written by Khatabook | June 29, 2021

भारतात जिम व्यवसाय कसा सुरू करायचा?

×

Table of Content


फिटनेसचा ट्रेंड सध्या सगळीकडेच जोरात सुरू आहे. त्यामुळे फिटनेसने आता एका इंडस्ट्रीचे रूप धारण केले आहे. तसेही आपल्या देशात जिम फार लोकप्रिय आहे, खास करून तरुण वर्गात याचे जास्त आकर्षण आहे. पण, काही जण घरातूनच व्यायाम करायला प्राधान्य देतात. मात्र, जिममध्ये योग्य सोयी-सुविधा असल्याने सध्याच्या पिढीची पावलं जिमकडे वळत आहेत. कारण बहुतेक लोकांना जागा खरेदी करून किंवा घरात जिमचे उपकरण बसवणं महागात जाते. ते जिममध्ये सहज उपलब्ध असते. व्यायाम करण्याचे विविध प्रकारही जिममध्ये शिकायला मिळते. यापेक्षाही ज्यांना स्वत:ला अधिक सकारात्मक आणि ताजतवाणं ठेवायचं असल्यास त्यांनी जिम जाॅईन करायला पाहिजे.

2022 पर्यंत फिटनेस इंडस्ट्रीची एकूण वाढ 32 अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे, यात जिम आणि स्लिमिंग सेवेचे एकूण 6.6 अब्ज डॉलर्सचे योगदान असणार आहे. जिम सुरू करण्याचा विचार करणार्‍यांसाठी, या ब्लॉगमध्ये जिम व्यवसाय कसा सुरू करायचा आणि त्याचे कायमस्वरूपी व्यवसायात कसे रुपांतर करायचे याबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती दिली आहे.

व्यवसाय माॅडेल निवडा

आपण निवडलेल्या व्यवसायाचे मॉडेल ठरवते की, आपण सेट केलेल्या क्षेत्रात आपली जिम किती चांगले कार्य करू शकेल. आपण कोणत्या व्यवसाय माॅडेलचा वापर केला पाहिजे किंवा कोणते व्यवसाय माॅडेल आपल्यासाठी योग्य आहे, यासाठी खाली दिलेल्या व्यवसाय माॅडेलचा आपण विचार करू शकता:

1. मेंबरशिप मॉडेल:

  • हे सामान्य व्यवसाय मॉडेल असून जिममध्ये याचा वापर बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. या माॅडेलमध्ये ग्राहक मासिक फी भरतात, यामुळे आपल्याला नियमित उत्पन्न मिळते.
  • जर आपण चांगली मागणी असलेल्या क्षेत्रात जिम सेट केले तर आपल्याकडे अधिक ग्राहक येतील. हे मॉडेल जोरदार फायदेशीर ठरू शकते.
  • जर तुमचा मासिक खर्च 50000 रुपये आणि मासिक मेंबरशिप फी 1000 रुपये असल्यास आपल्याला आपला खर्च भागवण्यासाठी किमान 50 मेंबरची आवश्यकता असेल.

2. जेवढे वेळा जाल तेवढेच पे करा माॅडेल:

  • जिम सुरू करून काहीच दिवस झाले असल्यास जिममध्ये नवीन ग्राहक मिळवण्याचा विचार करीत असल्यास हे मॉडेल उत्कृष्ट कार्य करते.
  • खास करून ज्यांना जिममध्ये रोज यायला वेळ मिळत नाही. पण, त्यांना फिटनेस मेंटन करायचा आहे. अशा लोकांसाठी हे माॅडेल छान आहे.
  • उदाहरणार्थ, पॅकेज 10 भेटींसाठी 1000 रुपये असल्यास त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा 10 वेळा ते जिमला भेट देऊ शकतात.

3. विविध पॅकेजस मॉडेल:

  • ​​​​आपण वजन कमी करण्यासाठी किंवा बॉडीबिल्डिंगच्या प्रशिक्षणासह जिम किंवा फ्रेंचायजी किंवा फिटनेस-संबंधित इतर प्रोग्राम सुरू केल्यास हे मॉडेल कार्य करते. ​​​​​
  • ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि लक्ष्यांवर आधारित विविध पॅकेजेस या माॅडेलमध्ये दिले जाते.आपण मोठ्या शहरांमध्ये चांगल्या परिसराजवळ आपले जिम उघडल्यास हे मॉडेल अधिक फायदेशीर ठरू शकते.​​​​​​

4. एकीकृत मॉडेल:

  • हे मॉडेल मेंबरशिप एकत्र करते आणि जेवढे वेळा जाल तेवढे पे करा मॉडेल जिम आणि ग्राहक दोघांनाही मदत करते.
  • नियमित मेंबर्सना मेंबरशिप मॉडेलचा फायदा होऊ शकतो, परंतु अनियमित मेंबर इतर पर्याय निवडू शकतात.
  • हे सुनिश्चित करेल की आपल्याकडे उच्च ग्राहक आधार आणि स्थिर उत्पन्न आहे.

लोकेशन निवडणे एक कला

जिमसाठी लोकेशन निवडणे एक महत्वाचा घटक आहे जे आपल्या जिमचे भवितव्य ठरवेल. निवासी क्षेत्र, जास्त वस्ती असलेले ठिकाण, अपार्टमेंट किंवा कॉम्प्लेक्सजवळ आपली जिम स्थापित करणे योग्य आहे. निवासी क्षेत्राशेजारी जागा उपलब्ध नसल्यास, कमी भाड्याने उपलब्ध असलेल्या जवळच्या संभाव्य ठिकाणी मोठी जागा निवडा. निवासी क्षेत्राजवळील जिम्समध्ये लोक सकाळी आणि संध्याकाळी गर्दी करतात. म्हणून जागा मोठी निवडणं कधीही चांगलंच असते.

हेही वाचा: भारतात बेकरी व्यवसाय कसा उघडायचा? अधिक महसूल निर्मितीसाठी काही टिप्स!

भारतात जिम सेटअप करायला लागणारी रक्कम

भारतात जिम सेटअप करायचे म्हणजे पूर्णत: तिचा आकार, सुविधा, गुणवत्तेची उपकरणे आणि आपण नियुक्त केलेले प्रशिक्षक यावर अवलंबून असते. येथे त्याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे:

  • जागा आणि रेंट: जास्तीतजास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी जिम प्रशस्त असणे आवश्यक आहे. यासाठी कमीतकमी 10,000 चौरस फूट क्षेत्राची आवश्यकता असेल. लोकेशननुसार या मोठ्या जागेच्या रेंटची किंमत कुठेही 30,000 रुपये ते 5,00,000  रुपयांपर्यंत असू शकते.
  • उपकरणे: चांगल्या जिमला विविध प्रकारचे उपकरणे ऑफर करावी लागतील आणि त्यांची संख्याही अधिक असायला पाहिजे, जेणेकरून जास्त लोक एकाच वेळी वर्क आउट करू शकतील. जर आपण लहान जिम सुरू करत असाल तर मूलभूत उपकरणांचा खर्च 5,00,000 रुपये तर प्रगत उपकरणांसह उत्तम जिम सेट करण्यासाठी  50,00,000 रुपये लागू शकतात.
  • इंटिरिअर्सः जर आपण एखाद्या उच्चभ्रू भागातील ग्राहकांना आकर्षित करणार असाल तर तुमच्या जिमचे इंटिरिअर्स अभिजात वाटले पाहिजे. इंटिरिअर डिझायनिंगसाठी 2,00,000 रुपये ते  5,00,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
  • स्टाफ मेंटेनन्स: फ्रंट डेस्कच्या रिसेप्शनिस्टसह स्टाफ मेंटेनन्ससाठी 30,000 रुपये ते 60,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाते. तसेच त्यांना किती वेतन द्यायला पाहिजे, हे आपल्याजवळ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येवरून ठरवता येते.
  • प्रशिक्षक: पात्र प्रशिक्षकांची भरती करण्यासाठी थोडासा खर्च होऊ शकतो. तो खर्च 1,00,000 रुपयांच्यावर ही जावू शकतो किंवा ते तुमच्या जिममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते.  

आवश्यक परवाने मिळवा  

सर्व व्यवसायांनी सरकारने निश्चित केलेलं नियम आणि कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे पाळायला पाहिजेत. येथे कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे त्याविषयी माहिती दिली आहेः

  • जिम रजिस्ट्रेशन. इतर प्रत्येक व्यवसायाप्रमाणे, आपले  फिटनेस सेंटरदेखील एकतर मालकी, भागीदारी फर्म किंवा कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे.
  • अन्य कागदपत्रांमध्ये इमारत परवानग्या, गुंतवणूकीशी संबंधित प्रारंभिक करार, कर नोंदणी, प्रक्रिया आदींचा समावेश आहे.
  • इनडोअर स्विमिंग पूल, स्पा, लॉकर रूम्स आणि यासारख्या आणखीही जिम सुविधांसाठी विशेष परवानगी.
  • विमासुद्धा जिमचाचा एक प्रमुख भाग आहे कारण, अपघात आणि उपकरणासंबंधित नुकसान झाल्यास त्याला संरक्षित करणे आवश्यक आहे.
  • व्यवसायाने 20 लाखापेक्षा अधिक उलाढाल केल्यास जीएसटी नोंदणी अनिवार्य आहे, काही राज्यात ती रक्कम 10 लाख आहे.
  • फिटनेसशी संबंधित सर्व व्यवसायासाठी पोलिस विभागातील मंजुरीदेखील आवश्यक आहे.

फिटनेस प्रशिक्षक हायर करा

तुम्ही जिमचा व्यवसाय सुरू करता तेव्हा फिटनेस प्रशिक्षकांची नेमणूक करणे महत्वाचे आहे. फिटनेस प्रशिक्षक योग्य पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी मदत करू शकतात आणि ग्राहकांना वैयक्तिक सल्ला ही देऊ शकतात. या सेवेमुळे त्यांचे दीर्घकालीन सदस्यत्व निश्चित होईल.

  • ते वर्कआउट सत्राचे समन्वय साधायला आणि सदस्यांना व्यायामाचा दिनक्रम तसेच मशीन्सचे वाटप करण्यास मदत करतात. यामुळे कमी वेळात तुमच्या बऱ्याच समस्या सुटण्यास मदत होईल.
  • अनुभवी प्रशिक्षकामुळे सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. तसेच, त्यांच्या अनुभवांद्वारे आपल्याला जिम अजून सर्वोत्तम बनवण्यासाठी आयडियाही मिळू शकतात.
  • अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की, फिटनेस प्रशिक्षकांची भरती करणे महाग असू शकते आणि ते कदाचित 1,00,000 रुपयांच्यावर ही जावू शकते. तसेच, आपल्याला किती प्रशिक्षक हवेत यावरही ते अवलंबून असते.

फिटनेस प्रशिक्षक हायर करण्यापूर्वी, येथे काही महत्वाची प्रमाणपत्र तुम्ही पाहू शकता:

  • GFFI (गोल्ड जिम फिटनेस इन्सीट्युट)
  • BFY Sports & Fitness (बीएफवाय स्पोर्ट्स ॲन्ड फिटनेस)
  • CBT (सर्टीफाईड बाॅडीबिल्डींग ॲन्ड जिम/ पर्सनल ट्रेनर)
  • IAFT (इंडियन ॲकेडमी ऑफ फिटनेस ट्रेनिंग)

उपकरणं आणि इंटेरिअर्स

सर्व जिमसाठी उच्च-गुणवत्तेची उपकरणे महत्त्वपूर्ण आहेत. आपल्या जिम सेटअपमध्ये हे मूलभूत उपकरणे असायला पाहिजेत:

  • ट्रेनिंग बेंचेस: ही विविध प्रकारच्या व्यायामासाठी वापरली जाणारी मूलभूत उपकरणे आहेत. आपल्यालाजवळ ते अधिक प्रमाणात असायला पाहिजे, कारण ते वजन उचलण्यासाठी वापरले जातात. बेंच उच्च दर्जाचे आणि समायोजित करायला सोपे जातील असेच पाहिजे.
  • फ्री वेटः यात डंबबेल सेट, बारबेल सेट, केटलबेल सेट्स, वेट प्लेट्स आणि इतरही अनेक उपकरणे समाविष्ट आहेत. कारण जिममध्ये सर्वांत जास्त वापरली जाणारी ही उपकरणे आहेत, जिममध्ये जास्त सदस्य नसले तरी ही उपकरणे मोठ्या प्रमाणात असल्याची खात्री करून घ्या.
  • पुल अप फ्रेम्स आणि बार्स:  हे बॉडीवेट व्यायामासाठी आहेत आणि माउंटिंगसाठी भिंत किंवा त्यासाठी आधार आवश्यक असेल. स्क्वॉटिंग रॅक आणि बारबेल ठेवण्यासाठी रॅकही गरजेच्या आहेत.
  • कार्डिओ उपकरण: ट्रेडमिल, स्थिर सायकली आणि पंचिंग बॅग ही सर्व प्रकारची कार्डिओ उपकरणे आहेत जी सर्व जिममध्ये आवश्यक असतात. यांची संख्या कमीतकमी 5-15 पर्यंत असायला पाहिजे. पंचिंग बॅग कमी असल्या तरी चालतील पण त्यांना आधारासाठी जागा गरजेची आहे.
  • अ‍ॅक्सेसरीजः इतर बरीच उपकरणे आहेत जी जिमसाठी आवश्यक आहेत, जसे की रेझिस्टन्स बँड, फिटनेस बॉल, रोइंग मशीन, अ‍ॅब व्हील्स, मॅट्स, बॅटल रोप्स आदी.
  • इंटिरिअर्सः जिम बघताच क्षणी नजर खिळायला हवी अशी असायला पाहिजे. यासाठी चमकदार दिवे, चांगल्या पेंटिंग्ज आणि भरपूर प्रेरक पोस्टर्स बनवायला पाहिजे. तसेच, हॉलमध्ये आरसे आणि संरक्षक बम्परसह भिंती तयार केल्या पाहिजेत.

सदस्यांना प्रोत्साहित करणारे उपक्रम

योग्य जिमचे पॅकेज सदस्यांना जास्त काळापर्यंत रोखून ठेवू शकत नाही. तुम्ही यासाठी वेगळी युक्ती आखून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवू शकता जसे की, फॅट लाॅस उपक्रम, फिजियोथेरेपी, झुंबा, एरोबिक्स आणि सदस्यांना विशेष प्रशिक्षण देणारे उपक्रम आदी.

भारतात जिम व्यवसायाची मार्केटींग

मार्केटींग तुमच्या व्यवसायावर बराच प्रभाव पाडू शकते. मार्केटींगमुळे तुम्हाला जिमचे सुरूवातीचे प्रदर्शन आणि भविष्यात त्याची वाढ होण्यासाठी काय करावे लागेल हे कळायला सोपे जाईल. आपण ते खालील प्रकारे करू शकता:

  • वेबसाईट किंवा अ‍ॅप बनवून आणि लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन आपली ऑनलाईन ओळख तयार करुन प्रारंभ करा.
  • आपल्या वेबसाईटवर आपल्या सुविधा आणि ऑफरबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे. ब्लॉग लिहा आणि  SEO (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) साठी भरपूर कंटेंट तयार करा. बहुतेक वापरकर्ते Google चा वापर त्यांना हवे ते शोधण्यासाठी करतात, तुमच्याजवळ SEO ची चांगली रणनीती असल्यामुळे त्याचा मोठा फायदा मिळू शकतो.
  • तुमचा व्यवसाय जलद वाढवण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामचा वापर करू शकता. आपल्या सोयीनुसार जिममध्ये वर्क आउट करणाऱ्या लोकांचे फोटो पोस्ट करा. तसेच, तुमच्या जिममध्ये काय सुरू आहे हे लोकांना दाखवण्यासाठी रोज मनोरंजक स्टोरी तयार करा.

जिम फ्रॅंचायजी

जर आपण भारतात जिम प्लॅन शोधत असल्यास त्यासाठी जास्त अनुभवाची आवश्यकता नाही, तुमच्यासाठी फ्रेंचायजी निवडणे उत्तम पर्याय ठरू शकतो. जिमच्या फ्रॅंचायजीची किंमत महाग असू शकते, परंतु हे आपल्याला सुरूवातीपासूनच होणाऱ्या त्रासातून वाचवते. जिमसाठी फ्रँचायजी निवडणे आपल्याला उद्योगाबद्दल बरेच काही शिकण्यास मदत करते. त्या ज्ञानामुळे आपण आपली स्वतःची जिम सुरू करू शकता आणि समस्या सोडवू शकता.

जिम मॅनेजमेंट सॉफ्टवेअर

आपल्या जिमचा व्यवसाय शेकडो सदस्यांसह वाढवण्याचा विचार करत असल्यास, आपल्याला निश्चितपणे जिम मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची आवश्यकता असेल. सॉफ्टवेअर वैयक्तिक सदस्य, त्यांच्या दिनचर्या, प्रगती, विशेष गरजा, टिप्पण्या आणि नियमितपणावर ट्रॅक ठेवू शकते. ही सर्व माहिती आपल्याला व्यवसाय मेट्रिक्स निर्धारित करण्यात मदत करू शकते. हे सॉफ्टवेअर महाग असू शकते त्यामुळे आपला व्यवसाय वाढत असताना आपण त्याचा वापर करू शकता.

निष्कर्ष

एक चांगला जिम व्यवसाय ज्या ठिकाणी तो स्थापित केला जातो, प्रारंभिक गुंतवणूक उपकरणे, इंटेरिअर्स, स्पेस, प्रशिक्षक आणि दीर्घकालीन व्यवसाय मॉडेल यावर अवलंबून असतो. ज्यांना या व्यवसायाचा अनुभव आहे किंवा ज्यांना फ्रॅंचायजीमध्ये आवड आहे त्यांच्यासाठी हा चांगला बिजनेस पर्याय आहे. ज्यांना या व्यवसायात करिअर घडवायचे आहे त्यांना एवढी माहिती असणे गरजेचे आहे. 

सतत विचारले जाणारे प्रश्न

भारतात जिम उघडणे फायदेशीर आहे का?

नफा हा जिमचे लोकेशन आणि आपण देऊ केलेल्या सेवा यावर अवलंबून असतो. अंदाजित गुंतवणूक 50 लाखापर्यंत जावू शकते, तुमचा वार्षिक नफा ऑपरेशनल काॅस्टनंतर 15 लाखापर्यंत जावू शकतो.

व्यवसाय म्हणून जिम सुरू करणे चांगले आहे का?

 विशेष म्हणजे जिममध्ये लागणारी प्रारंभिक गुंतवणूक अधिक आहे. हे यशस्वीरित्या चालवण्यासाठी, आपल्याला या इंडस्ट्रीविषयी काही अनुभव आवश्यक आहे. आपल्या व्यवसाय मॉडेलच्या आधारावर तसेच, तुम्ही ते कसे सेट केले आहे. यावर व्यवसायाचे यश अवलंबून आहे.

भारतात जिम सुरू करण्यासाठी किती गुंतवणूकीची आवश्यकता आहे?

आपण बर्‍याच ग्राहकांची अपेक्षा करत असल्यास चांगल्या क्षेत्रात दर्जेदार जिम सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी सुमारे 50 लाखांची गुंतवणूक करावी लागू शकते. जर आपला बजेट कमी असल्यास 10 लाखापर्यंत खर्च येवू शकतो.

जिम ट्रेनरचा पगार किती असतो?

फ्रेशर्सना कुठेही 15 हजार ते 20 हजारापर्यंत पगार दिला जातो. अनुभवी प्रशिक्षकांना 40 हजार ते 1 लाखापर्यंत दिला जातो. विशेष प्रमाणपत्र असणार्‍यांची सुरूवात 60 हजारापासून सुरू होते.

जिम मालकांना कोणत्या अडचणी असतात?

मुख्य अडचण म्हणजे सुरूवातीस ग्राहक येतात की नाही ही असते. त्यानंतर स्टाफचा खर्च आणि वित्त व्यवस्थापनाची व्यवस्था याविषयी अडचणी असतात.

जिममध्ये किती सदस्य असतात?

मोठ्या जिममध्ये, अंदाजे 1000 सदस्य असतात, खासकरून ते फ्रॅंचायजी असल्यास.









 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.