written by Khatabook | July 1, 2021

सॅलरी स्लीप म्हणजे काय? ती का महत्वाची आहे?

×

Table of Content


कर्मचार्‍यांना सॅलरी स्लीप म्हणजे काय हे जाणून घेणे आणि समजणे खूप महत्वाचे आहे. जर एखाद्या कर्मचार्‍याला सॅलरी स्लीप म्हणजे काय हे समजत नसल्यास त्यांना कामासाठी अर्ज करताना आणि इतर गरजांसाठी कागदपत्र भरण्यात खूप अडचणी येतील.

सॅलरी स्लीप काय आहे?

  • सॅलरी स्लीप म्हणजे उद्योजकाने जारी केलेली व योग्यरित्या स्टँप केलेला पेपर असतो. सॅलरी स्लीप कर्मचार्‍यांना त्यांच्या सॅलरीविषयी तपशीलवार माहिती देते. जसे की, एचआरए, टीए, काही बोनस इत्यादी, विविध भाग यात तपशीलवार सूचीबद्ध असतात. तसेच, या स्लीपमध्ये कपातीची माहितीदेखील असते.
  • कायद्यानुसार उद्योजकाने नियमितपणे सॅलरी दिल्याचा पुरावा म्हणून कर्मचाऱ्यांना सॅलरी स्लीप देणे गरजेचे आहे. फक्त कामगारांनाच सॅलरीच्या स्लीपमध्ये प्रवेश असतो आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या सॅलरीची प्रिंट तुम्हाला प्रदान करण्यासाठी मालक जबाबदार असतो.
  • काही छोटे व्यवसाय नियमितपणे सॅलरी स्लीप देत ​​नाहीत, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या उद्योजकाला सॅलरी प्रमाणपत्रांची विनंती करू शकता. बहुतेक उद्योजक त्यांच्या कर्मचाऱ्यांना  डिजिटल पे-स्लीप्स ऑफर करतात, परंतु अजूनही काहीजण पेपरच्या प्रिंटच प्रदान करतात.

चला आता पुढील उप-विभागामध्ये याविषयी अजून सखोल जाणून घेवूया.

सॅलरी स्लीपचे स्वरूप

  • येथे आपण सॅलरी स्लीपचे स्वरूप पाहूया - सॅलरी स्लीपचे स्वरूप हे कर्मचार्‍याच्या मासिक सॅलरीविषयी वित्तीय तपशील नोंदवण्याची प्रमाणित रचना आहे. तुम्हाला सॅलरी स्लीपचे स्वरूप जाणून घ्यायचे असल्यास, त्याचे स्वरूप आम्ही खाली शेअर केले आहे.

  • स्वरूप प्रत्येक कंपनीचे थोडे वेगवेगळे असू शकते. बेसिक सॅलरी, एलटीए, एचआरए, पीएफ कपात, वैद्यकीय भत्ता, आणि व्यावसायिक कर या सर्व गोष्टी कोणत्याही सॅलरी स्लीपच्या स्वरूपात समाविष्ट असायला पाहिजे. सॅलरी स्लीपचे उत्पन्न आणि कपात हे दोन्ही विभाग वेगवेगळ्या घटकांद्वारे बनलेले आहेत. हे भाग, त्यांच्या व्याख्यांसह खाली सूचीबद्ध केले आहेत.

हेही वाचा: सॅलरी कॅल्क्यूलेटरद्वारे करा टेक होम सॅलरी कॅल्क्यूलेट

कंपनीचे नाव (पत्ता)

सॅलरी स्लीप

उद्योजकाचे नाव

 

पदनाम

 

महिना:

 

वर्ष:

 

कमाई

 

कपात

 

बेसिक आणि डी.ए.

-

भविष्य निर्वाह निधी

-

एचआरए

-

ईएसआय.

 

-

सुविधा

-

लोन

-

 

 

व्यावसायिक कर

-

 

 

टीडीएस

-

एकूण बेरीज

-

एकूण कपात

-

 

 

नेट सॅलरी

-

चेक नंबर

 

तारीख

 

बँकेचे नाव

 

कर्मचार्‍याची सही

 

आपल्याला सॅलरी स्लीपची गरज का आहे?

  • सामान्यत: बँकांसारख्या वित्तीय संस्था अर्जदारांना त्यांची सॅलरी स्लीप मागतात. ते पेमेंट स्लीपला कर्जदाराची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा पुरावा मानतात. ग्राहकाची क्रेडिट लिमिट सॅलरी स्लीपवर अवलंबून असते. सॅलरी स्लीप किंवा पे-स्लीपलाही अत्यंत मौल्यवान कायदेशीर दस्तऐवज मानल्या जाते. भविष्यातील कोणत्याही आवश्यकतेसाठी एखाद्याने सॅलरी स्लीप किंवा रेकाॅर्ड सांभाळून ठेवायला पाहिजे.
  • कर्मचार्‍यांची सॅलरी स्लीप महत्त्वपूर्ण कायदेशीर दस्तऐवज आहे जो त्यांच्या कमाईचा पुरावा आहे. परिणामी, उद्योजक तुम्हाला सॅलरी स्लीप प्रदान करत नसल्यास, तुमच्याजवळ विनंती करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तरी सर्व उद्योजकांनी तुम्हाला सॅलरी स्लीप प्रदान करणे आवश्यक आहे, काही व्यवसाय सॅलरी स्लीपची प्रिंट प्रदान करतात किंवा त्यांच्या कामगारांना पीडीएफ स्वरूपात सॅलरी स्लीप ईमेल करतात जेणेकरुन, ते कोणत्याही वेळी सॅलरी स्लीप तपासू शकतात.

कर्मचार्‍यांच्या सॅलरी स्लीपचे महत्त्व

  • सॅलरी स्लीप म्हणजे संस्थेशी संबंधित कायदेशीर पुरावा होय. लोकांना कधीकधी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घर किंवा कार खरेदी करण्यासाठी त्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असू शकते. अशा वेळी, एखादी व्यक्ती कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे लोनसाठी अर्ज करू शकते. जेव्हा तुम्ही लोनसाठी अर्ज करता, तेव्हा सॅलरी स्लीप कामकाजाचा पुरावा आणि उत्पन्नाचा स्रोत दर्शवते.
  • सॅलरी स्लीपमध्ये, कर्मचारी आणि उद्योजक दोघांची ही नावे सूचीबद्ध असतात. कर्मचार्‍याचा कायमचा पत्ताही सॅलरी स्लीपवर नमूद केलेला असतो. तसेच, सॅलरी स्लीपवर, सॅलरीच्या निश्चित तारखेचा उल्लेखदेखील केलेला असतो. सॅलरी स्लीपवर कपात, नेट सॅलरी आणि ग्राॅस सॅलरी यासारखी अन्य माहिती उपलब्ध असते.
  • पे-स्लीपमध्ये कपातीचा समावेश आहे. आता ते फक्त पेमेंट कराच्या रकमेचा अंदाज लावण्यातच मदत करत नाही तर कर परतावा कॅल्क्यूलेट करण्यासदेखील मदत करते.
  • क्रेडिट कार्ड आणि लोन व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते आणि सॅलरी त्याचा एक संकेत आहे.
  • तसेच, तुमच्या मागील संस्थेच्या सॅलरी स्लीपचा वापर भावी उद्योजकांसह चांगल्या सॅलरीसाठी आणि फायद्यांविषयी बोलणी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

सॅलरी स्लीपचे घटक

बेसिक सॅलरी- बेसिक सॅलरीलाच बेस सॅलरी असेही म्हटले जाते, कर्मचार्‍यांच्या उत्पन्नातून कोणतीही वाढ कपातीनंतर नियमित उत्पन्नाच्या आधी किंवा नंतर कपात केली जाते. बेसिक सॅलरी म्हणजे कर्मचाऱ्यांना दिलेली एखादी अतिरिक्त रक्कम किंवा कपात करण्यापूर्वी दिलेली रक्कम होय. घरातून काम करणाऱ्यांसाठी इंटरनेट भत्ता किंवा फोन कॉलसाठी दूरध्वनी भत्ता यासारखे भत्ते बेसिक सॅलरीत जोडले जातात.

महागाई भत्ता- महागाई भत्ता हा कर्मचार्‍यांना देण्यात येणाऱ्या सॅलरीचाच आणखी एक भाग आहे. महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी हे पैसे दिले जातात. डीएचे नियमन करणारे कायदे आपण कोठे राहता यावर अवलंबून असतात. डीए पूर्णपणे करपात्र लाभ आहे. असे दोन प्रकार आहेत:

1) रोजगाराच्या अटींनुसार डीए दिले जाते.

2) रोजगाराच्या अटींनुसार डीए दिले जात नाही.

घरभाडे भत्ता- घरभाडे भत्ता हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या सॅलरीचाच एक भाग असतो जो घर भाडे देण्याच्या खर्चासाठी भरला जातो. हे कामगारांना त्यांच्या घराचे भाडे भरण्यास मदत करते. ही सूट भाड्याने घेतलेल्या घरात राहणाऱ्या पगारदार व्यक्तींसाठी उपलब्ध आहे आणि ते त्यांचा कर दायित्व मर्यादित करण्यासाठी वापरू शकतात. तथापि, तुम्ही भाड्याच्या घरात राहत नसल्यास ही कपात पूर्णपणे करपात्र आहे.

प्रवास भत्ता- वाहतूक भत्ता जो वाहन भत्ता म्हणूनही ओळखल्या जाते, कामगारांना त्यांच्या उद्योजकांनी त्यांचे घर ते कामाच्या ठिकाणी प्रवास खर्च भागवण्यासाठी दिलेला सॅलरीचाच एक प्रकार आहे. टीपः सन 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, 50,000 ची प्रमाणित कपात सादर केली आहे. कर्मचार्‍यांना सहसा त्यांच्या बेसिक सॅलरीवर हा लाभ दिला जातो, जो आयकर कायद्यानुसार कर आकारला जाऊ शकतो किंवा नाही.

सुट्टी प्रवास सूट (एलटीसी)- सुट्टी प्रवास भत्त्यासाठी सूट उपलब्ध आहे. उद्योजक त्यांच्या कामगारांना सुट्टीवर असताना त्यांचा प्रवास खर्च भागवण्यासाठी देतात. 1961 च्या आयकर कायद्यातील 10(5) कलमनुसार, सुट्टी प्रवास भत्ता म्हणून भरलेल्या रकमेस कर आकारणीतून सूट देण्यात आली आहे. फक्त स्थानिक प्रवास सुट्टीतील प्रवास भत्त्याद्वारे संरक्षित केला जातो आणि प्रवास हवाई, रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतुकीद्वारे असणे आवश्यक आहे.

वैद्यकीय भत्ता- वैद्यकीय भत्ता कंपनीच्या कर्मचार्‍यांना त्यांचे वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी दिलेली निश्चित रक्कम असते.

बोनस भत्ता- उद्योजक एखाद्या कर्मचार्‍याला त्याच्या कामाच्या मान्यतेनुसार बोनस देतो. जास्तीतजास्त कर्मचार्‍यांना प्रेरित व प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. परिणामी, कामगारांना बोनस म्हणून काही रक्कम दिली जाते, जी पूर्णपणे करपात्र असते.

इतर भत्ता- परिस्थिती किंवा नोकरीनुसार इतर भत्तेदेखील तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. काहींची मर्यादा असते, तर काही पूर्णपणे करपात्र नसतात.

प्रमाणित कपात- एकापेक्षा कमी छोट्या कपातीऐवजी आपण दावा करू शकता अशी एक मोठी कपात म्हणजे प्रमाणित कपात होय. इंधन भत्ता सूट आणि विविध वैद्यकीय खर्चाच्या भरपाईचा पर्याय म्हणून अर्थसंकल्प 2018 मध्ये सर्वप्रथम यावर चर्चा झाली होती. 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांसाठी प्रमाणित कपात 50,000 रुपये आहे.

हेही वाचा: ग्रॉस सॅलरी म्हणजे काय? जाणून घ्या ग्राॅस सॅलरी कशी कॅल्क्यूलेट करायची​​​​​

सॅलरी स्लीपअंतर्गत कपात

पे-स्लीपच्या कपात कलमांतर्गत, खालील मुख्य बाबी तुमच्या लक्षात येतील:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी- भत्ते वगळता असे अनेक घटक आहेत जे तुमच्या सॅलरी स्लीपमध्ये समाविष्ट आहे. त्यामध्ये भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान म्हणून तुमच्या सॅलरीतून कपात केलेली रक्कम समाविष्ट आहे. निवृत्तीनंतर तुम्हाला मिळालेल्या तुमच्या बेसिक सॅलरीच्या 12% रक्कम तुमच्या सॅलरीमधून कपात केली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध कायदा 1952, या योजनेचे संचालन करते. कर्मचारी आणि उद्योजक दोघेही कर्मचार्‍याच्या बेस सॅलरीतून 12% योगदान देतात. ईपीएफ ठेवींवरील सध्याचा व्याज दर वार्षिक 8.50 टक्के आहे

व्यावसायिक कर- विशिष्ट करापेक्षा जास्त पैसे कमवणाऱ्या सर्व कामगारांवर राज्य सरकारांकडून नाममात्र कपात म्हणजे व्यावसायिक कर होय. हे अशा कोणालाही संदर्भित करते जे कोणत्याही पगाराच्या व्यावसायिकांद्वारे नव्हे तर कोणत्याही माध्यमाद्वारे जीवन व्यतीत करतात. जरी प्रमाणित रक्कम 250 रुपये असली तरी नेहमी असे नसते. तुमच्याकडून कपात केलेल्या व्यावसायिक कराची रक्कम राज्य सरकार निर्धारित करते आणि ते राज्यानुसार बदलते.

टीडीएस- ज्या कर्मचाऱ्यांची सॅलरी कराच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल अशांचा टीडीएस कपात केला जातो. उद्योजक कर्मचार्‍यांच्या सॅलरीतून टीडीएस कापून सरकारकडे जमा करतो.

सॅलरी स्लीपसाठी कोणाला विचारावे लागेल?

  • तुमच्या कंपनीचे मानव संसाधन, वित्त किंवा प्रशासन विभाग.
  • तुमच्या सेवेचा प्रदाता जो उद्योजकाच्या सॅलरीची हाताळणी करतो आणि आउटसोर्स आधारावर मजुरी सांभाळतो.
  • जर तुमच्या सॅलरीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होत असल्यास तुमची बँक तुम्हाला पे-स्लीपदेखील प्रदान करण्यास सक्षम असेल. तथापि, हे फक्त अतिरिक्त तपशील न देता असे स्पष्ट करेल की, सॅलरी ट्रान्सफर झाली आहे.

निष्कर्ष

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, कर्मचार्‍यांना सॅलरीची रक्कम किंवा सॅलरी स्लीप म्हणजे उद्योजकाने महिन्याकाठी दिलेली रक्कम होय. त्यात सॅलरी कॅल्क्यूलेट आणि तुम्हाला ती कशी पाठवली आहे, यासंबंधी सर्व तपशील असतात. आम्हाला आशा आहे की, तुम्हाला सॅलरी स्लीपविषयी सर्व काही समजले असेल.

सतत विचारले जाणारे प्रश्न

भत्ता म्हणजे काय?

भत्ता हा उद्योजकाद्वारे कर्मचार्‍यास दिलेला आर्थिक लाभ असतो. यातील काही भत्ते अधिकृत कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍याने वहन केलेल्या खर्चासाठी आहे. 

मला सॅलरी स्लीप कशी मिळेल?

तुम्ही खाली दिलेल्या दोन मार्गांपैकी एक निवडू शकता:

1. तुमच्या उद्योजकाच्या मानव संसाधन, वित्त किंवा प्रशासन विभागांकडून सॅलरी स्लीप किंवा पे-स्लीप मिळवा.

2. पेरोल सेवा प्रदाता जो तुमच्या उद्योजकाचे पगार आणि सॅलरी मॅनेज करतो.

सॅलरी स्लीप हरवल्यास काय करावे?

तुमची सॅलरी स्लीप हरवल्यास वित्त किंवा मानव संसाधन विभागाला तुम्ही विनंती करू शकता. तुम्ही नवीन नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा तुम्ही मागील उद्योजकाला सॅलरी स्लीपची विनंतीदेखील करू शकता. उद्योजकाद्वारे प्रदान केलेले सॅलरी प्रमाणपत्र सॅलरी स्लीपऐवजी विचारात घेतले जाते.

सॅलरी स्लीप कोणाला मिळू शकेल?

प्रत्येक कर्मचार्‍यांना सॅलरी स्लीप मिळू शकते. खरं तर, प्रत्येक कर्मचार्‍याला त्याच्या उद्योजकाकडे सॅलरी स्लीपची विनंती करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. ती हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी असू शकते.

आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत सॅलरी स्लीपमध्ये कोणती सूट आहे?

आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत भत्त्यामध्ये घरभाडे, सुट्टी प्रवास भत्ता, संशोधन आणि शिष्यवृत्ती भत्त्याचा समावेश आहे.


 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.