Home जीएसटी जीएसटी ट्रॅकिंग – तुमच्या अर्जाच्या स्थितीवर ऑनलाईन ट्रॅक ठेवा

जीएसटी ट्रॅकिंग – तुमच्या अर्जाच्या स्थितीवर ऑनलाईन ट्रॅक ठेवा

by Khatabook

जुलै 2017 पासून लागू केलेला वस्तू व सेवा कर ( (जीएसटी)) ही सर्वांत मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणा असून भारत या गोष्टीचा साक्षिदार आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’ या उपक्रमांतर्गत जीएसटीने केंद्र व राज्ये यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या विविध करांचा, जसे उत्पादन शुल्क, सेवा कर, राज्य कर, प्रवेश कर, लक्झरी कर इत्यादींचा यामध्ये समावेश केला आहे.

एका प्रमाणित करासह अनेक अप्रत्यक्ष करांच्या बदलीमुळे पेपरवर्क लक्षणीय घटले आहे, ज्यामुळे करदात्याचे ओझे कमी झाले आहे. या लेखात, जीएसटीबद्दल तुमची जागरूकता वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या चिंता आणि नियमांवर प्रकाश टाकला आहे.

जीएसटी नोंदणी कधी आवश्यक आहे?

कोणताही व्यवसाय जो खाली दिलेल्या यादीतील श्रेणीमध्ये येतो तो जीएसटीसाठी नोंदणी करण्यास जबाबदार असेल:

 • ई-काॅमर्स व्यवसाय, त्यांची उलाढाल किती ही असो.
 • वार्षिक 20 लाख रूपयांपेक्षा अधिक आणि उलाढालीसह राज्यांतर्गत व्यवसाय.

राज्यांतर्गत व्यवसाय विशेष प्रवर्गातील राज्यासाठी उत्तर-पूर्व, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर जेथे 10 लाख रूपयांची उलाढाल होते.

इनपुट टॅक्स क्रेडिटवर दावा करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांक (जीएसटीआयएन) आवश्यक आहे. जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक करदात्यास नियुक्त केलेला हा अद्वितीय 15 अंकी क्रमांक आहे आणि जीएसटी कर प्रणालीवर तुमचे प्रतिनिधित्व करतो. एकदाच तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक जीएसटीआयएन नियुक्त केला जाईल.

इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी कोण दावा करु शकतो:

 • व्यवसायाची वार्षिक उलाढाल विचारात न घेता, जीएसटीआयएन असणे गरजेचं आहे.
 • वेगवेगळ्या राज्यात अनेक व्यवसाय असल्यास स्वतंत्र नोंदणी करणे अनिवार्य आहे.
 • कोणताही कर भरणारा व्यक्ती, जो करपात्र वस्तूंचा पुरवठा करतो.
 • करपात्र पुरवठा करणारी अनिवासी करपात्र व्यक्ती.

ज्यांना रिव्हर्स चार्ज अंतर्गत कर भरणे आवश्यक आहे.

जीएसटीची ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

ऑनलाईन जीएसटी भरणे ही आता अत्यंत सोपी प्रक्रिया झाली आहे. प्रारंभ करण्यासाठी, खालील कागदपत्रे प्राप्त करा:

 • PAN कार्ड
 • आधार कार्ड
 • बिजनेस नोंदणी प्रमाणपत्र
 • निगमन प्रमाणपत्र
 • बॅंक खाते स्टेटमेंट
 • डिजिटल स्वाक्षरी

जीएसटी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी या पायऱ्यांचे अनुसरण कराः

 • ब्राउझर उघडा आणि जीएसटी पोर्टल वेबसाईटवर जा (www.gst.gov.in).
 • ‘नवीन वापरकर्ता’ लॉग इन टॅब निवडा.
 • तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेला जीएसटी फॉर्म निवडा.
 • सर्व तपशिल भरा आणि जीएसटी फॉर्म सबमिट करा.
 • काही कागदपत्रे फॉर्मसह अपलोड करायची आहेत.
 • एकदा ते पूर्ण झाल्यावर अर्जाचा संदर्भ क्रमांक (एआरएन) स्वयंचलितपणे तयार केला जाईल.

तुम्हाला तुमचा जीएसटीआयएन प्राप्त होईपर्यंत एआरएन हा तात्पुरता नंबर असेल, एआरएनचा वापर पोर्टलवर तुमच्या नोंदणीच्यास्थितीचा ट्रॅक ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. एकदा तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर, जीएसटीआयएन तयार होईल जे भविष्यातील लाॅग इनसाठी वापरले जाऊ शकते.

पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवला जाईल, ई-मेल उघडा आणि लिंकचे अनुसरण करा.

 • तुम्ही पुन्हा एकदा सरळ जीएसटी पोर्टल लॉग इन पेजवर जाल.
 • क्रेडेन्शियल्सची नोंद करा आणि तुमच्या ई-मेल पत्त्यावर पाठवलेला पासवर्ड वापरा.
 • एकदा प्रवेश मंजूर झाल्यावर आवश्यक असल्यास तुम्ही तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड बदलू शकता.

तुमच्या जीएसटी अर्जाची स्थिती कशी ट्रॅक करायची?

एकदा तुम्ही जीएसटीसाठी नोंदणी केली की तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती वेगवेगळ्या मार्गांनी शोधू शकता, त्यापैकी काहींची खाली यादी दिली आहे.

जीएसटी

जीएसटी पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासत आहे.

जीएसटी पोर्टल तुमच्या अर्जाची स्थिती अपडेट करते.

 • वेबसाईट उघडा आणि लॉग इन करा.
 • दर्शवलेल्या यादींमधून ‘नोंदणी’ निवडा.
 • ‘सेवा निवडा’, या पर्यायात ‘ट्रॅक अर्जाची स्थिती’ असावा.

तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दर्शवण्यात यायला हवी.

अर्जाच्या स्थितीचे विविध प्रकार आहेत त्याची तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे, खालीलप्रमाणे:

 • एआरएन तयार झाले – नोंदणीकृत अर्ज सबमिट केल्यावर अस्थायी संदर्भ क्रमांकाची स्थिती (टीआरएन).
 • प्रक्रियेसाठी प्रलंबित- नोंदणीकृत अर्ज यशस्वीरित्या दाखल केला.
 • तात्पुरती – जीएसटीआयएनची स्थिती, जेव्हा नोंदणीकृत अर्ज मंजूर होईपर्यंत चलान निर्मिती सुरू केली जाते (प्रासंगिक करदात्यासाठी).
 • प्रमाणीकरणासाठी प्रलंबित- एआरएन तयार होईपर्यंत नोंदणीकृत अर्ज सादर केल्यानंतर.
 • प्रमाणीकरण त्रुटी – एआरएन तयार होईपर्यंत नोंदणीकृत अर्ज सबमिट केल्यावर, प्रमाणीकरण अयशस्वी झाल्यास.

जीएसटी पोर्टलवर लॉग इन केल्याशिवाय अर्जाची स्थिती तपासणे.

तुम्ही जीएसटी पोर्टलवर लॉग इन न करता तुमचा अर्ज सबमिट केला असेल तर तुम्ही आता हा एआरएन वापरून स्थिती ट्रॅक करू शकता.

 • जीएसटी पोर्टल उघडा, ‘नोंदणी’ निवडा, त्यानंतर ‘सेवा’वर क्लिक करा.
 • तुम्हाला ‘ट्रॅक अर्जाची स्थिती’ पर्याय प्रदर्शित होईल, पुढे जा आणि तो निवडा.
 • एकदा उघडल्यानंतर, ‘एआरएनसह अर्जाचा ट्रॅक घ्या’ हा पर्याय निवडा.
 • तेथे एक आडवे स्तंभ प्रदर्शित होईल जेथे तुम्हाला एआरएन टाकायला लागेल.
 • तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवलेला तोच एआरएन दाखल करा.
 • कॅप्चा मजकूर भरण्यासाठी पुढे जा आणि ‘शोधा’ वर क्लिक करा.

जीएसटी प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे?

जीएसटी प्रमाणपत्र जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत सर्व करदात्यांना जारी केले जाते. हे प्रमाणपत्र करदात्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शविले जाणे आवश्यक आहे. जीएसटी प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया खाली दिलेल्या यादीप्रमाणे आहे:

 • पोर्टलवर लाॅग इन करा (www.gst.gov.in)
 • ‘सेवा’ वर क्लिक करा, त्यानंतर ‘वापरकर्ता सेवा’ निवडा.
 • ‘पाहा / डाउनलोड प्रमाणपत्र’ हा पर्याय प्रदर्शित होईल.
 • डाउनलोड लिंकवर क्लिक करा आणि फाईल सेव्ह करा.

जीएसटी प्रमाणपत्राची वैधता

एका नियमित करदात्यास दिलेले जीएसटी प्रमाणपत्र जोपर्यंत जीएसटी प्राधिकरणाने जीएसटी नोंदणी आत्मसमर्पण केली नाही किंवा रद्द केली नाही तोपर्यंत कालबाह्य होणार नाही.

एखादा प्रासंगिक करदाता किंवा अनिवासी करदात्याच्या बाबतीत, प्रमाणपत्राची वैधता जास्तीत जास्त 90 दिवसांची असते. त्याच्या वैधता कालावधीनंतर ते वाढवले किंवा त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते.

जीएसटी प्रमाणपत्रात बदल करण्याविषयी

जीएसटी नोंदणी प्रमाणपत्रात कोणतीही माहिती चुकीची असल्यास, करदाता जीएसटी पोर्टल वर दुरुस्तीसाठी प्रारंभ करू शकतात. या दुरुस्तीस कर अधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असेल.

जीएसटी नोंदणी प्रमाणपत्रात काही बदल करण्यासाठी परवानगी याप्रमाणे आहे:

 • PAN मध्ये बदल न करता व्यवसायाच्या कायदेशीर नावामध्ये बदल करता येतो.
 • व्यवसायाच्या मुख्य ठिकाणात बदल.
 • व्यवसायाच्या अतिरिक्त ठिकाणात बदल (राज्यातील बदलांव्यतिरिक्त).
 • व्यवसाय भागीदार, व्यवस्थापकीय संचालक, विश्वस्त मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा समकक्ष इत्यादींना जोडण्यासाठी किंवा हटविण्यामधील बदल.

एकदा सुधारित अर्ज मंजूर किंवा नाकारल्यानंतर तुम्ही एसएमएसद्वारे ई-मेल किंवा अधिसूचना प्राप्त कराल. तसेच, दुरुस्त केलेल्या तपशिलांसह सुधारित नोंदणी प्रमाणपत्र डाउनलोडसाठी उपलब्ध असेल.

Related Posts

Leave a Comment