written by khatabook | October 20, 2020

बिलिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय? - हे वित्तपुरवठ्यात लहान व्यवसायांना कशी मदत करते?

×

Table of Content

बिलिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय?

लहान किंवा मोठ्या कोणत्याही व्यवसायात विविध कारणांसाठी बिल तयार करण्याची आवश्यकता असते. बिल हा लेखी दस्तऐवज आहे ज्यात विक्री केलेल्या वस्तूंचा किंवा ग्राहकांना दिलेल्या सेवांचा तपशिल असतो. बिल सेवा प्रदात्याने तयार केले असते आणि ते खरेदीदाराच्या स्वाधीन करण्यात येत. जुन्या काळात, प्रत्येक व्यवसाय सेवेसंबंधी सर्व तपशिल दाखल करून बिल मॅन्यूअली तयार केले जात असे. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण बिलिंग सॉफ्टवेअर वापरू शकता जे आपले बिले तयार करण्यास मदत करते. यामुळे प्रक्रियेस गती मिळून, अचूकता सुधारण्यासही मदत मिळते. बिलातील आवश्यक तपशिलांमध्ये विक्रेता आणि खरेदीदाराचे नाव, पत्ता, संपर्क इत्यादी तपशील समाविष्ट असतील. तसेच सुलभ ट्रॅकिंगसाठी बिल क्रमांक, विक्री केलेल्या प्राॅडक्ट्सचा किंवा सेवेची किंमती, कर तपशिल आणि देय निर्देशांसह तपशिल प्रदान करण्यात येतो.

बिलिंग सॉफ्टवेअरद्वारेऑफर केलेली फिचर्स

बाजारात उपलब्ध ऑनलाईन बिलिंग सॉफ्टवेअर व्यवसायात आयुष्य सुकर बनवणारी अनेक फिचर्स प्रदान करते. आपल्याला फक्त एकदाच सॉफ्टवेअर इन्स्टाॅल करावे लागेल आणि आपण भविष्यात बिले तयार करणे चालू ठेवू शकतो.

  • इनव्हाॅईस निर्मिती - हे भारतातील प्रत्येक बिलिंग सॉफ्टवेअरचे मूलभूत फिचर आहे जे प्रकल्प, वेळ आणि ग्राहकांचे तपशिल काढून एक व्यावसायिक इनव्हाॅईस तयार करते.
  • ग्राहक रेकॉर्ड तयार करणे - काही प्रगत बिलिंग सॉफ्टवेअर ग्राहक तपशिल आणि खरेदी माहिती सारांशित करण्यास मदत करते. स्मार्ट सिस्टम सहज प्रवेश आणि संदर्भासाठी प्रत्येक ग्राहकांच्या नावाखाली तपशिल वेगळा करते.
  • क्रेडिट कार्डची प्रक्रिया - रेस्टॉरंट्ससारख्या व्यवसायांसाठी डिझाईन केलेले बिलिंग सॉफ्टवेअर जे ग्राहकांच्या क्रेडिट कार्डवर प्रक्रिया करतात.तसेच, ग्राहकांना थकबाकीवर पेमेंटसाठी रिमाईंडर देखील पाठवते.
  • कस्टमाईज टेम्पलेट्स - हे फिचर्स व्यवसायाला इनव्हाॅईस तयार करण्यास आणि ग्राहकांच्या गरजा आणि फिचर्सवर आधारित कस्टमाईज करण्यास अनुमती देते. अशा प्रकारे हा एक वेळचा अभ्यास भविष्यातील बिलिंग जलद आणि अचूक करेल. </ Span> </ b>
  • कर रिपोर्ट निर्मिती - –सर्वोत्तम ऑनलाईन बिलिंग सॉफ्टवेअर कर रिपोर्ट तयार करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे. या रिपोर्टच्या मदतीने कर रिपोर्ट तयार करण्यासाठी कोणत्याही बाह्य सिस्टमवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही.

जीएसटी बिलिंग सॉफ्टवेअर

भारत सरकारकडून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करून 3 वर्षे झाली आहेत आणि छोट्या व्यवसायांना कर भरणे मॅनेज करण्यासाठी वस्तू सेट करायच्या आहेत. जीएसटी करांच्या कमीतकमी कॅसकेडची खात्री देते ज्यामुळे ती महागाईविरोधी पद्धत आहे. जीएसटीच्या सहाय्याने व्यवसाय करण्यास मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे. मोफत जीएसटी बिलिंग सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना जीएसटीची गणना करण्याची आणि कोणत्याही वेळी कर भरण्याची परवानगी देते. वेळ आली आहे आणि सर्व व्यवसायांनी आता प्रत्येक व्यवसायाच्या व्यवहारासाठी जीएसटी इनव्हाॅईस सादर करणे आवश्यक आहे.

योग्य मोफत बिलिंग सॉफ्टवेअर कसे निवडावे?

  1. सॉफ्टवेअर सुरक्षित आहे आणि ते आपली माहिती गोपनीय ठेवेल याची खात्री करा.
  2. पुढे येते प्रवेशयोग्यता. हे सुनिश्चित केले पाहिजे की बिलिंग सॉफ्टवेअर भिन्न प्लॅटफॉर्मवर सुसंगत आहे आणि ऑपरेटिंग सिस्टमशिवाय लॅपटॉप, पीसी, स्मार्टफोनद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो.
  3. व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बिलिंग सॉफ्टवेअरची क्षमता विद्यमान ईआरपी आणि अन्य सॉफ्टवेअरसह एकत्रित करण्याची आहे.
  4. हे सर्व कर-संबंधित तपशिल आणण्यात आणि व्यवसायाचा वेळ अकाउंटींगमध्ये वाचवण्यात सक्षम असणे आवश्यक आहे. तसेच, स्मार्ट सिस्टम महत्वाची आहे.
  5. अखेरीस, हे सोपे आणि प्रतिसाद देणारे आहे की नाही तसेच, सामान्य माणसं याचा वापर करणं सहज शिकतील की नाही हे तपासा.

छोट्या व्यवसायांसाठी बिलिंग सॉफ्टवेअरचे फायदे

बिलिंग सॉफ्टवेअर केवळ स्वयंचलित बिलिंगच प्रदान करणार नाही तर असंख्य मार्गांनी मदत देखील करेल. जसे की, आर्थिक बाबी अधिक चांगल्या प्रकारे हाताळणे आणि प्रत्येक लहान व्यवसाय फायदेशीर बनवणे.

प्रभावी- खर्च

असे बरेच मोफत ऑनलाईन बिलिंग सॉफ्टवेअर आहेत जे खर्च वाचवतात आणि छोट्या व्यावसायिकांसाठी ते आदर्श आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त, हे मॅन्यूअली दाखल करण्याची वेळ कमी करू शकते आणि म्हणूनच आपल्याला त्या उद्देशाने केवळ एखाद्या व्यक्तीस रूजू करून घेण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच, आपण मानवी संसाधनांचा खर्च देखील वाचवू शकता. काहीही खर्च न करता अचूक बिल तयार करणे हे व्यवसाय मालकांसाठी एक वरदान आहे.

इंटेलिजेंट मॅनेजमेंट सिस्टम

प्रत्येक ग्राहकाचे तपशिल फक्त एकदाच सॉफ्टवेअरवर अपडेट केले जाऊ शकते आणि सॉफ्टवेअरने दिलेला कस्टमाईज उपाय पुढील वेळीपासून तपशिल घेईल. यामुळे व्यवसायाला ग्राहक पत्त्यावर प्रवेश करणे यासारख्या क्षुल्लक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि प्रत्येक वेळी मॅन्यूअली प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या इतर वैयक्तिक तपशिलांवर लक्ष देणे थांबवता येईल. यामुळे वेळ आणि बर्‍याच प्रयत्नांची बचत होते, म्हणनच ती एक प्रभावी व्यवस्थापन सिस्टम बनते.

त्रुटी मुक्त

या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये सिस्टम मोजणी त्रुटी-मुक्त आहे. जेव्हा सिस्टममध्ये डेटा दाखल केला जातो तेव्हा फक्त संभाव्य चूक उद्भवू शकते. परंतु बिलिंग सॉफ्टवेअरची स्मार्ट फिचर्स ग्राहक फाईलमधून ऑनलाईन डेटा काढू शकतात. म्हणून, गणना त्रुटी-मुक्त होते ज्यामुळे ही अडथळा रहीत प्रक्रिया बनते.

सुरक्षित & विश्वसनीय

ऑनलाईन सिस्टम सुरक्षित आहेत आणि ही सर्व सॉफ्टवेअर एनक्रिप्टेड आहेत जी कोणत्याही गोपनीय माहितीस बाहेर जाऊ देणार नाहीत. व्यवसाय आणि ग्राहक दोघेही डेटा सुरक्षिततेबद्दल खात्री बाळगू शकतात.

मान्यतांचे पालन

जेव्हा सॉफ्टवेअर जीएसटी बिले तयार करते तेव्हा सरकारी नियमांचे पालन न करण्याची भीती नसते. यामुळे आपल्याला चिंता न करता व्यवसाय वाढवण्याचा आत्मविश्वास येईल आणि तुम्हाला सरकारी कर्जासाठी अर्ज करण्यास देखील मदत होईल. यशस्वी व्यवसायाच्या प्रवासासाठी सुरूवातीला चांगल्या गोष्टींची मांडणी करणं आवश्यक आहे.

प्रतिष्ठा मिळवते

बिलिंग सॉफ्टवेअर प्रभावी, अचूक आणि जलद बिले देतात असे म्हटल्यावर आपण निश्चितच आपल्या ग्राहकांमध्ये प्रतिष्ठा मिळवू शकता. आनंदी ग्राहक आपले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत जे आपल्याला बर्‍याच व्यवसाय संधींसाठी रेफर करतील. आपण विद्यमान ग्राहक टिकवून ठेवू शकता आणि त्यांच्या रेफरन्सने अधिक ग्राहक जोडू शकता. बिलिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने, व्यवसायाची थेट आणि अप्रत्यक्षरित्या आर्थिक वाढ होते.

शेवटची सूचना

सुरूवातीस, एखादी व्यक्ती जीएसटी बिलिंग सॉफ्टवेअरची मोफत आवृत्ती वापरण्याचा प्रयत्न करू शकते आणि ती कशी वापरली जाऊ शकते याबद्दल तो आयडिया प्रदान करेल. पुढे, वर सूचीबद्ध सर्व फायद्यांचा आनंद घेता येईल आणि ते आपल्याला कोणत्याही बिलिंग सॉफ्टवेअरवर विश्वास ठेवण्यास प्रेरित करेल, जे कोणत्याही मर्यादेशिवाय अनेक फिचर्स ऑफर करते. थोडक्यात, आपण ऑनलाईन बिलिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने त्रास-मुक्त, प्रभावी-खर्च, अचूक आणि जलद बिलिंगचा आनंद घेऊ शकता.

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.