written by khatabook | August 8, 2020

सीजीएसटी कायद्यातील नवीनतम सुधारणा तुम्हाला माहिती असणं आवश्यक

×

Table of Content


सीजीएसटी कायदा: “केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) कायदा”, हे ते शब्द आहेत जे सध्या देशपातळीवर चर्चेचा विषय बनले आहेत. आतापर्यंत चर्चा फक्त जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कराविषयी सुरू होती. जीएसटीसारखंच सीजीएसटीमध्ये झालेल्या नवीनतम सुधारणांविषयी जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. या नवीन कर रचनेच्या राजवटीच्या अंमलबजावणीला समजून घेण्यासाठी व्यवसाय मालक आणि ग्राहक दोघेही प्रयत्न करत आहेत. सीजीएसटी या नवीन संकल्पनेची ओळख या परिस्थितीत समजणे सोपे नाही. अर्थ वर्ष 2019-2020 साठी लागू होणाऱ्या सीजीएसटीला सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी हा लेख तुम्हाला मदत करेल. लहान व्यवसाय मालकांपासून तर ग्राहकांपर्यत, हे त्या सर्वांसाठी आहे ज्यांना सीजीएसटी कायदा आणि त्याच्या नवीनतम सुधारणा समजून घेण्याची आवश्यकता आहे.

सीजीएसटी कायदा समजून घेताना

हा  कायदा मुळीच नवीन नाही आहे. जीएसटी म्हणजे सर्वसाधारणपणे एप्रिल 2017 मध्ये सुरू झालेली एक नवीन अप्रत्यक्ष कर व्यवस्था आहे. दोन नवीन संसदीय कायदे या नवीन कर प्रणालीचा आधार बनतात: आयजीएसटी कायदा आणि सीजीएसटी कायदा. आयजीएसटी कायदा म्हणजे एकात्मिक वस्तू व सेवा कर कायदा आणि सीजीएसटी कायदा म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा. आयजीएसटी वस्तू आणि सेवांवर लागू होतो जेव्हा ते एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जातात. आयजीएसटीमार्फत जमा झालेला महसूल केंद्र आणि राज्ये वाटून घेतात. दुसरीकडे, सीजीएसटी म्हणजे जो राज्यातील वस्तू आणि सेवांच्या हालचालींवर आकारल्या जातो. हा कर 2017 पासून व्यवहारातही लागू आहे. एप्रिल 2019 पासून सीजीएसटी कायद्यात काही सुधारणा केल्या गेल्या आहेत, याच कारणामुळे सीजीएसटीची चर्चा जीएसटीमधून वेगळी होवून पुढे आली आहे.

सीजीएसटीतील बदल

सीजीएसटी कायद्यात 2019 मधील सुधारणा खालील क्षेत्रांशी संबंधित आहेत.

  • नोंदणीची मर्यादा
  • योजना स्कीम मर्यादा
  • 50 लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी नवीन योजना
  • पुरवठादारांना पेमेंट देण्याची पद्धत
  • परतावा भरण्याची पद्धत
  • कर आणि व्याज देयके
  • विविध बाबी

नोंदणीची मर्यादा

मार्च 2019 पर्यंत वस्तू आणि सेवा या दोन्ही वस्तूंच्या पुरवठ्यासाठी जीएसटी नोंदणीची सुरूवातीची मर्यादा दरवर्षी २० लाख रुपये होती. केवळ राज्यातच कार्यरत असलेल्या कोणत्याही वस्तू व सेवा पुरवठादारास २० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उलाढालीसाठी जीएसटी नोंदणी करावी लागायची. आता ही मर्यादा  2019-2020 या आर्थिक वर्षासाठी 40 लाख रूपयांपर्यंत केली आहे फक्त वस्तूंसाठी. चालू आर्थिक वर्षासाठी वार्षिक 40 लाखांपर्यंतची उलाढाल असलेल्या वस्तू पुरवठा करणाऱ्यांना आता जीएसटी नोंदणीतून सूट देण्यात आली आहे.

हा बदल अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किम, तेलंगणा, त्रिपुरा, आणि उत्तराखंड या विशेष राज्यांशिवाय संपूर्ण भारतभर वैध आहे. हा बदल पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशासही लागू नाही. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मर्यादांवर कोणताच बदल नाही म्हणजेच आयएनआर १० लाखांवर कायम आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी सेवांच्या नोंदणीची मर्यादा न बदलता 20 लाख रुपये ठेवली गेली आहे. याव्यतिरिक्त, जेथे आयजीएसटी लागू आहे, तेथे आंतरराज्यीय वस्तूंच्या पुरवठ्यावर लागू होणार नाहीत. सीजीएसटीच्या कलम 24 नुसार चिन्हांकित केलेल्या वस्तूंच्या पुरवठादारासह ऑनलाईन विक्रेत्याच्या मर्यादेतही बदल केलेला नाही. आईस्क्रीम किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खाद्य बर्फ पुरवठा करणार्‍याच्या मर्यादादेखील कायम ठेवल्या आहेत. सुधारणेतील एक नवीन उपविभाग आधार कार्ड व्हेरिफिकेशन अनिवार्य करते. आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेचे देखील या विभागात वर्णन केले आहे. कंपनीचे महत्वपूर्ण कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी, एमडी इत्यादींना आधार व्हेरिफिकेशन देखील अनिवार्य आहे.

योजना स्कीम मर्यादा

सीजीएसटी कायद्यांतर्गत रचना योजना सोप्या दराखाली वस्तू आणि सेवा प्रदात्यांना त्रैमासिक देयके पर्यायासाठी नोंदणी करण्याचा चांगला मार्ग आहे. 2019  च्या दुरुस्तींद्वारे या योजनेच्या मर्यादेतही बदल करण्यात आले आहेत.

आयएनआर १ कोटी वार्षिक उलाढालीऐवजी आता मर्यादा वाढवून 1.5 कोटी केली आहे. नवीन मर्यादा केवळ व्यापारी, उत्पादक आणि रेस्टॉरंट सेवा प्रदात्यांसाठी लागू आहे. व्यापारी आणि उत्पादकांना 1% दराने सीजीएसटी भरणे आवश्यक आहे. रेस्टॉरंट सेवा प्रदात्यांसाठी कर दर 5% आहे. हे दर पूर्वीसारखेच आहेत.

50 लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी नवीन योजना

या सुधारणांनी मिश्रित पुरवठादारांसाठी म्हणजेच वस्तू आणि सेवा दोन्ही प्रदान करणार्‍यांसाठी नवीन विभाग जोडला आहे. आंतरराज्यीय पुरवठ्यात सामील नसलेले असे मिश्रित पुरवठादार रचना योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी मागील आर्थिक वर्षातील मर्यादेची उलाढाल 50 लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजे.

अशा मिश्र पुरवठा करणाऱ्यांना  केंद्राने आकारलेला @ 6%, 3%  आणि राज्य (एसजीएसटी) द्वारे आकारलेला 3% कर भरावा लागेल. कर्ज आणि ठेवी वाढवणे यासारख्या वित्तीय सेवा आणि त्यातून जमा झालेले व्याज मर्यादेच्या मापना बाहेर राहील. सुधारणेतील नवीन उपविभाग या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देते. सुधारित रचना योजनेशी संबंधित काही बारीकसारीक अटी व शर्ती जोडल्या आहेत. हे तपशिल मुख्यतः शब्दावलीशी संबंधित आहेत.

पुरवठादारांना पेमेंट देण्याची पद्धत

नवीन उपविभाग काही नोंदणीकृत पुरवठादारांना त्यांच्या प्राप्तकर्त्यांना हवे असल्यास त्यांना इलेक्ट्रॉनिक पेमेंट देण्याची परवानगी देणे अनिवार्य करते. परंतु अशा पुरवठादारांना ई-पेमेंट शुल्क घेण्याची आवश्यकता नाही.

टीसीएस तरतुदी

टीसीएस म्हणजे कर कलेक्टेड केलेला स्त्रोत. पूर्वी, टीसीएस रक्कम जीएसटी गणनामध्ये समाविष्ट केली गेली होती. सुधारणांनुसार ही रक्कम आता जीएसटी मोजणीच्या बाहेर असेल. सोप्या उदाहरणासह स्पष्टीकरण देण्यासाठी समजा, पुरविल्या जाणार्‍या वस्तूंचे एकूण मूल्य 4,00,000 रुपये आहे. टीसीएस @ 1% 4,000 रुपये असेल. त्यात एकूण 4,04,000 रुपये इतकी भर पडेल. पूर्वी, जीएसटी या एकूण मूल्याच्या 3% मोजले जाई. तर ते आता 12,120 रुपये असते. तर अंतिम रक्कम 4,00,000+ 4,000 + 12,120(जीएसटी) = INR 4,16,120 होईल. सुधारणांनंतर, एकूण रक्कम असेलः 4,00,000 रुपये (जीएसटी केवळ मूळच्या  @ 3%) 12,000 = 4,12,000.

परतावा भरण्याची पद्धत

2019 च्या सुधारणांनी गुंतागुंतीची फाईलींग प्रक्रिया कमी करण्यासाठी या विभागात काही सकारात्मक बदल केले आहेत. काही करदात्यांकडे आता मासिकऐवजी तिमाही रिटर्न भरण्याचा पर्याय आहे. पण तरीही दरमहा कर भरावा लागतो.

रचना स्कीम अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्यांना आता त्रैमासिक ऐवजी दरवर्षी रिटर्न भरणे शक्य झाले आहे. परंतु कर भरणे तिमाही आधारावर सुरू राहील.

कर आणि व्याज देयके

जर एखादा करदाता चुकीच्या शीर्षकाखाली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कर, दंड किंवा व्याज भरत असेल तर ही रक्कम आता फक्त अचूक जागी वळवणे शक्य आहे. पूर्वी, रक्कम गमावली जायची.

सुधारणेचा अर्थ असा आहे की आता देय देण्याला विलंब झाल्यास केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरलेल्या रकमे एवढे व्याज असेल. यापूर्वी करदात्यांना संपूर्ण रकमेवर व्याज द्यावे लागत होते.

विविध बाबी

2019 च्या जीएसटी सुधारणांमध्ये राष्ट्रीय नफा-विरोधी प्राधिकरणात महत्वाचे सकारात्मक बदल केले आहेत. ते आता नफा कमावलेल्या रकमेच्या 10% पर्यंत दंड आकारू शकतात. किंमत कपात करण्याच्या मार्गाने ग्राहकांना इनपुट टॅक्सचा फायदा कमी होतो हे यातून सुनिश्चित करणे आहे.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.