

जसे की समजा जर कोणी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवस चे गिफ्ट म्हणून तिला नेकलेस गिफ्ट करू इच्छित असेल तर आपल्याला आपल्या दुकानात असलेल्या गिफ्ट पेपर चा वापर करून ते गिफ्ट व्यवस्थित बंद करून त्या ग्राहकाला दिले पाहिजे ह्या अश्या गोष्टी मधुन आपल्याला थोडे जास्तीचे पैसे तर भेटतातच त्याच प्रमाणे भविष्या काळात ही ह्या अश्या गोष्टीचा जास्तीचा फायदा होऊ शकतो . 

शुल्काच्या रचनेबाबत लवचिक रहा: 

जर ग्राहक खर्चामुळे एखादी सेवा नाकारत असतील तर किंमत कमी करा. 

आपण गिफ्ट-रॅप सेवा देऊ शकता आणि गुंडाळलेल्या प्रत्येक वस्तूसाठी थोडे शुल्क आकारू शकेल.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले प्रदर्शन सेट अप करा. 

आपले बरेच ग्राहक रस्त्यावरुन फिरत असल्याने,आपल्या विंडोजमधील डिस्प्ले किंवा आपल्या दुकानासमोर पदपथावर ठेवलेल्या वस्तू आकर्षक आहेत की नाही याची खात्री करा. 

हंगामी वस्तूची विक्री करा . 

ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि आपल्या कडे खूप आणि नाविन्यपूर्ण स्टॉक आहे हे दाखविण्यासाठी काही वस्तूची पूर्व खरेदी करून ठेवा.

विशिष्ट सुट्टी किंवा विशिष्ट हंगामांच्या आसपास थीम विक्री करा

उदाहरणार्थ, दिवाळी आणि गणपती गौरीच्या काळात बायका मेहंदी, रांगोळी चा जास्त वापर करतात, रक्षाबंधन च्या काळात राखीचा तर घटस्थापने च्या काळात टीपऱ्याचा 

या नुसार आपण पूर्व खरेदी करून ठेवा. 

आपल्या दुकानातील आर्थिक खर्च आणि उत्पन्न बुक करा. 

कोणताही व्यवसाय हा आपण दिलेल्या उत्तम सेवे बरोबरच आपली आर्थिक घडी ह्यावर ही अवलंबून असतो 

आर्थिक मालमत्ता, कर्जे , मासिक भाडे देयके आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यासह आपल्या व्यवसायाच्या वित्तपुरवठ्यांचा मागोवा ठेवा. 

कोणत्याही गोष्टीचा जास्तीचा स्टॉक करून ठेऊ नका तिथे आपला पैसा अडकला जातो 

कोणालाही उधारी वर समान देऊ नका 

शक्य असल्यास उधारी वर सामना घेऊ ही नका 

आपल्या दुकानात पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन एप्लिकेशन चा पर्याय ग्राहकांना द्या. 

एक लहान व्यवसाय मालक म्हणून, आपल्याला कर भरावा लागतो. गुड अँड सर्विस टैक्स भरण्यासाठी आपल्याला जीएसटी पोर्टल वर जीएसटी क्रमांक घेणे आवश्यक आहे…  

करा विषयी ची अधिक माहिती आपल्याला चार्टर अकाउंट कडून अथवा जीएसटी पोर्टल वरून मिळेल. 

तसेच जर आपल्याला आपल्या स्टोअर मध्ये नफा होत असेल आणि आपल्याला अतिरिक्त कामगार कामावर घेण्याची आवश्यकता वाटत असेल तर त्याचा योग्य असा निर्णय आपण घ्यावा. 

आमच्या मते, आपल्याला एक उत्तम फॅन्सी  शॉप काढण्यासाठी सुरुवातीला 3 ते 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो. आणि आपल्या शॉपला नाव लौकिक मिळण्यासाठी आणि स्थिरता येण्यासाठी 3 ते 5 वर्ष लागू शकतात 

एक उत्तम व्यवसायिक होण्यासाठी आपल्याकडे 

संयम

कोणताही व्यवसाय लगेच यशस्वी होत नाही तिथे तुम्हाला संयमाची आवश्यकता असते.

मैत्रीपूर्ण वागणूक

आपल्याला आपला व्यवसाय करताना सर्वाशी मैत्रीपूर्ण वागणुक ठेवली पाहिजे.. आपण ज्याच्या कडून माल विकत घेतो ते आपल्या शेजारी ज्याचे दुकान आहे ते ग्राहक सर्वाशी मैत्री पूर्ण वागणूक ठेवली पाहिजे 

ग्राहकांसोबत सचोटी ने वागले पाहिजे

ग्राहक हा राजा आहे. तो आहे म्हणून आपला व्यवसाय आहे त्याच्या बरोबर प्रामाणिकपणे तसेच प्रेमाने वागले पाहिजे 

काही वेळेला ग्राहक त्याचा राग ही आल्यावर काढू शकतो अश्या काळात आपण आपला ताबा सोडू नये.. 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.