written by khatabook | October 19, 2020

अत्यल्प गुंतवणूकीसह भारतात किराणा शाॅप सुरू करण्यासाठी प्रभावी पायऱ्या

×

Table of Content

किराणा शाॅप म्हणजे काय?

एका सामान्य किराणा शाॅपमध्ये किचनशी संबंधित सामग्री जसे की, तांदूळ, दाळ, गहू, मसाले इत्यादी. तसेच, घरातील कामासाठी प्लास्टिक मग, ब्रश, बकेट इत्यादी आणि इतर डिटर्जेंट पावडर, सॅनिटायजींग लिक्विड, टूथपेस्ट, बाथरूम व टाॅयलेट क्लिनर्स इत्यादी उपलब्ध असते. एक यशस्वी किराणा शाॅप उघण्यासाठी वरिल वस्तूंसह अनेक प्राॅडक्ट्स विक्रीसाठी असणे गरजेच आहे. किराणा शाॅपमधील प्राॅडक्ट्स त्यांच्या आकार, क्षमता आणि दुकानदाराने त्यावर गुंतवणूक केल्यानुसार त्यावरील पैसे किंवा त्यांचा भाव ठरवला जातो. कधीकधी लोकांच्या गरजेनुसार एखाद्या शाॅपमध्ये फळ आणि भाजीपाला देखील विक्रीसाठी शाॅपमध्येच ठेवण्यात येतो.

भारतातील किराणा शाॅपच्या नफ्याचे मार्जीन

भारतात किराणा शाॅपमधील नफ्याचे मार्जीन 2% ते 20% पर्यंत आहे. किराणा मालाची विक्री ही भारतातील एक आकर्षक बाजारपेठ आहे. अनेक परदेशी, भारतीय आणि स्थानिक ब्रॅण्ड बाजारपेठेसाठी स्पर्धा करतात आणि किराणा शाॅपमध्ये त्यांचे प्राॅडक्ट असल्याचे ही सुनिश्चित करतात. भारतातील शहरे आणि टावून्स वेगाने वाढत असून भारताचे स्थान तीन वैश्विक अर्थव्यवस्थांपैकी एक व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. किरकोळ स्टोअर किंवा किराणा शाॅप जवळजवळ सर्वच लहान, मोठ्या आणि महानगरांमध्ये वाढण्याची प्रचंड क्षमता आहे. लोक प्रगतीसाठी व उदरनिर्वाहासाठी अनेक छोट्या शहरांतून मोठ्या शहरांत स्थलांतर करत आहेत, अशा स्थितीत भारताच्या कानाकोपऱ्यात लोकांच्या क्रयशक्तीची वाढ होत आहे. किराणा वस्तूंवर नफा काही रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत असतो. अशा प्रकारे किराणा शाॅपमध्ये गुंतवणूक फायदेशीर आहे आणि ते आपल्याला दीर्घ मुदतीत उच्च उत्पन्न मिळवून देते. भारतात किराणा शाॅप सुरू करण्यासाठी किती पैशांची आवश्यकता आहे? किराणा शाॅपमध्ये गुंतवणूक 10 लाख रुपयापासून 2 कोटी रुपयांपर्यंत करू शकतो. हे स्टोअरचा आकार, क्षमता आणि पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. आपण निश्चित गुंतवणूक आणि फ्लोट गुंतवणूकीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भारतातील किराणा शाॅपच्या किंमतीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :

  • शेल्फ्स, फर्निचर, डिस्प्ले रॅक इत्यादींसह पायाभूत सुविधा समाविष्ट आहेत,
  • संगणक, कॅश रजिस्टर, सुरक्षा कॅमेरे आणि घड्याळे इत्यादी उपकरणे.
  • वस्तू आणि विक्रीसाठी वस्तूंची यादी
  • कर्मचार्‍यांचा पगार
  • Tax, fees and कर, फी आणि परवानग्या इत्यादी
  • शाॅप आणि कर्मचाऱ्यांचा विमा
  • मार्केटींग आणि जाहिरात खर्च
  • स्टोअरच्या रोजच्या साफसफाईसाठी साहित्य
  • इलेक्ट्रिसिटी आणि इतर उपकरणे जसे की एसी, पंखे आणि दिवे इत्यादी
  • भाडे खर्च

किराणा शाॅप कसे सुरू करावे?

फायदेशीर किराणा व्यवसाय स्थापित करण्याच्या प्रभावी व्यवसाय योजनेमध्ये पुढील पायऱ्यांचा समावेश आहे:

  1. प्रथम जीएसटी नोंदणी - जर तुमची वार्षिक उलाढाल 20 लाख असल्यास तुम्हाला 15 अंकी जीएसटी नोंदणी क्रमांक मिळवणं आवश्यक आहे.
  2. परवाने - आपला खाद्य परवाना, शाॅप आणि स्थापना नोंदणी आणि घटकाची नोंदणी करून घ्या. हे करण्यासाठी परवाना प्राधिकरण कार्यालयाला भेट द्या.
  3. लोकेशन - आपल्या शाॅपसाठी योग्य लोकेशन निवडा.
  4. स्टोअर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक - लोकेशन निश्चित केल्यावर आपल्याला आपल्या स्टोअरला आकर्षक बनवणे आणि स्टोअरमधील वस्तूंची मांडणी करणे आवश्यक आहे.
  5. ग्राहक - आपल्याला आपल्या ग्राहकांची प्राधान्ये, त्यांची जगण्याची पद्धत आणि बाजारपेठेचा आकार यांचा एक छोटासा अभ्यास करणे आवश्यक आहे.
  6. आपल्या स्पर्धेचा अभ्यास करा - आपल्या स्टोअरच्या सभोवतालचे प्रतिस्पर्धी आणि प्राॅडक्ट्स समजण्यास मदत करण्यासाठी, ग्राहक आपल्याकडून काय खरेदी करतात याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
  7. विक्रेते - स्टोअरमध्ये विक्री करण्यासाठी आपल्याला पाहिजे असलेला माल डिलीव्हरी करण्यासाठी काही विक्रेत्यांशी संबंध ठेवणे.
  8. प्राॅडक्ट्सची किंमत - स्टोअरमधील वस्तूंसाठी योग्य आणि स्पर्धात्मक किंमती सेट करा. आयटमसाठी 25% ते 40% पर्यंत मार्जिन ठेवा, परंतु सर्वच वस्तूंवर ठेवणं आवश्यक नाही.
  9. आपल्या स्टोअरसाठी कर्मचारी - आपल्या स्टोअरसाठी आसपासच्या ठिकाणावरून काही कर्मचारी किंवा मदतनीस कामासाठी ठेवा.
  10. शाॅप ऑनलाईन ठेवा - आपले स्टोअर ऑनलाईन ठेवणे फायद्याचे आहे जेणेकरून लोक आपल्या स्टोअरमधून ऑनलाईन वस्तू ऑर्डर करू शकतात.
  11. जाहिरात करा - आपल्याला पत्रके, सूचना तयार करणे तसेच स्टोअरची माहिती सर्वत्र आणि अगदी दूरवर पसरवणे गरजेचं आहे
  12. डिजिटली तयार राहा - बिलिंगसाठी तयार असलेल्या संगणकांसह स्केलिंग आयटमसाठी इलेक्ट्रॉनिक वजनाची मशीन्स ठेवा आणि पेमेंट देण्याच्या पद्धतींसाठी क्रेडिट/डेबिट कार्ड्स, Phone Pe, PayTM, Google Pay इत्यादी डिजिटल पेमेंट पद्धतीसह सज्ज व्हा.

किराणा शाॅपच्या फ्रॅन्चायजीचे फायदे

फ्रॅन्चायजी बिनेसमध्ये बरेच फायदे आहेत खालीलप्रमाणे:

  • ब्रँडच्या नावाने विक्रीची क्षमता वाढण्यास मदत होईल
  • यशस्वी होण्याची संधी अधिक आहे
  • सुरू करायला वेळ कमी लागतो आणि त्वरित स्थापित केला जाऊ शकतो
  • सपोर्ट व प्रशिक्षण मोफत दिल्या जाते
  • प्रस्थापित व्यवसाय मॉडेल आहे
  • वेळे प्रसंगी सहाय्य केल्या जाईल
  • निधीचा पर्याय सुरक्षित आहे
  • एकाच वेळी खरेदी केल्याने खरेदी किमंत कमी होते
  • सहकाऱ्यांचे नेटवर्क तुम्हाला या स्पर्धेत डील करायला सामोर जाण्याची परवानगी देईल.

भारतात किराणा मालाचे शाॅप उघडण्याचे बरेच फायदे आहेत आणि हा एक आकर्षक व्यवसाय आहे. ट्रेंड दर्शवतो की भारत दरवर्षी सुमारे 10% वाढतो आहे. लोकांच्या खरेदीची क्षमता गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्टार्टअप किराणा शाॅपमधील विविध फायदे आणि जोखीम समजून घेऊन गुंतवणूकदार आणि उद्योजकांनी आत्मविश्वासाने किराणा शाॅप सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.