written by Khatabook | May 10, 2022

कॅशबॅक स्कॅमचे ट्रेंड काय आहेत? त्यांच्यापासून सुरक्षित कसे राहायचे?

×

Table of Content


मागील काही वर्षांत ऑनलाईन पेमेंटसाठी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये खूप वाढ झाली आहे. महामारीमुळे सर्व ठिकाणी लॉकडाउनची स्थिती उद्भवली आणि त्यामुळे डिजिटली पेमेंटचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेत. लोकं आता बऱ्याच खरेदी ऑनलाईन करत असून पेमेंटही ऑनलाईनच करत आहेत. वाढत्या ऑनलाईन व्यवहारांमुळे स्कॅमर्सना महामारीच्या काळात लोकांची फसवणूक करण्याची जणू परवानगीच मिळाली आहे. कॅशलेस पेमेंटच्या सुविधेमुळे जोखीम वाढली आहे, विशेषत: त्यांच्यासाठी, जे लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास नवीन आहेत. सर्वांत अलीकडील फिशिंग स्कॅम म्हणजे कॅशबॅक ऑफरशी संबंधित PayTM स्कॅम, ज्याचा वापर वापरकर्त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी केला जातो.

कॅशबॅक म्हणजे काय?

कॅशबॅक हा एक प्रकारचा रिवार्ड प्रोग्राम आहे, ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या ऑनलाईन खरेदीवर काही टक्के मिळवू शकतात. हे प्रारंभी  क्रेडिट कार्डचे फिचर्स होते, परंतु आता ते रिटेल विक्रेते, ऑनलाईन स्टोअर्स आणि UPI अ‍ॅप्सवरही  उपलब्ध आहे. कंपनीच्या कॅशबॅकचे प्राथमिक उद्दीष्ट ग्राहकांना खरेदी करण्यासाठी आकर्षित करणे किंवा ऑनलाईन व्यवहारांसाठी  त्यांच्या अ‍ॅप्सचा वापर करायला लावणे होय. शॉपिंग, तिकीट, हॉटेल बुकिंग आणि बिल भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही कॅशबॅक, रिवॉर्ड्स पॉइंट्स किंवा स्क्रॅच कार्ड मिळवू शकता. याव्यतिरिक्त, PayTM त्यांच्या नियमित ग्राहकांना यापैकी काही डील ऑफर करते. PayTM सामान्यत: त्यांच्या सेवा वापरण्यासाठी निवडलेल्या वेबसाईट्सवर कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स किंवा सूट देते, जसे की युटिलिटी बिले भरणे, एखाद्याला पैसे पाठवणे किंवा इतर कोणतीही सेवा वापरणे. अ‍ॅपविषयी माहिती असलेल्यांना कॅशबॅक योजना कशा कार्य करतात हे समजते, परंतु एक अनपेक्षित कॅशबॅक नोटिफिकेशन नवीन वापरकर्त्यास आकर्षित करू शकते.

तुम्हाला माहिती आहे का? Google Play वर, Paytm वॉलेट अ‍ॅपचे 100 मिलियन  डाउनलोड आहेत. PayTM चे 350 मिलियनहून अधिक वापरकर्ते आहेत.

हेही वाचा : e-RUPI काय आहे?

PayTM स्कॅम कसा होतो?

कॅशबॅक ऑफरशी संबंधित PayTM स्कॅमविषयी बोलूया. 

कॅशबॅक ऑनलाईन ट्रॅपची सुरुवात एका अचानक आलेल्या ब्राउजर नोटिफिकेशनने होते, ते अशा प्रकारचे असते, "अभिनंदन! तुम्ही PayTM स्क्रॅच कार्ड जिंकले आहे." 

लिंक पाहिल्यावर उत्साही लोक विचार न करताच ती उघडतात. हे नोटिफिकेशन त्यांना paytm-cashoffer.com वर घेवून जाते, अशी साईट ज्याला त्यांनी यापूर्वी कधीही भेट दिली नव्हती.

यात युजरला 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळाला असल्याचा दावा करण्यात येतो. त्यानंतर साईट त्यांना हे कॅशबॅक रिवार्ड त्यांच्या PayTM खात्यात पाठवायला लावते. कारण, ते अधिकृत अ‍ॅपसारखे दिसते, नवीन वापरकर्ता ते समजू शकत नाही. पाठवा बटणावर क्लिक केल्यानंतर, ते त्यांना मूळ PayTM अ‍ॅपवर घेवून जाते. तेथे त्यांना कॅशबॅकची रक्कम "भरण्यास" सांगितले जाते. लोकं रक्कम मिळण्याऐवजी पैसे भरत आहेत हे लक्षात न घेताच व्यवहार पूर्ण करतात. 

या युक्तीचा वापर करून स्कॅमर्स वापरकर्त्यांच्या मानसशास्त्राचा गैरफायदा घेतात. हा स्कॅम प्रथम लोकांना त्यांनी मोठा कॅशबॅक जिंकला आहे असा विचार करण्यात गुंतवतो, नंतर कॅशबॅकचा वापर करून ते खरोखर "पाठवत" आहेत की "पेमेंट" करत आहेत यावरून त्यांचे लक्ष विचलित करतात.

ज्या लोकांना UPI-आधारित अ‍ॅप कसे कार्य करते हे समजत नाही, तेच या स्कॅमचे लक्ष्य होतात. जर तुमच्या फोनमध्ये UPI पेमेंट अ‍ॅप इन्स्टॉल नसेल तर हा स्कॅम करता येणार नाही. ही फसवणूक फक्त स्मार्टफोनवर होते, संगणकावर नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही लिंकवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला एक वेगळी कॅशबॅक ऑफर दिली जाते. 

कॅशबॅक ऑनलाईन स्कॅमचे लक्ष्य PhonePe देखील आहे. गुन्हेगार अनोळखी लोकांना नव्या नंबर्सवरून फोन कॉल करतात आणि ते PhonePe चे असल्याचा दावा करतात. ते लोकांना पटवून देतात की त्यांनी कॅशबॅक रिवार्ड जिंकले आहे आणि त्यांना रिवार्ड बटणावर क्लिक करण्यास सांगतात.

ज्या लोकांना असे फोन आले, त्यांनी रिवॉर्ड पेचे बटण दाबून व्यवहार पूर्ण केले, तेव्हा त्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्यात आले आणि बँक खाती आणि इतर इंटरनेट बँकिंग क्रेडेन्शियल्सची संवेदनशील माहिती अनेक प्रकरणांमध्ये लीक झाल्याचे आढळून आले.

कॅशबॅक स्कॅमपासून सुरक्षित राहण्याच्या टिप्स

बऱ्याच नोटिफिकेशन ज्या दावा करतात की तुम्ही कॅशबॅक किंवा रिवार्ड जिंकले आहेत, त्या तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी डिझाईन केलेले स्कॅम असतात. लिंकचा सोर्स डबल-चेकिंग केल्याशिवाय उघडणे योग्य नाही. वेबसाईट व्हेरिफाय करण्यासाठी, पेजच्या शीर्षस्थानी दिसणाऱ्या URL कडे पाहा. वापरकर्त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की वैध पेमेंट वेबसाईट्स आणि प्लॅटफॉर्म जास्त कॅशबॅक देत नाहीत. त्यामुळे लोकांनी इंटरनेटवर त्यांना मिळालेल्या कोणत्याही कॅशबॅक ऑफरवर क्लिक करण्यापूर्वी क्रॉस-चेक करावे.

अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी, तुम्ही वापरत असलेल्या अ‍ॅप्सबद्दल, विशेषत: आर्थिक व्यवहारांसाठी जेवढी माहिती मिळवू शकता तेवढी माहिती मिळवा. PayTM ग्राहकांना संभाव्य स्कॅमपासून सावध करण्यासाठी चेतावणीचे मेसेज वारंवार पोस्ट करते आणि त्याचबरोबर खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे:

  • PayTM कधीही बाह्य लिंकद्वारे किंवा तिसऱ्या पार्टीच्या वेबसाईटद्वारे कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स ऑफर करत नाही. जर तुम्ही कॅशबॅक जिंकलात तर ते आपोआप तुमच्या PayTM वॉलेटमध्ये किंवा तुम्ही अ‍ॅपशी लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होईल.
  • अ‍ॅप वापरकर्त्यांना कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स प्राप्त करण्यासाठी इतर कोणत्याही वेबसाईटला भेट देण्यास सांगत नाही.
  • तुमचा ब्राउजर तुम्हाला मिळणाऱ्या कोणत्याही कॅशबॅक किंवा रिवार्ड डील्सबद्दल सांगणार नाही. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्याद्वारे किंवा PayTM अ‍ॅपद्वारे नवीन PayTM ऑफरबद्दल सूचित केले जाईल.
  • प्राप्तकर्त्याने कधीही अनोळखी नंबरच्या  WhatsApp किंवा SMS द्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये. यापैकी एका सेवेद्वारे तुम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही बँक किंवा कॅशबॅक ऑफरकडे दुर्लक्ष करणे चांगले.
  • जेव्हा तुम्ही पैसे "प्राप्त" करता तेव्हा तुम्हाला "पे" बटणावर टॅप करण्याची किंवा तुमचा UPI पिन दाखल करण्याची आवश्यकता नसते. UPI पिन वापरुन तुम्ही केवळ पैसे पाठवू शकता किंवा तुमचे बँक बॅलन्स तपासू शकता.
  • पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी, प्राप्तकर्त्याची ओळख व्हेरिफाय करा.
  • तुमचा वन टाइम पासवर्ड (OTP) आणि बँक खात्याची माहिती नेहमी खासगी ठेवा.
  • विविध प्लॅटफॉर्मवरून मिळणाऱ्या मेसेजेस आणि लिंक्समध्ये तुम्हाला अनेक खोट्या आणि फेक न्यूज दिसतील. तुम्ही बारकाईने पाहिल्यास तुम्हाला टायपो, वेगळी डिझाईन किंवा अन्य असामान्य गोष्टी दिसू शकते. या इंडिकेटर्सवर लक्ष ठेवा जेणेकरून तुम्ही बोगस लिंकमध्ये दिलेल्या माहितीची अचूकता व्हेरिफाय करू शकाल.
  • तुम्ही काहीही डाउनलोड करणार असल्यास, ते विश्वसनीय स्रोताकडूनच आहे याची खात्री करून घ्या. कधीकधी, एखाद्या अ‍ॅपचे व्ह्यूव हाईड केलेले असते आणि तुम्ही मूळ आवृत्तीचा क्लोन डाउनलोड करता.
  • खबरदारी म्हणून WhatsApp वर कधीही अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नका.

हेही वाचा : तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी UPI QR कोड कसा मिळवायचा?

PayTM स्कॅमचे रिपोर्टिंग

PayTM ने ग्राहकांची सुरक्षा आणि गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट सायबर सुरक्षा टीम असल्याचा दावा केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून, अ‍ॅप कोणत्याही फसव्या किंवा संशयास्पद उपक्रमाला त्वरित ओळखू शकते आणि दूरसंचार अधिकारी, वापरकर्त्याची बँक आणि कोणत्याही फसव्या उपक्रमांविषयी सायबर सेलला सूचित करू शकते.

प्रत्येक UPI-आधारित अ‍ॅप डिजिटल पेमेंट फ्रॉडचा रिपोर्ट देऊ शकते. अ‍ॅपमध्ये हा पर्याय त्वरित दिसत नसल्यास हेल्प अँड सपोर्ट विभाग पाहा. PayTM अ‍ॅपवरील कॅशबॅक ऑनलाईन फसवणुकीसह तुम्ही कोणत्याही फसव्या व्यवहाराची माहिती कशी देऊ शकता ते सविस्तर जाणून घ्या.

  • स्टेप 1: स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यातील "प्रोफाईल" विभागावर जा.
  • स्टेप 2: हेल्प अँड सपोर्टला एकदा आणखी दाबा.
  • स्टेप 3: विभागात शोधा आणि निवडा "तुम्हाला मदतीची आवश्यकता असलेली सेवा निवडा" आणि "सर्व सेवा पाहा" बटणावर क्लिक करा.
  • स्टेप 4: "फसवणूक आणि व्यवहारांचा रिपोर्ट द्या" हा बॉक्स शोधा आणि क्लिक करा.
  • स्टेप 5: ती समस्या ओळखा, जिची तुम्हाला गरज आहे. फसवे व्यवहार, फिशिंग वेबसाईट्स आणि इतर समस्याही अशाच प्रकारे नोंदवता येतात.
  • स्टेप 6: त्यानंतर तुम्हाला फसवणुकीचे तपशील देण्यास सांगितले जाईल जेणेकरून त्यांना सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करता येईल.

निष्कर्ष

ऑनलाईन मार्केटमधील वस्तू आणि सेवांसाठी पैसे द्यायला ग्राहक पीअर-टू-पीअर पेमेंट (पी2पी) आणि ई-वॉलेट अ‍ॅप्सचा वापर करतात. भारतात हे अ‍ॅप्स अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर करून, लोक इतर राज्यांमधील प्रियजनांना पैसे पाठवू शकतात, स्थानिक सेवेसाठी पैसे देऊ शकतात आणि बरेच काही करू शकतात. सर्व पीअर-टू-पीअर (पी2पी) व्यवहारांपैकी निम्म्याहून अधिक ग्राहक एखाद्या तिसऱ्या पार्टीसोबत व्यवहार करतात, ज्यांच्याविषयी त्यांना काहीच माहिती नसते. यामुळे ते विशेषत: फसवणुकीला बळी पडतात. आजच्या घडीला जशी ई-कॉमर्स, मोबाईल पेमेंट्स आणि कॉम्प्युटिंगची पॉवर वाढली आहे, तशीच फसवणुकही वाढली आहे.

इंटरनेटवरून आर्थिक व्यवहार करताना ग्राहकांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांनी त्यांची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती फोन किंवा इंटरनेटवरून कधीच कोणालाही देऊ नये. आशा आहे की वर दिलेली माहिती तुम्हाला ऑनलाईन कॅशबॅक स्कॅमचा बळी पडण्यापासून वाचवेल. 

ताजे अपडेट्स, न्यूज ब्लॉग्ज आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय (एमएसएमई), व्यवसाय टिप्स, आयकर, जीएसटी, सॅलरी आणि अकाउंटिंगशी संबंधित लेखांसाठी Khatabook ला फाॅलो करा.

कृपया या प्रकरणाचा रिपोर्ट एकतर तुमचे कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडे करा किंवा जवळच्या सायबर क्राइमला संपर्क करा. या प्रकरणाचा रिपोर्ट करण्यासाठी cybercell@khatabook.com वर ई-मेल पाठवा.

महत्वाचे: SMS किंवा अन्य चॅनेलद्वारे प्राप्त होणारे OTP, पिन किंवा अन्य कोड कोणासोबतही शेअर करू नका. तसेच, तुमचा खाते क्रमांक किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील सार्वजनिक प्लॅटफाॅर्मवर कधीही शेअर करू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: कॅशबॅक काय आहे?

उत्तर:

कॅशबॅक हा एक प्रकारचा रिवार्ड प्रोग्राम आहे, ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या ऑनलाईन खरेदीवर काही टक्के मिळवू शकतात.

प्रश्न: PayTM कॅशबॅक देते का?

उत्तर:

PayTM कधीही बाह्य लिंकद्वारे किंवा तिसऱ्या पार्टीच्या वेबसाईटद्वारे कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स ऑफर करत नाही. जर तुम्ही कॅशबॅक जिंकलात तर ते आपोआप तुमच्या PayTM वॉलेटमध्ये किंवा तुम्ही अ‍ॅपशी लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होईल.

प्रश्न: PayTM मध्ये स्क्रॅच कार्ड कसं शोधाल?

उत्तर:

PayTM अ‍ॅपच्या "कॅशबॅक आणि ऑफर" विभागात स्क्रॅच कार्ड उपलब्ध असतात.

प्रश्न: SaveMudra काय आहे?

उत्तर:

SaveMudra.com एक कॅशबॅक वेबसाईट आहे, ज्याचे उद्दीष्ट कॅशबॅक प्रदान करून ग्राहकांना त्यांच्या ऑनलाईन खरेदीवर पैसे वाचवण्यात मदत करणे आहे. जवळजवळ प्रत्येक प्रसिद्ध ऑनलाईन रिटेलरवर कॅशबॅक मिळवता येतो. त्यांचे  Amazon, Flipkart, Myntra आणि अन्य टाॅपच्या ऑनलाईन रिटेलरशी संबंध असतात.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.