written by | October 11, 2021

किराणा दुकान

×

Table of Content


किराणा दुकान लाईव्ह २४x७ 

गेल्या पाच सहा वर्षांपुर्वीचा तुमचा शनिवार-रविवार आठवा. किराणा सामान आणण्यासाठी तुम्ही साधारणतः हाच दिवस निवडत असायचा. आठवड्याचं लागणारं वाणसामान घरात आणून ठेवण्यासाठी तुम्ही जवळच्या सुपर मार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करायचात आणि नंतर सुरु व्हायची बिलिंग काऊंटरवरची ती अतिशय कंटाळवाणी लाईन. कधीकधी अक्षरशः तासभर ताटकळल्यावर तुमचा नंबर लागायचा आठवड्यातील सुट्टीच्या दिवसातला हा सर्वात कंटाळवाणा भाग… पण आता काळ बदललाय, ई कॉमर्सच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीकारक बदलांमुळे आता तुम्हाला सुपर मार्केटपर्यंत जाऊन बिलींगच्या रांगेत तुमचा विकेंड वाया घालविण्याची गरज नाही. आता केवळ एका क्लिकवर तुमचा आठवड्याचा किराणा तुमच्या दारात येत आहे.तुमचा विकेंड तुम्ही अक्षरशः बिछान्यात आणखी तासभर छान ताणून देऊन काढू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या महत्वाच्या कामात तुम्ही लक्ष घालू शकता, एवढा वेळ तुमच्याकडे शिल्लक राहू शकतोय.

ऑनलाईन किराणा विकण्याचा व्यवसाय हा सध्याचा सर्वात हॉट ट्रेण्ड आहे. एका सर्वेनुसार अगदी चार वर्षांपुर्वी म्हणजे २०१६ साली ऑनलाईन वाणसामान विक्रीच्या क्षेत्रात भारत आशिया पॅसिफिक क्षेत्रात पाचव्या क्रमांकावर होता.पण आता २०२० सालापर्यंत या क्षेत्रात मोठी वृद्धी दर्शविण्यात आली असून बहुतेक शहरांमध्ये ऑनलाईन किराणा मागविण्याकडे कल वाढला आहे. या व्यवसायातील एकूण उलाढाल सुमारे ६५० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळेच ऑनलाईन किराणा दुकान उघडण्याची हीच ती वेळ असं समजण्यास हरकत नाही.तुम्ही कितीही प्रामाणिकपणे मेहनतीने या व्यवसायात काम करायला सुरुवात केली तरीही या क्षेत्रातील अडीअडचणी, संभाव्य धोके आदींचा देखील प्राधान्याने विचार करायला हवा. उदा. किराणा दुकानातील काही वस्तु या नाशवंत माल या प्रकारात मोडणाऱ्या असतात. त्यामुळे तुम्हाला त्या वेळ निघून जाण्यापुर्वीच विकणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा तुमचे नुकसान ठरलेले आहेत. या अशा गोष्टींचा सर्वंकष विचार करुन या व्यवसायात प्रवेश कराल तरच तुम्ही ऑनलाईन किराणाविक्रिच्या व्यवसायात तुमची छाप पाडू शकाल.   

लक्षात घ्या,चाणाक्ष व्यापारी तोच जो बाजारातील संधींचा फायदा घेऊ शकतो.त्यामुळेच या संधींचा अंदाज ज्याला येतो तोच ऑनलाईनच्या धंद्यात यशस्वी होईल. एखाद्या यशस्वी उद्योजकासारखं तुम्हाला आपली विचारांची दिशा ठेवावी लागेल.तुम्हाला ऑनलाईन किराणा दुकान सुरु करायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला ते कोणत्या भागात सुरु करायचंय तो भाग अगोदर निश्चित करुन घ्यावा लागेल. तिथली सामाजिक स्थिती, ग्राहकांची मानसिकता, त्यांची व्यस्तता, बाजारातील स्पर्धा आणि तुम्ही देऊ करणार असणारी सेवा याचे वेगळेपण  आदिंचा तुम्हाला विचार करावा लागेल. या सर्व मुद्यांचा विचार केलात तरच तुम्ही ऑनलाईन किराणा विक्रीच्या धंद्यात यशस्वी होऊ शकाल.

ई कॉमर्सला वाहिलेली वेबसाईट उभारणे ही तुमच्या ऑनलाईन व्यवसायाची पहिली पायरी ठरु शकेल. यासाठी तुम्ही दोन पर्यायांचाअवलंब करु शकता. यासाठी तुम्ही परंपरागत साईटस् सुरु करण्याचा पर्याय तपासून पाहू शकता.परंतु ही प्रक्रिया तुलनेने तशी लांबलचक आणि वेळखावू आहे. शिवाय ही प्रक्रिया तशी खार्चिक देखील आहे. दुसरा पर्याय आहे तो नव्या जमान्याशी जोडून चालण्याचा तो म्हणजे तुम्ही सोशल माध्यमांचा वापर करुन आपल्या व्यवसायाची वाढ करु शकता. याशिवाय बाजारात खास ऑनलाईन किराणा विक्रीसाठी उपलब्ध असणारे प्लॅटफॉर्म आय़ते उपलब्ध करुन देणाऱ्या संस्था देखील आहेत. तुम्ही त्यांचीही सर्विस घेऊ शकता.

किराणा सामानाची यादी ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुमच्याकडे वस्तुंची विविधता जेवढी जास्त तेवढं तुम्ही ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठराव. यासाठी तुमच्याकडे अतिशय उत्तम असं वाणसामानाचं नियोजन करण्याचं कौशल्य असायला हवं ही त्याची पहिली अट. तुमच्या किराणा दुकानाची फडताळं जितकी समृद्ध आणि नीटनेटकी असतील तेवढा ग्राहकांचा तुमच्याकडे ओढा अधिक असेल. प्रत्येक वस्तुची वर्गवारी अतिशय नीटनेटकी करायला हवी. शिवाय एखाद्या वस्तुच्या वर्गवारीत काही उपप्रकार असतील तर त्यांचाही तसा उल्लेख करता येणं आवश्यक आहे. किंबहुना असे उपप्रकार अधिक ठळकपणे दिसायला हवेत.सामानाच्या यादीसोबत त्याच्याशी संबंधित तपशील आणि त्याचे आकर्षक छायाचित्र यांची सखोल माहिती ग्राहकाला वस्तुवर नजर टाकताक्षणी मिळायला हवी.

दुकान सजवलं, ग्राहकांना आकर्षित केलं, तुम्हाला ऑर्डर्स यायला सुरुवात झाली. आता पुढचा टप्पा सुरु होतो. तो म्हणजे तुम्ही ग्राहकांना सेवा कशी देता. ही सेवा ग्राहकाच्या सोयीनुसार असावी.ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तुमची डिलिव्हरी सेवा अतिशय दर्जेदार असणं आवश्यक आहे.तुमच्या ग्राहकांना ठराविक वेळेत मिळणारी सेवा लक्षात घेऊन तुमच्या डिलिव्हरी सेवेचे नियोजन आवश्यक आहे. ही तुमची सेवा अतिशय चोख आणि दर्जेदार ठेवण्याची काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल. ग्राहकांसोबतचे तुमचे संबंध हे अतिशय सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे असायला हवेत. हे संबंध तुमची डिलिव्हरी कशी आहे यावर अवलंबून असतात. थोडक्यात डिलिव्हरी सेवा हा तुमच्या ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायाचा आत्मा आहे असं म्हणता येईल.

आता पुढचा टप्पा… तुमच्या ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायाचा विस्तार करण्याची एक नामी संधी तुमच्याकडे चालून येतेय. ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही इतर विक्रेत्यांनाही आपल्यासोबत जोडून घेऊ शकता. यासाठी तुमचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म त्यादृष्टीने सज्ज असायला हवा. त्या विक्रेत्यांकडे किंवा उत्पादकांकडे असणाऱ्या वस्तुंची व्हरायटी व इतर बाबींचा तुम्ही अंदाज घेऊन त्यांना आपल्या दुकानात जागा देऊ शकता. शिवाय त्याची तशी जाहिरात करुन त्याची विक्री करु शकता.हे तुमच्या व्यवसायाला वेगळे वळण देणारे देखील ठरु शकते.

इतर कोणत्याही व्यवसायाला आवश्यक असते त्याप्रमाणे ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायासाठी अतिशय दर्जेदार मार्केटिंगची आवश्यकता आहे. तुमच्या ग्राहकांना तुमचे अस्तित्त्व अगदी ठळकपणे जाणवलं पाहिजे. तुमचं ग्राहकांसाठी सतत उपलब्ध असणं,तुम्ही इंटरनेटच्या संपर्कात असणं हे अतिशय महत्वाचं असतं. तुम्ही ऑफलाईन असणं म्हणजे तुम्ही एकप्रकारे ग्राहकांपासून संपर्क तोडल्यासारखं होईल. तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही ऑनलाईन असणं म्हणजे तुमच्या व्यवसायातील यश दुप्पट होण्याची खात्री…. याशिवाय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मार्केटिंगचा विचार करीत असताना तुमच्या खरेदीवर तुम्ही किती व कसे डिस्काऊंट देता, कशा प्रकारे तुम्ही नवनव्या स्किम्स देता याचाही तुमच्या व्यवसायाचे यश सामावले आहे. हा व्यवसाय इंटरनेटच्या माध्यमातून करीत असताना मार्केटिंगसाठी तुम्हाला सोशल मिडियाचा खुप फायदा होऊ शकतो. जाहिरातींवर जी मोठी रक्कम यापुर्वी तुम्ही कदाचित खर्च करीत असाल परंतु सोशल मिडियाच्या माध्यमातून बरेचदा मोफत देखील तुमची जाहिरात करता येईल. तुमचा ‘रीच (reach)’ आणि स्वीकार्यता वाढविण्यासाठी सोशल मिडिया अतिशय मोलाची भूमिका पार पाडू शकेल. व्हॉटस्अप, फेसबुक, ट्वीटर, इन्ट्राग्राम या रुढ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन तुम्ही तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. अलिकडच्या काळात रिटेल क्षेत्रातील सोशल माध्यमांचे महत्त्व लक्षात घेऊन काही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स त्यानुसार अपडेट झाले आहेत. सोशल मिडीयाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद लगेचच मिळतो. हा प्रतिसाद अनेकदा खासगी स्वरुपाचा आणि ग्राहकांशी जिव्हाळा वाढविणारा असू शकतो. ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी तुम्ही २४ तास उपलब्ध राहू शकता.तुमच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे देखील तुम्ही या माध्यमातून नियोजन करु शकता. एकंदर सोशल मिडियाचा तुमच्या ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायासाठी खुप मोठा फायदा होऊ शकतो.

ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायासाठी एक महत्वाची बाब लक्षात घ्या… ती म्हणजे तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंटचे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असले पाहिजेत. बिलडेस्क, युपीआय, कार्ड, कॅश ऑन डिलिव्हरी अशा विविध माध्यमातून तुम्ही पेमेंट स्वीकारु शकता. ग्राहकाला सोपी पडणारी पेमेंट सिस्टीम तुमच्या व्यवसायाचा लौकीक वाढविण्यासाठी महत्वाचा घटक ठरेल. हा जमाना स्मार्टफोन्स युजर्सचा आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा काळ आहे. ग्राहकाच्या हातात आता अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या साईटवर किंवा तुमच्या दुकानाच्या पर्यायावर ग्राहक कसा खिळून राहू शकतो यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.या सर्व बाबींचा विचार करुन तुम्ही तुमच्या ऑनलाईन किराणा दुकान व्यवसायात यशस्वी होऊ शकता. 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.