written by Khatabook | August 16, 2022

ई-वे बिल वैधतेविषयी जाणून घ्यायचे आहे?

×

Table of Content


ई-वे बिल मालाची वाहतूक करणे सक्षम करते. तुम्ही ते अधिकृत ई-वे बिल जनरेशन पोर्टलवर तयार करू शकता. तंत्रज्ञानामुळे अँड्रॉइड अप्लिकेशनद्वारे किंवा अगदी शॉर्ट मेसेज सेवेद्वारे (एसएमएस) हे बिल तयार करणे अधिक सोपे झाले आहे. यासाठी तुम्ही अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसचा (एपीआय) आधार घेऊ शकता. एकदा बिल जनरेट केल्यानंतर, त्या प्राप्तकर्त्याला ई-वे बिल क्रमांक प्रदान केला जातो. जनरेट केलेला प्रत्येक ई-वे बिल क्रमांक अद्वितीय आहे. ई-वे बिल तेव्हाच अनिवार्य होते, जेव्हा वाहतूक केल्या जाणाऱ्या मालाचे मूल्य 50000 पेक्षा जास्त असल्यास आणि तुम्ही जीएसटी नोंदणीकृत व्यक्ती असल्यास. या विधेयकाची दोन प्राथमिक उद्दिष्टे अशी आहेत :

  • जीएसटीची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी, जी तुमच्या मालाची वाहतूक करणार्‍या व्यक्तीवर आकारली जाईल.
  • कर आकारणी केलेल्या मालाच्या सर्व आंतरराज्यीय हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच एखाद्या विशिष्ट राज्याच्या हद्दीत वाहून नेल्या जाणाऱ्या मालावर लक्ष ठेवणे.

ई-वे बिल वैधतेचा कालावधी हा माल किती अंतरावरून नेला जातो यावर अवलंबून असते. अशा प्रकारे प्रवास केलेले अंतर 100 किमीपेक्षा जास्त नसल्यास, वाहतूक सुरू होण्याच्या तारखेपासून केवळ 24 तासांसाठी वैधता लागू होते. या पलीकडे, वैधता सुरूवातीच्या वाहतुकीच्या तारखेपासून आणखी 24 अतिरिक्त तासांनी वाढवल्या जाते.

तुला माहिती आहे का? ई-वे बिल हे कर न भरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन म्हणून काम करते.

ई-वे बिलाच्या वैधता ठरवणं 

ई-वे बिल वैधतेचे निर्धारक काय आहेत?

  • ई-वे बिल वैधतेचा कालावधी हा मालाच्या वाहतूकदाराने पार केलेल्या अंतरावर अवलंबून असतो.
  • ई-वे बिलात दोन भाग असतात, भाग अ आणि भाग ब. भाग अ'मध्ये विविध डिटेल्स असतात त्यातील काहींमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
  • ज्या उत्पादनांची वाहतूक केली जात आहे त्यांचे प्रमाण
  • उत्पादनांचे मूल्य
  • जीएसटीआयएन डिटेल्स (मालाच्या प्राप्तकर्त्याचा डब्ल्यू.आर.टी.)
  • इनव्हाॅईस क्रमांकाचे डिटेल्स
  • माल किंवा रेल्वे पावती क्रमांक किंवा माल लादण्याचे बिल तसेच, वायुमार्ग बिल क्रमांक
  • मालाची ने-आण करण्याचे कारण
  • मालाचे एकूण मूल्य
  • HSN कोड
  • भाग बी'मध्ये खालील डिटेल्स गोष्टींचा समावेश आहे:
  • मालाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचा वाहन क्रमांक
  • कागदपत्राचा  क्रमांक
  • कागदपत्राची तारीख

हेही वाचा: ई-वे बिल काय आहे? ई-वे बिल कसे तयार करावे?

ई-वे बिलाची वैधता, ज्या दिवशी ई-वे बिलाच्या भाग बी मध्ये मालाची तसेच वाहतूक पद्धतीची माहिती अपडेट केली जाते, त्याच दिवशी सुरू होते. ई-वे बिलाची वैधता दुसऱ्या दिवसाच्या मध्यरात्री (एकूण 24 तास) संपून जाते.

क्रमांक

मालाचा प्रकार

एकूण अंतर

वैधता

1

 

नियमित पाठवला जाणारा माल

100 किमीपर्यंत

अतिरिक्त दिवस (24 तास)

2

प्रत्येक अतिरिक्त 100 किमी किंवा 100 किमपेक्षा कमी अंतरासाठी

अतिरिक्त दिवस (24 तास)

3

 

वस्तू ज्या वाहनाच्या डेकपेक्षा अधिक आहेत जेथे त्यांना लोड केले जाते

 

20 किमीपर्यंत

अतिरिक्त दिवस (24 तास)

4

प्रत्येक अतिरिक्त 20 किमी किंवा 20 किमीपेक्षा कमी अंतरासाठी

अतिरिक्त दिवस (24 तास)

एकदा ई-वे बिल जनरेट झाले की, ई-वे बिल वैधतेची वेळ दुसऱ्या दिवशीच्या मध्यरात्रीपर्यंत (बरोबर 24 तासांनंतर) मोजली जाते. याचा आपण उदाहरणाद्वारे विचार करू. 100 किमीपेक्षा कमी अंतराच्या मालाची वाहतूक करण्यासाठी 1 जून 2019 ला ई-वे बिल जनरेट केल्यास बिलाची वैधता 2 जून 2019 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढते.

तरीही, या वैधतेत 1 जानेवारी 2021 पासून सुधारणा केली आहे. त्याचे डिटेल्स खाली दिले आहे:

क्रमांक

प्रवासाचे अंतर

वाहनाचा प्रकार

वैधतेचा कालावधी

1

200 किमीपर्यंत 

नियमित वाहन

एक दिवस

2

सुरुवातीला सांगितलेल्या अंतरानंतर पुढील 200 किंवा 200 किमीपेक्षा कमीसाठी

नियमित वाहन

अतिरिक्त दिवस (24 तास)

3

20 किमीपर्यंत

वस्तू ज्या वाहनाच्या डेकपेक्षा अधिक आहेत जेथे त्यांना लोड केले जाते

एक दिवस

4

सुरुवातीला सांगितलेल्या अंतरानंतर पुढील 20 किंवा 20 किमीपेक्षा कमीसाठी

वस्तू ज्या वाहनाच्या डेकपेक्षा अधिक आहेत जेथे त्यांना लोड केले जाते

अतिरिक्त दिवस (24 तास)

ई-वे बिलाच्या वैधता कालावधीमध्ये वाढ

ई-वे बिलाची वैधता वाढवणे हा अनेक व्यक्तींसाठी नेहमीच कठीण निर्णय राहिला आहे. ई-वे बिलाची वैधता विविध परिस्थितीत वाढवता येऊ शकते. यापैकी काही खाली दिले आहे:

  • विविध अनपेक्षित आकस्मिक परिस्थितीमुळे, ई-वे बिल वैधता वेळेत माल जिथे पोहोचणे अपेक्षित आहे तेथे पोहोचवता येत नाही. हे कायदा व सुव्यवस्थेचा अचानक व्यत्यय, मुसळधार पाऊस किंवा पूर, अपघात किंवा वस्तूंच्या वाहतुकीस उशीर करणारा अडथळा ही असू शकतो
  • जर माल वाहून नेणाऱ्या वाहनात मशिनरी बिघडली असल्यास किंवा इतर काही प्रकारचा बिघाड झाला असल्यास ज्यामुळे माल वाहतूक करण्यास विलंब होतो
  • जर काही कारणास्तव, परिस्थितीला या वाहतुकीसाठी वाहन बदलण्याची आवश्यकता असल्यास,
  • मालाच्या विद्यमान वाहकाला ई-वे बिल वैधता कालावधी वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे

ई-वे बिलाची वैधता वाढवण्यासाठी स्टेप्स

बिलाची वैधता संपल्याच्या मुदतीच्या आठ तास आधी किंवा आठ तासांनंतर तुम्ही ई-वे बिलाच्या वाढीसाठी मागणी करू शकता.

ई-वे बिलाची वैधता वाढवण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या विविध स्टेप्स खाली दिल्या आहेत:

  • सुरुवातीला तुम्हाला ई-वे बिलिंग पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच www.ewaybillgst.gov.in वर लॉग इन करावं लागेल. तुमचा युजरनेम, संबंधित पासवर्ड आणि कॅप्चा अशा सर्व संबंधित डिटेल्स भरल्यानंतर 'लॉग इन' टॅबवर क्लिक करा.
  • तुम्हाला नवीन स्क्रीन दिसेल. स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला विविध पर्याय दिसतील. 'वैधता वाढवा असे नमूद केलेल्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला आता ई-वे बिलाचा नंबर टाकावा लागेल ज्यासाठी तुम्ही मुदतवाढ मागत आहात
  • 'होय' आणि 'नाही' असे सांगणारे दोन पर्याय दिसतील
  • 'होय' पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला मुदतवाढ मागण्याची कारणे देण्यास सांगितले जाईल.
  • माल वाहून नेणाऱ्या वाहनाचा नंबर आणि इतर डिटेल्स भरा
  • ड्रॉप-डाऊन मेन्यू दिसेल. ड्रॉप-डाऊन मेनूच्या आवश्यकतांविरूद्ध कारण टाका. तुम्ही या औपचारिकता पूर्ण करताच, सिस्टम तुम्हाला ई-वे बिल वैधता वाढीसह प्रदान करते. तरीही, वाढ त्या वेळेपर्यंत किती अंतर पार केले आहे यावर अवलंबून असेल.

ई-वे बिल वैधतेसाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

ई-वे बिलाची वैधता विशिष्ट परिस्थितीत शक्य आहे. रस्ते अपघातामुळे होणारा विलंब, कायदा व सुव्यवस्थेचा अनपेक्षित व्यत्यय, अत्यंत हवामानाची परिस्थिती किंवा वाहनाच्या बिघाडामुळे होणारा विलंब असू शकतो

  • मालाची वाहतूक करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीस ई-वे बिलाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करण्याचा अधिकार देण्यात आला आहे
  • ई-वे बिल जनरेट केल्यानंतर त्यात बदल, संपादन किंवा रद्द करता येत नाही. अपडेट करता येणारा एकमेव विभाग म्हणजे भाग ब. यात माल वाहून नेणाऱ्या वाहनाचे डिटेल्स समाविष्ट आहे म्हणून जर वाहनात बदल झाला तर ते या विभागात अपडेट केले जाते
  • जर तुम्ही ई-वे बिलात चुकीचे डिटेल्स सादर केले असल्यास तो रद्द करून नव्या विधेयकासाठी अर्ज करावा लागेल. ई-वे बिल जनरेट केल्यानंतर 24 तासांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
  • प्रत्येक ई-वे बिलाची वैधता ही मालाचा पुरवठा करणाऱ्याने किंवा ज्याला माल मिळणार आहे त्याने दिलेल्या अधिकृत कागदपत्रात नमूद केलेल्या वाहन नंबरच्या डिटेल्सनेच सुरू होते
  • अगदी पहिल्या दिवसाची वैधता दुसऱ्या दिवसाच्या मध्यरात्री किंवा शून्य तासांपर्यंत संपून जाते
  • प्रत्येक इनव्हाईससह एकच ई-वे बिल असते. तुम्ही अनेक इनव्हाॅईससाठी ई-वे बिल तयार करू शकत नाही.

हेही वाचा: जीएसटी इनव्हॉईस एक्सेल - तुमच्या पीसीवर जीएसटी पात्र इनव्हॉईस तयार करा

निष्कर्ष:

या लेखातील कंटेंट ई-वे बिलाच्या वैधतेबद्दल अधिक स्पष्टता देतो. हा लेख तुम्हाला ई-वे बिलाची वैधता काय निर्धारित करते आणि विशेष परिस्थितीत ते कसे वाढवता येईल याची माहिती देतो. ई-वे बिलाच्या वैधतेत वाढ करण्यासाठी अर्ज करण्याच्या विविध स्टेप्सची माहिती ही तुम्हाला मिळते. तुम्हाला पेमेंट मॅनेजमेंट आणि जीएसटी संबंधित अडचणी आहेत? आयकर किंवा जीएसटी फाइलिंग, कर्मचारी मनेजमेंट आणि अन्य सर्व मुद्द्यांसाठी Khatabook ॲपला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: ई-वे बिलाची वैधता संपली तर काय करावे?

उत्तर:

जर ई-वे बिलाची वैधता संपली असल्यास तुम्ही अधिकृत पोर्टलवर मुदतवाढीसाठी अर्ज करू शकता. मात्र, बिलाची वैधता संपल्यानंतर हे आठ तासांचा कालावधी असावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता, तुम्ही युजरनेम आणि पासवर्डसह लॉग इन करू शकता आणि ई-वे बिल वैधता वाढवण्यासाठी समाविष्ट असलेल्या सोप्या स्टेप्स फाॅलो करू शकता. तुम्ही दिलेली औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला नवीन क्रमांक प्रदान केला जाईल.

प्रश्न: समजा, एखाद्या मालाच्या वाहतुकीत अनेक वाहतूकदार गुंतले आहेत. तर त्यासाठी वेगवेगळे ई-वे बिल जनरेट करावे लागेल का?

उत्तर:

नाही. एक ई-वे बिल पुरेसे आहे. जेव्हा अनेक वाहतूकदार गुंतलेले असतात, तेव्हा या प्रक्रियेला 'ट्रान्स-शिपमेंट' असे म्हणतात. संबंधित वाहतूकदार हाच माल दुसऱ्या वाहतूकदाराला ही देऊ शकतो. अधिकृत ई-वे बिलिंग पोर्टलवर हे बदल तातडीने करावे लागतील.

प्रश्न: सेवा पुरवठ्याच्या बाबतीत ई-वे बिल जनरेट करणे आवश्यक आहे का?

उत्तर:

नाही. तुम्हाला सेवा-आधारित असलेल्या कोणत्याही व्यवहारांसाठी ई-वे बिलाची आवश्यकता नाही.

प्रश्न: ई-वे वैधता कालावधी काय आहे?

उत्तर:

ज्या अंतरावरून मालाची वाहतूक केली गेली आहे त्यावर वैधता अवलंबून असते. तसेच, मालाच्या वाहतुकीसाठी कोणत्या प्रकारचे वाहन वापरले गेले आहे यावरही ते अवलंबून असते.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.